✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

परीक्षा...कुणाची ?

ब — बाजीगर, Sun, 02/23/2025 - 12:34
परीक्षा...कुणाची? 'सी ई ओ'समोर पडला कॉप्यांचा पाऊस ! डोके गरगरले,संताप आला भाऊस ।। 'विकास मीना'- करारी, मारली धडक भरारी ।। बारावी चा गणिताचा पेपर, खोके भरून कॉप्या,गाईड, पाहून आले फेफरं ।। परीक्षाकेंद्रातून अनेकांनी मारली धूम, कॉपी फॅक्टरी हँडलूम ।। आता त्यांची सटकली, जबाबदारी ना झटकली ।। इमानदारीची लढाई आरपार, पूर्ण प्रशासन व पर्यवेक्षक यांच्यावर, केला पोलीस ठाण्यात FIR ।। आदर्श(?!)विद्यालय फुलंब्री संचालक पर्यवेक्षक नंबरी ।। कुंपण च शेत खाते, पर्यवेक्षक कॉपी देते ।। कशासाठी हे सर्व? शिक्षण न देता पास व्हावेत सर्व ।। विद्यार्थांना शिकायचे नाहीये. शिक्षणसम्राटांना शिकवायचे नाहीये ।। आता हा झेडपी 'सी ई ओ' प्रामाणिक, कशी बदली करावी आणिक ।। हाच चालला असेल खल, एक होतील नायक खल ।। लोकांची स्मृती असते अधू च, तीन महिन्यांनी शाळेचा, 100% पास निकाल बघू च !! https://www.esakal.com/marathwada/aurangabad/ceo-exposes-hsc-exam-mathematics-scandal-mass-copying-case-in-phulambri-tehsil-crime-pjp78

प्रतिक्रिया द्या
953 वाचन

💬 प्रतिसाद (3)

अतिशय स्तुत्य.

कर्नलतपस्वी
Sun, 02/23/2025 - 13:08 नवीन
कुंपणच शेत खाते पण किती असे इमानदार अधिकारी असतील ? शिक्षण म्हणजे सापशिडीचा खेळ, नववी इयत्ते पर्यंत सर्व पास मात्र ९९ वर गेल्यावर सापाच्या तोंडातून खाली येणार.
  • Log in or register to post comments

समयोचित कविता....

मुक्त विहारि
Sun, 02/23/2025 - 19:15 नवीन
आवडली....
  • Log in or register to post comments

सर्वांना पास करा, सर्वांना

विवेकपटाईत
गुरुवार, 02/27/2025 - 12:03 नवीन
सर्वांना पास करा, सर्वांना डिग्री द्या. हाच खरा समाजवाद असतो. प्रत्येक राज्यांत दहावीचा परिणाम 95 टक्क्यांचा वर असतो. दोन दिवस आधी चॅम्पियन वाचून किंवा नकल करून सहज बीए पास होता येते. हिंदीत एमए झालेला मुलगा एक पान हिन्दीचे न चुकता वाचू शकत नाही. बाकी विषयांबाबत न बोलणे उचित. आजची शिक्षण व्यवस्था वयाच्या 22 वर्षापर्यंत कागदी ज्ञान असणार्‍या तरुणांना तैयार करत आहे. मग त्यांना मूर्ख बनविण्यासाठी आरक्षण इत्यादि खेळ सुरू होतात. हे माहीत असून ही 100 पैकी फक्त 3 तरुणांना सरकारी नौकरी मिळणार. बाकी वयाच्या 30-35 वर्षांपर्यंत सरकारी नौकरीची तैयारी करत बेरोजगार फिरणार. 50 टक्के पेक्षा जास्त मार्क्स असणार्‍या विद्यार्थ्यांना 8 पुढे शिक्षणाची अनुमति दिली पाहिजे. 60 टक्केहून जास्त मार्क्स असेल तरच कॉलेज शिक्षण.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा