✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सिप (SIP) चे मजेदार विज्ञापन

व
विवेकपटाईत यांनी
Mon, 04/07/2025 - 09:52  ·  लेख
लेख
(विज्ञापन आणि माझ्या मनातील विचार) काल टीव्ही वर आयपीएलचा सामना पाहत होतो. मध्येच एक विज्ञापन आले. एक दुकान दिसत होते. दुकानाच्या साईन बोर्ड वर झगमग लाईटिंग दिसत होती. दुकानासमोर उभे राहून एक तरुण मुलगी गोड आवाजात म्हणाली, मी नियमित सिप मध्ये गुंतवणूक करते.त्या गुंतवणूकीतून मी वडिलांसाठी .... मी: वडिलांना दुकान टाकून दिले... ती: नाही हो, मी: मग दुकानात लाखोंचा माल भरून दिला असेल. ती: नाही हो, हा जो दुकानावर लागलेला झगमग करणारा साईन बोर्ड आहे, तो मी वडिलांना दुकानावर लावण्यासाठी विकत घेऊन दिला. माझी सिप मधली गुंतवणूक सार्थकी लागली. मी विचार करू लागलो, हा साईन बोर्ड जास्तीसजास्त पाच किंवा दहा हजाराचा असेल. सिप मध्ये नियमित गुंतवणूक करून तिला एवढेच पैसे मिळाले... सर्वांनी सिप गुंतवणूक करण्यापूर्वी, हे विज्ञापन अवश्य पाहिले पाहिजे. अश्याच प्रकारचे विज्ञापन दिसले असतील तर त्यांचा उल्लेख ही प्रतिसादात करवा. जास्त मजा येईल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1978 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

काहीही

सुरिया
Mon, 04/07/2025 - 14:36 नवीन
हा साईन बोर्ड जास्तीसजास्त पाच किंवा दहा हजाराचा असेल.
जाहिरातीत दाखवलेल्या एलईडी बोर्डाचे आजच्या भावात साधारणपणे कमीत कमी ७५ ते ८० हजार होतात. . तुम्ही काहीही सांगायला आणि खरे मानायला हा काही पीएम ऑफिसचा धागा नाहीये. नीट बघा, माहीती घ्या आणि त्यावर धाग्याचा डोलारा उभा करा.
  • Log in or register to post comments

LED रेट २५० sq फुट पासून सुरू

विवेकपटाईत
Mon, 04/07/2025 - 16:34 नवीन
LED रेट २५० sq फुट पासून सुरू होतात. विज्ञापन मध्ये दाखविलेल्या दुकानाचे साईन बोर्ड २x१० sq ft. असेल. ५००० रुपये होतात. लेख लिहिण्याआधी ऑनलाईन रेट बघितले होते. मिपावकरांचा स्वभाव माहित आहे मला. प्रतिसादात एका व्यक्ती प्रति द्वेष सर्व ठिकाणी उफाळुन येतो. बाकी उत्तम क्वालिटी धरली तरी १० ते २० हजार होतील. बाकी मौज मस्ती म्हणून लिहिलेला लेख आहे उगाच सिरीयस घेऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

आजकाल

प्रसाद गोडबोले
Wed, 04/09/2025 - 11:37 नवीन
आजकाल मिपावर अशा व्यक्ती केंद्रित टिप्पणीचे संपादन होत नाही, असे प्रतिसाद देणारे स्कोअर सेटलिंग करणारे आयडी उडवले जात नाहीत असे निदर्शनास येत आहे ! चांगलं आहे. मोदी सरकारच्या काळात किमान मिसळपाव वर तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकून आहे ! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

मिपावकरांचा स्वभाव माहित आहे

श्रीगुरुजी
Mon, 04/07/2025 - 19:59 नवीन
मिपावकरांचा स्वभाव माहित आहे मला. प्रतिसादात एका व्यक्ती प्रति द्वेष सर्व ठिकाणी उफाळुन येतो. सहमत
  • Log in or register to post comments

मुळात जाहिरात SIP ची नसून

अमर विश्वास
Wed, 04/09/2025 - 14:44 नवीन
मुळात जाहिरात SIP ची नसून GROW app ची आहे .. Grow च्या माध्यमातून सिप फक्त सिप करता येते हे कोणी सांगितले तुम्हाला ? आणि या अँप मधून गुणवणूक करून काहीतरी साध्य केल्याचा आनंद आहे .. कुठेही असे म्हटले नाहींनाही कि सगळीच्या सगळी गुंतवणूक वापरून तो बोर्ड बनवला उगाच काहीही लिहायचे
  • Log in or register to post comments

सर्वांनी सिप गुंतवणूक

चौथा कोनाडा
Wed, 04/16/2025 - 13:02 नवीन
सर्वांनी सिप गुंतवणूक करण्यापूर्वी, हे विज्ञापन अवश्य पाहिले पाहिजे.
आताच जाहिरात पाहिली ! आता करणार सीप मध्ये गुंतवणु़क !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा