मी स्वत: लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला मत देण्यापेक्षा एखाद्या राष्ट्रीय पक्षाला मत देणे पसंत करेन!
अपवाद : मतदान करीत असलेल्या मतदारसंघात राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार उभा नसल्यास.....
कारण :
१. प्रादेशिक पक्षांची विचारसरणी ही केवळ त्या त्या प्रदेशाच्या मुलभुत प्रश्नांशी निगडीत असते. शक्यतो राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांबद्दल त्यांना सोयरसुतक नसते.
२. अधिकाधिक प्रादेशिक पक्षांच्या उदयामुळे केंद्रात त्रिशंकु स्थितीचा सामना करावा लागतो.
३. वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांमुळे बनलेले सरकार कितपत सुज्ञ निर्णय घेउ शकेल याची शाश्वती अजिबात नसल्याने.
विधानसभा निवडणुकीत मात्र शक्यतो प्रादेशिक पक्षाला (ज्याची केंद्रात सत्ता असण्यार्या पक्षासमवेत युती आहे) त्यालाच मत देणे पसंत करेन.
राष्ट्रीय ऐक्याची ऐशीच्यातैशी करणार्या प्रादेशिक पक्षाला मत कधीही देउ इच्छित नाही!
- टिंग्या
>>मी स्वत: लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला मत देण्यापेक्षा एखाद्या राष्ट्रीय पक्षाला मत देणे पसंत करेन!
मी स्वतः भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही ढोंगी पक्षांसाठी पर्याय शोधत होतो. आणि माझ्या मते मनसेच्या रुपाने मला तो मिळाला.
>>१. प्रादेशिक पक्षांची विचारसरणी ही केवळ त्या त्या प्रदेशाच्या मुलभुत प्रश्नांशी निगडीत असते. शक्यतो राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांबद्दल त्यांना सोयरसुतक नसते.
हे राष्ट्रीय प्रश्न राष्ट्रीय प्रश्न असतात तरी काय? शेवटी कोणत्याना कोणत्या ठीकाणी ते स्थानिक होतच असतात. उदा. बिहारी जनतेच्या स्थलांतराचा प्रश्न हा महाराष्ट्र, आसाम्, पंजाब अनेक ठीकाणी स्थानिक प्रश्न आहेच की. शेवटी मी देखील राष्ट्राचा एक भाग आहे म्हणून माझा विचार असा आहे की जर माझ्या आजूबाजूचे सर्व उत्तम असेल तर मी राष्ट्राचा विचार करू शकतो. अन्यथा ना धड राष्ट्रीय समस्यांवर तोडगा आहे ना स्थानिक.... आणि राष्ट्रीय पक्ष देखील देशभरातल्या मतांचा विचार करून देशभरात सर्बत्र असलेल्या या स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढत नाहीत. हा स्थानिकांवर अन्याय नाही का? याचाच राग मलातरी सर्वात जास्त आला. जेव्हा भाजप कर्नाटकात कानडी अस्मिता म्हणून बेळगाव प्रश्नावर मूग गिळून बसते, सर्व बिहारी नेते राजविरुद्ध एक होतात तेव्हा एकही मराठी भाजपा वा काँग्रेस नेता राजच्या भूमिकेचे समर्थन करू धजत नाही ? गेले तेल लावत असे राष्ट्र जिथे एखाद्या प्रगतीशील राज्याच्या अस्मितेला असे हिणवले जाते. माझे सरळसरळ म्हणणे असे आहे कि जर राजच्या भूमिकेचे समर्थन जर सोनियांनी केले असते व त्यावर उपाय योजायचे कबूल केले असते तर मी मत काँग्रेसलाही दिले असते.
>>२. अधिकाधिक प्रादेशिक पक्षांच्या उदयामुळे केंद्रात त्रिशंकु स्थितीचा सामना करावा लागतो.
राष्ट्रीय पक्ष एकात्मतेच्या नावाखालीच ढोंगीपणा करू लागतात त्यामुळे स्थानिक पक्ष जन्मास येतात व तगतात. त्यामुळे त्रिशंकू स्थितीस हे राष्ट्रीय पक्षच काही अंशी जबाबदार ठरतात.
