खग्रास सूर्यग्रहण : अविस्मरणीय अनुभव
ग्रहण बघण्याची खरी मजा ही खग्रास सूर्यग्रहणातच येते. मी २४/१०/१९९५ चे ग्रहण पाहिले होते. त्याची काही क्षणचित्रे लिहीत आहे.
१.‘खग्रास’ (म्हणजे ९९% अंधार) चा भौगोलिक पट्टा हा मर्यादित असतो. अन्य लांबच्या ठिकाणाहून ते खंडग्रास दिसते.
२. म्हणून एकटे जाण्याऐवजी माहितगार चमू बरोबर जावे. युवाशक्तीचे अभ्यासू लोक तारखेच्या आधीच इच्छीत ठिकाणाची पाहणी करून येतात.
३. त्यामुळे आमचे राहण्याचे ठिकाण हे त्या मैदानापासून अगदी जवळचे निवडले होते.
४. जे एकटे दुकटे लोक फत्तेपूर सिक्रीला राहिले होते त्यांना त्या सकाळी हॉटेल पासून जाम एकही वाहन मिळत नव्हते. ग्रहण आपली वेळ कधीही चुकवत नाही !!! तो निसर्ग आहे, माणूस नव्हे ! त्यामुळे अशा लोकांचे सहलीचे पैसे अक्षरशः पाण्यात गेले.
५. ते ग्रहण सकाळी ८ वा होते. त्यामुळे अंधाराचे प्रमाण ७०% च्याआसपासच राहिले. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता.
६. पण, त्यावेळेस पक्षी घरट्याकडे परतू लागले . तसेच बारीक थंडीही वाजू लागली. खग्रास काळ ३ मिनिटेच होता. जास्तीत जास्त तो साडेसात मिनिटेच असू शकतो.
७. खास चष्म्यातून सूर्याचा ‘करोना’ पाहिला. डोळ्यांचे पारणे फिटते.
८. त्या मैदानावर फक्त आमचा चमू होता. तेथील खेडवळ लोक जमले होते पण त्यांना याबद्दलचे काहीच ज्ञान नव्हते. फक्त आम्ही ४० जण असल्याने त्यांनी पटकन शेगडी आणून चहाचा धंदा करून घेतला.
९. एकून खग्रास पैकी बरीचशी समुद्रावर होतात. त्यामुळे आपल्याला जमिनीवरून पाहायला फार थोडी उरतात.
१०. १९९९ चे गुजरात मधून दिसले होते. ते पावसाळ्यात होते त्यामुळे दिसण्याच्या आशा नव्हत्या. पण मस्त दिसले असे वाचले होते. रस्त्यावरच्या ट्रकना दु. ३ वा. दिवे लावायला लागले होते.
११. आता भारतातून ५०-६० वर्षे तरी बहुतेक नाही. ज्या ठिकाणी ते होते तिथेच पुन्हा व्हायला अंदाजे ३५० वर्षे लागतात.
१२. अजून काही लाख वर्षानी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी मधली अंतरे बदलतील. त्यानंतर मात्र ‘खग्रास’ बंद होतील. फक्त खंडग्रास राहतील.
इतरांचे अनुभव वाचण्यास उत्सुक
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक खग्रास सुर्यग्रहण १९८०
बरोबर. तेव्हा बरेच लोक ते
एकदा ८०% इतके ग्रस्त झालेलं
प्रचेतस, एकदा तरी आयुष्यात
जगलो वाचलो तर २०३४ चं खग्रास
जगातील सर्वात सुंदर प्रकाश
जगातील सर्वात सुंदर प्रकाश
https://en.wikipedia.org/wiki
म्हात्रे काकांची मस्त सफर
धन्यवाद. दोन्ही निवांतपणे
सूर्य आणि त्याबद्धल मिळणार्
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sophia Loren Mambo Italianoमस्त माहिती
पृथ्वी = युएफो
मदनबाण, उपयुक्त माहितीबद्दल
खग्रास अजून बघितलंच नाहीय.
सूड, काय बी करा पन आयुष्यात
अबब ! काय हे शीर्षक?
मस्त धागा.
कल्पना छान