मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सैल धागे

गणेशा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मी: शेवटचं तुला भेटायचं राहून गेलं, स्वप्नच तू, जगायचं राहून गेलं... चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ, त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं... ती: अंतरातले अंतर मोजताना, अंतर काही संपत नाही… (२) अंतरात माझ्या पाहताना, अंतर तुला तिथेही नाही. मी: माळले नवकिरणांनी नभाचे हार, रात्रीस बिलगायचं, शेवटचं राहून गेलं... बांधले नजरेचे पूल या डोळ्यांनी, तुझ्यासवे शेवटचं चालायचं राहून गेलं... ती: चंद्र विसावला अंतरी तरी, अंतरात हे कसले अंतर? अंतरात खोल दडले, तुझे माझे सैल धागे - शब्दमेघ (६ फेब्रुवारी २०२६)

वाचने 402 वाचनखूण प्रतिक्रिया 3

चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ, त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं... अहाहा..! सुंदर कविता आवडली. काही तरी राहून गेलं अशा आशयाची कविता थेट पोहोचली. प्रेमात काही राहून जाण्याची हुरहूर आंनदायी असते. अपूर्व राजपूत या कवी मित्राच्या चार ओळी टाकण्याचा मोह होतो. याच एका विचारात पुन्हा भिजली गे दिठी युगे लोटली लोटली कान्हा राहिली रे मिठी -दिलीप बिरुटे ( गोड मिठीतला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणेशा Tue, 02/10/2026 - 23:09
युगे लोटली लोटली कान्हा राहिली रे मिठी.. काय सुंदर ओळी... मी कधीच असा विचार केला नव्हता, वा

श्वेता२४ Fri, 02/06/2026 - 13:14
अंतरातले अंतर मोजताना, अंतर काही संपत नाही… (२) अंतरात माझ्या पाहताना, अंतर तुला तिथेही नाही.