Skip to main content

अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.

लेखक गवि यांनी गुरुवार, 12/06/2025 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं. इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा. कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते. ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे. अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात. काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार. त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं. हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर. अधिक अपडेट इथे करत राहू.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 44938
प्रतिक्रिया 188

प्रतिक्रिया

कारण बोईंगमधला बिघाड नसून एंजिनाचं ईंधनच बंद करणारं बटण फिरवलं होतं. आणि त्यातली चर्चा ब्लॅक बॉक्समधून कळली. " तू इंधन बंद का केलंस?" " मी नाही केलं." ......... मग ती दोन्ही बटणं फिरवण्यात आली तरी तेवढा वेळच नव्हता आणि विमान खाली आदळलं. आता बहुतेक ट्रकचा दुसरा ड्रायवर मागच्या बाकड्यावर झोपतो तसं विमानाच्या कोपायलटला मागे झोपवणार.

In reply to by कंजूस

इंजिनला होणारा इंधन पुरवठा बंद झाल्यावर हा प्रश्न एका पायलटने दुसऱ्याला विचारला. दोन्ही इंजिनचा इंधन पुरवठा स्वतंत्र चालू बंद करावा लागतो. असा सहज बटण फिरवला आणि बंद केले होत नाही.. आणि एकाच वेळी दोन्ही इंधन पुरवठा बटण द्वारे बंद झाला हे सिद्ध जाले नाहीये

In reply to by कपिलमुनी

दुव्याबद्दल...आभार. -दिलीप बिरुटे

एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात (वृत्तपत्र दुवा) नमूद करण्यात आले आहे. चला आमचा अंदाज अभ्यास नसतानाही, व्हीडीयोज, गूगल आणि इतर साधने यावरुन बरोबर आला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन पुरवठा खंडीत होण्याचा फरक फक्त एक सेकंदाचा होता. पुढील १० सेकंदात दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा पूर्ववत झाला होता.

In reply to by आग्या१९९०

किंचित बदल. दहा सेकंदांत पुरवठा पूर्ववत झाला नव्हता तर साधारण दहा सेकंदांत फ्युएल कट ऑफ स्विच एकामागून एक दोन्ही इंजिन्ससाठी पुन्हा ऑन केली गेली. क्रॅश होण्याच्या वेळेपर्यंत एक इंजिन हळूहळू सुरू होत आले होते पण अद्याप पुरेसा थ्रस्ट उत्पन्न करू शकले नव्हते.

मी हे इंग्लिश मध्ये लिहितो आहे/उधृत करत आहे.क्षमस्व N THE 1980s a new generation of high-speed computers will appear with switching devices in the electronic components which are so small they are approaching the molecular microworld in size. Old computers were subject to “hard errors”—a malfunction of a part, like a circuit burning out or a broken wire, which had to be replaced before the computer could work properly. But the new computers are subject to a qualitatively different kind of malfunction called “soft errors” in which a tiny switch fails during only one operation—the next time it works fine again. Engineers cannot repair computers for this kind of malfunction because nothing is actually broken. Could the God that plays dice trigger a nuclear holocaust by a random error in a military computer? Can quantum indeterminacy affect our lives? The answer is yes—as the example of the soft errors in computers shows. Atomic events which are completely unpredictable deeply influence our lives—we are in the hands of the God that plays dice.

सहज बटण फिरवलं आणि बंद केले होत नाही.. Two step switch असतातात प्रत्येक एंजिनासाठी. हेच इतर पायलटसनी सांगितलं मग कुणी बंद केलं? ........ अशा विविध शक्यता इकडे वर्तवणाऱ्यांचे कौतूक.

हेल्लो मी हार्ड स्विचेस बद्दल बोलत नाहीये. ज्याना electronics आणि कवान्टम टनेलिंग ची कल्पना आहे त्यांना बरोबर समजेल.

In reply to by भागो

भागो, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही वर्णिलेले दोष जालप्रक्षेपणात ( = नेटवर्क ट्रान्समिशन ) उद्भवू शकतात. म्हणून त्यांत विचलनसुधार प्रणाली ( = एरर करेक्शन अल्गोरिदम ) राबवली जाते. आ.न., -गा.पै.

लोकहो, वर दिलेला अहवाल वाचल्यावर एक प्रश्न उरतोच : ऐन उड्डाणसमयी इंधन बंद कोणी केलं? हा गणनदोष ( = सॉफ्टवेअर बग ) होता की घातपाती विषाणू ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इंधन कट ऑफ व्हॉल्व सारखी अत्यंत क्रिटिकल यंत्रणा आपोआप कार्यरत होत नसते. किंवा चुकून जाता तिजवर जाता हात पडला किंवा मोबाईल पडला आणि झाला कट ऑफ, असे होत नाही. त्यासाठी स्प्रिंग लोडेड सिस्टीम असते. आधी नॉब बाहेर खेचून मग त्या अवस्थेत खाली वळवला / किंवा वर वळवला आणि जागी पोचल्यावर खटका सोडला कीच हे नॉब चालू बंद होतात. शिवाय तरीही त्यावर काही पडू नये म्हणून त्याच्या दोन्ही बाजूंना एक एक कमानाकृती अडसर असतो. हे सर्व पार करून काही जादूने ते कट ऑफ झाले तरी दोन्ही वेगवेगळे करावे लागतात. एकत्र करणे अवघड. आता इतक्या सगळ्या गोष्टी बायपास होऊन फ्युएल शट ऑफ कसा घडला हे खरेच अनाकलनीय आहे. बरे, ते व्हॉल्व आधीपासून बंदच होते म्हणावे तर तसेही नाही. टेक ऑफ होताच ते ऑन चे ऑफ झाले. एक सेकंदाचा फरक तूर्त सोडून द्यावा. कारण इनपुट रिफ्रेश रेट प्रत्येक उपकरणाचा वेगळा असतो (स्टेटस रेकॉर्ड करण्याची वारंवारिता). यातून नक्कीच कोणतातरी वीक पॉईंट बाहेर येणार. नॉब मधल्याच कुठल्या पोझिशनवर अडकून राहू शकले आणि मग धक्क्याने ते खाली सटकले असे काही होणे तत्वत: सिद्ध झाले तर बोईंगला फटका आहे.

RAT सिस्टिम चालू झाली होती.. म्हणजे काहीतरी तारिक बिघाड होता.. पायलट ने एकाच वेळी दोन्ही स्विच manually बंद करणे अशक्य वाटते

१७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन एव्हीएशन रेग्युलेटरीने सगळ्या जगाला उद्देशून एक सूचनावजा संदेश प्रसारित केला होता की, ड्रीम लाायनर ७८७ चा फ्युएल स्वीच हा स्वताहून बंद होऊ शकतो.

In reply to by शाम भागवत

हंम. आता बोला. दोन सरावलेले वैमानिक इंधन बंद करण्याची चूक करणार नाहीत. शिवाय ते विमान या अगोदर पारीस दिल्ली अहमदाबाद असं उडत आलं होतं. अहमदाबादला काय त्यातला एक दारू ढोसून आला असेल? म्हणजे बोइंग कंपनीच्या विमानांची विश्वसनीयता संपली आहे असं म्हणावे लागेल. विमाने परत करा आणि पैसे मागा.

In reply to by शाम भागवत

बोईंग कंपनीने ही अ‍ॅडव्हायसरी जारी केली व त्यानंतर अनेक कंपन्यांनी हे स्वीचेस बदलून घेतले. या विशिष्ट विमानाचे हे स्वीचेस बदलून घेतले होते किंवा कसे, याचा तपशील अहवालात आहे का? त्यांनी वैमानिकांच्या संभाषणातील ती विशिष्ट दोन वाक्येच का जाहीर केली? संपूर्ण संभाषण सर्वांसाठी का उपलब्ध करून दिले नाही? तसेचः विमानात बिघाड - बोईंग व जीई यांचेसाठी गैरसोईचा देखभाल समस्या - एअर इंडीयासाठी गैरसोईची घातपात - सरकार व इतर सुरक्षा संस्थांसाठी गैरसोईचा वैमानिकांची चूक - सर्वांसाठी सोईची. शिवाय ते बाजू मांडायला हजर नाहीत. त्यामुळे अहवाल वैमानिकांचीच चूक असावी याकडे झुकतोय का असे वाटते? अहवालाच्या दर्जावर अनेक जण प्रश्न विचारत आहेत.

