मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महामाया निळावंती (ऐसी अक्षरे ३८)

Bhakti · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
महामाया निळावंती लेखक-सुमेध 1 दोन वर्षांत २५ वी आवृत्ती प्रकाशित झालेली ही मराठी साहित्यातील आताची उत्कृष्ट कादंबरी आहे. जीवनाची लालसा मृत्यूला हरवायला पाहते. जीवनदेवी महामाया निळावंती सतत सूचवत असते, "गेलेल्याला आपल्या ठिकाणी जाऊ द्यावे,तुझ्यामध्ये विश्व आहे, त्याचा शोध घे!" सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून उगवलेली एक प्राचीन दंतकथा, रहस्यमयी निळावंतीची कथा, आजच्या काळात पुन्हा जिवंत होते. चारशे वर्षांपूर्वी निळावंती ही एक रहस्यमयी स्त्री होती .ती पशु-पक्ष्यांची, झाडांची, निसर्गातील मूक चेतनांची भाषा जाणत होती. तिच्याकडे मृत्यूला आव्हान देण्याची, प्राण फुंकण्याची कला होती.काळाच्या अनंत चक्रात निळावंती पुन्हा पुन्हा जागी होते.काळपुरुषाचा अवतार हा निळावंतीचा साथीदार हाही पृथ्वीच्या जन्मापासून तिचा शोधक आहे. काळाच्या अनंत उलथापालथीनंतर माणूस स्वार्थी-आत्मकेंद्रित होत गेला. निळावंतीशी निगडित एक प्राचीन पोथी आहे, जी जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर खेळते. आधुनिक काळात एक बाप आपल्या वैयक्तिक दु:खातून या पोथीचा शोध घेत सह्याद्रीत येतो, आणि तिथून कथा उलगडू लागते.कादंबरीत अनेक रहस्य एकात एक गुंफलेले आहेत. विक्रम, बाजिंदा, हेलबर्ग यांच्या रूपाने निळावंतीची प्राणप्रतिष्ठा करण्याची कला त्या स्वार्थी माणसाला आपल्या कडे पाहिजे. तेव्हा निळावंतीचा भाबडा जीव, मूक प्राणीमात्रांचे अस्तित्व याचा त्याला सतत विसर पडत राहतो.निळावंती मात्र निसर्गाशी एकरूप असते, ती मायाजाळ सहज पार करते, प्राण फुंकते, पण स्वार्थी मनाच्या काळ्या बाजू तिला पूर्णपणे समजत नाहीत आणि शेवटपर्यंत दगाफटका होत राहतो. लेखक सुमेध यांनी अठरा पौराणिक पोथ्या, ऐतिहासिक दस्तऐवज आणि तांत्रिक आख्यायिकांचा अभ्यास करून ही मेटाफिक्शन कादंबरी निर्माण केली आहे. वाचकांना खिळवून ठेवते आणि वाचून झाल्यावरही विचार करायला लावते. आणि हो, त्या ताम्हण फुलाच्या गूढाबद्दल तर खूप चर्चा झाली होती! काही आवृत्त्यांमध्ये वाचकांसाठी ताम्हण फुलांच्या बिया दिल्या होत्या.कोणाकोणाला मिळाल्या ताम्हण फुलांच्या बिया ?? कोणाकोणाचे त्या बिया रुजल्या? लेखकाच्या हस्ते हस्ताक्षरीत अशी प्रत मिळालेली मी एक भाग्यवान वाचक आहे! -भक्ती

वाचने 1071 वाचनखूण प्रतिक्रिया 6

अर्धवटराव Sun, 01/25/2026 - 02:01
निळावंती पुस्तकाबद्दल एक (गैर्?)समज ऐकला आहे.. ते तांत्रीक विद्येचं आरण्यक साहित्य आहे, साध्या संसारी माणसाने ते वाचलं तर त्याला वेड लागतं किंवा काहि अघटीत होतं.. असं बरच काहि. त्याच संकल्पनेवर आधारीत आहे का हे पुस्तक ?

In reply to by अर्धवटराव

Bhakti Sun, 01/25/2026 - 13:39
हो या कादंबरीत त्याच निळावंतीचे पात्र आहे.पण मेटाफिसिकल पद्धतीने लिहिली आहे.त्यामुळे निळावंती विषयीच्या अनेक शंकांचे योग्य उत्तरे मिळतात . पोथी वाचून वेड लागत ... मुळात पोथीची सिद्धी मिळ्वण्यासाठीच्या खूप अटींची पूर्तता करावी लागते. ज्या सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि जरी अटी पूर्तता झाली. तरी पोथी प्रमाणित राहिली नाही. त्यात अनेक गोष्टी आल्या अनेक गायब झाल्या कायमच्या !! तेव्हा याला साक्षीदार कोणीच नाही .हे तंत्र मंत्र अघोरच करू जाणे ..

In reply to by अनन्त्_यात्री

Bhakti Tue, 01/27/2026 - 16:00
त्या निळ्या दरीच्या गर्भी घननीळ गूढसे काही नि:शब्द काफिला भोगी ती पिठुर रानभुल देही
चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले ओंजळी उधळीत मोती, हासरी ताराफुले... वाहती आकाशगंगा की कटीची मेखला तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफिले... गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या जे तुझ्या तालावरी बोलांवरी नादावले... गे निळावंती कशाला, झाकिसी काया तुझी पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे... -राजा बढे या गीताची आठवण मनी निळ चांदणे पेरुन गेल :) धन्यवाद!