✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बिहार निवडणूका २०२५ आणी प्रशांत किशोर

ध
धर्मराजमुटके यांनी
गुरुवार, 11/06/2025 - 00:51  ·  लेख
लेख
नमस्कार, दिनांक ६ आणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार विधानसभेसाठी निवडणूका होत आहेत. निवडणूकीचे निकाल १४ नोव्हेबर २०२५ रोजी येतील. निवडणूक निकालांवर मिपावरील बरेच सदस्य लक्ष ठेऊन असतीलच तर निकालांची कारणीमिमांसा करणारे काही लेख १४ नोव्हेंबर २०२५ नंतर मिपावर येऊ शकतील. मला मुख्यतः महाराष्ट्र विधानसभा आणी राष्ट्रीय स्तरावरील लोकसभेच्या निवडणूकांमधे विशेष रस असतो. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणूकांबद्दल रस निर्माण झाला ते केवळ एका व्यक्तीमुळॅ ते म्हणजे प्रशांत किशोर पांडे ! (बिहार मधे आडनावाचा उल्लेख सार्वजनिक जीवनात केला जात नाही मात्र मराठी वाचकांसाठी आणि 'तुही जात कंची ?' या प्रश्नात रस असणार्‍यांसाठी 'पांडे' असण्याचा विशेष उल्लेख ! भारतातील राजकीय निवडणू़कांचा अभ्यास करणार्‍या व्यक्ती आणी संस्थांसाठी प्रशांत किशोर उर्फ पीके हे नाव अगदी ओळखीचे आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीची आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघ (युनोच्या) अंतर्गत 'सार्वजनिक स्वास्थ्य कार्यक्रम' योजनेअंतर्गत काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून अनेक राजकीय पक्षांसाठी काम केले. मला स्वतःला त्यांना राजकीय रणनीतीकार म्हणण्यापेक्षा राजकीय व्युव्हरचनाकार म्हणणे जास्त संयुक्तिक वाटते. त्यांच्या राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून काम करण्याच्या कार्यकाळात त्यांनी केलेली आणि प्रसिद्ध पावलेल्या कामांची यादी खालीलप्रमाणॅ. भाजपा : गुजरात विधानसभा आणी लोकसभेसाठी २०१२ आणि २०१४ मधे काम केले. त्यांच्या "चाय पे चर्चा", 'रन फॉर युनिटी' "3 डी रॅली' सारख्या संकल्पना कमालीच्या यशस्वी ठरल्या. जनता दल (युनायटेड) : २०१५ मधे नितिश कुमार आणि महागठबंधनसाठी काम केले. २०१५ मधे प्रशांत किशोर आणी इतर काही जणांनी मिळून Indian Political Action Committee (I-PAC) नावाची संस्था स्थापन केली. ह्या संस्थेने मग अनेक राज्यात आणी अनेक पक्षांसाठी निवडणूका जिंकण्यासाठी काम केले. पंजाब काँग्रेस : २०१७ मधे पंजाबमधील निवडणूकांमधे कॅप्टन अमरींदर सिंह यांचेसाठी 'पंजाब दा कॅप्टन' मोहीम राबविली. उत्तर प्रदेश काँग्रेस : '२७ साल बेहाल', "खाट पे चर्चा" अशा मोहिमा राबविल्या. मात्र सभेसाठी जमलेल्या लोकांनी त्या खाटा पळविल्याने ही मोहिम वेगळ्या कारणाने गाजली. या निवडणूकीत कॉंग्रेसला आणी पीके टीम ला विजय मिळवता आला नाही. वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी : यांचेसाठी २०१९ आणि २०२४ मधे निवडणूक मोहिम (२०२४ मधे वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी चा पराभव होऊन तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले). शिवसेना (अखंड शिवसेना, आताची उबाठा शिवसेना) : पीके आणी (I-PAC) यांनी यांचेसाठी काम केले. या कामाची फी म्हणून प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की तुमच्या राजवटीत बिहारी मजुरांना शिवसेनेकडून मारहाण होऊ नये याची काळजी घ्या. २०२० मधे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी दिल्लीसाठी काम केले. २०२१ मधे तामिळनाडू मधे एम. के. स्टॅलीन साठी काम केले. २०२१ आणी २०२४ मधे प.बंगालमधे तृणमुल कॉग्रेस साठी निवडणूक मोहिमेत भाग घेतला. (प्रशांत किशोर यांनी मात्र २०२१ मधेच राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून आपल्या कामातून निवृत्ती घेतली आणी त्यांनी आपले पुर्ण लक्ष बिहारवर केंद्रीत केले. २०२२ मधे त्यांनी जनसुराज आंदोलन चालू केले आणी त्या बॅनरखाली जवळ्जवळ दोन वर्ष ३००० किलोमीटर पदयात्रा करुन पुर्ण बिहार उभा आडवा पिंजून काढला, गावोगाव फिरले आणी बिहारची स्थिती जाणून घेतली आणी आपण राजकीय पक्षाची स्थापना करु असे जाहिर केले. पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर सुरुवातीला गांधीजीची प्रतिमा होती. २ ऑक्टॉबर २०२४ गांधीजयंतीच्या दिवशी आपण "जनसुराज पक्ष" ची स्थापना करत असून त्या नावाखाली निवडणूका लढवू असे जाहिर केले. आता पक्षाच्या झेंड्यावर गांधीजींसोबत बाबासाहेबांची देखील प्रतिमा आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह "स्कुल का बस्ता" म्हणजे "शाळेचे दप्तर" आहे. उद्याच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास सगळ्याच मतदारसंघांमधे (२४३ पैकी २३८ जागांवर) उमेदवार दिले आहेत. जवळपास सगळेच उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. बरेचसे उमेदवार चागले शिकलेले, प्रशासकीय पदावरून किंवा चांगल्या पदावरुन निवृत्त झालेले आहे. मात्र मुस्लीम, मागासवर्गीय आणि अगदी तळागाळातील जातीतील उमेदवार देखील दिले आहेत. त्यांची बिहार स्थितीबद्द्लची बरीचशी अनुमाने सटीक आहेत व विचार करण्यास प्रवृत्त करतात. उदा. १. बिहार मधे कागदावर दिसते त्यापेक्षा जास्त गरीबी आहे. २. बिहारी मतदार जातीपातीवर आधारीत मतदान करतात हा गैरसमज आहे. देशातील बाकी मतदार जितका जातीपातीचा विचार करुन मतदान करतात तेवढाच विचार बिहारी मतदार करतात. ३. ज्यांनी लालूंचे जंगलराज अनुभवले आहे ते केवळ ते जंगलराज परत येऊ नये म्हणून नितीश कुमारांना आणि (एनडीए ला) मतदान करतात. ४. मुसलमानांना भाजपाची भीती वाटते त्यामुळे बरेचशे नाईलाजाने लालूंच्या पक्षाला मतदान करतात. ५. देशातील सगळ्यात जास्त आय एस / आय पीएस हे बिहारमधून येतात हा मोठा गैरसमज आहे. हे बिहारी मुळातच बिहारमधून निघून इतरत्र स्थायिक झालेत व तिकडे त्यांना जे चांगले वातावरण लाभले आहे त्याच्या परीणाम म्हणून आपल्याला जास्त बिहारी सरकारी नोकरीत दिसतात. ६. बिहारी मजूर म्हातारपणी थकल्यावर तरी आपल्या घरी परत येईल मात्र शिकला सवरलेला बिहारी आजची परिस्थिती पाहता बिहार मधे येण्याची शक्यताच नाही. ७. दक्षिण भारतातील राज्ये प्रगत होण्याचे एक मोठे कारण म्हणजे तिथले मतदार भाकरी फिरवितात. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कोणताच पक्ष सत्तेवर राहत नाही. त्यामानाने बिहारमधे पर्याय नसल्यामुळे मतदार आलटून पालटून लालू किंवा नितिश यांनाच मते देतात. मतदारांना तिसरा व चांगला पर्याय मिळावा म्हणून आपण जनसुराज पक्षाची स्थापना केल्याचे ते सांगतात आणी बिहार मधून पोटपाण्यासाठी बाहेर पळणार्‍यांना बिहार मधे रोजगार उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावे हे त्यांचे मुख्य कार्यक्रम आहेत असे ते सांगतात. निवडणूकांमधे त्यांना किती जागा मिळतील त्याच्या अंदाज सांगताना ते म्हणतात की मुळात बिहार ची परिस्थिती सुधरु शकते हा विश्वासच तेथील लोक गमावून बसले आहेत. जनसुराज पक्ष हा तिसरा पर्याय आहे याची त्यांना व्यवस्थित जाणीव झाली तर १५० पेक्षा जास्त जागा येऊ शकतील आणि नाही झाली तर १० जागांच्या आतमधेच त्यांचा खेळ संपेल असे अनुमान ते सार्वजनिक रित्या वर्तवतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प़क्षाला ३० ते ६० दरम्यान जागा येऊ नयेत असे त्यांना वाटते कारण त्यामूळे इंडिया किंवा एनडीए ला घोडेबाजार करायला उत्तेजन मिळेल आणी त्या गोंधळात जनसुराज चे विजयी उमेदवार इतर पक्षांच्या वळचणीला जाऊ शकतील आशी भिती त्यांना वाटते. युट्यूबवर त्यांच्या बर्‍याच चित्रफिती आहेत, अधिक माहितीसाठी त्या इच्छूकांनी बघाव्यात. "इस बार अपने बच्चों के भविष्य के लिए वोट दो" हे त्यांचे निवडणूक घोषवाक्य आहे. मी भाजपासमर्थक असलो तरी प्रशांत किशोर आणि जनसुराज पक्षाला बिहार मधे चांगले यश मिळावे असे मनापासून वाटते. नितीश, तेजस्वी किंवा काँग्रेस यांचेपैकी कुणाकडेही सत्ता गेल्यास मागील पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागेल. लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान देखील एक उत्तम नेते आहेत त्यांना देखील चांगले यश लाभावे असे वाटते. त्यांचा पक्ष २८ जागांवर लढत आहे. प्रशांत किशोर यांचेकडे अनेक निवडणूकांची रणणिती तयार करणे, इतर राजकीय पक्षाची रणणिती माहित असणे, उत्तम वक्ता असणे, चांगले व्यक्तीमत्त्व, भारदस्त आवाज, दुर्दम्य मात्र आंधळा नसलेला आशावाद, आणि हे सगळे गुण आहेत. मात्र ते ब्राह्नण असणे, प्रत्यक्ष राजकीय पक्ष चालविण्याचा अनुभव नसणे, पक्षात इतर लोकप्रिय नेते नसणे अशा काही कमतरता आहेत. शेवटी एक बिहारी सब पे भारी पडतो, की मागे पडतो, की उठून अजून संघर्ष करतो हे १४ नोव्हेंबर आणी त्यानंतर येणारा काळच ठरवू शकतो. मात्र बिहारला तिसरा पर्याय हवा हे बिहारींच्या आणि इतर देशासाठी देखील महत्वाचे आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16564 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

आणि लालूप्रसादांना २५

शाम भागवत
Tue, 11/18/2025 - 16:04 नवीन
आणि लालूप्रसादांना २५
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

तेजस्वीची मतं कॉंग्रेसकडे

शाम भागवत
Tue, 11/18/2025 - 16:17 नवीन
तेजस्वीची मतं कॉंग्रेसकडे गेली नाहीत हे त्याचं कारण आहे. तेजस्वी यांना भाजप व जेडीयू यांना स्वतंत्रपणे जेवढी मते पडलेली आहेत त्यापेक्षा जास्त मते पडलेली आहेत. मतं मिळवण्यामधे तो सर्वात मोठा पक्ष आहे. कॉंग्रेसचा एकच प्रॉब्लेम आहे. त्यांना अजूनही पेरे पाटलांचा मुद्दा पटलेला नाही. पेरे पाटलांच्या प्रमाणे लोकशाहीत जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन जाणारा यशस्वी होत असतो. पध्दत योग्य की अयोग्य हा मुद्दा सत्तासंपादनात महत्वाचा नसतो. पण कॉंग्रेस व त्यांचे समर्थक आजही त्यावर काम करायला तयार नाहीत. इव्हीएम, व्होटचोरी, इडी, चुना आयोग असले मुद्दे घेऊन लोकं जोडली जायच्या ऐवजी कमी होत आहेत असं मतदान टक्केवारी तरी सांगते आहे. आता वाट बघूया मुंबई महानगर पालिका. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

तेजस्वी पार्टीला प्रति जागा

विवेकपटाईत
गुरुवार, 11/20/2025 - 10:02 नवीन
तेजस्वी पार्टीला प्रति जागा ८०,०००+ जेडीयूला प्रति जागा ९६,०००+मते. भाजपला प्रति जागा ९९,०००+ मते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अवांतर : आम्हांस भगतसिंग समजलाच नाही ....

गामा पैलवान
Wed, 11/19/2025 - 00:45 नवीन
अवांतर : आग्या१९९०, आपला इथला संदेश वाचला. १.
तुम्हाला भगतसिंग समजलाच नाही.
ज्जे बात! अगदी बरोबर बोललात पहा. आम्हांस भगतसिंग समजलाच नाही. पण इंग्रजांना बरोब्बर समजला. २.
उजव्यांना सवयच आहे एखाद्याला ओढूनताडून आपल्या कळपात खेचून घ्यायची.
इंग्रजांनी त्यास फासावर चढवून कायमचा उजव्यांच्या कळपात ढकलला. आज भगतसिंगास आमच्या कळपांत सामील करावयास आम्हांस धडपड करायची मुळीच गरज नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

ज्यांनी इंग्रजांची अनेकवेळा

आग्या१९९०
Wed, 11/19/2025 - 21:53 नवीन
ज्यांनी इंग्रजांची अनेकवेळा माफी मागितली अशांनाच तुमच्या कळपात सामील करतात ना? शूरवीर आणि माफीवर एकाच कळपात कसे काय ब्वॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

त्यांनी माफी मागितली म्हणून

विवेकपटाईत
गुरुवार, 11/20/2025 - 10:00 नवीन
त्यांनी माफी मागितली म्हणून त्यांना वर्षे काळा पाण्याची सजा दिली. जे स्वतंत्रता सैनिक होते ते मात्र आगाखान पॅलेस मध्ये मौज करायचे. दोन्ही सावरकर बंधूंनी दहा-दहा वर्ष अंदमानच्या काळकोठरीत काढले आहे. ज्यांची निष्ठा देशाप्रती नाही तेच त्यांना वाईट बोलू शकतात. देशभक्त लोकांसाठी ते आदर्श आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

जे स्वतंत्रता सैनिक होते ते

आग्या१९९०
गुरुवार, 11/20/2025 - 10:44 नवीन
जे स्वतंत्रता सैनिक होते ते मात्र आगाखान पॅलेस मध्ये मौज करायचे. देशद्रोह्यांना काळे पाणी. बरोबर ना?
  • Log in or register to post comments

२७२ हूर निवडणूक आयोगाच्या

आग्या१९९०
गुरुवार, 11/20/2025 - 15:23 नवीन
२७२ हूर निवडणूक आयोगाच्या बचावाला उतरले. ह्यात किती माजी निवडणूक अधिकारी आहेत बघावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

"Old wine in new Bottle, Shape and Colour of the bottle is chang

टर्मीनेटर
गुरुवार, 11/20/2025 - 18:30 नवीन
'Business Communication' हा विषय शिकवणारे आमचे 'राजगोपाल' म्हणून एक (तामिळ) प्रोफेसर होते. त्यांचे इंग्रजी आणि (एकतर जन्माने मुंबईकर त्यात बायको मराठी असल्याने) मराठी भाषेवरही प्रभुत्व होते. अध्यापनात ते म्हणी आणि वाक्प्रचारांचा मुबलक वापर करत असत आणि अवांतराचेही त्यांना वावडे नसायचे त्यामुळे त्यांचे लेक्चर बंक करायची आमच्यासारख्या टपोरी विद्यार्थ्यांनाही कधी ईच्छा व्हायची नाही.
"Old wine in new Bottle, Shape and Colour of the bottle is changed but wine is one and the same..."
हे वाक्य/वाक्प्रचारही त्यांच्याकडूनच ऐकला असल्याने असेल कदाचित, पण कायमस्वरूपी लक्षात राहिला आहे आणि तो इथेही लागू पडतोय!
"२७२ हूर निवडणूक आयोगाच्या बचावाला उतरले."
ह्यात नवीन असे काहीच नाही... मागे 'पुरस्कार वापसी' (पुरस्कार नामक कागदाची भेंडोळी/सुरनळी फक्त, त्या पुरस्काराची रक्कम कोणी परत केल्याचे ऐकण्या/वाचण्यात आलेले नाही) नामक नौटंकी आपण बघून झाली आहे, त्याआधी भारतातल्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अमेरिकेचा व्हिसा मिळू नये म्हणून पत्रलेखन करणारे महाभागही आपण बघितले आहेत... तशीच ही अजून एक नौटंकी! चार दिवस मिडिया ह्यावर चर्चित चर्वण करेल ह्यापेक्षा जास्ती काही होणार नाही. न्यायपालिकेवर देशवासीयांचा कणभरही विश्वास उरला असता तर त्यांना 'चाराचोर' लालूप्रसाद यादव आणि त्यांचा 'जमीनचोर' परिवार, 'आदर्श' अशोक चव्हाण, 'पत्रावाला' संजय राऊत, 'महा-भामटा'अरविंद केजरीवाल, ' नॅशनल हेराल्ड चोर' सोनिया गांधी आणि ('माफीवीर') राहुल गांधी, 'भुखंड चोर' रॉबर्ट वाड्रा आणि असे अनेक नामचीन घोटाळेबाज गजाआड जाण्याऐवजी अजून जामिनावर किंवा अन्य कारणांनी बाहेर कसे? असा प्रश्न पडला नसता! 'सब घोडे बारा टक्के' हेच तेवढे खरे, त्यामुळे 'Whores' (सो कॉल्ड 'हूर/ हूरें' 😂) ७२ असोत की २७२, बाटली नवीन असली तरी त्यात दारू जुनीच असल्याने परिस्थितीत किंचितही फरक पडेल असे वाटत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ह्यात नवीन असे काहीच नाही...

