Skip to main content

आषाढी एकादश

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 05/07/2025 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादश, भक्त कासावीस, विठ्ठलाची आस, दर्शनाची || उचंबले मन, हरपले भान, लागलेच ध्यान, पांडुरंग || वैजयंती सुगंध तुटे भाव बंध, वैष्णव ते धुंद, नाचण्यात || टाळ मृदुंग धून, विठ्ठला चे गुण, भजन आतून, कीर्तनात || नाचे वारकरी, तुळशी हार करी, भवतारु पारकरी, कृपावंता || कसा भक्तीरंग, बाजीगर दंग, पाहता अभंग, लेखणीत ||
लेखनविषय:

वाचने 884
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अनाजी पोचला विठूच्या दरबारी भरतभेटीचा सोहळा रंगला समुद्र किनारी..... कोण राम कोण भरत विठूला साकडे अनाजी घालतो.... मस्तच.