प्रसंग बाका,
वाल्या च आका,
दिवसा डाका,
दिसेचीना।।
पवन चक्की,
जेल ची चक्की,
गोष्ट पक्की,
होईचिना।।
सरपंच,
रंगमंच,
भ्रष्ट संच,
न्याय चि ना ।।
दागी मंत्री,
गुन्हे जंत्री,
राजीनामा,
मागेचीना।।
पळालं आंधळं,
पोलीस पांगळं,
दिसतंय सगळं
सापडेचीना ।।
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1282
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळे एकमेकांना सामील आहेत
अगदी बरोबर
In reply to सगळे एकमेकांना सामील आहेत by कानडाऊ योगेशु
छान
शुजात खान यांनी गायलेली...
किमान शब्दांत आणि नेमकं!