Skip to main content

बिहार निवडणूका २०२५ आणी प्रशांत किशोर

लेखक धर्मराजमुटके यांनी गुरुवार, 06/11/2025 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दिनांक ६ आणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार विधानसभेसाठी निवडणूका होत आहेत. निवडणूकीचे निकाल १४ नोव्हेबर २०२५ रोजी येतील. निवडणूक निकालांवर मिपावरील बरेच सदस्य लक्ष ठेऊन असतीलच तर निकालांची कारणीमिमांसा करणारे काही लेख १४ नोव्हेंबर २०२५ नंतर मिपावर येऊ शकतील. मला मुख्यतः महाराष्ट्र विधानसभा आणी राष्ट्रीय स्तरावरील लोकसभेच्या निवडणूकांमधे विशेष रस असतो. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणूकांबद्दल रस निर्माण झाला ते केवळ एका व्यक्तीमुळॅ ते म्हणजे प्रशांत किशोर पांडे ! (बिहार मधे आडनावाचा उल्लेख सार्वजनिक जीवनात केला जात नाही मात्र मराठी वाचकांसाठी आणि 'तुही जात कंची ?' या प्रश्नात रस असणार्‍यांसाठी 'पांडे' असण्याचा विशेष उल्लेख ! भारतातील राजकीय निवडणू़कांचा अभ्यास करणार्‍या व्यक्ती आणी संस्थांसाठी प्रशांत किशोर उर्फ पीके हे नाव अगदी ओळखीचे आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीची आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघ (युनोच्या) अंतर्गत 'सार्वजनिक स्वास्थ्य कार्यक्रम' योजनेअंतर्गत काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून अनेक राजकीय पक्षांसाठी काम केले. मला स्वतःला त्यांना राजकीय रणनीतीकार म्हणण्यापेक्षा राजकीय व्युव्हरचनाकार म्हणणे जास्त संयुक्तिक वाटते. त्यांच्या राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून काम करण्याच्या कार्यकाळात त्यांनी केलेली आणि प्रसिद्ध पावलेल्या कामांची यादी खालीलप्रमाणॅ. भाजपा : गुजरात विधानसभा आणी लोकसभेसाठी २०१२ आणि २०१४ मधे काम केले. त्यांच्या "चाय पे चर्चा", 'रन फॉर युनिटी' "3 डी रॅली' सारख्या संकल्पना कमालीच्या यशस्वी ठरल्या. जनता दल (युनायटेड) : २०१५ मधे नितिश कुमार आणि महागठबंधनसाठी काम केले. २०१५ मधे प्रशांत किशोर आणी इतर काही जणांनी मिळून Indian Political Action Committee (I-PAC) नावाची संस्था स्थापन केली. ह्या संस्थेने मग अनेक राज्यात आणी अनेक पक्षांसाठी निवडणूका जिंकण्यासाठी काम केले. पंजाब काँग्रेस : २०१७ मधे पंजाबमधील निवडणूकांमधे कॅप्टन अमरींदर सिंह यांचेसाठी 'पंजाब दा कॅप्टन' मोहीम राबविली. उत्तर प्रदेश काँग्रेस : '२७ साल बेहाल', "खाट पे चर्चा" अशा मोहिमा राबविल्या. मात्र सभेसाठी जमलेल्या लोकांनी त्या खाटा पळविल्याने ही मोहिम वेगळ्या कारणाने गाजली. या निवडणूकीत कॉंग्रेसला आणी पीके टीम ला विजय मिळवता आला नाही. वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी : यांचेसाठी २०१९ आणि २०२४ मधे निवडणूक मोहिम (२०२४ मधे वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी चा पराभव होऊन तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले). शिवसेना (अखंड शिवसेना, आताची उबाठा शिवसेना) : पीके आणी (I-PAC) यांनी यांचेसाठी काम केले. या कामाची फी म्हणून प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की तुमच्या राजवटीत बिहारी मजुरांना शिवसेनेकडून मारहाण होऊ नये याची काळजी घ्या. २०२० मधे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी दिल्लीसाठी काम केले. २०२१ मधे तामिळनाडू मधे एम. के. स्टॅलीन साठी काम केले. २०२१ आणी २०२४ मधे प.बंगालमधे तृणमुल कॉग्रेस साठी निवडणूक मोहिमेत भाग घेतला. (प्रशांत किशोर यांनी मात्र २०२१ मधेच राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून आपल्या कामातून निवृत्ती घेतली आणी त्यांनी आपले पुर्ण लक्ष बिहारवर केंद्रीत केले. २०२२ मधे त्यांनी जनसुराज आंदोलन चालू केले आणी त्या बॅनरखाली जवळ्जवळ दोन वर्ष ३००० किलोमीटर पदयात्रा करुन पुर्ण बिहार उभा आडवा पिंजून काढला, गावोगाव फिरले आणी बिहारची स्थिती जाणून घेतली आणी आपण राजकीय पक्षाची स्थापना करु असे जाहिर केले. पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर सुरुवातीला गांधीजीची प्रतिमा होती. २ ऑक्टॉबर २०२४ गांधीजयंतीच्या दिवशी आपण "जनसुराज पक्ष" ची स्थापना करत असून त्या नावाखाली निवडणूका लढवू असे जाहिर केले. आता पक्षाच्या झेंड्यावर गांधीजींसोबत बाबासाहेबांची देखील प्रतिमा आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह "स्कुल का बस्ता" म्हणजे "शाळेचे दप्तर" आहे. उद्याच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास सगळ्याच मतदारसंघांमधे (२४३ पैकी २३८ जागांवर) उमेदवार दिले आहेत. जवळपास सगळेच उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. बरेचसे उमेदवार चागले शिकलेले, प्रशासकीय पदावरून किंवा चांगल्या पदावरुन निवृत्त झालेले आहे. मात्र मुस्लीम, मागासवर्गीय आणि अगदी तळागाळातील जातीतील उमेदवार देखील दिले आहेत. त्यांची बिहार स्थितीबद्द्लची बरीचशी अनुमाने सटीक आहेत व विचार करण्यास प्रवृत्त करतात. उदा. १. बिहार मधे कागदावर दिसते त्यापेक्षा जास्त गरीबी आहे. २. बिहारी मतदार जातीपातीवर आधारीत मतदान करतात हा गैरसमज आहे. देशातील बाकी मतदार जितका जातीपातीचा विचार करुन मतदान करतात तेवढाच विचार बिहारी मतदार करतात. ३. ज्यांनी लालूंचे जंगलराज अनुभवले आहे ते केवळ ते जंगलराज परत येऊ नये म्हणून नितीश कुमारांना आणि (एनडीए ला) मतदान करतात. ४. मुसलमानांना भाजपाची भीती वाटते त्यामुळे बरेचशे नाईलाजाने लालूंच्या पक्षाला मतदान करतात. ५. देशातील सगळ्यात जास्त आय एस / आय पीएस हे बिहारमधून येतात हा मोठा गैरसमज आहे. हे बिहारी मुळातच बिहारमधून निघून इतरत्र स्थायिक झालेत व तिकडे त्यांना जे चांगले वातावरण लाभले आहे त्याच्या परीणाम म्हणून आपल्याला जास्त बिहारी सरकारी नोकरीत दिसतात. ६. बिहारी मजूर म्हातारपणी थकल्यावर तरी आपल्या घरी परत येईल मात्र शिकला सवरलेला बिहारी आजची परिस्थिती पाहता बिहार मधे येण्याची शक्यताच नाही. ७. दक्षिण भारतातील राज्ये प्रगत होण्याचे एक मोठे कारण म्हणजे तिथले मतदार भाकरी फिरवितात. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कोणताच पक्ष सत्तेवर राहत नाही. त्यामानाने बिहारमधे पर्याय नसल्यामुळे मतदार आलटून पालटून लालू किंवा नितिश यांनाच मते देतात. मतदारांना तिसरा व चांगला पर्याय मिळावा म्हणून आपण जनसुराज पक्षाची स्थापना केल्याचे ते सांगतात आणी बिहार मधून पोटपाण्यासाठी बाहेर पळणार्‍यांना बिहार मधे रोजगार उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावे हे त्यांचे मुख्य कार्यक्रम आहेत असे ते सांगतात. निवडणूकांमधे त्यांना किती जागा मिळतील त्याच्या अंदाज सांगताना ते म्हणतात की मुळात बिहार ची परिस्थिती सुधरु शकते हा विश्वासच तेथील लोक गमावून बसले आहेत. जनसुराज पक्ष हा तिसरा पर्याय आहे याची त्यांना व्यवस्थित जाणीव झाली तर १५० पेक्षा जास्त जागा येऊ शकतील आणि नाही झाली तर १० जागांच्या आतमधेच त्यांचा खेळ संपेल असे अनुमान ते सार्वजनिक रित्या वर्तवतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प़क्षाला ३० ते ६० दरम्यान जागा येऊ नयेत असे त्यांना वाटते कारण त्यामूळे इंडिया किंवा एनडीए ला घोडेबाजार करायला उत्तेजन मिळेल आणी त्या गोंधळात जनसुराज चे विजयी उमेदवार इतर पक्षांच्या वळचणीला जाऊ शकतील आशी भिती त्यांना वाटते. युट्यूबवर त्यांच्या बर्‍याच चित्रफिती आहेत, अधिक माहितीसाठी त्या इच्छूकांनी बघाव्यात. "इस बार अपने बच्चों के भविष्य के लिए वोट दो" हे त्यांचे निवडणूक घोषवाक्य आहे. मी भाजपासमर्थक असलो तरी प्रशांत किशोर आणि जनसुराज पक्षाला बिहार मधे चांगले यश मिळावे असे मनापासून वाटते. नितीश, तेजस्वी किंवा काँग्रेस यांचेपैकी कुणाकडेही सत्ता गेल्यास मागील पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागेल. लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान देखील एक उत्तम नेते आहेत त्यांना देखील चांगले यश लाभावे असे वाटते. त्यांचा पक्ष २८ जागांवर लढत आहे. प्रशांत किशोर यांचेकडे अनेक निवडणूकांची रणणिती तयार करणे, इतर राजकीय पक्षाची रणणिती माहित असणे, उत्तम वक्ता असणे, चांगले व्यक्तीमत्त्व, भारदस्त आवाज, दुर्दम्य मात्र आंधळा नसलेला आशावाद, आणि हे सगळे गुण आहेत. मात्र ते ब्राह्नण असणे, प्रत्यक्ष राजकीय पक्ष चालविण्याचा अनुभव नसणे, पक्षात इतर लोकप्रिय नेते नसणे अशा काही कमतरता आहेत. शेवटी एक बिहारी सब पे भारी पडतो, की मागे पडतो, की उठून अजून संघर्ष करतो हे १४ नोव्हेंबर आणी त्यानंतर येणारा काळच ठरवू शकतो. मात्र बिहारला तिसरा पर्याय हवा हे बिहारींच्या आणि इतर देशासाठी देखील महत्वाचे आहे.

वाचने 17447
प्रतिक्रिया 130

प्रतिक्रिया

बालबुद्धिची "बालदिनी" ५/६१ भेट. सुकडा साफ!! हा "कार्ल्याचा" रस कसा बरे "Ghandy चाटू" पचवणार? वोटचोरी, ईव्हीएम चोरी, मतअधिकार यात्रा, चुकिचा SIR ह्या बिनबूडाच्या प्रचाराला बिहारच्या जनतेने खांग्रेसला "फाट्यावर" मारण्यात आले आहे! बाकी चालू द्या! :-)

पण ज्या चुना आयोगामुळे एवढा मोठा विजय मिळाला त्या चुना आयोगाचे कुठल्याजी भाजप नेता, कार्यकर्त्याने आभार मानले नाहीत! फक्त स्वीस बँकेत पैसा पोहोचवला म्हणजे सगळ झाल का? सार्वजनिक रित्या आभार मानायचा रीत भात आहे की नाही? दृष्ट मेले. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आमच्या सोसायटीत फटाके फुटले. कारण अर्धा स्टाफ आपल्या पगाराचे नुकसान करून वोट द्यायला गेला होता. आमची मोलकरीण ही 25 गेली आणि दहा लावोट टाकून परतली.तिला दहा हजाराच्या वर नुकसान झाले. कारण जंगल राजची भीती.बाकी भाजप जेडीयू आणि LJP तिन्ही मत 2020 मध्ये ही 44 टक्के होते. यावेळी 48 टक्के झाले. तुम्ही शिक्षित आहात? जमिनीवरचे सत्य का दिसले नाही.

In reply to by विवेकपटाईत

तुम्ही शिक्षित आहात? जमिनीवरचे सत्य का दिसले नाही.
शिक्षित लोकांनाच समोर दिसत असते ते बघायचे नसते. बंगाली समाज - विशेषतः कलकत्त्यातील भद्रलोक हा भारतातील सगळ्यात सुशिक्षित समाज आहे असे म्हटले तरी आश्चर्य वाटू नये. तरीही गेली जवळपास ५० वर्षे ते कम्युनिस्ट आणि नंतर ममता या रानटी प्रकारांना अगदी भरभरून मते देत आले आहेत. २०१९ मध्ये बंगालमध्ये भाजपने लोकसभेच्या १८ जागा जिंकल्या पण त्यापैकी कलकत्त्यात नाही तर बंगालच्या उत्तर भागात जिंकल्या होत्या. रघुराम राजन, मनमोहन सिंग, चिदंबरम, जयराम रमेश वगैरे उच्चशिक्षित लोकांचे प्रकार आपण बघतच आहोत. मला तर वाटते की एखादा माणूस जितका जास्त शिकलेला असतो तितका तो **** असायची शक्यता जास्त असते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

"बंगाली समाज - विशेषतः कलकत्त्यातील भद्रलोक हा भारतातील सगळ्यात सुशिक्षित समाज आहे असे म्हटले तरी आश्चर्य वाटू नये. तरीही गेली जवळपास ५० वर्षे ते कम्युनिस्ट आणि नंतर ममता या रानटी प्रकारांना अगदी भरभरून मते देत आले आहेत."
आपण लिहिता/बोलताना अनेकदा 'अकार्यक्षम', 'निष्क्रिय', 'निरुपयोगी' अशा अर्थानी वापरत असलेल्या 'दळभद्री' ह्या शब्दाची व्युत्पत्ती 'भद्रलोक' (भद्री) ह्या शब्दापासून झाल्याचे मागे एका चर्चेत वाचले होते तेव्हा ही एखादी विनोदी कोटी किंवा भंकस असावी असे वाटले होते, पण ह्या लोकांचे एकंदरीत वर्तन पाहता त्यात तथ्य असावे ह्याची आता खात्री पटत चालली आहे 😀
"रघुराम राजन, मनमोहन सिंग, चिदंबरम, जयराम रमेश वगैरे उच्चशिक्षित लोकांचे प्रकार आपण बघतच आहोत"
वरील यादीत 'राहुल गांधी' ह्या तथाकथित उच्चशिक्षित युगपुरुषाचे नाव नसल्याबद्दल आपला तीव्र णिषेध 😂 नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ह्या विद्वान व्यक्तीने केलेल्या, "जब आप जिओ का फोन इस्तमाल करते हो... और व्हिडीओ बनाकर अपने दोस्त को भेजते हो, इंस्टाग्राम के रील बनाते हो तो पैसा किसके जेब में जाता हैं? अदानी..." ह्या विधानामुळे 'गोबरयुगात' राहणाऱ्या तुमच्या-माझ्या सारखे असंख्य सर्वसामान्य लोक बुचकळ्यात पडणे अगदी स्वाभाविक असले तरी त्यात चुकही 100% आपलीच आहे! कारण वरकरणी 'अचाट, अतर्क्य, अशक्य' वगैरे वाटणाऱ्या ह्या अर्थशास्त्रीय विधानाचा अर्थ, त्यातले 'मर्म' समजण्यासाठी फक्त गोबरयुगात रहाणे पुरेसे नसून त्यासाठी डोस्क्यात मेंदूच्या जागी 'गोबर' भरलेले असावे लागते 😂 दुर्दैवाने ही दैवी देणगी आपल्याला लाभलेली नसल्याने 'पराभवांचे शतक पूर्ण होण्यापासून केवळ पाच पावले दूर असलेल्या' ह्या सिद्धपुरुषाची महत्ताच आपल्यासारख्याना कळत नाही आणि त्यामुळे अशी दैवी देणगी लाभलेल्या देशातल्या आणि इथल्या अनेकांप्रमाणे आपण ह्या महाना(ला)यकाचा अनुनय, समर्थन न करता त्याची टिंगल-टवाळी करतो हे सर्वस्वी चुकीचे आहे. खरंतर आपल्या बौद्धिक, आपलं 'गोबरिक' मर्यादांची आपल्यालाच जाणीव नाही हीच आपल्या सारख्यांची खरी समस्या आहे, आपल्याला मिळालेला हा एक अभिशाप आहे 😂 😂 😂 असो... बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या दणदणीत 'नैतिक' विजयासाठी Development Studies मध्ये M.Phil असलेले उच्च विद्याविभुषीत श्री.श्री.श्री. राहुल गांधी आणि 9th Fail श्री.श्री.श्री. तेजस्वी यादव ह्या दोन्ही असामान्य प्रभूती आणि महाठगबंधनच्या समस्त नेत्यांचे त्रिवार अभिनंदन आणि भविष्यातल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचे असेच नैतिक विजय कायम होत राहोत अशा शुभेच्छा! .

In reply to by टर्मीनेटर

बाकी आपले कोटस, लिंका, स्मायलीज, मेम्स आदींनी समृध्द रंगीबेरंगी प्रतिसाद पाहून काही जुने मिपाडोवालांचे प्रतिसाद आठवले. ड्वाळे पानावले हो... इस्पेसली आयटीसेलचे राहुलबाबावरचे प्रेम फारच क्रियेटिव्हली आणि अस्सल खांग्रेसीपेक्षा तसूभर जास्तच असते हे मात्र पटते. . असो, 'जितका शिकलेला तितका हुकलेला' ही खात्री मिपावरच पटली असल्याने आगामी नैतिकतेसाठी कायमच शुभेच्छा.

In reply to by अभ्या..

आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद 😀 बाकी हे मिम्स बनवणार्‍यांच्या क्रिएटिव्हिटिला मनापासुन सलाम... काय एक से एक मिम्स बघायला मिळालेत गेल्या दोन दिवसांत, हसुन हसुन पार मुरकुंडी वळाली राव 😂

In reply to by टर्मीनेटर

आणि उजवे विचारतात गांधीजींनी भगतसिंगची फाशी रद्द करण्यासाठी प्रयत्न केले नाही. भगतसिंग हा कट्टर कम्युनिस्ट होता तरी उजव्यांना अचानक पुळका कसा आला?

In reply to by आग्या१९९०

भगतसिंग कट्टर कम्युनिस्ट होता ही एक कम्युनिस्ट भूलथाप आहे. जो माणूस परमादरपूर्वक गीता सदैव सोबत बाळगतो तो कम्युनिस्ट कसा होईल ! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

क्रांतिकारक भगतसिंगांना कर्तव्य आणि नैतिकतेची प्रेरणा गीतेतून मिळत असल्याने ती बाळगणे ह्यात गैर काय आहे?

In reply to by आग्या१९९०

काहीच गैर नाही. फक्त गीता व कम्युनिझम यांचे संदेश एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहेत, एव्हढंच सांगू इच्छितो. भगतसिंगास कम्युनिस्ट म्हणा, अन्यथा गीताप्रेमी म्हणा. घोडा बोलो नायतर चतुर बोलो. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्हाला भगतसिंग समजलाच नाही. उजव्यांना सवयच आहे एखाद्याला ओढूनताडून आपल्या कळपात खेचून घ्यायची.

In reply to by गामा पैलवान

श्री० गा०पै० सुमारे ४० वर्षांपूर्वी मी पुण्याच्या टिमविमध्ये संस्कृत शिकायला जात असे. आमचा अभ्यासक्रम बीए च्या समकक्ष होता. अनेक अभिजात साहित्यकृती अभ्यासाला होत्या, त्यात भ०गी०, मनुस्मृती, वेद इ० पण होते. मी तेव्हा तब्येतीत संस्कृत शिकलो. तेव्हा केलेले पाठांतर अजुनही बर्‍यापैकी जीभेवर आहे. आमच्या गीता शिकविणार्‍या बाई आम्हाला वर्गात अनेकवेळा म्हणायच्या की आख्खा कम्युनिझम गीतेमधून काढून दाखवता येतो. पण तो कसा हे मात्र त्यांनी कधीच सांगितले नाही. आता आमच्या बाई हयात आहेत की नाही माहीत नाही, पण गीतेमध्ये कम्युनिझम कसा हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहीला (बाकी आयुष्यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्याचे समाधान मोठे आहे). त्यामुळे भगतसिंग कुणाला कम्युनिस्ट वाटत असेल त्यात वाईट वाटायचे कारण नाही. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्। मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः।।4.11।। हे गीतावचन आपल्याला माहित असेलच.

In reply to by युयुत्सु

ए० आय० च्या मदतीने गीतेतल्या साम्यवादाचा शोध घेतला टिळकांपासून कोसंबींपर्यत गीतेतल्या अनेक कल्पनांमध्ये साम्य दिसले आहे. Tilak (in Gita Rahasya) argued that the Gita emphasizes selfless action for the collective good. Some Marxist-leaning scholars later interpreted this as compatible with collectivist, duty-based social ethics, although Tilak himself was not a communist. M.N. Roy, once a communist leader, interpreted various Indian scriptures (including the Gita indirectly) to search for “ancient Indian rationalism.” He did not claim the Gita is communist, but some of his followers suggested that the Gita’s idea of “Nishkama Karma” resembles communist expectations of selfless collective labour. A few Indian Marxist scholars (e.g., D.D. Kosambi) commented that: The Gita justifies one’s role in a social order (varna system) But its emphasis on disciplined, purposeful labour can be compared to Marxist conceptions of productive work Their intention was usually critical, but they did draw comparisons.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भद्रलोक म्हणजे अभिजन. या वर्गाचा एकूण समाजावर सांस्कृतिक, सामाजिक आणि बऱ्यापैकी आर्थिक प्रभाव असतो असं आपण गृहीत धरतो. किमान भारतात तरी कुठल्याही काळात एकूण लोकसंख्येत अभिजनवर्ग हा अल्पसंख्यच राहिला आहे याबद्दल दुमत नसावे. निवडणुकीच्या राजकारणात मात्र संख्येला महत्त्व असल्याने हा वर्ग कितपत परिणामकारक ठरत असेल? बंगाल काय किंवा अन्य कुठेही बहुसंख्येने असलेला बहुजनसमाज, एकगठ्ठा मते हीच बहुमत निश्चित करतात. या वर्गाला आकर्षित करणारे मुद्दे हे अभिजनवर्गाला भावणाऱ्या मुद्द्यांपेक्षा नक्कीच वेगळे असणार, कदाचित महागाईचा मुद्दा सोडल्यास. एकूण बंगाली भद्रलोक आणि एकेकाळी निवडणुकीवर प्रभाव हे माध्यमांनी घडवलेले मिथक असावे. कारण या वर्गाला भावणारे विषय आणि निव्वळ अस्तित्वासाठी झगडणारी आणि त्यादृष्टीने मतदान करणारी कष्टकरी, अशिक्षित जनता यांत किमान निवडणुकीच्या संदर्भात तरी काहीच ताळमेळ दिसत नाही. तत्कालीन सत्ताधारी पक्षाने अभिजन आणि बहुजन (आणि निवडणूक यंत्रणा) यांना एकाच वेळी यशस्वीपणे हाताशी धरले असे म्हणता येईल, इंदिरा गांधींप्रमाणे.

समजा बिहार सरकारने महिलांना दहा हजार दिले नसते तर एव्हढा मोठा विजय मिळाला असता का? मला तरी वाटतंय नसता मिळाला. ही तर उघड उघड दिलेली लाच आहे. बिहार सारख्या गरीब राज्यात दहा हजार म्हणजे भरपूर झाले. एकूण दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती.

PK तेरी मोरनी को मोर ले गये... बाकी जो बचा था काले चोर ले गये 😀 शून्य उमेदवार निवडून आले असले तरी पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या पक्षाला जवळपास साडेतीन टक्के मते मिळाली हे ही नसे थोडके, परंतु "जदयू च्या 25 पेक्षा जास्ती जागा निवडून आल्या तर राजकारणातून संन्यास घेईन" अशी काहीतरी भीष्मप्रतिज्ञा प्रशांत किशोर ह्यांनी केली केली असल्याने आता 'Better luck next time' अशा शुभेच्छाही त्यांना देता येत नाहीयेत...

In reply to by टर्मीनेटर

PK ला ६ टक्के मते मिळाली असती तर त्यांची भविष्यवाणी खरी ठरली असती. पण मिळाले २ टक्के पेक्षा कमी. माझा अंदाज खरा ठरला. महाराष्ट्र सारखी सुनामी आली. बाकी आता उरलेले पेमेंट मिळणार नाही.

In reply to by टर्मीनेटर

बाकी पेमेंट मिळणार नाही. बहुतेक त्यांना आर्थिक नुकसान ही निश्चित झाले असेल. या घटनेला सर्वात जास्त चिंतेत असतील. बाकी राजकुमार नेहमीसारखे प्रसन्नचित्त विदेशात मौज करतील.

बिहारमध्ये सुवर्ण काळ चालू असताना इकडे कशाला ** घालायला येतात ? हा मोठा प्रश्न ? इकडून तिकडे जायचे जंगलराज येऊ नये म्हणून.. मग मागची १० वर्षे सुराज्य आहे तर तिकडेच जाऊन का राहत नाहीत ? ही बिहारी आणि मोतीचे एन आर आय सारखेच..

इकडे कशाला ** घालायला येतात ? काय भाषा आहे? वैफल्य इतकं? उद्या अमेरिकी लोक अनिवासी भारतीय लोकांबद्दल असं बोलत असतील तर आपण कोणत्या तोंडाने त्याना बोलू शकू?

In reply to by सुबोध खरे

इकडे कशाला ** घालायला येतात ? काय भाषा आहे? वैफल्य इतकं?
घालायचेच असले तर वर्षं, श्राध्द, छट, पैसे, खाऊ, शेण, माती, चड्डी, कार्ड अशी बरीच दोन अक्षरी खालायची शब्दं आपापल्या समज, भावना आणि मतीनुसार घालता येतात. काहीजणांची भाषा डायरेक्ट चालून जाते, काहींच्या चांदण्या सुध्दा झोंबतात. इतकेच. . बाकी इतक्या वर्षांच्या वैफल्यानंतर आलेला इंस्टंट माज बघता कुणालाही वैफल्य येईल. .
उद्या अमेरिकी लोक अनिवासी भारतीय लोकांबद्दल असं बोलत असतील तर आपण कोणत्या तोंडाने त्याना बोलू शकू?
उद्या? ते आजच बोलताहेत, आपल्या कोणत्या तोंडाने बोलायची हिंमत दाखवलीय ते सांगा.

भाजपा/नीतीश ह्यांच्या विजयापे़क्षा आम्हाला प्रश्न पडलाय की कॉन्ग्रेस पक्ष बिहारमध्ये एवढा का ढेपाळला? आम्हाला ह्यावेळी कॉन्ग्रेस पक्ष ५०/६० जागा आणेल अशी आशा होती. राहुल/टीमने बर्यापैकी मेहनत घेतल्याचे दिसत होते. सभांना गर्दीही दिसत होती. असो. आता पत्रकार म्हणत आहेत की खुद्द काँग्रेस कार्यकर्तेच खाजगीत सांगत होते की २०च्या वर जागा आल्या तरी डोक्यावरुन पाणी आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फक्त हात बांधून मान डोलावणाऱ्या वयस्करांनाच कांग्रेसमध्ये स्थान आहे. ते म्हणे देश चालवणार. सरकार चालवणार.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आम्हाला ह्यावेळी कॉन्ग्रेस पक्ष ५०/६० जागा आणेल अशी आशा होती.
मुळात ६१ जागा लढविल्या होत्या त्यापैकी ५०/६० जागा काँग्रेस जिंकेल अशी आशा होती? कमाल आहे. बाकी बिहारमध्ये काँग्रेसचा हा सगळ्यात मोठा पराभव नाही. २०१० मध्ये काँग्रेसने स्वबळावर निवडणुक लढवली होती आणि त्यांना तेव्हा तब्बल ४ जागा मिळाल्या होत्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तेजस्वीची मतं कॉंग्रेसकडे गेली नाहीत हे त्याचं कारण आहे. तेजस्वी यांना भाजप व जेडीयू यांना स्वतंत्रपणे जेवढी मते पडलेली आहेत त्यापेक्षा जास्त मते पडलेली आहेत. मतं मिळवण्यामधे तो सर्वात मोठा पक्ष आहे. कॉंग्रेसचा एकच प्रॉब्लेम आहे. त्यांना अजूनही पेरे पाटलांचा मुद्दा पटलेला नाही. पेरे पाटलांच्या प्रमाणे लोकशाहीत जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन जाणारा यशस्वी होत असतो. पध्दत योग्य की अयोग्य हा मुद्दा सत्तासंपादनात महत्वाचा नसतो. पण कॉंग्रेस व त्यांचे समर्थक आजही त्यावर काम करायला तयार नाहीत. इव्हीएम, व्होटचोरी, इडी, चुना आयोग असले मुद्दे घेऊन लोकं जोडली जायच्या ऐवजी कमी होत आहेत असं मतदान टक्केवारी तरी सांगते आहे. आता वाट बघूया मुंबई महानगर पालिका. असो.

In reply to by शाम भागवत

तेजस्वी पार्टीला प्रति जागा ८०,०००+ जेडीयूला प्रति जागा ९६,०००+मते. भाजपला प्रति जागा ९९,०००+ मते.

अवांतर : आग्या१९९०, आपला इथला संदेश वाचला. १.
तुम्हाला भगतसिंग समजलाच नाही.
ज्जे बात! अगदी बरोबर बोललात पहा. आम्हांस भगतसिंग समजलाच नाही. पण इंग्रजांना बरोब्बर समजला. २.
उजव्यांना सवयच आहे एखाद्याला ओढूनताडून आपल्या कळपात खेचून घ्यायची.
इंग्रजांनी त्यास फासावर चढवून कायमचा उजव्यांच्या कळपात ढकलला. आज भगतसिंगास आमच्या कळपांत सामील करावयास आम्हांस धडपड करायची मुळीच गरज नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ज्यांनी इंग्रजांची अनेकवेळा माफी मागितली अशांनाच तुमच्या कळपात सामील करतात ना? शूरवीर आणि माफीवर एकाच कळपात कसे काय ब्वॉ.

In reply to by आग्या१९९०

त्यांनी माफी मागितली म्हणून त्यांना वर्षे काळा पाण्याची सजा दिली. जे स्वतंत्रता सैनिक होते ते मात्र आगाखान पॅलेस मध्ये मौज करायचे. दोन्ही सावरकर बंधूंनी दहा-दहा वर्ष अंदमानच्या काळकोठरीत काढले आहे. ज्यांची निष्ठा देशाप्रती नाही तेच त्यांना वाईट बोलू शकतात. देशभक्त लोकांसाठी ते आदर्श आहेत.

जे स्वतंत्रता सैनिक होते ते मात्र आगाखान पॅलेस मध्ये मौज करायचे. देशद्रोह्यांना काळे पाणी. बरोबर ना?

In reply to by आग्या१९९०

२७२ हूर निवडणूक आयोगाच्या बचावाला उतरले. ह्यात किती माजी निवडणूक अधिकारी आहेत बघावे लागेल.

In reply to by आग्या१९९०

'Business Communication' हा विषय शिकवणारे आमचे 'राजगोपाल' म्हणून एक (तामिळ) प्रोफेसर होते. त्यांचे इंग्रजी आणि (एकतर जन्माने मुंबईकर त्यात बायको मराठी असल्याने) मराठी भाषेवरही प्रभुत्व होते. अध्यापनात ते म्हणी आणि वाक्प्रचारांचा मुबलक वापर करत असत आणि अवांतराचेही त्यांना वावडे नसायचे त्यामुळे त्यांचे लेक्चर बंक करायची आमच्यासारख्या टपोरी विद्यार्थ्यांनाही कधी ईच्छा व्हायची नाही.
"Old wine in new Bottle, Shape and Colour of the bottle is changed but wine is one and the same..."
हे वाक्य/वाक्प्रचारही त्यांच्याकडूनच ऐकला असल्याने असेल कदाचित, पण कायमस्वरूपी लक्षात राहिला आहे आणि तो इथेही लागू पडतोय!
"२७२ हूर निवडणूक आयोगाच्या बचावाला उतरले."
ह्यात नवीन असे काहीच नाही... मागे 'पुरस्कार वापसी' (पुरस्कार नामक कागदाची भेंडोळी/सुरनळी फक्त, त्या पुरस्काराची रक्कम कोणी परत केल्याचे ऐकण्या/वाचण्यात आलेले नाही) नामक नौटंकी आपण बघून झाली आहे, त्याआधी भारतातल्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अमेरिकेचा व्हिसा मिळू नये म्हणून पत्रलेखन करणारे महाभागही आपण बघितले आहेत... तशीच ही अजून एक नौटंकी! चार दिवस मिडिया ह्यावर चर्चित चर्वण करेल ह्यापेक्षा जास्ती काही होणार नाही. न्यायपालिकेवर देशवासीयांचा कणभरही विश्वास उरला असता तर त्यांना 'चाराचोर' लालूप्रसाद यादव आणि त्यांचा 'जमीनचोर' परिवार, 'आदर्श' अशोक चव्हाण, 'पत्रावाला' संजय राऊत, 'महा-भामटा'अरविंद केजरीवाल, ' नॅशनल हेराल्ड चोर' सोनिया गांधी आणि ('माफीवीर') राहुल गांधी, 'भुखंड चोर' रॉबर्ट वाड्रा आणि असे अनेक नामचीन घोटाळेबाज गजाआड जाण्याऐवजी अजून जामिनावर किंवा अन्य कारणांनी बाहेर कसे? असा प्रश्न पडला नसता! 'सब घोडे बारा टक्के' हेच तेवढे खरे, त्यामुळे 'Whores' (सो कॉल्ड 'हूर/ हूरें' 😂) ७२ असोत की २७२, बाटली नवीन असली तरी त्यात दारू जुनीच असल्याने परिस्थितीत किंचितही फरक पडेल असे वाटत नाही!

In reply to by टर्मीनेटर

ह्यात नवीन असे काहीच नाही... मागे 'पुरस्कार वापसी' (पुरस्कार नामक कागदाची भेंडोळी/सुरनळी फक्त, त्या पुरस्काराची रक्कम कोणी परत केल्याचे ऐकण्या/वाचण्यात आलेले नाही) नामक नौटंकी आपण बघून झाली आहे, मुळात तुलनाच चुकीची आहे. सरकारविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी पुरस्कार वापसी हत्यार वापरले गेले होते. का ते माहित असेलच. आत्ताचे २७२ एका विरोधी पक्षनेत्याविरुद्ध आणि संशयीत आयोगाचा बचाव करण्यासाठी उतरले आहेत. ज्यात रिस्क शून्य आणि रिवॉर्डची अपेक्षा जास्त. असंही राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांकडे बिहारच्या जनतेने दुर्लक्ष केले असल्याने आयोगाचा बचाव करण्यात काहीच अर्थ नाही.

आजतागायत कुणी वीर चक्र, महावीर चक्र, परमवीर चक्र परत केल्याचे ऐकिवात नाही कारण यातील एकही पुरस्कार लांगुलचालन किंवा लाळघोटेपणा करून मिळालेला नाही बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

हे २७२ दगडाखाली हात अडकल्याने राहुल गांधींच्या ( आता पप्पू संबोधत नाही ,पुरून उरला विश्वगुरू आणि शिशुवर्गाला ) विरोधात उतरवले गेले आहेत. ह्या शूरांनी कितीही लांगुलचालन किंवा लाळघोटेपणा केला तरी पुरस्कार मिळणे दूर, कायम मालकाचे तळवे चाटणे आणि छू म्हटले की धावून जाणे हेच काम करावे लागणार, गुलामीकरता कुठलीच कसर ठेवली नाही ह्या नगांनी. तरी बरं निवडणूक आयोगाचे माजी अधिकारी ह्यात सामील नाहीत. राहुल गांधींना हे कोर्टात का खेचत नाही? ग्यानी बाबाकडून शपथपत्र लिहून घ्यावे. आपला एक दुबळा शत्रुदेश जसे आपल्याशी प्रॉक्सी युद्ध करते तसे सत्ताधारी पक्ष राहुल गांधींविरुद्ध लढत आहेत. ह्यावरून शोलेचा संवाद आठवला, " सुनो ठाकूरने xxxकी फौज बनाई है l

In reply to by सुबोध खरे

शिशुवर्गाच्या आजीवन विद्यार्थ्याच्या आकलनापलीकडचा विषय आहे हा. तूर्तास दूरच रहावे हा फुकटचा सल्ला देतो. :)

राहुल गांधींना हे कोर्टात का खेचत नाही? Long List Of Cases Against Rahul Gandhi Filed Across India. https://www.ndtv.com/india-news/long-list-of-cases-against-rahul-gandhi… The Lok Sabha had disqualified Mr Gandhi from the house's membership after his conviction in a defamation case. Mr Gandhi is out on bail in the National Herald case. Along with his mother Sonia Gandhi, he was granted bail in December 2015 in the case pursued by BJP leader Subramanian Swamy. Rahul Gandhi ‘unconditionally apologises’ to apex court.सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागून सुद्धा हे सुधारत नाहीत. सलग ९६ निवडणूक हरून सुद्धा अजून काँग्रेस पक्ष याना सोडचिठ्ठी देत नाही आणि आपल्यासारखे गुलाम यांची भलामण करत फिरत असतात. https://www.thehindu.com/news/national/rahul-gandhi-unconditionally-apo… लाखो रुपये घेणारे अभिषेक मनू सिंघवी आणि कपिल सिब्बल सारखे वकील त्यांच्या दावणीला बांधलेले आहेतच. त्यामुळे सकृतदर्शनी पुरावे असले तरी जामिनावर हे बाहेर जगभर फिरत असतात. खालच्या कोर्टात हरले कि वरच्या कोर्टात खटला चालू असतो आणि आपली कूर्मगती न्यायालये पाहिली तर त्यांचे खटले संपेस्तोवर त्यांची पंचाहत्तरी उलटली तरी आश्चर्य वाटू नये. 2015-2019 Period: The Union Home Ministry stated in parliament that Rahul Gandhi made 247 foreign trips between 2015 and 2019 without informing the Special Protection Group (SPG) security detail in advance. This number only includes unnotified trips, so the actual total number of visits during this period is potentially higher. चार वर्षात २४७ वेळेस परदेशात गेले हे युवराज म्हणजेच दर महिन्यास पाच वेळेस परदेशात फिरत होते. खासदारकीचा पगार सोडल्यास यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय ज्यात हे युवराज महिन्याला पाच वेळेस परदेशात फिरत होते हा साधा प्रश्न आपल्यासारख्या गुलामांना पडत नाही कारण आपली अक्कल एकदा गहाण पडली कि विचारशक्ती कुंठीत होते. तेंव्हा तुम्ही टंकत राहा राहुल गांधी स्तोत्रे मिपावर. चालू द्या

In reply to by सुबोध खरे

:) नुसते विचारता काय, काढा शोधून त्यांचे उत्पन्नाचे स्रोत. सरकार काय झोपले आहे का? पुरावे असेल तर कोर्टात जा, कोणी रोखले आहे तुम्हाला? अर्थात कपिल सिब्बलसारखे वकीलच बघा. शिशुवर्गातून वकील कसे मिळणार? शुभेच्छा!

In reply to by आग्या१९९०

रागा २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत राजकारणात असलेच पाहिजेत. कोर्टाचे निकाल तोपर्यंत तरी नको. :)

In reply to by सुबोध खरे

तुम्ही आयुष्यभर कण्हत कुथत मोजत राहा राहुल गांधींचे परदेश दौरे आणि न शोधता येणारे आर्थिक स्रोत.

In reply to by आग्या१९९०

एक सर्वेक्षण केले की 2029 च्या निवडणूकीत कॉन्ग्रेस चा प्रचार प्रमुख कोण हृवा? 90% कोन्ग्रेसी म्हणाले की राहूल गांधी तर 100% भाजप वाले म्हणाले आम्हाला राहूल गांधी च हवेत

राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहे. राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख राहो हे भाजपाच्या हिताचे आहे.

काँग्रेसचे लोकं अजूनही राहुल गांधीनाच कुरवाळत का बसलेत ते समजतं नाही. दुसऱ्या कोणच्या हातात पक्ष दिला तर २९ ला काँग्रेस कदाचित सत्तेत येणार नाही. पण पक्ष तरी हळू हळू उभा राहील. निखिल वागळे, रविश कुमार सारखे पत्रकारही राहुल गांधीच कसे योग्य आहेत ह्याचे व्हिडीओ बनवत आहेत. मोदी शहा ED वगैरे ची मदत, कामाच्या जाहिराती करून यशस्वी होत आहेत. एकदा हरायला लागले की भाजप त्यांचं महत्व कमी करून टाकेल. वाजपेयी नंतर आडवानी च्या नेतृत्व खाली एका का दोन निवडणूक लढली. कांय होत नाही हे लक्षात आलं की मोदींना पुढ केलं. म्हणूनच भाजपाला हे दिवस आलेत. गांधीनाच चिकटून राहायचंच आहे हेच ठरल असेल तर प्रियांका वढेरांच्या मुलांना आडनाव बदलून तरी आणायला पाहिजे.

ए आई लेखावर प्रतिसाद देताना सारखी unexpected error येत आहे. इथे प्रतिसाद देऊन बघतो. बाकी रेहान वाड्रा चे बहुतेक बदलले आहे.

पप्पू हा मोदी व शहांचा राजकीय विमा आहे. तो उगीच अडगळीत पडायला नको. माझ्या मते यासाठीच भाजपवाले निखील वागळे, रवीशकुमार, वगैरेंना सूचना देत असावेत की पप्पूचाच प्रचार करा म्हणून. -गा.पै.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार असे मला वाटते. असे अजून कोणाला वाटते?