आमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक भेळ आहे. रामण्णा बुट्टी भेळ.
एका (प्लास्टिकच्या) बुट्टीत तिघा चौघांना पुरेल असा चिवडा, पातीचा कांदा, शेंगदाणे, कोथमीर, थोडं नावापुरतं फरसाण आणि मटकी शिजवून अशी भेळ देतात. वरून एक आक्खा कांदा आणि हिरव्या मिरच्या. बास. हिला मटकी भेळ असेही म्हणतात. यात चिंचेचा कोळ गूळ वगैरे काही नसते. चिवडा देखील आपले लांबडे मुरमुरे हळदीत आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेले.
आमचा आज्जा कधीतरी असे चिरमुरे फरसाण घरी घेऊन यायचा. आणि आम्ही मग कांदे चिरून कधी कधी टमेटो (पूर्वीचा उच्चार टोमॅटो) चिरून अशी सुकी भेळ करून खात असू.
एखाद्या देवळाला जाताना हमखास या भेळेचे सामान घेऊन जाऊन तिथे अशी भेळ करून खाल्ली जायची. लहान पल्ल्यांच्या सहलींच्या नियोजनात आयत्यावेळेस देखील येऊन मंच गाजवणारा यशस्वी कलाकार असावा तशी ही भेळ. किंवा एखाद्या देवस्थानात लग्नाला जायला निघालेले वर्हाड असो, तिथे लगेच स्केल होऊ शकणारा हा नाश्ता कुणीतरी नियोजनपट्टू हमखास एकदम टाईट बजेट मधे बसवतोच.
हिच्याबद्दल कुणी फारसे पॅशनेट नसते. हे एक बरे आहे, खरेतर अस्मितांचे गंड नाहीसे करायला भेळेवर माणसांनी एकमेकांशी बोलावं. तोंड खवळून घ्यावं पण पुढचा बकाणा भरण्यासाठी. आणि वचावचा बोलणं थांबवावं.
त्यानंतर गावी गेल्यावर Knock Out किंवा एल.पी. सारखी थर्ड क्लास सुंदर बियर घेऊन दोस्तांचे टोळके गेले की पुन्हा अशीच भेळ साथीला.
नोकरी लागल्यावर फक्त बियरचा ब्रँड बदलला मॅग्नम बडवायझर किंवा मिलर वगैरे, (उगाच आपला लायकी नसलेला शो ऑफ, लायकी एल पीचीच). पण भेळ तीच. मटकी भेळ तर खासच. आणि असल्या फाटक्या बियरपार्टीला असलीच भेळ पाहिजे. हार्ड लिकर वगैरे साठी इतर उच्चभ्रू चकणे.
मग दूर गावाबाहेर एखादा वन बीएच के किंवा अजून थोडा मोठा ब्लॉक किंवा नवं बैठं घर असो की त्याचे बांधकाम कुठवर आले आहे त्या विझिट मधे बायको पोरांबरोबर गावठी चैन करायला आपले एक मध्यमवर्गीय रिच्युअल. हा एक टप्पा पूर्ण होत असताना भेळ असते साथीला.
मग तेच चक्र पुन्हा.
मला काही कधी चौपाटी समुद्रकिनारा लाभला नाही. तिथेही हिचे प्रकार मिळत अस्तात. ओल्या भेळेला ग्लॅमर आहे, आजकाल तिच्यात कैरीपासून अननसापर्यंत काहीही टाकतात मात्र ही अजून ही एकदम रिलायबल आहे. पेपरवर खा नाहीतर कागदी प्लेटात खा किंवा थेट आमच्या सारखे बुट्टीत खा. काही नखरे नाहीत.
हा फोटो रेडिटवर पाहिला.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
3244
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
रामण्णा भेळ
अहाहा.
In reply to रामण्णा भेळ by हणमंतअण्णा शंक…
ह्या मुरमुर्यांना ट्रान्सपरंट फोड असतात.हे पंढरपुरी चुरमुरे. समस्त सोलापूर आणि मराठवाड्यात हेच चुरमुरे चालतात. हे भडंगच्या चुरमुर्यापेक्षा हलके, पोकळ आणि कुरकुरीत असतात त्यामुळेच ह्याचा चुराही होतो पटकन. केलेल्या चिवड्याच्या तळाशी मीठमसाल्यासोबत बसतो. सोलापुरात खैरमोडे, कत्ते आदी भडभुंजे लोक ह्या चुरमुर्यासाठी कित्येक वर्षे प्रसिध्द आहेत. भट्टीत भाजलेले चुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे, लाह्या आदीसाठी खास त्यांची दुकाने आहेत. पंढरपुर गावात भत्ता म्हणले जाते. दहाबारा मित्र मिळून त्यातीलच एखाद्याच्या दुकानात, हपिसात, कारखान्यात भत्ता करतात. दिड दोन किलो चुरमुरे, शेंगदाणा कच्चे तेल, शेंगादाणे, दाळे, तिखट, गोडा मसाला, मिठ हे सर्व एकत्र चोळले जाते हलक्या हाताने. तीन चार पेपर पसरुन त्यावर हा ढीग असतो. हौसेसाठी थोडा फरसाण , शेव, गाठी, पापड्या, बारीक चिरलेला कांदा आणि पिळलेले लिंबू. सुरुवातीला मंदाद्रीसम दिसणारा पर्वत गप्पा, गावच्या कुचाळक्या आणि समस्त दुनियेची मापे काढत कधी पेपरखाली गेलेले चुरमुरे हुडकण्यात बदलतो ते कळतही नाही. बार्शी गावात गुंड म्हणून एक भेळवाला होता. चुरमुर्याचा चिवडा, तिखट चिवडा, भाजक्या पोह्याचा चिवडा, ओल्या हरभर्याची उसळ, तिखट, मसाले, कांदा, कोथींबीर आणि शेव फरसाणाचे असे जालीम मिश्रण करायचा की बस्स. लहानपणी ह्याची हातगाडी होती, त्याचे हॉटेल झाले पण हॉटेलच्या दारात हातगाडी कायम. समस्त बेवडे, हौशी आणि कुंटुंबवत्सलांच्या गर्दीत हा पुडा मिळवणे म्हनजे दिव्य कामगिरी असायची. थोडीफार अशीच पण जरा सॉफिस्टिकेटेड भेळ पिंपरीमध्ये नितीन म्हणून कुदळे बंधूंची आहे त्यांची सुकी भेळ ही आवडते. लेखात वर्णिलेली बिरादाराची भेळ ही चाखली आहे. सोलापूरपासून जतकडे जाणारे पब्लिक (मुख्यत्वे गुड्डापूर धानम्माचे भाविक) भरपूर असलेने आणि सांगली जिल्हा, कर्नाटक बॉर्डर ही साम्यस्थळे असल्याने ही संस्क्रुती ओळखीचीच.भत्ता हा शब्द हा लेख
In reply to अहाहा. by अभ्या..
रतनपाशी असलेलं ते चिवड्याचं
In reply to भत्ता हा शब्द हा लेख by गवि
तुम्ही पण, LP Mild वाले दिसता...
बीयर
In reply to तुम्ही पण, LP Mild वाले दिसता... by मुक्त विहारि
नॉक आऊट.. प्रयोगशील होतात
कॅनन १०००० वरुन सुरुवात केली
In reply to नॉक आऊट.. प्रयोगशील होतात by गवि
तही गोरे भोरे रूढ
In reply to नॉक आऊट.. प्रयोगशील होतात by गवि
चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ!
कपाले उत्तम आहे. यात शंकाच
In reply to चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! by कांदा लिंबू
गावच्या आठवणी
In reply to कपाले उत्तम आहे. यात शंकाच by गवि
पद्मा टॉकीज समोरील दुकानामधे
In reply to गावच्या आठवणी by स्वधर्म
सांगली भडंग
In reply to पद्मा टॉकीज समोरील दुकानामधे by सिरुसेरि
+१
In reply to चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! by कांदा लिंबू
सांगलीच्या आसपास देखील अनेक भेळी आहेत
In reply to चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! by कांदा लिंबू
जयसिंगपूर [ नृसिंहवाडी ]-
In reply to चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! by कांदा लिंबू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1मी दोन वेळा कॅनन१०००० प्यालो.
आण्णा एकच नंबर लेख
वैर
In reply to आण्णा एकच नंबर लेख by स्वधर्म
पंढरपुर येथे "तुरीवाले" आणी
In reply to वैर by हणमंतअण्णा शंक…
कृबु ला विचारा की
In reply to वैर by हणमंतअण्णा शंक…
+१
चुरमुरे मुरमुरे
एल.पी. सारखी थर्ड क्लास ??
बियर? = गिनिज [पुर्णविराम]
वा! लेख आणि प्रतिसादात
जाता जाता: पुण्याच्या
In reply to वा! लेख आणि प्रतिसादात by विंजिनेर
हो आठवते ना
In reply to वा! लेख आणि प्रतिसादात by विंजिनेर
मी गेलो होतो तेव्हा
In reply to हो आठवते ना by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बरोबर! अगदी ३०
In reply to मी गेलो होतो तेव्हा by गवि
नाही तेव्हा ते दुकान तेव्हा
In reply to बरोबर! अगदी ३० by विंजिनेर
कल्याण