लोकहो, गेले काही दिवस केरळात अनंतपूर-तिरू येथे ब्रिटीश शाही नौदलाचं एक एफ-३५बी हे विमान अडकून पडलं होतं. अधिक माहिती : https://www.loksatta.com/explained/uk-f-35b-lightning-jet-stranded-kera… तर वदंतेनुसार हे विमान भारताच्या किनाऱ्याजवळ आल्यावर भारतीय वायुदलाने त्यास तिरू-अनंतपूर येथे सक्तीने उतरावयास भाग पाडलं. उतरल्यावर भारतीय जुगाडूंनी ते कूटप्रक्रियेद्वारे अप्रवेश्य ( = इनअॅक्सेसिबल बाय हॅकिंग ) केलं. त्याच्या अमेरिकी निर्मात्यांना आव्हान दिलं की हे विमान पुनर्योजनशील बनवून घेऊन जा म्हणून. यावर उत्तर म्हणून बोईंग आस्थापनास गळ घालून भारताचं प्रवासी विमान मुद्दामून पाडलं. ड्रीमलायनरच्या देखभालीत असंख्य त्रुटी आहेत. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात अशी परिस्थिती आहे. बोईंग विमानाच्या असंख्य यंत्रणांना जे मार्दव्य ( = सॉफ्टवेअर ) व वर्मव्य ( = फर्मवेअर ) लागतं त्यावर आवृत्तीनियंत्रण ( = व्हर्शन कंट्रोल ) यथातथाच आहे. आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल घडवून आणले यांचा हिशोब लागणे अवघड. अशा वेळेस विषाणू घुसवून ऐन वेळेस सक्रिय करता येतो. माझ्या मते सदर प्रकरणाचा हा उपसंहार ( = क्लोजर ) आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by कपिलमुनी

आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल घडवून आणले यांचा हिशोब लागणे अवघड. आमच्या बथ्थड कंपणीत पण सॉफ्ट्वेयर वर्जन कंत्रोल आहे. कोणी ध चा म केला की जगाला कळते. बोईंग मधे ते अजुनही नाही हे ऐकुन मला माझ्या बथ्थड कंपणीचा अभिमान वाटला .. बाकी धागा जरा सिरियस आहे म्हणुन जास्त पाचकळ विनोद करत नाही.

In reply to by सुक्या

सुक्या, बोईंगमधील गुणवत्तानियंत्रणाचे धिंडवडे इथे काढले आहेत ( इंग्रजी चलचित्र ) : https://www.youtube.com/watch?v=pz5rX6Whj4o सदर चलचित्रात २ मिनिटांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन वेस्ट याने कबुली दिली आहे की, वर्षानुवर्षे आम्ही कामं ठीक करण्यापेक्षा काम पूर्ण दाखवायला ( विमान पटापट बाहेर काढायला ) अधिक प्राधान्य दिलं. हे यांत्रिकीय घटकांच्या गुणवत्तेसंबंधी ( = मेकॅनिकल कंपोनंट्स क्वालिटी ) आहे. मार्दव्य व वर्मव्य ( = सॉफ्टवेअर व फर्मवेअर ) यांत यांत्रिक घटकांपेक्षा अधिक त्रुटी सापडतात, असा जगांत सार्वत्रिक अनुभव आहे. ऐन उड्डाणात विमान वर चढवतांना अलास्का एअरलाईन्सच्या विमानाचा दरवाजा उडून गेला होता. जर बोईंग यांत्रिक घटकांविषयी इतकं बेफिकीर आहे, तर वर्मव्याविषयी किती गंभीर असेल? बोईंग मार्दव्य व वर्मव्याच्या आवृत्ती नियंत्रणाच्या नोंदी ( = व्हर्शन कंट्रोल लॉग्ज ) भारतीय अन्वेषकांना देणार का ? आ.न., -गा.पै.