>>३. वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांमुळे बनलेले सरकार कितपत सुज्ञ निर्णय घेउ शकेल याची शाश्वती अजिबात नसल्याने.
तसेही २/३ बहुमतातील सरकारने देखील शहाबानो प्रकरणासारख्या घोडचूका केल्याच आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षाचे मिळून झालेले सरकार काही अंशी बरे असे वाटते. कमीत कमी एकाच विचारसरणीच्या पक्षाची किंवा नेत्याची मनमानी तरी चालत नाही.
>>राष्ट्रीय ऐक्याची ऐशीच्यातैशी करणार्या प्रादेशिक पक्षाला मत कधीही देउ इच्छित नाही!
राष्ट्रीय ऐक्याची ऐशी तैशी करणार्या राष्ट्रीय पक्षाला मत मीही कधीही देऊ इच्छीत नाही.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
मस्त रे पेशव्या ... विण्या लेका तुझ्याशी बी १०१% सहमत आहे !!
टिंग्या... काय लेका तु पण ? कोणत्या अँगल ने विचार करतोस रे ? असो .. विचारस्वातंत्र्य आहे :)
बाकी विधानसभेत राज ठाकरे आलाच पाहिजे राव !! च्यायला दिल्लीत नाय गेला चालत .. पण मुंबैत राज ठाकरे आनाच्च मंगता .. केवळ काही दिवस मुंबैत राहूनच मला परिस्थितीची जाणिव झालीये .. राज बोलतो त्यात तथ्य वाटते बॉ !!
- टाराज ठाकसे
(मिसळपाव नवनिर्माण सेणा)
इनोबा आपले म्हणणे पटले.अनामिकाताईंचे दु:ख दुहे री आहे,एकीकडे मराठी माणूस हरला तर दुसरीकडे शिवसेना.पण यात आत्मपरीक्षणाची वेळ उध्धवजींवर आलेली आहे.आज ते जर कार्याध्यक्ष नसते तर नारायण राणे आणि राजसाहेबांनी मिळून शिवसेना कुठल्या कुठे नेली असती.
पण यात आत्मपरीक्षणाची वेळ उध्धवजींवर आलेली आहे.आज ते जर कार्याध्यक्ष नसते तर नारायण राणे आणि राजसाहेबांनी मिळून शिवसेना कुठल्या कुठे नेली असती.
सहमत आहे..
तात्या.
कुणीही यावे आणि मुबंईवर टिचकी मारून जावे अशी मुंबईची स्थिती केवळ काँग्रेस ने केली हे आपण मुंबईच्या तसेच द्विभाषीक राज्यातुन संयूक्त महाराष्ट्राच्या जन्मापासुन पाहात आलो आहोत. तोच कित्ता आता यापुढे मराठी मुगगीळे आमदार, खासदार, मंत्री- संत्री चालवत आहेत. त्यास आताशी काही प्रमाणात शिवसेनेचा पण हातभार लागत आहे/ होता.
पण मुंबई - आणि मराठी साठी आता राज ठाकरे हा समर्थ पर्याय उपलब्ध झालेला असतांना ज्या लोकांनी त्यांना मतदान केले नाही त्या सारखे करंटे आपणच.
६० वर्षे झालीत तरी अजुन आपण गटारे, रस्ते, पाणी यातच अडकलेलो आहोत. शरद पवार , मनोहर जोशीं, सुशीलकूमार सारखे गुळगुळीत बोलणारे आपल्याला चालतात पण हातात दांडु घेणारा चालत नाही. राज आंदोलन करत होते तेव्हा कोण कसे वागले आपण पाहीले नाही काय?
यांना फक्त सत्तेची उब पाहीजे. ही उब गेली की ते काकडुन मरतील.
अजुनही वेळ गेलेली नाही. नाहीतर येणार्या मराठी पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाही.
अजुनही एक लक्षात घ्या, मुंबई जर महाराष्ट्रापासुन वेगळी करायची भाषा कोणी सुरू केली तर त्या विरूद्ध उतरणारे पहीले मुले केवळ मराठी असतील आणि ते केवळ आणि केवळ मनसे आणि आधीच्या शिवसेनेच्या विचारांचीच असतील.
कोल्हापुर, हतकणंगले मधली विजयाची स्थिती पण हिच मनसेची बंडखोर मानसीकता दाखवत आहे, जरी विजयी उमेदवार मनसेचे नसतील तरी.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर सह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
मनसेमुळे सेना - भाजपा युती मुंबईत साफ झोपली
शिवसेनेच्या मुंबईतील आणि राष्ट्रवादीच्या शिरुर, मावळ, कोल्हापूर, हातकणंगले येथील पराभवांना त्या-त्या पक्शांचे प्रमुख आणि त्यांचे तथाकथित कारभारी जबाबदार आहेत, मनसे किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना नव्हेत...
--सुहास
हे चारही मतदार संघ बहुतांशी त्या त्या जिंकलेल्या उमेदवारांच्या प्रतिमेमुळे आणि आधीच स्थापित असलेल्या संपर्क यंत्रणे मुळे आले आहेत.
विलास लांडे हा उमेदवार शिरूर मधून अढळराव पाटलांसारख्या मातब्बर उमेदवारापुढे नक्कीच कमजोर होता. आणि अढळरावांच्या प्रचाराला आणि या उमेदवाराविरुद्ध घेतलेल्या थेट आक्रमक भूमिकेला विलास लांडे आणि राष्ट्रवादी उत्तर देऊ शकले नाहीत.
पवारांच्या सभा होऊनही हे हरले. शिरूर व मावळ दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या सभा झाल्या पण त्या मोठ्या मुद्द्यांवर व भाजप - सेनेवर टि़का करणार्याच होत्या. स्थानिक मुद्दे किंवा खासदार / प्रतिस्पर्धी उमेदवाराविरुद्ध त्यांना जनमत उभे करता आले नाही. तेच गजानन बाबर यांचे. गेली अनेक वर्षे त्यांचे मुळशी मावळ भागात नाव आहे. तिथे थोडी लढत झाली खरी. थोडक्यात त्यांनी बाजी मारली... अढळरावांचे मताधिक्य मोठे आहे त्यामुले पक्ष प्रमुख किंवा कारभारींवर या अपयशाचा भार तितका जात नाही.
कोल्हापूर मध्ये प्रमुखांची चूक ही सदाशिव रावांसारख्या जुन्या आणि मुरलेल्या माणसाला बाजूला सारण्याची. त्यात सदाशिव रावांवर अगदी तोल सोडून केलेली टिका त्यांना स्वतःला भोवली असावी. त्यांच्या जवळच्या काही माणसांकडून असं कळालं की सदाशिव रावांना यशाबद्दल पूर्ण खात्री होती. म्हणजे त्यांनी उभी केलेली राष्ट्रवादीची संघटना अर्थात त्यांच्या बाजूने लढली पक्षाच्या नव्हे.
हातकणंगले - राजू शेट्टी यांचा वैयक्तिक इतिहास आणि शेतकर्यांची सहानूभूती, तसंच साखर कारखानदारांनी - जसं कोरे, माने इ. त्यांच्या विरुद्ध केलेला प्रचार हा शेतकर्यांनी त्यांच्या बाजूने घेतला. सामान्य शेतकरी कारखानदारांच्या थापांना भुलला नाही. इतकी वर्षे माने यांना मत देणारा शेतकरी पर्यायाच्या शोधात होता. त्यांच्या विरोधात लढणारा एक उमेदवार त्यांना मिळाला.
यात राष्ट्रवादीचं कर्तृत्व नाही...
कितीजण पक्के मुंबईकर आहेत जे कधीही मुंबई सोडून अन्य देशात ,राज्यात गेलेले नाहीत. कारण ज्यांना मुंबई सोडाविशी वाटली त्यांना मराठी मुंबईबद्दल लिहायचा अधिकारच नाही.
मी जे बोललो ते सत्यच आहे.तुम्ही अधिक विचार केल्यास तुम्हालाही पटेल. कारण तिथे परदेशात राहणारे जेव्हा इथे मराठीची बाजू मांडतात तेव्हा ते तिथे परप्रांतियच असतात ना.
कितीजण पक्के मुंबईकर आहेत जे कधीही मुंबई सोडून अन्य देशात ,राज्यात गेलेले नाहीत. कारण ज्यांना मुंबई सोडाविशी वाटली त्यांना मराठी मुंबईबद्दल लिहायचा अधिकारच नाही.
मग त्याच न्यायाने काश्मीरबाबत बोलायचा अधिकार केवळ काश्मीरात रहात असलेल्यांनाच का?मी काश्मीरमध्ये अजूनपर्यंत एकदाही गेलेलो नाही पण ते भारताचेच आहे आणि असावे हे मला कळकळीने वाटते. आणि त्यात चूक काय आहे ते कृपया स्पष्ट करावे.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
बाकी बरेच वर चर्चिले गेले आहे. त्यातील फुटीविरुद्धच्या मतांशी सहमत...
एक बातमी आत्ताच पाहीली. त्यातील सुरवातीचा भागः
'तुम अपुन को इतना मारा, लेकीन अपुन ने तुमको सिर्फ दोही मारा, पर क्या सॉलिड मारा' हा 'अमर अकबर अॅन्थनी' या चित्रपटातील डायलाग बोलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिलेल्या दणक्याचे मार्मिक शब्दांत वर्णन केले. शिवाय, मराठी मतांमध्ये फूट पडली नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी भरभरून मते दिली, असा दावा राज यांनी केला. (संदर्भ: म.टा.)
हे असले उद्गार राजच्या (किंवा कुणाच्याही) राजकारण्याच्या तोंडून ऐकणे पोरकटपणाचे वाटते. त्यात अजून एक गंमतः ज्या अमिताभला आणि हिंदीला शिव्या दिल्या त्याचाच उपयोग स्वतःच्या भावना व्यक्त करायला करणे हे बाकी कसेही असोत "पॉलीटीकली करेक्ट" वाटत नाही. नशिबाने आपली जनता दहशतवादी हल्ले लक्षात ठेवत नाही तर असली फुटकळ वाक्य/कोट्यांचा वापर आणि चुका थोड्याच लक्षात ठेवणार आहेत! :-)
हे असले उद्गार राजच्या (किंवा कुणाच्याही) राजकारण्याच्या तोंडून ऐकणे पोरकटपणाचे वाटते. त्यात अजून एक गंमतः ज्या अमिताभला आणि हिंदीला शिव्या दिल्या त्याचाच उपयोग स्वतःच्या भावना व्यक्त करायला करणे हे बाकी कसेही असोत "पॉलीटीकली करेक्ट" वाटत नाही"
हाच मूळ मुद्दा आहे.
(५ मिनिटांसाठी मनसेचा कार्यकर्ता समजा मला :) )
हिंदीद्वेषी नाही आहोत आम्ही. आम्ही मराठी बोलता बोलता जेवढ्या सहजतेने हिंदी भाषा वापरतो, तेवढ्याच सहजतेने कधीतरी मराठी येउदे परप्रांतीयांच्या तोंडून. [जसे अनवधानाने, हम युपी के है... निघुन जाते तसे.]
राजने मुद्दामून केले का चुकुन झाले माहित नाही पण मराठीचा उदो उदो करणारा सहज हिंदी बोलून जातो यावरुन मनसे फुटीरतावादी वगैरे नाहीये हे ४ लोकांच्या लक्षात आले तरी चिक्कार.
असं दिसतं आहे.
कदाचित हाच त्यांचा मास्टर प्लॅनही असू शकेल.
एकाने (शिवसेना) हिंदूत्त्वाचा मुद्दा फॉलो करायचा आणि एकाब ब्रँच (मनसे) ने मराठीचा मुद्दा हाताळायचा.
