Skip to main content

भिक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 10/09/2025 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
भिक - शशक गणपती विसर्जनाचा दिवस. डीजेचा दणदणाट आसमंताला भिडलेला. एका मंडळापुढे पोरं तर्राट नाचत होती. एकजण खेळण्यातला हाडाचा सापळा घेऊन नाचत होता. बेभानपणे ! तशा गर्दीत एक लहान मुलगी घुसली. भिक मागायला. सापळावाला तिच्याकडे बघून हसला. त्याने तिला तो सापळा देऊन टाकला. भिक म्हणून . वारे औदार्य! ती घाबरली ; पण ते एक खेळणंच तर होतं. तो घेऊन ती एका मांडवाच्या मागे गेली. आडोशाला. तिथे तिची आई होती. झोपलेली. तिने आईकडे पाहिलं. मग त्या सापळयाकडे पाहिलं. आणि तिला एकदम हुंदकाच फुटला. तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि तिने तो सापळा एकदम लांब फेकला. तिची आई म्हणजे हाडाचा एक जिवंत सापळाच तर होती.
लेखनविषय:

वाचने 1173
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कोणासाठी खेळणे तर कोणासाठी नाईलाज किवा अपरिहार्यता शशक आवडली