आग्या१९९०
गुरुवार, 11/20/2025 - 21:00 नवीन
ह्यात नवीन असे काहीच नाही... मागे 'पुरस्कार वापसी' (पुरस्कार नामक कागदाची भेंडोळी/सुरनळी फक्त, त्या पुरस्काराची रक्कम कोणी परत केल्याचे ऐकण्या/वाचण्यात आलेले नाही) नामक नौटंकी आपण बघून झाली आहे, मुळात तुलनाच चुकीची आहे. सरकारविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी पुरस्कार वापसी हत्यार वापरले गेले होते. का ते माहित असेलच. आत्ताचे २७२ एका विरोधी पक्षनेत्याविरुद्ध आणि संशयीत आयोगाचा बचाव करण्यासाठी उतरले आहेत. ज्यात रिस्क शून्य आणि रिवॉर्डची अपेक्षा जास्त. असंही राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांकडे बिहारच्या जनतेने दुर्लक्ष केले असल्याने आयोगाचा बचाव करण्यात काहीच अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

'Whores' (सो कॉल्ड 'हूर/

कांदा लिंबू
Fri, 11/21/2025 - 12:06 नवीन
'Whores' (सो कॉल्ड 'हूर/ हूरें') येक लंबर, टर्मी भौ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

आजतागायत कुणी वीर चक्र,

सुबोध खरे
Fri, 11/21/2025 - 10:10 नवीन
आजतागायत कुणी वीर चक्र, महावीर चक्र, परमवीर चक्र परत केल्याचे ऐकिवात नाही कारण यातील एकही पुरस्कार लांगुलचालन किंवा लाळघोटेपणा करून मिळालेला नाही बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments

हे २७२ दगडाखाली हात अडकल्याने

आग्या१९९०
Fri, 11/21/2025 - 21:39 नवीन
हे २७२ दगडाखाली हात अडकल्याने राहुल गांधींच्या ( आता पप्पू संबोधत नाही ,पुरून उरला विश्वगुरू आणि शिशुवर्गाला ) विरोधात उतरवले गेले आहेत. ह्या शूरांनी कितीही लांगुलचालन किंवा लाळघोटेपणा केला तरी पुरस्कार मिळणे दूर, कायम मालकाचे तळवे चाटणे आणि छू म्हटले की धावून जाणे हेच काम करावे लागणार, गुलामीकरता कुठलीच कसर ठेवली नाही ह्या नगांनी. तरी बरं निवडणूक आयोगाचे माजी अधिकारी ह्यात सामील नाहीत. राहुल गांधींना हे कोर्टात का खेचत नाही? ग्यानी बाबाकडून शपथपत्र लिहून घ्यावे. आपला एक दुबळा शत्रुदेश जसे आपल्याशी प्रॉक्सी युद्ध करते तसे सत्ताधारी पक्ष राहुल गांधींविरुद्ध लढत आहेत. ह्यावरून शोलेचा संवाद आठवला, " सुनो ठाकूरने xxxकी फौज बनाई है l
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गोरी काकी च्या मतिमंद मुलाची

सुबोध खरे
Fri, 11/21/2025 - 22:15 नवीन
गोरी काकी च्या मतिमंद मुलाची किती ती गुलामी? अरेरे
  • Log in or register to post comments

शिशुवर्गाच्या आजीवन

आग्या१९९०
Fri, 11/21/2025 - 22:41 नवीन
शिशुवर्गाच्या आजीवन विद्यार्थ्याच्या आकलनापलीकडचा विषय आहे हा. तूर्तास दूरच रहावे हा फुकटचा सल्ला देतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अतिजरठ पणाचे लक्षण असते

सुबोध खरे
Sat, 11/22/2025 - 01:16 नवीन
अतिजरठ पणाचे लक्षण असते फुकटचा सल्ला देणे! एक्सपायरी डेट झाल्याचे लक्षण! ))=((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

:)

आग्या१९९०
Sat, 11/22/2025 - 07:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राहुल गांधींना हे कोर्टात का

सुबोध खरे
Sat, 11/22/2025 - 10:17 नवीन
राहुल गांधींना हे कोर्टात का खेचत नाही? Long List Of Cases Against Rahul Gandhi Filed Across India. https://www.ndtv.com/india-news/long-list-of-cases-against-rahul-gandhi-filed-across-india-see-details-3890553 The Lok Sabha had disqualified Mr Gandhi from the house's membership after his conviction in a defamation case. Mr Gandhi is out on bail in the National Herald case. Along with his mother Sonia Gandhi, he was granted bail in December 2015 in the case pursued by BJP leader Subramanian Swamy. Rahul Gandhi ‘unconditionally apologises’ to apex court.सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागून सुद्धा हे सुधारत नाहीत. सलग ९६ निवडणूक हरून सुद्धा अजून काँग्रेस पक्ष याना सोडचिठ्ठी देत नाही आणि आपल्यासारखे गुलाम यांची भलामण करत फिरत असतात. https://www.thehindu.com/news/national/rahul-gandhi-unconditionally-apologises-to-sc-for-wrongly-attributing-chowkidar-remark-to-it/article27065672.ec लाखो रुपये घेणारे अभिषेक मनू सिंघवी आणि कपिल सिब्बल सारखे वकील त्यांच्या दावणीला बांधलेले आहेतच. त्यामुळे सकृतदर्शनी पुरावे असले तरी जामिनावर हे बाहेर जगभर फिरत असतात. खालच्या कोर्टात हरले कि वरच्या कोर्टात खटला चालू असतो आणि आपली कूर्मगती न्यायालये पाहिली तर त्यांचे खटले संपेस्तोवर त्यांची पंचाहत्तरी उलटली तरी आश्चर्य वाटू नये. 2015-2019 Period: The Union Home Ministry stated in parliament that Rahul Gandhi made 247 foreign trips between 2015 and 2019 without informing the Special Protection Group (SPG) security detail in advance. This number only includes unnotified trips, so the actual total number of visits during this period is potentially higher. चार वर्षात २४७ वेळेस परदेशात गेले हे युवराज म्हणजेच दर महिन्यास पाच वेळेस परदेशात फिरत होते. खासदारकीचा पगार सोडल्यास यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय ज्यात हे युवराज महिन्याला पाच वेळेस परदेशात फिरत होते हा साधा प्रश्न आपल्यासारख्या गुलामांना पडत नाही कारण आपली अक्कल एकदा गहाण पडली कि विचारशक्ती कुंठीत होते. तेंव्हा तुम्ही टंकत राहा राहुल गांधी स्तोत्रे मिपावर. चालू द्या
  • Log in or register to post comments

:)

आग्या१९९०
Sat, 11/22/2025 - 10:31 नवीन
:) नुसते विचारता काय, काढा शोधून त्यांचे उत्पन्नाचे स्रोत. सरकार काय झोपले आहे का? पुरावे असेल तर कोर्टात जा, कोणी रोखले आहे तुम्हाला? अर्थात कपिल सिब्बलसारखे वकीलच बघा. शिशुवर्गातून वकील कसे मिळणार? शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रागा २०२९ च्या लोकसभा

शाम भागवत
Sat, 11/22/2025 - 11:17 नवीन
रागा २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत राजकारणात असलेच पाहिजेत. कोर्टाचे निकाल तोपर्यंत तरी नको. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तुम्ही टंकत राहा राहुल गांधी

सुबोध खरे
Sat, 11/22/2025 - 15:02 नवीन
तुम्ही टंकत राहा राहुल गांधी स्तोत्रे मिपावर. चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तुम्ही आयुष्यभर कण्हत कुथत

आग्या१९९०
Sat, 11/22/2025 - 15:16 नवीन
तुम्ही आयुष्यभर कण्हत कुथत मोजत राहा राहुल गांधींचे परदेश दौरे आणि न शोधता येणारे आर्थिक स्रोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक सर्वेक्षण केले की 2029

सुबोध खरे
Sun, 11/23/2025 - 22:02 नवीन
एक सर्वेक्षण केले की 2029 च्या निवडणूकीत कॉन्ग्रेस चा प्रचार प्रमुख कोण हृवा? 90% कोन्ग्रेसी म्हणाले की राहूल गांधी तर 100% भाजप वाले म्हणाले आम्हाला राहूल गांधी च हवेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

राहुल गांधी हे भाजपचे स्टार

विवेकपटाईत
Sat, 11/22/2025 - 12:02 नवीन
राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहे. राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख राहो हे भाजपाच्या हिताचे आहे.
  • Log in or register to post comments

चेन्नईत कॉलेजकन्यकांसमोर

कंजूस
Sat, 11/22/2025 - 13:11 नवीन
चेन्नईत कॉलेजकन्यकांसमोर झालेल्या भाषणानंतर कन्यकांनी अभिप्राय दिला " we don't know politics but Rahul is very cute"
  • Log in or register to post comments

काँग्रेसचे लोकं अजूनही राहुल

रात्रीचे चांदणे
Sat, 11/22/2025 - 13:11 नवीन
काँग्रेसचे लोकं अजूनही राहुल गांधीनाच कुरवाळत का बसलेत ते समजतं नाही. दुसऱ्या कोणच्या हातात पक्ष दिला तर २९ ला काँग्रेस कदाचित सत्तेत येणार नाही. पण पक्ष तरी हळू हळू उभा राहील. निखिल वागळे, रविश कुमार सारखे पत्रकारही राहुल गांधीच कसे योग्य आहेत ह्याचे व्हिडीओ बनवत आहेत. मोदी शहा ED वगैरे ची मदत, कामाच्या जाहिराती करून यशस्वी होत आहेत. एकदा हरायला लागले की भाजप त्यांचं महत्व कमी करून टाकेल. वाजपेयी नंतर आडवानी च्या नेतृत्व खाली एका का दोन निवडणूक लढली. कांय होत नाही हे लक्षात आलं की मोदींना पुढ केलं. म्हणूनच भाजपाला हे दिवस आलेत. गांधीनाच चिकटून राहायचंच आहे हेच ठरल असेल तर प्रियांका वढेरांच्या मुलांना आडनाव बदलून तरी आणायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

ए आई लेखावर प्रतिसाद देताना

विवेकपटाईत
Sat, 11/22/2025 - 18:14 नवीन
ए आई लेखावर प्रतिसाद देताना सारखी unexpected error येत आहे. इथे प्रतिसाद देऊन बघतो. बाकी रेहान वाड्रा चे बहुतेक बदलले आहे.
  • Log in or register to post comments

मोशांचा राजकीय विमा

गामा पैलवान
Sat, 11/29/2025 - 22:05 नवीन
पप्पू हा मोदी व शहांचा राजकीय विमा आहे. तो उगीच अडगळीत पडायला नको. माझ्या मते यासाठीच भाजपवाले निखील वागळे, रवीशकुमार, वगैरेंना सूचना देत असावेत की पप्पूचाच प्रचार करा म्हणून. -गा.पै.
  • Log in or register to post comments

पंतप्रधान

हणमंतअण्णा शंक…
Tue, 12/02/2025 - 18:02 नवीन
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार असे मला वाटते. असे अजून कोणाला वाटते?
  • Log in or register to post comments

मला पण! अमितशा नाही हू देत पण

अमरेंद्र बाहुबली
Tue, 12/02/2025 - 18:51 नवीन
मला पण! अमितशा नाही हू देत पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा