Skip to main content

मनसेमुळे सेना - भाजपा युती मुंबईत साफ झोपली

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शनिवार, 16/05/2009 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंच्या करिश्म्यामुळे मुंबईत शिवसेना भाजपा युतीचा सुपडा साफ झाला मनसे सारख्या नवख्या पक्षांच्या नवख्या उमेदवारांमुळे शिवसेना भाजपाचे राम नाईक गजानन किर्तीकर किरिट सोम्मया सारखे दिग्गज उमेदवार पडले आहेत मनसेची लाट युतीची वाट लावणार ’ , असं समीकरण राजकीय विश्लेषकांनी आणि अभ्यासू मतदारांनी ३० एप्रिलला मतदानाच्या दिवशीच मांडलं होतं. अगदी तसंच चित्र आज पाहायला मिळालं. महाराष्ट्रातल्या १२ जागांवर, जिथे मनसेचे उमेदवार उभे होते, तिथे शिवसेना-भाजप युतीचे अक्षरशः बारा ’ वाजले आहेत. ठाणे आणि मुंबई या शिवसेनेच्या दोन गडांना तर त्यांनी खिंडार पाडलंय. अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवाराला तिस-या नंबरवर फेकण्याची करामतही त्यांनी केलेय. दक्षिण मुंबईत काँग्रेसचे मिलिंद देवरा विजयी झाले असून विजयाची सिक्सर मारायला निघालेले शिवसेनेचे मोहन रावले तिस-या नंबरवर फेकले गेलेत. दुसरा क्रमांक पटकावणा-या मनसेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांचा घात केला. दक्षिण मध्य मुंबईतही मनसेच्या श्वेता परूळकर, शिवसेनेचे सुरेश गंभीर यांच्या मार्गातला अडथळा ठरल्यात. त्यामुळे एकनाथ गायकवाड यांची लाइन अगदीच क्लिअर झाली आहे. तसंही त्यांचं पारडं जड होतं, त्यातच मनसेनं सेनेची अवस्था अधिकच गंभीर ’ केली. काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य या नव्या मतदारसंघातही बाजी मारली आहे. राम जेठमलानी आणि राज ठाकरे यांच्या वादावादीत महेश जेठमलानी यांना धक्का बसलाय. मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाल्यानं जेठमलानी यांचा पत्ता सहज कट ’ झालाय. वायव्य मुंबईत गजानन कीर्तिकर यांची सीट पक्की मानली जात होती. पण तिथे मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी त्यांना ‘ ठाकरी हिसका ’ दाखवला. गुरुदास कामत यांचं भाग्य मात्र त्यामुळे चांगलंच फळफळलं. त्यांच्यासाठीही हा मतदारसंघ नवा होता आणि तिथे त्यांचा फारसा प्रभावही नव्हता. उत्तर मुंबईत भाजपचे राम नाईक यांना पुन्हा एकदा दणका बसलाय. शिरीष पारकर यांनी त्यांची पार वाट लावली आहे. त्यामुळे संजय निरुपम अनपेक्षित विजयाच्या दिशेनं कूच करत आहेत. ईशान्य मुंबईतही शिशिर शिंदे यांच्यामुळे भाजपच्या किरीट सोमय्या यांना पराभवाचा धक्का बसलाय. उत्तर मध्य मुंबई प्रिया दत्त (काँग्रेस) - ३ लाख १९ हजार ३५२ महेश जेठमलानी (भाजप) - १ लाख ४४ हजार ७९७ शिल्पा सरपोतदार (मनसे) - १ लाख ३२ हजार ५५५ मताधिक्यः १ लाख ७४ हजार ५५५ ईशान्य मुंबई संजय पाटील (राष्ट्रवादी) - २ लाख १३ हजार ५०५ डॉ. किरीट सोमय्या (भाजप) - २ लाख १० हजार ५७२ शिशिर शिंदे (मनसे) - १ लाख ९५ हजार १४८ मताधिक्यः २ हजार ९३३ वायव्य मुंबई गुरुदास कामत (काँग्रेस) - २ लाख ५३ हजार ८९९ गजानन कीर्तिकर (शिवसेना) - २ लाख १५ हजार ४८४ शालिनी ठाकरे (मनसे) - १ लाख २३ हजार ८८५ अबू आझमी (सपा) - ८४ हजार ४११ मताधिक्यः ३८ हजार ४१५ ठाणे संजीव नाईक (राष्ट्रवादी) - ३ लाख ०१ हजार ००० विजय चौगुले (शिवसेना) - २ लाख ५१ हजार ९८० राजन राजे (मनसे) - १ लाख ३४ हजार ८४० मताधिक्यः ४९ हजार ०२० भिवंडी सुरेश टावरे (काँग्रेस) - १ लाख ८२ हजार ७८१ जगन्नाथ पाटील (भाजप) - १ लाख ४१ हजार ६१६ देवराज म्हात्रे (मनसे) - १ लाख ०७ हजार ०८५ आर. आर. पाटील (सपा)- ३२ हजार ७६५ मताधिक्यः ४१ हजार १६५ (सर्व आकडेवारी मटा मधुन सांभार)

वाचने 15679
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

सेनेने भले काही केल नसेल मराठी माणसासाठी पण म्हणुन मराठीची ओरड करत मराठी माणसाचा पर्यायाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अधिकार मनसेला कुणी दिला?>>> गंमत आहे नाही. प्रश्न असा आहे की खंजीर कुणी कुणाच्या पाठीत खुपसला. इथे राजना किंवा मनसेला दोष देण्यापेक्षा जरा आत्मपरिक्षण करणे योग्य नाही का ठरणार? शिवसेनेची किंवा भाजपाची मते मनसेने खाल्ली आणि युती झोपली व त्यामुळे मराठीयांचे नुकसान झाले असे म्हणताना मग या मराठी माणसांनी सरसकट राजजींच्या मनसेलाच मते का नाही दिली. मुळात खुप कमी प्रमाणात मतदान झाले, ज्यांनी केले ते अस्थानी केले. तेव्हा खंजीर खुपसण्याचा आरोप जर मनसेवर किंवा राजवर होत असेल तर असे मतदान करणारी मराठी जनतादेखील तेवढीच दोषी आहे. उगीचच फक्त राजकारण्यांवरच आगपाखड करण्यात काय अर्थ आहे? सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

या विषयावरची पुढे कुठेच न नेणारी चर्चा आता थांबवण्यात यावी ही विनन्ती. भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

"मनसे'चा पराभवात विजय जरी झाला असला तरी.. कोणाच्या पराभवात विजय मानणे हे सुरवातीची व्यूहरचना म्हणून ठीक असले तरी ते "नवनिर्माण' करू शकत नाही. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने एक राजकीय पर्याय निर्माण करून तो स्थिर करायचा असेल तर पक्षबांधणीसाठी राज ठाकरे यांना प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी पक्षात दुसरी फळी भक्कमरीत्या उभी करावी लागेल. राज ठाकरे यांच्या प्रचाराचा सारा रोख प्रस्थापित पक्षांच्या विरोधात होता; परंतु त्यांच्या राजकारणामुळे सत्ताधारी आघाडीलाच फायदा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे केवळ पाडापाडी करणारा पक्ष अशी प्रतिमा निर्माण होऊ न देता एक सक्षम पर्याय म्हणून मनसे कसा उभा राहणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पुणे-मुंबई-नाशिकच्या बाहेरही महाराष्ट्र आहे. तेथे रुजल्याशिवाय असा पर्याय निर्माण करता येत नाही. हे लक्षात घेतले नाही तर पराभवातील विजयाप्रमाणे भविष्यात विजयातील पराभवाची चवही मनसेला कदाचित चाखावी लागेल.

काही व्याख्या व गृहितके आणि किंचित आकडेमोड...... व्याख्या १) मराठी - ज्याची मातृभाषा मराठी आहे तो. २) मुंबईकर - ज्याचा जन्म आणि बहुतांश काळ मुंबईत गेला आहे तो गृहितके १) मनसेच्या उमेदवारला मिळालेली सगळी मते, जर मनसे रिंगणात नसती तर, सेना-भाजप उमेदवारला मिळाली असती. २) अबु आझमीला मिळालेली सगळी मते, जर तो उभा नसता तर, काँग्रेस उमेदवारला (गुरुदास कामत) यांना मिळाली असती. वरील दोन्ही गृहितके खरी मानली तर काय परिस्थिती असती? निवडून आलेले उमेदवार हे असते - ६ पैकी ३ मराठी. राम नाईक (मराठी) गुरुदास कामत किरिट सोमैय्या प्रिया दत्त एकनाथ गायकवाड (मराठी) मोहन रावळे (मराठी) आणि सध्याचे परिस्थिती अशी आहे - ६ पैकी २ मराठी. संजय निरुपम गुरुदास कामत संजय पाटील (मराठी) प्रिया दत्त एकनाथ गायकवाड (मराठी) मिलिंद देवरा म्हणजे फक्त एक मराठी उमेदवार कमी! जाता जाता - मुंबईबाहेरचा मराठी आणि पक्का मुंबईकर अमराठी यांतून काय निवडावे बरे? उमेदवाराचे चारित्र्य / काम तसेच त्याच्या पक्षाची ध्येयधोरणे समान असतील तर, स्थानिक उमेदवार हाच योग्य पर्याय ठरू नये काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आज मनसे कडे तरुण वर्ग जो आकर्षित झाला आहे तो १४-२० वया दरम्यानच्या तरुण तरुणीचा आहे . हे अगदी १००% खरे आहे. माझी १४ वर्षांची मुलगी राजसमर्थक आहे. तिच्या शाळेत, ज्यांचे आईवडील मनसे सोडुन इतर पक्षांचे नेते आहेत, त्या मुली सोडून बाकी सगळ्या राजसमर्थक आहेत. आणि माझ्या मुलीच्या मते, त्या मुलीही फार काळ आईवडीलांच्या पक्षांचे समर्थन करणार नाहीत. बाकीच्या मुली लवकरच त्यांना राजसमर्थक बनवतिल. :) साधना

काही असो .. मनसे ने शिवसेनेच्या जागा घेतल्यान हे काही चांगलं नाही... कारण , मधे एकदा मिलिंद देवरा म्हणाले होते की मुंबई जर का राज्य झाल तर चांगल होईल.. तेव्हा ही भूमिका घेणारा पक्ष मुंबईतुन निवडून आला हे काही चांगल नाही. आता झालं ते झालं .. पूढ्च्या वेळी माझ्या मते ...एका पक्षाला मतदान होईल... या वेळचे निकाल नक्कीच मतदाराला आवडले नाही आहेत... आणि निवडणूकीत हे बरेचदा आपोआप बदलतं .कारण आपण मतदान करतो तेव्हा तो माणूस निवडून यावा यासाठी करतो .. दूसरा पडावा म्हणून नाही , किमान दोन वेळा असं होणार नाही..

साला जर एव्हडीच उध्दवमधे धमक असती तर २००४ च्या निवडनुकित त्यांचा एकच खासदार निवडुन नसता आला आता तर तो पण पडला मुंबई महराष्ट्रापासुन तोडायचा डाव आहे असे ओरडुन ओरडुन्च सेनेने किती तरी वेळा मुंबई महानगर्पालीकेत सत्ता घेतली आहे त्याच काय अजुन तरी मंबई महाराष्ट्रातच आहे ना आणी पालिकेत ह्यांनी कोनाच भल केल आहे स्वताच आणी स्वताच्या कंत्राटदारांच त्याच काय ?