✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन १

म
माहितगार यांनी
Sun, 04/06/2025 - 18:34  ·  लेख
लेख
हे एक स्वानंदासाठी केलेले स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. हल्ली (गेल्या काही महिन्यांपासून) ब्रह्म मुहुर्तावर उठणे होते. खरे सांगायचे तर जाग तशीही येत होती पण झोप पूर्ण होत नव्हती तर होणार्‍या झोप मोडीशी झगडा करण्यापेक्षा संध्याकाळचे जेवण आणि रात्री झोपण्याचीच वेळ बरीच अलिकडे घेतली. ज्या दिवशी लवकर झोप येणार नाही त्या दिवशी मेडीटेशन केले आणि झोपीचा पॅटर्न यशस्वीपणे बदलला. झोपही पूर्ण होऊ लागली आणि ब्रह्ममुहुर्तावर शुचिर्भूत होऊन शारिरीक कसरतींना आणि नाचण्यालाही (शारिरीक कसरतीचे नाचणे) वेळ मिळू लागला आहे. आज राम नवमी, तर शुचिर्भूत होऊन परिसरातील राम मंदिराकडे सकाळी पाऊणेपाचासच मोर्चा वळवला. या मंदिरात सकाळी योगा प्राणायाम इत्यादी मोफत शिकवले जाते. ब्रह्म मुहुर्तास उठूनही माझा अद्याप तो मुहुर्त लागणे अद्याप बाकी आहे. सकाळी लवकर उठू न शकणार्‍या घरच्या दारच्या मंडळींबद्दल त्यांना पहटेच्या प्प्रसन्नतेस मुकण्याबद्दल एकीकडे वैषम्य वाटते दुसरीकडे त्यांच्याच आळसामुळे रस्त्यांवर गर्दी न होता आपल्याला प्रसन्नतेचा आस्वाद शांततेत अनुभवता येतो असेही वाटते. असो, प्रसन्नशा वातावरणात केवळ तुरळक भूंकणारी कुत्री अधून मधून दोन चार गाड्या दूध आणि वर्तमानपत्रवाले रस्त्यांना नाही म्हणावयास जाग आणून होते. तसाही वेळ होता तर रस्त्यात लावलेल्या क्वचितच वाचल्या जाणर्‍या कथित नेते मंडळींच्या वाढदिवसाचे फ्लेक्स ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या आणि राम नवमीच्या होर्डींग्सेचेही जमेल तेवढे वाचन करत, पावले अंमळ संथपणे पुढे सरकत होती. कारण मंदिर अद्याप उघडले असेल का याची अंमळ शंका वाटत होती. आणि झालेही तसेच मंदिराच्या गेटला अद्याप कुलूप लटकत होते. पण प्रसादाच्या भंडार्‍याचे काम करणारी मंडळी मात्र आधीच कामास जुंपलेली दिसली. प्रसाद दुपारी बारा एक नंतरच असणार पण त्याची तयारी सकाळी चार पासून चालू करणार्‍यांच्या कर्तव्यनिष्ठेचे मनोमन कौतुकच करून दहा मिनीटे पुढे चालत जाऊन वापस आलो. गेटचे कुलूप अद्याप तसेच होते. आज आपल्याला देवबाप्पाचे बोलावणे नाही असा विचार करून देवबाप्पाला गेट बाहेरूनच नमस्कार करून जवळपास वापस निघालो. पण देवबाप मंडंळींही माझ्यातल्या नॉन-कन्फर्मीस्ट स्केप्टीक माणसाशी - कोणतेही अनुसरण करण्यापुर्वी चोखंदळपणे अनुसरणाची गरज पडताळून पहाणारा - काही दशकांचा अनुभवावरून माझ्याशी जुळवून घेऊन अधुन मधुन अनुभूती देऊन माझी आंतरीक अज्ञेयता डोळस श्रद्धतेकडे पुरेशी झुकवून आहेत. म्हणजे असे की बालपणा पासून तर्क-विज्ञानादी सर्व ललितेतर विषयांसमवेत सर्वधर्मीय आस्तिक अध्यात्म किर्तने आणि नास्तिक प्रवचने तेवढ्याच तन्मयतेने ऐकणारा मी, मला स्वतःला वाटले नाही तो पर्यंत म्हणजे सुरवातीची वीसेक वर्षेतरी मुर्तीपुजेपासून दूर होतो. तारुण्यात येई पर्यंत शब्द पुजा, पुस्तक पुजा, व्यक्ती पुजा यांच्या मर्यादांचा जसा जसा अदमास आला तसे तसे शब्द