विषारी सरोवर : युधिष्ठिराची अखेर
लेखनप्रकार
बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला.
पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा. त्याची आज्ञा न घेता भावंडांनी पाणी प्यायले असावे, म्हणून यक्षाने त्यांना दंडित केले असावे.
युधिष्ठिराने यक्षाला पुकारले, “हे यक्षदेव, तुम्ही दयाळू आहात. या वाळवंटात पाण्याचे संरक्षण करून प्रवाशांची तहान भागविण्याचे पुण्यकार्य करत आहात. माझ्या भावंडांकडून चूक झाली, कृपया त्यांना क्षमा करा.”
युधिष्ठिराचा पुकारा ऐकून यक्ष प्रकट झाला. युधिष्ठिराने त्याला प्रणाम केला आणि भावंडांच्या प्राणांची भीक मागितली. यक्ष म्हणाला, “युधिष्ठिर, मी कोण क्षमा करणारा? तुझी तहानेने व्याकूळ भावंडे या सरोवरावर आली. त्यांनी पाणी पिण्याची माझी परवानगी मागितली. पण हे पाणी अत्यंत दूषित आणि विषारी आहे, म्हणून मी नकार दिला. त्यांनी माझे ऐकले नाही. पाणी प्राशन केले आणि मृत्यूमुखी पडले.”
युधिष्ठिराने पुन्हा हात जोडून विनंती केली, “हे यक्षदेव, आपण सर्वज्ञ आहात. यावर काही उपाय असेल का?
यक्ष म्हणाला, पूर्वी हिमालयात संजीवनी बुटी मिळायची. तीच आणून हनुमानाने लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते. पण आज हिमालयावर एकही वृक्ष नाही. संजीवनी मिळण्याचा प्रश्नच येत नाही.” क्षणभर थांबून यक्षाने युधिष्ठिराला विचारले, “जीवनाचे अंतिम सत्य काय आहे?”
युधिष्ठिर म्हणाला, “मृत्यू हेच जीवनाचे शेवटचे सत्य आहे.”
यक्ष अट्टहासाने हसत म्हणाला, “युधिष्ठिर, तुला जीवनाचे सत्य माहित आहे, हे चांगलेच. तुझे बंधू जिवंत होऊ शकत नाहीत. इथे दूर-दूर पिण्यालायक पाणीही नाही. तुझ्यासमोर दोनच मार्ग आहेत- या सरोवराचे विषारी पाणी पिऊन काही क्षणांत मृत्यू स्वीकार किंवा तहानेने तडफडत मृत्यूला सामोरे जा.”
हे सांगून यक्ष अदृश्य झाला.
युधिष्ठिर काही वेळ विचारात गढून गेला. “मरण निश्चित आहे, तर भावंडांसोबत मेलेले बरे,” असा विचार करून त्याने विषारी पाणी प्राशन केले. तहान शांत झाली. काही क्षणांत तोही निष्प्राण झाला.
पाचही पांडव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडले होते. महाभारताचा अवेळीच अंत झाला. हा सत्याचा विजय नव्हता. प्रदूषणाचा मानवावर विजय झाला होता.
वाचने
2441
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
तहानलेलं असताना पाणी
In reply to तहानलेलं असताना पाणी by युयुत्सु
वैदिक काळापासून भारतात
In reply to वैदिक काळापासून भारतात by विवेकपटाईत
तेवढ्यातल्या तेवढ्यात पण
In reply to तेवढ्यातल्या तेवढ्यात पण by स्वधर्म
'ताडोबा अंधारी' हे ठिकाण
In reply to तेवढ्यातल्या तेवढ्यात पण by स्वधर्म
हा लेख तलावांवर आहे खाणींवर
In reply to हा लेख तलावांवर आहे खाणींवर by विवेकपटाईत
धन्यवाद
In reply to वैदिक काळापासून भारतात by विवेकपटाईत
स्कोअर सेटलिंग आहे एवढं बोलून
In reply to स्कोअर सेटलिंग आहे एवढं बोलून by सुबोध खरे
हे युयुत्सु यांच्या
In reply to तहानलेलं असताना पाणी by युयुत्सु
?
रोचक कथा. आवडली.
मुळ कथा निराळी आहे ना?
In reply to मुळ कथा निराळी आहे ना? by निनाद
होय तर! मूळ कथा वेगळी आहे.
In reply to होय तर! मूळ कथा वेगळी आहे. by युयुत्सु
महाभारत असा ग्रंथ आहे जो
In reply to महाभारत असा ग्रंथ आहे जो by विवेकपटाईत
महाभारतातून धडा घेऊन भविष्यात
In reply to महाभारतातून धडा घेऊन भविष्यात by सोत्रि
Ha ha ha
In reply to महाभारतातून धडा घेऊन भविष्यात by सोत्रि
विनोदाचा भाग सोडला तर माझ्या
In reply to महाभारतातून धडा घेऊन भविष्यात by सोत्रि
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश
In reply to मुळ कथा निराळी आहे ना? by निनाद
मूळ कथा !
In reply to मुळ कथा निराळी आहे ना? by निनाद
मूळ कथे वेगळी आहे.ही कथा
परिस्थिती बदलेली नाही!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kabhi Bekasi Ne Maara... Alag Alag ( 1985 )In reply to परिस्थिती बदलेली नाही! by मदनबाण
उत्तम नगर दिल्लीत प्रत्येक