Skip to main content

नको रे मना मत्सरू..(शतशब्दकथा)

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 06/03/2025 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
षड्रिपुंवरच्या माझ्या पाच शतशब्दकथांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकाला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली. काय नाहीये माझ्या पाच शशकांत? माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल. "मद" वाचून ट्रम्पतात्याही सर्वोदयी होतील. पण माझी गाडी मत्सराशी अडलीय कारण मला मेलीला मत्सर म्हायतीच नाय ना. आता "मत्सर" शशक लिहिण्यासाठी इतर शशक "लिहिण्या"पूर्वी लावला तसा कौल डीपसीकला लावला. ..मग आठवलं की त्यालाही बिचाऱ्याला मत्सरस्पर्श झालेलाच नाहीय. आता जाते चॅट जीपीटीच्या वाटे जे डीपसीकचा मत्सर करते ...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1547
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छान! अशी कथा लिहायला जिपट्याला कितीतरी अभ्यास करावा लागेल.