निवडणूका झाल्या कि एकत्र (दिलजमाई? काका-पुतण्या? कला का भुला शाम को घर.. टाईप) यायचं
:?
असं झालं तर चांगलच आहे.
मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर तो राज ठाकरे ह्यांचा वैचारिक पराभव असेल्.शरद पवारांची आज जशी अवस्था आहे तशी होईल्.बरोबर दहा वर्षांपुर्वी पवारानी परदेशी मुद्दा उचलुन राष्ट्रवादी स्थापन केली होतीं. नंतर 'ग्रेट मराठा' अपरिपक्व'परदेशी' सोनियांपुढे कितीवेळा नतमस्तक झाला ते आपण पाहिलेच. रा़ज ठाकरे असे होवू देणार नाहीत असे वाटते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
<<सेनेने भले काही केल नसेल मराठी माणसासाठी पण म्हणुन मराठीची ओरड करत मराठी माणसाचा पर्यायाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अधिकार मनसेला कुणी दिला?>>>
गंमत आहे नाही. प्रश्न असा आहे की खंजीर कुणी कुणाच्या पाठीत खुपसला. इथे राजना किंवा मनसेला दोष देण्यापेक्षा जरा आत्मपरिक्षण करणे योग्य नाही का ठरणार? शिवसेनेची किंवा भाजपाची मते मनसेने खाल्ली आणि युती झोपली व त्यामुळे मराठीयांचे नुकसान झाले असे म्हणताना मग या मराठी माणसांनी सरसकट राजजींच्या मनसेलाच मते का नाही दिली. मुळात खुप कमी प्रमाणात मतदान झाले, ज्यांनी केले ते अस्थानी केले.
तेव्हा खंजीर खुपसण्याचा आरोप जर मनसेवर किंवा राजवर होत असेल तर असे मतदान करणारी मराठी जनतादेखील तेवढीच दोषी आहे. उगीचच फक्त राजकारण्यांवरच आगपाखड करण्यात काय अर्थ आहे?
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
या विषयावरची पुढे कुठेच न नेणारी चर्चा आता थांबवण्यात यावी ही विनन्ती.
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
"मनसे'चा पराभवात विजय जरी झाला असला तरी..
कोणाच्या पराभवात विजय मानणे हे सुरवातीची व्यूहरचना म्हणून ठीक असले तरी ते "नवनिर्माण' करू शकत नाही. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने एक राजकीय पर्याय निर्माण करून तो स्थिर करायचा असेल तर पक्षबांधणीसाठी राज ठाकरे यांना प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी पक्षात दुसरी फळी भक्कमरीत्या उभी करावी लागेल. राज ठाकरे यांच्या प्रचाराचा सारा रोख प्रस्थापित पक्षांच्या विरोधात होता; परंतु त्यांच्या राजकारणामुळे सत्ताधारी आघाडीलाच फायदा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे केवळ पाडापाडी करणारा पक्ष अशी प्रतिमा निर्माण होऊ न देता एक सक्षम पर्याय म्हणून मनसे कसा उभा राहणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुणे-मुंबई-नाशिकच्या बाहेरही महाराष्ट्र आहे. तेथे रुजल्याशिवाय असा पर्याय निर्माण करता येत नाही. हे लक्षात घेतले नाही तर पराभवातील विजयाप्रमाणे भविष्यात विजयातील पराभवाची चवही मनसेला कदाचित चाखावी लागेल.
काही व्याख्या व गृहितके आणि किंचित आकडेमोड......
व्याख्या
१) मराठी - ज्याची मातृभाषा मराठी आहे तो.
२) मुंबईकर - ज्याचा जन्म आणि बहुतांश काळ मुंबईत गेला आहे तो
गृहितके
१) मनसेच्या उमेदवारला मिळालेली सगळी मते, जर मनसे रिंगणात नसती तर, सेना-भाजप उमेदवारला मिळाली असती.
२) अबु आझमीला मिळालेली सगळी मते, जर तो उभा नसता तर, काँग्रेस उमेदवारला (गुरुदास कामत) यांना मिळाली असती.
वरील दोन्ही गृहितके खरी मानली तर काय परिस्थिती असती?
निवडून आलेले उमेदवार हे असते - ६ पैकी ३ मराठी.
राम नाईक (मराठी)
गुरुदास कामत
किरिट सोमैय्या
प्रिया दत्त
एकनाथ गायकवाड (मराठी)
मोहन रावळे (मराठी)
आणि सध्याचे परिस्थिती अशी आहे - ६ पैकी २ मराठी.
संजय निरुपम
गुरुदास कामत
संजय पाटील (मराठी)
प्रिया दत्त
एकनाथ गायकवाड (मराठी)
मिलिंद देवरा
म्हणजे फक्त एक मराठी उमेदवार कमी!
जाता जाता - मुंबईबाहेरचा मराठी आणि पक्का मुंबईकर अमराठी यांतून काय निवडावे बरे? उमेदवाराचे चारित्र्य / काम तसेच त्याच्या पक्षाची ध्येयधोरणे समान असतील तर, स्थानिक उमेदवार हाच योग्य पर्याय ठरू नये काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आज मनसे कडे तरुण वर्ग जो आकर्षित झाला आहे तो १४-२० वया दरम्यानच्या तरुण तरुणीचा आहे .
हे अगदी १००% खरे आहे. माझी १४ वर्षांची मुलगी राजसमर्थक आहे. तिच्या शाळेत, ज्यांचे आईवडील मनसे सोडुन इतर पक्षांचे नेते आहेत, त्या मुली सोडून बाकी सगळ्या राजसमर्थक आहेत. आणि माझ्या मुलीच्या मते, त्या मुलीही फार काळ आईवडीलांच्या पक्षांचे समर्थन करणार नाहीत. बाकीच्या मुली लवकरच त्यांना राजसमर्थक बनवतिल. :)
साधना
काही असो .. मनसे ने शिवसेनेच्या जागा घेतल्यान हे काही चांगलं नाही...
कारण , मधे एकदा मिलिंद देवरा म्हणाले होते की मुंबई जर का राज्य झाल तर चांगल होईल.. तेव्हा ही भूमिका घेणारा पक्ष मुंबईतुन निवडून आला हे काही चांगल नाही.
आता झालं ते झालं ..
पूढ्च्या वेळी माझ्या मते ...एका पक्षाला मतदान होईल... या वेळचे निकाल नक्कीच मतदाराला आवडले नाही आहेत...
आणि निवडणूकीत हे बरेचदा आपोआप बदलतं .कारण आपण मतदान करतो तेव्हा तो माणूस निवडून यावा यासाठी करतो ..
दूसरा पडावा म्हणून नाही , किमान दोन वेळा असं होणार नाही..
साला जर एव्हडीच उध्दवमधे धमक असती तर २००४ च्या निवडनुकित त्यांचा एकच खासदार निवडुन नसता आला
आता तर तो पण पडला मुंबई महराष्ट्रापासुन तोडायचा डाव आहे असे ओरडुन ओरडुन्च सेनेने किती तरी वेळा
मुंबई महानगर्पालीकेत सत्ता घेतली आहे त्याच काय अजुन तरी मंबई महाराष्ट्रातच आहे ना आणी पालिकेत ह्यांनी कोनाच भल केल आहे स्वताच आणी स्वताच्या कंत्राटदारांच त्याच काय ?
प्रतिक्रिया
?
>>मी स्वत:
+१
+२
बरोब्बर
पण यात
कुणीही यावे
अत्यंत चोख विश्लेषण
मनसेमुळे? की शिवसेनेमुळे...?
शिरुर, मावळ, कोल्हापूर, हातकणंगले
मुळात
वर लिहीलेल्यांपैकी
हा, हा, हा......
प्रदीप साहेब
तोच न्याय
एक पोरकटपणा
हाच मुद्दा आहे
राज ठाकरे
मनसे किंवा शिवसेना परत एकत्र होणार
जर
<<सेनेने
या
"मनसे'च्या पराभवात विजय ...!!
हे
किंचित आकडेमोड....
आज मनसे
पुढे काय होईल?
साला जर
Pagination