माझी डिग्री अर्धवट राहिलीय
मी तळमळतोय,
नेहमी, रोज.
कधी होईल पूर्ण?
का होत नाहीये?
का राहताहेत विषय?
मी रोज झोपतोय आणि तळमळत जागा होतोय.
डिप्लोमा झाल्यावर मी डिग्रीला अॅडमिशन घेतलं.
जॉब करत डिग्री करायची म्हटली, पण डिग्री सोपी नव्हती.
माझे विषय राहिले, ते मी काढतच गेलो.
इकडे पगार वाढला, "डिग्री करायची गरज नाही" असे सल्ले मिळू लागले.
पण मी डिग्री पूर्ण करतच राहिलो,
पण ती पूर्ण होत नाहीये.
कधी मी पेपरला वेळेत पोहोचत नाहीये,
तर कधी पोहोचूनही मला काही लिहिता येत नाहीये.
लिहूनही पास होत नाहीये.
तर कधी भलतंच काहीतरी आचरट घडतंय —
सगळं जग जणू माझी डिग्री होऊ नये म्हणून तुटून पडलंय.
डिग्री पूर्ण होत नाहीये.
हे असं बऱ्याच वर्षांपासून चाललं आहे.
मी झोपतोय नीट, पण अपूर्ण डिग्रीच्या भयंकर स्वप्नाने उठतोय.
उठल्यावर कळतं —
जग खूप पुढे गेलंय, आपणही खूप पुढे आलोय.
बाजूला बायको आणि मुलगा झोपलेत.
खऱ्या आयुष्यात माझी डिग्री होऊन अनेक वर्षे झाली आहेत.
पण माझ्या त्या स्वप्नांच्या जगात
काहीतरी अपूर्ण राहिलंय
माझी डिग्री!
डिग्री मला मिळेल की
झोपेतच सोबत नेईल...?
वाचने
3945
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
मलाही असे स्वप्न पडते नेहेमी.
सेम टू सेम. हल्ली कमी झाले
In reply to मलाही असे स्वप्न पडते नेहेमी. by कानडाऊ योगेशु
मला आठवड्यातून दोनदा होते.
In reply to मलाही असे स्वप्न पडते नेहेमी. by कानडाऊ योगेशु
भावा, मला कधीतरी चार पाच
In reply to मला आठवड्यातून दोनदा होते. by अमरेंद्र बाहुबली
नक्कि
In reply to भावा, मला कधीतरी चार पाच by भीमराव
आवडलं!
धन्यवाद!
In reply to आवडलं! by युयुत्सु
डिग्री सर्टिफिकेट ही अजून
का?
In reply to डिग्री सर्टिफिकेट ही अजून by कंजूस
Mark list आणि एक तात्पुरते
In reply to का? by अमरेंद्र बाहुबली
हल्ली हिन्दीभाषीक स्वप्ने पडतात.
खिक्क
In reply to हल्ली हिन्दीभाषीक स्वप्ने पडतात. by कर्नलतपस्वी
एकदा नौकरी लागल्या नंतर सर्व
हो होते असे! माझ्या काकांचा
या लेखाप्रमाणे आणि वर
शिक्षणानंतरही, आयुष्याच्या उत्तरार्धात परीक्षेची स्वप्ने पडणे सामान्य आहे आणि बहुतेकदा सततच्या चिंता किंवा जागृत जीवनात परीक्षेची भावना दर्शवते, शैक्षणिक अपयशाची खरोखरची भीती नसते. ही स्वप्ने सहसा ताणतणाव, अपुरेपणाची भावना किंवा सध्याच्या जीवनातील परिस्थितीत कामगिरी करण्याच्या दबावाचे प्रकटीकरण असतात, जरी त्या परिस्थिती शैक्षणिक नसल्या तरीही.अरे बापरे सगळ्यांची स्वप्ने इतकी सारखी :) :)
छान! हा लेख लिहिल्या नंतर
In reply to अरे बापरे सगळ्यांची स्वप्ने इतकी सारखी :) :) by Bhakti