पुजा, पुस्तक पुजा, व्यक्ती पुजा यांना मुर्तीपुजा हाच उत्तम श्रेयस उतारा आहे हा माझा विश्वास उत्तरोत्तर अधिक बळकट होत गेला आहे, हि झाली तार्कीक बाजू ज्या बद्दल मी स्वतंत्र लेखातून पुर्वीच मत मांडले आहे. दुसरीकडे मला अनुभूती देऊन, माझ्या विचारातील बदलांच्या संधीचा उपयोग न करून घेतील तर ते देव कसले? तर मंडळी एकुण मंदिरांमध्ये सहसा रांग आणि गर्दी नसते तेव्हाच मी येतो, चुकुन रांग आणि गर्दीत सापडलो तर मन त्या गर्दीसोबत नसते हे एव्हाना देव मंडळींना कळून चुकले आहे त्यामुळे तेही माझ्यासाठी विशेष दर्शनाची व्यवस्था हळूच करून देतात तशी मला वेळो वेळी अनुभूती देण्यास ती मंडळी सहसा चुकत नाहीत. आजही सकाळीही काहीसे असेच घडले, मंदिरापासून दिड दोनशे मीटर अंतरावर एका टपरीवाल्या बांबाकडे चहा तयार झाला होता. टपरीवाले बाबा सकाळी सकाळी शुचिर्भूत होऊन कपाळावर गंध लावून तोंडात तंबाखुसम चघळत चहात टाकायच्या आल्यावर लक्ष्य केंद्रीत करून होते. टपरीवर एक वॉचमन आणखी एक म्हातारा होता. कमी साखरेच्या चहाचे रुपये २० पेटीएम केले आणि चहाची वाट पाहू लागलो तेवढ्यात एक मोटोरसायकलस्वार तरूण चेहर्‍यावर खूप सगळा तणाव घेऊन पाय उतार न होताच 'सिगरेट आहे का?' असे टपरी बाबास विचारता झाला. हो म्हटल्यावर खाली उतरून सिगरेट सिलगवून काही धूर आम्हा पॅसिव स्मोकर ना देऊन झाल्यावर माझे लक्ष त्याच्या लक्षात येऊन दूर जाऊन उभे टाकला. अजून सकाळी साडेपाचचा अंधारच होता त्या तरुणाकडे बघताना सकाळी साडेपाचला काय तणाव असेल या तरुणाला या विचारात मी पडलो होतो पण त्याला जाऊ दिले. हातात चहा घेऊन चहावाल्या बाबांशी रोजचा गल्ला किती होतो या बद्दल विषय काढला. माझा पुढच्या सिगरेट विषयक प्रश्न अपेक्षित धरून काही नाही एखाद दुसरेच पाकीट जाते असे सांगून वेळ मारून नेणे चहा वाल्या बांबांच्या चेहर्‍यावर आणि त्यांच्या नंतरच्या 'काय करायचं पोटासाठी धंदा करावा लागतो ना या वाक्यातून दिसून आले. पण त्या गरीब बिचार्‍या मंडळींनाही व्यसनाधीनतेबद्दल काय दोष द्यायचा. आपल्याच रुग्णांना तंबाखुसेवनापासून प्रवृत्त करणारा तंबाखूच्या विरुद्ध व्यासपिठावरून व्याख्याने देणारा माझाच डॉक्टर मामा आयसीयूतून प्रायव्हेट रूम मध्ये येताच सगळे अनाठायी खटाटोप करून सिगरेट मिळवतो - दोन तीन आठवड्यापुर्वीचीच गोष्ट. पण याही व्यसनाधीनतेला काय नाव ठेवायचे? मंदिरात परत एक चक्कर करून नंतर जेव्हा वाटेत 'षड रिपु' सारख्या विषयावर विचार करत, घरी परताच प्री डायबेटीकाच्या गोडाच्या व्यसना प्रमाणे मी भल्या पहाटे खा खा करत सुटलो होतो. - अपूर्ण * लेख सदरातील हे लेख लेखन खरे म्हणजे स्वतःसाठीच अधिक आहे, कुठे काही न पटल्यास माफ करा पण ह्या लेखनावर इतरांची ओपीनीयन्स मागवत नाही आहे. त्यामुळे जज करणार्‍या प्रतिसादांना टाळल्यास त्यापासून वाचवल्यास आणि खासकरून धागा हायजॅक करणार्‍या विशेषत: अनुषंगिक नसलेल्या आणि आधीच होऊन गेलेल्या चर्चा, शुद्धलेखन चर्चा टाळल्यास अंमळ आभारी असेन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1539 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

