फुलत्या क्षणी फुलणे ना जमले
सुकताना ही खंत नको
गंधित होउन बहरुन जावे,
पाचोळ्यापरी अंत नको
जगणे अवघड झाले तेव्हा
दिला सुरांनी जन्म नवा
जन्मांतरी हे सूर भिनावे,
नुसता कोकिळकंठ नको
रंग-रूप, रस-गंध साठवित
फुलाफुलावर लहरत जावे
फूलपाखरू जीवन व्हावे,
कोशातिल सुरवंट नको
क्षणाक्षणाला कणाकणातुन
उसळावे चैतन्य अनोखे
खळाळते आयुष्य असावे,
गती कधीही संथ नको
अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6333
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
सुरेख कविता ..
नितांत सुंदर
केवळ
ख्ररचं खुप छान !!
वाह
सुंदर
कविता खूप आवडली
वा ! मस्त !!
आई गं
सुंदर
चेतन
In reply to सुंदर by चेतन
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to सुरेख by नंदन
उत्तम
फुलत्या
क्या बात है!!
माहेरचं कौतुक!
फारच सुरेख
केवळ अप्रतिम.!
अप्रतिम
नितांत सुंदर
अप्रतिम
वा मस्तच..................खुपच सुंदर
नेहमीसारखी मस्त.
सुंदर कविता
अतिशय सुंदर..
लय
सुरेख कविता
खुपच सुंदर
क्रांतीतै
खरंच!
In reply to क्रांतीतै by परिकथेतील राजकुमार
नितांत सुंदर विचार!
जबरी
आवडलेले लेखन.
थँक्यु सो मच उत्खनक !
In reply to आवडलेले लेखन. by उत्खनक