राज ठाकरेंच्या करिश्म्यामुळे मुंबईत शिवसेना भाजपा युतीचा सुपडा साफ झाला मनसे सारख्या नवख्या पक्षांच्या नवख्या उमेदवारांमुळे शिवसेना भाजपाचे राम नाईक गजानन किर्तीकर किरिट सोम्मया सारखे दिग्गज उमेदवार पडले आहेत
मनसेची लाट युतीची वाट लावणार ’ , असं समीकरण राजकीय विश्लेषकांनी आणि अभ्यासू मतदारांनी ३० एप्रिलला मतदानाच्या दिवशीच मांडलं होतं. अगदी तसंच चित्र आज पाहायला मिळालं. महाराष्ट्रातल्या १२ जागांवर, जिथे मनसेचे उमेदवार उभे होते, तिथे शिवसेना-भाजप युतीचे अक्षरशः बारा ’ वाजले आहेत. ठाणे आणि मुंबई या शिवसेनेच्या दोन गडांना तर त्यांनी खिंडार पाडलंय. अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवाराला तिस-या नंबरवर फेकण्याची करामतही त्यांनी केलेय.
दक्षिण मुंबईत काँग्रेसचे मिलिंद देवरा विजयी झाले असून विजयाची सिक्सर मारायला निघालेले शिवसेनेचे मोहन रावले तिस-या नंबरवर फेकले गेलेत. दुसरा क्रमांक पटकावणा-या मनसेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांचा घात केला.
दक्षिण मध्य मुंबईतही मनसेच्या श्वेता परूळकर, शिवसेनेचे सुरेश गंभीर यांच्या मार्गातला अडथळा ठरल्यात. त्यामुळे एकनाथ गायकवाड यांची लाइन अगदीच क्लिअर झाली आहे. तसंही त्यांचं पारडं जड होतं, त्यातच मनसेनं सेनेची अवस्था अधिकच गंभीर ’ केली.
काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य या नव्या मतदारसंघातही बाजी मारली आहे. राम जेठमलानी आणि राज ठाकरे यांच्या वादावादीत महेश जेठमलानी यांना धक्का बसलाय. मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाल्यानं जेठमलानी यांचा पत्ता सहज कट ’ झालाय.
वायव्य मुंबईत गजानन कीर्तिकर यांची सीट पक्की मानली जात होती. पण तिथे मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी त्यांना ‘ ठाकरी हिसका ’ दाखवला. गुरुदास कामत यांचं भाग्य मात्र त्यामुळे चांगलंच फळफळलं. त्यांच्यासाठीही हा मतदारसंघ नवा होता आणि तिथे त्यांचा फारसा प्रभावही नव्हता.
उत्तर मुंबईत भाजपचे राम नाईक यांना पुन्हा एकदा दणका बसलाय. शिरीष पारकर यांनी त्यांची पार वाट लावली आहे. त्यामुळे संजय निरुपम अनपेक्षित विजयाच्या दिशेनं कूच करत आहेत.
ईशान्य मुंबईतही शिशिर शिंदे यांच्यामुळे भाजपच्या किरीट सोमय्या यांना पराभवाचा धक्का बसलाय.
उत्तर मध्य मुंबई
प्रिया दत्त (काँग्रेस) - ३ लाख १९ हजार ३५२
महेश जेठमलानी (भाजप) - १ लाख ४४ हजार ७९७
शिल्पा सरपोतदार (मनसे) - १ लाख ३२ हजार ५५५
मताधिक्यः १ लाख ७४ हजार ५५५
ईशान्य मुंबई
संजय पाटील (राष्ट्रवादी) - २ लाख १३ हजार ५०५
डॉ. किरीट सोमय्या (भाजप) - २ लाख १० हजार ५७२
शिशिर शिंदे (मनसे) - १ लाख ९५ हजार १४८
मताधिक्यः २ हजार ९३३
वायव्य मुंबई
गुरुदास कामत (काँग्रेस) - २ लाख ५३ हजार ८९९
गजानन कीर्तिकर (शिवसेना) - २ लाख १५ हजार ४८४
शालिनी ठाकरे (मनसे) - १ लाख २३ हजार ८८५
अबू आझमी (सपा) - ८४ हजार ४११
मताधिक्यः ३८ हजार ४१५
ठाणे
संजीव नाईक (राष्ट्रवादी) - ३ लाख ०१ हजार ०००
विजय चौगुले (शिवसेना) - २ लाख ५१ हजार ९८०
राजन राजे (मनसे) - १ लाख ३४ हजार ८४०
मताधिक्यः ४९ हजार ०२०
भिवंडी
सुरेश टावरे (काँग्रेस) - १ लाख ८२ हजार ७८१
जगन्नाथ पाटील (भाजप) - १ लाख ४१ हजार ६१६
देवराज म्हात्रे (मनसे) - १ लाख ०७ हजार ०८५
आर. आर. पाटील (सपा)- ३२ हजार ७६५
मताधिक्यः ४१ हजार १६५
(सर्व आकडेवारी मटा मधुन सांभार)
वाचने
15679
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
<<सेनेने
या
"मनसे'च्या पराभवात विजय ...!!
हे
In reply to "मनसे'च्या पराभवात विजय ...!! by दगड
किंचित आकडेमोड....
आज मनसे
पुढे काय होईल?
साला जर