In reply to by कपिलमुनी

मुनीवर, बोईंगने प्रवाशांच्या सुरक्षेऐवजी नफ्यास प्राधान्य दिलं आहे. ७३७-मॅक्स च्या अपघातांतनं ही बाब पुरेशी स्पष्ट झाली आहे. शिवाय बोईंगमध्ये अनेक आर्थिक घोटाळेही झालेले आहेत. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://nlpc.org/corporate-integrity-project/boeing-a-legacy-of-corrupt… बोईंगची संथ घसरण कशी घडून आली यावर इंग्रजी लेख : https://www.msnbc.com/opinion/msnbc-opinion/boeing-senate-hearings-capi… महत्त्वाचे परिच्छेद :
The idea was that the airline manufacturers knew far more about their business than the government, and they would never want to make shoddy planes for fear of reputational damage. So, the argument went, these companies should effectively be allowed to regulate themselves. By the time the 737 Max disasters came around, much of Boeing’s regulatory oversight was being undertaken ‘within a company unit inside Boeing’. The FAA still managed to predict the problems with the MCAS, estimating that the system could cause as many as 15 crashes over 30 years . But they did nothing. In his book on the debacle, “Flying Blind,” Bloomberg reporter Peter Robinson cites a Boeing manager who stated that ‘people will have to die before Boeing will change things.’
हे भयावह आहे. पैशांसाठी कुठल्याही थरास जाणारी लोकं आहेत ही. यांच्यावर विसंबून आपण विमानात बसायचं का ? आ.न., -गा.पै.

स्वधर्म,
त्यांनी वैमानिकांच्या संभाषणातील ती विशिष्ट दोन वाक्येच का जाहीर केली? संपूर्ण संभाषण सर्वांसाठी का उपलब्ध करून दिले नाही?
मी ऐकलंय की 'It's locked in' असं कोणीतरी वैमानिक म्हणाला. पूर्ण संभाषण असं असावं : "Why did you switched off the fuel?" "I did not do that. It's locked in." हे लॉक्ड इन नेमकं काय आहे ? हे संगणकाने केलं होतं का ? तर मग नरारूढ्य ( = मॅन्युअल ओव्हरराईड ) का दिलेलं नव्हतं ? असे प्रश्न उपस्थित होतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी ऐकलंय की 'It's locked in' असं कोणीतरी वैमानिक म्हणाला.
कुठे ऐकले? या संदर्भात जर कोणी ते शब्द वापरले असतील तर ते अशा खटक्यांच्या विशिष्ट रचनेशी संबंधित आहेत. वर अन्यत्र वर्णन केले आहे स्प्रिंग लोडेड नॉब बाहेर ओढून स्थिती बदलून परत आत अडकून ती पोझिशन लॉक होणे. बाह्य धक्क्यांनी ही बटणे दाबली जाऊ नयेत यासाठी केलेली रचना.

लोकहो, बोईंगच्या घसरत्या गुणवत्तेविषयी पीटर रॉबिनसन या पत्रकाराने फ्लाईंग ब्लाईंड नामे इंग्रजी पुस्तक लिहिलं आहे. त्याचा अल्प परिचय : https://i.postimg.cc/50Gbw37S/boeing-woes.jpg पुस्तक मिळवून वाचायचा बेत आहे. आ.न., -गा.पै.

लोकहो, एक अत्यंत गंभीर तथ्य उजेडांत आलं आहे. गेल्या पाच वर्षांत भारतातील ६५ विमानांचे जोरे ऐन उड्डाणात किंवा हवेत असताना बंद पडले. याचा अर्थ दर महिन्याला किमान एक विमान जोऱ्या बंद पडतो. सर्व प्रकरणांमध्ये, वैमानिक एकाच जोऱ्यावर जवळच्या विमानतळावर विमान उतरवू शकले. हा प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. संबंधित बातमी : https://divyamarathi.bhaskar.com/national/news/65-aircraft-engines-fail… या बातम्या जाहीर का होत नाहीत ? प्रत्येक आपत्कौल ( = May Day Call ) जाहीर केलाच पाहिजे, असा नियम व्हायला हवा. तसंच प्रत्येक आपत्कौलावर जाहीर चर्चाही व्हायला हवी. आ.न., -गा.पै.

लोकहो, मजकुरी भयपट बघायचाय ? इथे इंग्रजी मजकूर पीडीएफ आहे : https://drive.google.com/file/d/1jg758YHWz66CmaKo1R5Kgqiz6SZTQVDb/ सदर पीडीएफ Flying Blind या पुस्तकाचा सारांश आहे. त्याच्या पीडीएफ पान क्रमांक ८२ पासून अखेरच्या पान क्रमांक १६७ पर्यंत प्रश्नोत्तरे आहेत. घ्या एकेक वाचायला. अक्षर मोठं असल्याने पटकन वाचून होतील. आ.न., -गा.पै.

गवि,
कुठे ऐकले?
ते लॉक्ड इन नसून आऊट आहे. चुकीबद्दल क्षमस्व. ते या इथे ऐकलं : https://www.youtube.com/watch?v=QGixhVwA6DA सदर संभाषण ११ मिनिटे ४० सेकंदांनी आहे.
Likely Captain : "Engine is not responding. Confirm settings." Another voice : "All set. Nothing is changing", Same voice : "It's not us. It's locked out."
याची विश्वासार्हता काय ते माहीत नाही. म्हणून 'ऐकलंय' म्हणजे 'ऐकीव माहिती' असं म्हणालो. आ.न., -गा.पै.

खरंतर या अहवालामध्ये तुटक माहिती टाकून सर्वांना संभ्रमात टाकायचं काम केलंय. अजून बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. गविंना एक शंका. रॅम बाहेर यायला विद्युत पॉवर कमी पडायला हवीय. पण ईंजिन बंद केल्यावर त्याचं आरपीएम कमी व्हायलाच बराच वेळ लागेल आणि तेवढ्या वेळासाठी ते नक्कीच विद्युत पॉवर आरामात देईल. या अपघातात रॅम बाहेर यायला वेळच लागला नाहीये. नक्की रॅम लगेचच बाहेर यावा अशी रचना असते कां ?

In reply to by अकिलिज

बराच वेळ लागणार नाही. काही सेकंदाचा फरक असेल पॉवर कट होण्यात. अहवालात मोघम माहिती आहे. अंतर, उंची आकडे देऊन स्पष्ट लिहिलेले नाही.

ह्या विमानबद्दल मला अजूनही एक गोष्ट कळत नाहीये! हे विमान सहा आसनी होते की ९ आसनी? (डका आडव्या रांगेत ९ आसने की ६?) विकिपीडियावरील फोटोत ९ आसनी दाखवत आहे तर ट्विटर वर दिल्ली ते अहमदाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाश्याने व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात सहा आसने दिसता होते. कुणी सांगेल का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

787 च्या इकॉनॉमी क्लासमध्ये 2-4-2, 3-3-3 अशी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतात. यात कसे होते बघावे लागेल.

माहितीपूर्ण लेख व चर्चा !

चूक कोणाची यापेक्षा महत्वाचे चूक काय होति ? हे बाहेर आले का ? नंतर ह्या बातम्या मिडियामधून गायब झाल्या

In reply to by कपिलमुनी

ते कळण्याच्या पलीकडे केस गेली आहे सध्या तरी. किंबहुना चूक काय होती हे स्पष्ट झाले पण कोणाची चूक हे तूर्त काळाच्या पडद्याआड गेल्यासारखं वाटतं आहे.

जवळपास टेकऑफच्या क्षणीच एकामागून एक पण एकाच वेळी, मानवी हातांनी व्हावेत तसे दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा चालू बंद करणारे व्हॉल्व बंद केले गेले. एका पायलटच्या ते लक्षात येताच (किंवा हेतुपुरस्सर नोंद म्हणून) त्याने दुसऱ्या पायलटला विचारले की तू हे व्हॉल्व बंद का केलेस? दुसरा पायलट म्हणाला की मी नाही केले. आता याहून अधिक काही कळणे कठीण आहे. यंत्राच्या लॉगनुसार शट ऑफ व्हॉल्व बंद केले गेले आणि त्यानुसार सर्व सुसंगती लागते आहे. का बंद केले आणि कोणी हे कळणे अशक्य वाटते. जोवर बाह्य काही माहिती येत नाही तोवर. याहून अधिक काही ब्लॅक बॉक्स मधून येणे अवघड आहे.

In reply to by गवि

पण कॉकपिटचे संपूर्ण संभाषण जाहीर का केले गेले नाहीत? पुढचा रिपोर्ट येणार आहे की नाही? कधी? की आला तोच रिपोर्ट शेवटचा होता? नेमके कारण कळणार का काही काळाने? की घटना, बातमी दाबल्या गेली असे म्हणावे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण कॉकपिटचे संपूर्ण संभाषण जाहीर का केले गेले नाहीत?
तेवढेच आहे त्यात. लगेचच कोसळले. संपूर्ण रिपोर्ट अर्थातच येईल. NTSB त्यात आहे म्हटल्यावर दाबले जाणे वगैरे शक्यता कमीच.

जे दोघे वैमानिक तेच विमान आणखी दोन ठिकाणांहून घेऊन इथे आले त्यांचे मधल्या दोन तासांत डोके फिरले म्हणणे अशक्य आहे.

In reply to by कंजूस

+१ आणि एखाद्याच्या मनात काही वादळ चाललेले असते आणि ते खूप जास्त वाढले तर आजूबाजूच्या कोणाच्या तरी लक्षात येत असते जनरली.

The Boeing advisory, issued by the FAA, recommended airlines inspect fuel control switches on several Boeing aircraft models to ensure the locking mechanism was properly engaged, preventing accidental movement that could lead to unintended engine shutdowns. This advisory was prompted by concerns that some switches were installed without the locking feature engaged, particularly affecting the 737

परत एकदा बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरच्या उड्डाणयंत्रणेतल्या दोषामुळे आपत्कालीन भिरभिरे आकस्मिक व अनावश्यक रीत्या सक्रीय झाले. एआय-११७ हे अमृतसर ते बर्मिंग(हॅ)म फेरीचे विमान भूगमन करतेवेळी आपत्कालीन भिरभिरे आपत्काल नसतांना आकस्मिक रीत्या कार्यान्वित झाले. संबंधित बातमी : https://www.loksatta.com/desh-videsh/air-india-amritsar-birmingham-flig… माझ्या मते वर्मव्य ( = firmware ) मध्ये कोणीतरी मुद्दाम त्रुटी ( = bug ) ठेवली आहे. त्या त्रुटीच्या सहाय्याने भिरभिरे सक्रीय करून भारताला एक चेतावणी देण्यात आली आहे. -गामा पैलवान

एअर इंडिया च्या एका विमानाने उड्डाणक्षमपत्राविना ( = without airworthiness certificate ) तब्बल आठ उड्डाणे केल्याचं तपासणीत उघडकीस आलं. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://economictimes.indiatimes.com/industry/transportation/airlines-/… एअर इंडिया म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा. मग ते खाजगी आस्थापन असो वा सरकारी. -गामा पैलवान

कर्णावतीच्या विमान अपघातानंतर असा काही निर्णय येणं अपेक्षितच होतं. भारताने नागरी विमाने बनवण्यासाठी रशियन आस्थापानासोबत सामंजस्य करार केला आहे. बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://economictimes.indiatimes.com/industry/transportation/airlines-/… म्येर्कू लागताय की ये तो पैलेच होणा मंगता था. खालीफोकट आक्षीडंटका राह देखते नै बैठनेका आपुनकू ! -गा.पै.

अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान अपघाताबाबत इटलीमधील कोरिएरे डेला सेरा य वृत्तपत्राने सनसनाटी दावा केला आहे. एका पायलटने इंधनाचा स्वीच जाणीवपूर्वक बंद केला होता असे भारतीय तपास संस्था आपल्या शेवटच्या अहवालात सांगू शकतात, असा दावा या वृत्तपत्राने केला आहे. -दिलीप बिरुटे

लोकहो, ड्रीमलायनर ७८७ ची इंधनपुरवठ्याची कळ परत एकदा बंद स्थितीत अडकली आहे. लंडन हीथ्रो ते बेंगळूरू ( उड्डाण क्रमांक एआय-१३२ ) या विमानाच्या इंधनपुरवठ्याची कळ चालू अवस्थेतून अचानक बंद स्थितीस आली. सुदैवाने विमान जमिनीवरच होतं. वैमानिकाने सत्वर या गंभीर त्रुटीची माहिती संबंधितांना दिली. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://avherald.com/h?article=5342238e&opt=0 बोईंगची विश्वासार्हता नामे काही पदार्थ अस्तित्वात आहे का ? एआय-१७१ च्या अहवालात वैमानिकांना दोष दिला नसेल, अशी आशा आहे. आ.न., -गा.पै.