अतिशय आवडले स्वैर चिंतन. पहाटे जाग येणे ...

चित्रगुप्त
Sun, 04/06/2025 - 20:53 नवीन
खूपच आवडले. अमूक एक विषय असा न घेता दैनंदिन घटनांच्या आधारे काहीतरी लिहावे हे माळरानावरल्या स्वैर, स्वच्छंद भटकंतीसारखेच निखळ आनंद देणारे असते. थोरोच्या 'वाल्डनकाठी विचार-विहार' ची आठवणही आली. असे जरूर लिहून इथे प्रकाशित करत रहावे. -- मलाही किमान गेली वीसेक वर्षे रात्री अडीच- तीनच्या सुमारास जाग येते, मग काही केल्या झोप येत नाही. अलिकडे काही काळापासून थंडीत देखील रात्री अडीच-तीनला गुदमरल्यासारखे होऊन खूप उकडू लागते आणि तहान लागते. -- या बाबतीत एक गोष्ट दोन आठवड्यांपूर्वी लक्षात आली. ती म्हणजे खोलीत ऑक्सिजनची कमतरता होणे. झोपण्याची खोली घराच्या मागल्या बाजूला असून पूर्वेकडे मोठी खिडकी आहे, परंतु खिडकीपलिकडे चार फूट अंतरावर पंधरा-वीस फूट उंच भिंत असल्याने मोकळी हवा येत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यावर पुढल्या खोलीत अगदी खिडकीजवळ झोपणे सुरू केले. पश्चिमेकडून मंद वारा येत रहातो. हे केल्याबरोबर गुदमरणे, उकडणे आणि तहान लागणेच काय, पण अडीच-तीनला जाग येणेही बंद झाले आहे. आता साधारण साडेचार-पाचला जाग येऊन उठतो. आणखी एक गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी पायांना - विशेषतः पोटर्‍यांना - तिळाचे तेल लावून भरपूर मर्दन करतो. त्याचाही परिणाम असेल. -- साडेपाचला टपरीवर आलेला तरूण कदाचित रात्रभर बाहेर घालवून पहाटे घरी परतत असेल, असे वाटले. Image removed.
  • Log in or register to post comments

हा लेख माहितगार यांनी लिहिलेला वाटत नाही.

धर्मराजमुटके
Sun, 04/06/2025 - 21:23 नवीन
हा लेख माहितगार यांनी लिहिलेला वाटत नाही. कदाचित त्यांनी एखादा ए.आय. टुल वापरुन लिहिला असावा अशी शंका येते :) शिवाय त्यांची नेहमीची "अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद आणि उत्तरदायित्वास नकार" सिग्नेचर गायब आहे. त्यांचे भुतकाळातील लेख इतके शब्दबंबाळ असायचे की वाचता वाचता माणूस रक्तबंबाळ व्हायचा. असो. लेख खरचं आवडला त्याची ही पावती.
  • Log in or register to post comments

पण देवबाप मंडंळींही

सुबोध खरे
Wed, 04/09/2025 - 10:14 नवीन
पण देवबाप मंडंळींही माझ्यातल्या नॉन-कन्फर्मीस्ट स्केप्टीक माणसाशी - कोणतेही अनुसरण करण्यापुर्वी चोखंदळपणे अनुसरणाची गरज पडताळून पहाणारा - काही दशकांचा अनुभवावरून माझ्याशी जुळवून घेऊन अधुन मधुन अनुभूती देऊन माझी आंतरीक अज्ञेयता डोळस श्रद्धतेकडे पुरेशी झुकवून आहेत. म्हणजे असे की बालपणा पासून तर्क-विज्ञानादी सर्व ललितेतर विषयांसमवेत सर्वधर्मीय आस्तिक अध्यात्म किर्तने आणि नास्तिक प्रवचने तेवढ्याच तन्मयतेने ऐकणारा मी, मला स्वतःला वाटले नाही तो पर्यंत म्हणजे सुरवातीची वीसेक वर्षेतरी मुर्तीपुजेपासून दूर होतो. तारुण्यात येई पर्यंत शब्द पुजा, पुस्तक पुजा, व्यक्ती पुजा यांच्या मर्यादांचा जसा जसा अदमास आला तसे तसे शब्द पुजा, पुस्तक पुजा, व्यक्ती पुजा यांना मुर्तीपुजा हाच उत्तम श्रेयस उतारा आहे हा माझा विश्वास उत्तरोत्तर अधिक बळकट होत गेला आहे, हि झाली तार्कीक बाजू ज्या बद्दल मी स्वतंत्र लेखातून पुर्वीच मत मांडले आहे. हि तीन वाक्ये पहा.
  • Log in or register to post comments

एआयलाही याचे पुर्नलेखन जमले

माहितगार
गुरुवार, 04/10/2025 - 09:50 नवीन
एआयलाही याचे पुर्नलेखन जमले नाही म्हणजे माझीच सिग्नेचर स्टाईल आहे:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असे स्वैर विचार लेख इतरांनीही

कंजूस
गुरुवार, 04/10/2025 - 03:52 नवीन
असे स्वैर विचार लेख इतरांनीही लिहावेत आणि मेन बोर्ड हलता ठेवावा. जुन्या लोकांनीच करणे शक्य आहे. नवीन तरुण मिपाकर भरती होत नाहीत.
  • Log in or register to post comments

चित्रगुप्त, धर्मराजमुटके,

माहितगार
गुरुवार, 04/10/2025 - 09:52 नवीन
चित्रगुप्त, धर्मराजमुटके, सुबोध खरे, कंजूस प्रतिसादांसाठी अनेक आभार
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा