✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बीचवरील रक्ताचे डाग

न
निनाद यांनी
गुरुवार, 12/18/2025 - 08:43  ·  लेख
लेख
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात असलेल्या प्रसिद्ध बॉंडाय बीचवर १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी 'हनुक्का' या ज्यू धर्मीयांच्या प्रकाशाच्या सणाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. आनंदाने आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला हा परिसर काही क्षणांतच किंकाळ्या आणि रक्ताच्या थारोळ्याने भरून गेला. आयसिस या दहशतवादी संघटनेने प्रेरीत झालेल्या अक्रम पिता-पुत्राने केलेल्या या अंधाधुंद गोळीबारात १५ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यातील सर्वात भीषण आणि मन सुन्न करणारी घटना म्हणजे १० वर्षांच्या चिमुरड्या मटिल्डा ब्रिटवान हिची झालेली हत्या. मटिल्डा आपल्या वडिलांकडे धावत जात असताना एका बंदूकधारी नराधमाने तिच्याकडे पाहिले आणि कोणताही संकोच न करता तिच्यावर गोळ्या झाडल्या. मटिल्डाच्या आईने हा थरार आपल्या डोळ्यांनी पाहिला. तिने रडत सांगितले की, "तो केवळ अपघाती गोळीबार नव्हता; त्या राक्षसाने माझ्या लेकीच्या डोळ्यात पाहिले, तो हसला आणि त्याने मुद्दाम तिच्यावर बंदूक चालवली." एका निष्पाप बालिकेवर अशा प्रकारे हेतुपुरस्सर गोळी झाडणे, ही या हल्लेखोरांच्या अमानवी क्रूरतेचे जिवंत उदाहरण आहे. जेव्हा गोळ्यांच्या आवाजाने सगळीकडे गोंधळ उडाला होता, तेव्हा कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता हल्लेखोरांचा सामना केला. दोन पोलीस कर्मचारी या चकमकीत गंभीर जखमी झाले, तरीही त्यांनी हल्लेखोरांना रोखून धरले. एका पोलीस अधिकाऱ्याने झाडाचा आडोसा घेत अचूक निशाणा साधून एका हल्लेखोराला जागीच ठार केले, ज्यामुळे पुढील मोठा नरसंहार टळला. पोलिसांच्या या धाडसामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले. यासोबतच अहमद अल-अहमद या एका सामान्य नागरिकाने दाखवलेले शौर्यही कौतुकास्पद आहे, ज्याने निशस्त्र असतानाही एका बंदुकधारी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पळाला. या हल्ल्यातील आरोपी साजिद अक्रम व्हिसावर ऑस्ट्रेलियात आला होता आणि तेथेच राहिला. त्याच्याकडे व्यवसायातील उच्च पदवी होती. अशा प्रकारे सुशिक्षित आणि समाजात स्थिरावलेल्या व्यक्तीने आपल्या २४ वर्षांच्या नावीद अक्रम या मुलासह इतका भयंकर मार्ग का निवडला, हा प्रश्न आता विचार करायला लावणारा आहे. उच्च शिक्षण असूनही इस्लामिक कट्टरतावादाच्या प्रभावाखाली येऊन स्वतःच्या मुलालाही दहशतीच्या मार्गावर नेणे, हे समाजव्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. कट्टरतावादी धार्मिक विद्वेषाचे हे विष सुशिक्षित वर्गापर्यंत कसे पोहोचते, याचे आत्मचिंतन आता सर्व समाजात करण्याची वेळ आता आली आहे. या घटनेने ऑस्ट्रेलियातील ज्यू समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी सर्वधर्मीय नागरिक एकजुटीने या संकटाचा सामना करत आहेत. मटिल्डासारख्या निष्पापांच्या बलिदानाची आठवण ठेवून, इस्लामिक कट्टरतावादाची धर्मद्वेषाची ही पाळेमुळे उखडून फेकणे हीच त्या मृतांना खरी श्रद्धांजली ठरेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1159 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

तिकडची वृत्तपत्रेदेखील या

सौंदाळा
गुरुवार, 12/18/2025 - 10:14 नवीन
तिकडची वृत्तपत्रेदेखील या हल्ल्यावर तुटून पडली आणि 'बास्टर्डस' अशा शिर्षकाने बातमी एका पेपरने दिली. असो मृतातम्यांना श्रध्दांजली. उर्वरीत दहशतवाद्याला त्वरीत मृत्युदंड मिळावा. २०२६ हे वर्ष संपूर्ण जगासाठी दहशतवाद मुक्त रहावे हिच इच्छा आणि प्रार्थना
  • Log in or register to post comments

भयानक आणि अमानुष हत्याकांड

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 12/18/2025 - 10:37 नवीन
भयानक आणि अमानुष हत्याकांड आहे हे. एक प्रश्न मला नेहेमी पडतो कि नक्की कशा प्रकारे सरसकट सुशिक्षित वा अशिक्षित शांतिप्रिय समुदायातील लोकांचे ब्रेनवॉशिंग केले जाते? कि ते असे अमानुष कृत्य करायला तयार होतात.
  • Log in or register to post comments

अशा प्रकरणांतील अतिरेकी किंवा

गवि
गुरुवार, 12/18/2025 - 10:51 नवीन
अशा प्रकरणांतील अतिरेकी किंवा पकडली / मारली जाणारी मारेकरी व्यक्ती ही आधी कधीतरी पोलिसांच्या किंवा तपास यंत्रणांच्या रडार वर आली होती असे प्रत्येक वेळी न चुकता उघड होत असते. पण तरी ते मोकळे सुटलेले असतात. यावेळी देखील तसे वाचले बातम्यांत.
  • Log in or register to post comments

सगळ्यात मोठा उघड प्रश्न

विजुभाऊ
Fri, 12/19/2025 - 12:53 नवीन
सगळ्यात मोठा उघड प्रश्न म्हणजे हे सगळे लोक एका विषिष्ठ धर्मातलेच का असतात? महजब ही सिखाता हमको आपस मै बैर रखना........ असेच म्हणावे लागेल
  • Log in or register to post comments

Youtube वर ex-muslim अनेक

NiluMP
Tue, 12/23/2025 - 23:00 नवीन
Youtube वर ex-muslim अनेक channels आहेत त्याच्याकडून islam उघड पडला जात आहे. कोणत्याही मुसलमानांशी धर्म या विषयावर चर्चा होऊ शकत नाही कारण ते त्याच्या धर्मात काही चुकीचं आहे हे मानतच नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा