Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मस्त कलंदर on Fri, 05/15/2009 - 00:11
  • Log in or register to post comments
  • 12459 views

प्रतिक्रिया

Submitted by Nile on Fri, 05/15/2009 - 00:50

Permalink

"भारतात

"भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?" Rolling On The Floor
ROFL!!! लई भारी! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by समिधा on Fri, 05/15/2009 - 00:54

Permalink

खुपच मजेशीर

"भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?" हे खरचं खुपच मजेशिर आहे. =)) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 05/15/2009 - 00:59

Permalink

हाहाहा वाच

हाहाहा वाचताना मजा येते आहे. मस्तच! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 05/15/2009 - 01:39

Permalink

जबराट!!!

खरंच, वाचताना मजा येत आहे. तमिळनाडूमधे हिंदीसाठी एक वेगळाच फाँट शोधून काढला आहे. जितका म्हणून कुरूप करता येईल तितका केला आहे. पण आपण बरंच काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Fri, 05/15/2009 - 06:49

Permalink

...की सगळेजण

...की सगळेजण यंडुगुंडु करायला लागत.. मी त्यांना कॉमन भाषा असे कानीकपाळी ओरडून थकले. असेच अनुभव येथील 'तेलगु' भाषिकांचे! सरळ मराठीत बोलायला सुरुवात करायची अशा वेळी. मजा येते...आजकाल सगळे तेंग्लिश कींवा इंदी बोलतात. ;) -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 05/15/2009 - 07:29

Permalink

जबरी

पाटी अफलातून आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 05/15/2009 - 08:54

In reply to जबरी by सहज

Permalink

असेच म्हणतो.

पाटी अफलातून आहे. मी मद्रासला गेलो होतो तेव्हा अशा तर्‍हेचेही हिंदी नव्हते. फक्त तमिळ आणि इंग्लीश. त्यामानाने ही नक्कीच सुधारणा आहे म्हणायचं. ;) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 05/15/2009 - 09:05

Permalink

भारी

भारी बोर्ड! त्या तमिळ हिंदीमधलं फक्त 'कंम्प्युटरी कृत आरक्षण ' (बहुधा हेच शब्द असावेत! :O ) एवढेच शब्द कळाले. तमिळ लोक भाषेच्या बाबतीत कडवे असतात अगदी.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/15/2009 - 09:31

Permalink

मस्तच मस्त कलंदर!

एकदम खतरा अनुभव आहेत! सांगताय सुद्धा छानच एकदम ओघवत्या भाषेत, उगाच डामडौल नाही! आवडलं मनापासून. ती पाटी जबरा आहे 'कंप्यूटरीकृत यात्री आरक्षण केंद्र' एवढेच शब्द लागले, बाकीचे काय ते एमजी आरच जाणे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 05/15/2009 - 09:36

In reply to मस्तच मस्त कलंदर! by चतुरंग

Permalink

शेवटचा शब्द आहे...

तरी म्हटलं अजून कुणी अक्षरे लावण्याचा प्रयत्न का नाही करत आहे? शेवटचा शब्द आहे... तिरूमलायै.. (स्थानकाचे नाव) मस्त कलंदर.. हे जीवन सुंदर आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Fri, 05/15/2009 - 11:53

Permalink

"भारतात

"भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?" घ्या हसून मद्राश्यांच्या आडमुठेपणावर ! पण लक्षात घ्या याच गुणामुळे त्यांची भाषा मद्रास आणि तामिळणाडू मध्ये घट्ट टिकून आहे. ब्रह्मदेवाचा बापही तिला हलवू शकत नाही. आणि परधार्जिण्या मराठ्यांच्या शहरांतून/राज्यातून त्यांची भाषा हळूहळू पण निश्चितपणे हद्दपार होते आहे. बाकी चालू द्या हिंदीचा उदोउदो .. (मद्राश्यांचा भाषाप्रेमाचा चाहता) अभिरत
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 05/15/2009 - 12:32

In reply to "भारतात by अभिरत भिरभि-या

Permalink

हे मात्र १००% खरं!!!!

आजकाल मुंबईत आणि पुण्यातही मराठी लोकही मराठी बोलत नाहीत.. माझा भाऊ पुण्यात असतो... त्याचं सगळीकडे हिंदी नि माझं अगदी मुंबईच्या मॉलमध्येही मुद्दाम मराठी..(आणि बर्‍याचदा समोरचा माणूसही मराठीच असतो...) ...हा आम्हां दोघांमधल्या वादाचा मुख्य मुद्दा आहे.. आणि हो.. मराठीत बोलतेय म्हणून जर कुणी घाटी म्हणून कुचेष्टेने पाहिले जरी मात्र.... मग त्या माणसाची/बाईमाणसाची फर्ड्या इंग्रजीत अशी वाट लावते ना... यंव रे यंव!!!!! नाद नाही करायचा!!!! मस्त कलंदर.. हे जीवन सुंदर आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 05/15/2009 - 13:53

In reply to हे मात्र १००% खरं!!!! by मस्त कलंदर

Permalink

मग

मग त्यांच्यात अन तुमच्यात काय फरक? हे दोन मुद्दे वेगळे आहेत. काही झालं तरी तमिळ मध्येच बोलायचे या अट्टाहासामुळे सर्वसामान्य तमिळ समाज हा अनेक गोष्टींना मुकतो आहे.( मी स्वतः मद्रास मध्ये २ वर्ष हिंदी शिकवले आहे). फक्त मराठीच शिकणार/अभ्यासणार असा पवित्रा कोणीही सुज्ञ वैचारीक मनुष्य घेणार नाही. साधारणपणे चार जणात बोलताना जी भाषा सर्वांना कळेल ती वापरणे हाच शिष्टाचार. आम्ही अमेरिकेत सुद्धा फक्त मराठी लोक असु तर मराठीतच बोलतो. पुण्यातही तसेच होते आणि ते हे सहाजिकपणे.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 05/15/2009 - 13:59

In reply to मग by Nile

Permalink

दुराग्रह नाही..

पण जिथे शक्य आहे, नि ज्यांना कळते, त्यांच्याशी मराठीत बोलायला काय हरकत आहे? मला ९५% लोकांशी बोलताना ते मराठी असल्याचा अनुभव आला.. दुसर्‍यांची गैरसोय करणारे भाषाप्रेम नककीच वाईट... मस्त कलंदर.. हे जीवन सुंदर आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 05/15/2009 - 14:04

In reply to दुराग्रह नाही.. by मस्त कलंदर

Permalink

मग जिथे

मग जिथे शक्य आहे आणि जी सर्वांना कळेल अश्या भाषेत बोलणे काय वाईट मग ती कोणती का भाषा असेना?
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 05/15/2009 - 14:18

In reply to मग जिथे by Nile

Permalink

सहमत!

जिथे पोट जाळायला येतो आपण त्या जागची भाषा शिकली की हा प्रश्नच येत नाही. दाक्षिणात्य राज्यांत गेलं की झक्क मारुन त्यांची भाषा शिकावी लागते ना? अमेरिकेत जाऊन कुणी मी मराठी/हिंदी/गुज्जु/तामिळ्/तेलुगु असले हट्ट करत नाही ना? मग तो आमच्या मातीतच का? कारण आम्हीच बोटचेपी धोरणं घेऊन ज्याच्यात्याच्या पाया पडायला जातो. :( ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 05/15/2009 - 14:36

In reply to सहमत! by धमाल मुलगा

Permalink

अनेक

अनेक गुजरात्यांनी मारवाड्यांनी मराठी मातीत येउन मराठी आत्मसात केली व व्यापार केला आणि संपन्न झाले. कुणी सांगितले अमेरिकेत regionalism चालत नाही म्हणुन? स्थानिक भाषा शिकणे अपरिहार्य असते कारण, रिक्षावाला, भाजिवाले, बस कंडक्टर वगैरे रोज भेटणारा इसम राष्टीय भाषा जाणतोच असे नाही, जसे तुम्ही तसेच दक्षिणी लोक इकडे आल्यावर शिकतातच कि मराठी वा हिंदी. (महाराष्ट्रात हिंदी सामान्याला कळते ति दक्षिणेत कळत नाही म्हणुन बर्‍याच लोकांचा त्रागा असतो, पण मराठी आणि हिंदी यामध्ये बरेच साम्य आहे, दक्षिणि भाषा या पुर्णपणे वेगळ्या आहेत त्यामुळे सहाजीकच त्यांना ते अवघड जात)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 05/15/2009 - 14:54

In reply to अनेक by Nile

Permalink

पुन्हा एकदा सहमत!

>>अनेक गुजरात्यांनी मारवाड्यांनी मराठी मातीत येउन मराठी आत्मसात केली व व्यापार केला आणि संपन्न झाले. अगदी! नुसतंच नव्हे तर इथं कमावलेल्या पैशाची जाण ठेऊन इथे समाजोपयोगी कामंही केली. वादच नाही त्याबद्दल! >>कुणी सांगितले अमेरिकेत regionalism चालत नाही म्हणुन? :) बहुतेक माझ्या वाक्याचा विपर्यास झालाय किंवा मला ते योग्य मांडता आलं नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की अमेरिकेत जाऊन तुम्ही (म्हणजे कोणीही, मी असो, अमरसिंह असो, अबु आझमी असो किंवा करुणानिधी :) ) तिथल्या लोकांशी बोलताना आपापली भाषा वापरता? की त्यांची भाषा?
स्थानिक भाषा शिकणे अपरिहार्य असते कारण, रिक्षावाला, भाजिवाले, बस कंडक्टर वगैरे रोज भेटणारा इसम राष्टीय भाषा जाणतोच असे नाही, जसे तुम्ही तसेच दक्षिणी लोक इकडे आल्यावर शिकतातच कि मराठी वा हिंदी.
अहो साहेब, मग मी कुठे आणखी काही वेगळं म्हणतोय? तेच तर म्हणतोय ना? त्याचपध्दतीनं आपण तिकडे गेलो तर आपल्याला तामिळ शिकावं लागेल्च. पण भर मुंबईत ऑफिसातल्या टीम मिटींग तामिळमध्ये व्हायला लागल्य तर काय म्हणाल? >>जसे तुम्ही तसेच दक्षिणी लोक इकडे आल्यावर शिकतातच कि मराठी वा हिंदी. आणि महाराष्ट्रात आल्यावर मराठी का नाही? तिकडे चालते का दुसरी भाषा? माझा मुद्दा भाषिक हटवादीपणाचा आहे. आम्ही इथे आलो तरी आम्ही असंच बोलणार किंवा काय करायचंय इथली भाषा शिकून? होताहेत ना कामं? हेच तर मुळावर येतंय ना शेठ :) असो, कलंदरताईंच्या धाग्यावर अंमळ विषयांतर घडतंय. उर्वरित चर्चा आपली हरकत नसेल तर खरडवहीतून करुया काय? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 05/15/2009 - 22:58

In reply to पुन्हा एकदा सहमत! by धमाल मुलगा

Permalink

आणि

आणि महाराष्ट्रात आल्यावर मराठी का नाही? तिकडे चालते का दुसरी भाषा? माझा मुद्दा भाषिक हटवादीपणाचा आहे. आम्ही इथे आलो तरी आम्ही असंच बोलणार किंवा काय करायचंय इथली भाषा शिकून? होताहेत ना कामं? हेच तर मुळावर येतंय ना शेठ
अहो, तुम्हाला काय म्हणायचे आहे? माझा मुद्दा होता ते कट्टरपणा करित असतील तर तुम्ही ही करणार का? जर तुमचे उत्तर हो असेल तर वादाचा मुद्दाच नाही. मी दक्षिणेत ३-४ वर्ष काढ्ली कोणतीही दक्षिणी भाषा विशेष न येता, न वापरता. मग आता दुसरी भाषा चालली कि नाही ते तुम्हीच ठरवा. आडमुठे लोक भेटले पण मला अजुन आडमुठा नाही बनवु शकले.
तिथल्या लोकांशी बोलताना आपापली भाषा वापरता? की त्यांची भाषा?
आम्ही जि भाषा सर्वांना कळेल ति वापरण्याचा प्रयत्न करतो.
पण भर मुंबईत ऑफिसातल्या टीम मिटींग तामिळमध्ये व्हायला लागल्य तर काय म्हणाल?
आता भाषा ही संवादाची गरज आहे, तुमच्या मिटिंगमधल्या लोकांना तुम्हाला वगळायचे तर नाही ना? ;) अनेक लोक मुर्खपणा करतात पण म्हणुन तुम्ही करणार का हा प्रश्न आहे. माझे मुळ वाक्यः
मग जिथे शक्य आहे आणि जी सर्वांना कळेल अश्या भाषेत बोलणे काय वाईट मग ती कोणती का भाषा असेना?
हे फक्त मराठी लोकांसाठी नाही. असो, मला याउपर काही म्हणायचे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Fri, 05/15/2009 - 14:23

In reply to मग जिथे by Nile

Permalink

मग जिथे

मग जिथे शक्य आहे आणि जी सर्वांना कळेल अश्या भाषेत बोलणे काय वाईट मग ती कोणती का भाषा असेना? आज काल आमची नविन पद्धती अवलंबली आहे. कुठे ही नविन ठीकाणी संवाद सुरु करताना मराठीत सुरु करतो. वर म्हट्ल्या प्रमाणे ९५% वेळा समोरच्याला मराठी येत किंवा समजत असते. जर त्याला मराठी कळत नसेल तर "क्या आपको मराठी नही आती?? कितने साल से मुंबई मे हो??" असे विचारुन पुढचा संवाद करतो. बहुतेक लोकांना हिंदी येतच असते त्यामुळे काम होतेच. नाहीतर वरच्या संवादाने समोरचा माणुस ओशाळतो(विश्वास बसणार नाही पण हे होतय). आता त्याल हिंदी येत नसेल तर इंग्रजी आहेच. आता हयात मराठीचा अट्टहास आहेच. सोय पण आहे. फक्त समोरच्याला येत नसेल असे समजुन सुरुवात हिंदीत करण्याला आमचा विरोध आहे. बाकी ज्यांना इंग्रजी सुद्धा येत नाही त्यांचा साठी आम्ही गुजराथी, बंगाली (बांग्लादेशात न येणार्‍या आपल्या बांधवांसाठी) आणी भोजपुरी शिकायचे ठरवले आहे. अरे सर्वात मह्त्वाचे तुमचे दोन्ही लेख खुप छान झाले आहेत. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 05/15/2009 - 14:44

In reply to मग जिथे by निखिल देशपांडे

Permalink

बरोबर आहे,

बरोबर आहे, तुम्ही केलंत की तुम्ही मराठीचे तारणहार, त्यांनी केलं की ते कट्टर भाषाप्रेमी. वादाचा मुद्दा येतो कुठे?
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Fri, 05/15/2009 - 16:13

In reply to बरोबर आहे, by Nile

Permalink

बरोबर आहे,

बरोबर आहे, तुम्ही केलंत की तुम्ही मराठीचे तारणहार, त्यांनी केलं की ते कट्टर भाषाप्रेमी. वादाचा मुद्दा येतो कुठे? बाबारे आम्ही पण कट्टर भाषाप्रेमीच आहोत.... फक्त आमची आणी त्यांची पद्धत वेगळी आहे ती वर दिलीच आहे. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 05/15/2009 - 12:02

Permalink

जोरदार..

हा भाग मस्तच उतरला आहे, हिंदी पाटी भन्नाट आणि राष्ट्रीय पक्षी कावळा.. अफलातून. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 05/15/2009 - 14:31

In reply to जोरदार.. by स्वाती दिनेश

Permalink

सहमत

आहे, पाटी तर बेष्टच. हिंदीची चिंधी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/15/2009 - 12:07

Permalink

वरील

वरील सर्वांसारखेच म्हणतो.. मस्तच! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 05/15/2009 - 14:12

Permalink

च्यायला!

ऐकावं ते एकेक नवलच! खरंच झंगडच दिसताहेत हे लोक.
यावर एका संगणक शास्त्रात एम. टेक. केलेल्या, एका महाविद्यालयात संगणक विभागात विभागप्रमुख असलेल्या मनुष्याचा युक्तिवाद: "भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?"
=)) =)) असतात, असतात असे आडमुठ्या तिरक्या खोपडीचे लोक :) त्याला कळेल अशा भाषेत विचारायचं ना, सगळीकडे मायक्रोसॉफ्ट जास्त वापरलं जातं म्हणुन तुम्ही ओपनसोर्स बंदच करु म्हणता का? बाकी, अभिरतबाबा तुमच्याशी सहमत! परंतु एक गोष्ट नक्की आहे, की "अभिमान" आणि "वृथा दुराभिमान" ह्यातला फरक कळणे ह्या लोकांना अत्यावश्यक आहे. अवांतरः यशोधरा, तुझ्या हापिसातला तो तामिळी माणसाचा किस्सा सांग की इथे :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Fri, 05/15/2009 - 16:05

In reply to च्यायला! by धमाल मुलगा

Permalink

मान्य

>> बाकी, अभिरतबाबा तुमच्याशी सहमत! परंतु एक गोष्ट नक्की आहे, की "अभिमान" आणि "वृथा दुराभिमान" ह्यातला फरक कळणे ह्या लोकांना अत्यावश्यक आहे. तामिळजनांचा अभिमान दुराभिमानाकडे झुकतो हे मान्य. पण मला मराठीजनांचा निराभिमान आणि तामिळींचा दुराभिमान यात एकाची निवड करायला सांगितले तर मी डोळे झाकून दुराभिमान निवडेन. अर्थात, या दोघांपेक्षाही बंगालीबाबू उत्तम! ते हिंदी शिकतातच पण स्वतःच्या भाषेचा रास्त अभिमानही बाळगतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 05/15/2009 - 16:09

In reply to मान्य by अभिरत भिरभि-या

Permalink

+१... सहमत

मस्त कलंदर.. हे जीवन सुंदर आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Fri, 05/15/2009 - 19:55

In reply to +१... सहमत by मस्त कलंदर

Permalink

+२

आज कळले तामीळ लोकांच्या भाषाप्रेमाचा स्विकार कसा झाला ते? खुपच छान! आवडले! :)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 05/15/2009 - 22:31

In reply to च्यायला! by धमाल मुलगा

Permalink

धम्याने

धम्याने सांगितल्यावरुन, थोडक्यात किस्सा - असच एकदा, हापिसात मराठी सहकार्‍यांशी मराठीतून गप्पा मारताना माझा एक मद्र देशीय सहकारी तिथे आला, रीतीप्रमाणे त्यालाही हाय हॅलो केल, कस चाललय वगैरे विचारल.. आणि, अर्थात हे विंग्रजीमधून, कारण, त्यांना एक मद्र आणि दुसरी विंग्रजी ह्या दोन भाषा सोडून, अगदी ते राहतात त्या राष्ट्राची दुसरी कोणतीही भाषा बोलायची पण विलक्षण एलर्जी आहे!! आणि कोणी काही लेक्चर द्यायच्या आत सांगतेय, मी मुळीच सगळ्यांना एकच पट्टीने मोजत नाहीये. माझी शेजारीण पण मद्र देशीयच आहे, आणि आमच एकदम गूळपीठ आहे. आणि ती चक्क मस्त हिंदीही बोलते, अन कधी कधी मला पण मद्र भाषेतले शब्द शिकवते, आणि मी ही शिकते. कुठलीच भाषा शिकायचं मला काही वावड नाहीये, विरोध आहे तो प्रवृत्तीला. तर, सुरुवातीला ठीक बोलत होतो आम्ही इथल तिथल, मग तो एकदम, आमच्या मराठी बोलण्यावरच घसरला!! आणि मग ही मुक्ताफळ उडाली!! तेच मूळ संवाद घालायचा मोह आवरत नाहीये, म्हणून त्यातल्या त्यात सेंसॉर करून... :D मद्रमॅन: व्हाऽऽट इस धिऽऽसऽऽऽ यू आल आऽऽऽऽलवेज स्पीक इन यूवर लॅंग्वेऽऽज... धिऽऽस इज वेऽऽऽऽरी रॉंग! ग वर जोर देऊन! आम्ही जरा उडालोच!! अरेच्या! याला काय चावल आता!! आधी आम्ही समजलो की तो खेचतोय आमची, मग लक्षात आल की, तस नाही, खरच म्हणतोय तो, तेवढ्यात, मद्रमॅन: यू मस्ट स्पीक इन अवर लॅंग्वेज, दु यू नो, देअर इज नोऽऽऽ लॅंग्वेज लाईक अवर्स!! इट इज इंटऽऽऽर् नॅशनल लंग्वेज, यू नो?? आमची डोचकी सटकायला लागलेली!! मी: इंटरनॅशनल?? सिन्स व्हेन?? हाउ कम?? मद्रमॅन: यू डोंट नो?? व्हाऽऽट यू आर सेईंग?? इट इज स्पोकन इन श्रीलंका, यू नो दॅट??? आम्ही प्रचंड वैतागाने, पण प्रचंड हसू यायला लागल्याने, खुर्च्यांमधून पडायच्या बेतात होतो!! आणि आता मराठी मॅन पण वैतागलेले!! आणि सगळ्यांनाच खुमखुमी चढलेली!! मराठी मॅन १: सो व्हाय डोंट यू गो टू श्रीलंका?? सेटल डाऊन देअर? मराठी मॅन २: लेका फ़ुकण्या ( ए, तू कान बंद कर आता, मी त्याला शिव्या ऐकवतो मस्त - हे मला) भXXXx तिकडे मुंबईत येता लेको, तिकडे काय मराठी शिकता का रे?? तू भेट रे साल्या बाहेर!! च्यायला, माज उतरवतो तुझा, मराठी बोलू नका म्हणतोय!! नंतरच्या शिव्या न लिहिल्याबद्दल क्षमस्व वाचक हो! मद्रमॅन : व्हाऽऽट इज धिस?? आय एम नॉट फ़ॉलोइंग यू गाऽऽईज!! स्पीक इन इंग्लिश, सो दॅट आय कॅन फ़ॉलो.... मराठी मॅन १: अबे, मेरी बात को समझ ध्यानसे, एक तो हम मराठीं में बोलना तो छोडने वाले नहीं, तेरी लॅंवेज इंटरनॅशनल हो या और कुछ... मद्रमॅन: आय डोंट अंडरस्टॅंड हिंदी... मराठी मॅन१ : वो तुम्हारा प्रॉब्लेम है, नहीं आती तो सीखो!! आणि अस बरच काय काय वाजल!! त्यानंतर त्याच्या समोर तर मराठीतच बोलयचो आम्हीं अन त्याच्याशी बोलताना हिंदीतच बोलायचो! सुरुवातीला त्याने कांगावा केला, पण आम्ही तरकटच लोक आहोत. त्याच्याशी हिंदीतच बोलतो आणि तो ही झक्कत आता बोलतो. आम्ही सुखाने मराठी गप्पांचा फड त्याच्या समोर जमवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 05/15/2009 - 14:22

Permalink

सुंदर

सुंदर अनुभव कथन. पु.ले.शु. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 05/15/2009 - 19:17

Permalink

वा .. दोन्ही

वा .. दोन्ही भाग वाचले.. मस्त आहेत.. पाटी आणि कावळ्याचा किस्सा तर फारच मजेदार :) पुढील लेखनास शुभेच्छा ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 05/15/2009 - 19:27

Permalink

मस्त

मस्त लेखन... पाटी अंमळ खत्रुड आहे. :D मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 05/15/2009 - 20:07

In reply to मस्त by मदनबाण

Permalink

त्या खत्रुडपणाला माझा काही इलाज नाही हो...

तिकडे अश बर्‍याचशा पाट्या होत्या.. पण सगळ्यांचे फोटो न काढ्ल्याचे वाईट वाटतेय.. नाहीतर पुणेरी पाट्यांसांरखी इथे पण एक मालिका सुरू केली असती.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Fri, 05/15/2009 - 19:39

Permalink

मस्त अनुभव

उतरला आहे.
व्हाय य्यू नार्थ इंडियन्स आर आल्वेज अग्गेन्स्ट साऊथ इंडियन्स"???
ईकडे हाच प्रकार असतो. मला एकदा "तुम्हा उत्तर भारतियांच्या जेवणात रोज भात असतो का?" असे एकाने विचारले असता कंटाळून मी शेवटी "भारताचा नकाशा उघड आणि महाराष्ट्र कुठे आहे ते बघ" असे उत्तर दिले. त्यावर त्याचे प्रत्यत्तुर - आमच्या राज्याच्या वर महाराष्ट्र आहे.म्हणजे ऊत्तरेला आहे म्हणुन तुम्ही उत्तर भारतिय.आता काय बोलणार? थोड्याफार प्रमाणात आपणही हेच करतो-चेन्नई चा मद्रासी,हैदराबादचा पण मद्रासी, मैसुरचा मद्रासी आणि कोचीनचा पण मद्रासीच.!! पुर्वी दिल्लीकरांच्या द्रुष्टीने भारतात तीनच भाषा असायच्या- हिंदी,बंगाली आणि मद्रासी.!! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामि on Fri, 05/15/2009 - 21:54

Permalink

क्या बात है...

नाद नाही करायचा! सही रे मस्त कलंदर,या भय्या लोक्सची तोंड इंग्रजीनेच फोडली पाहीजेत.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 05/15/2009 - 22:45

Permalink

झकास

झकास वर्णन! मजा आली दुसर्‍याही भागात. कावळाचा विनोद आणि पाटी दोन्ही सह्हीच!! वर्णसाम्यामुळेसुद्धा कावळ्याला राष्ट्रीय पक्षी घोषित करावं असं वाटलं का मद्रमनुष्याला? ;-) अवांतरः आमच्या हापिसात बंगाल्यांचे ऑकार कानावर यायला लागले की सरळ त्यांना मराठीतून काहीही प्रश्न विचारते. एक शांतता पसरते आणि पुन्हा संवादाची भाषा हिंदी किंवा इंग्लिश होते! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 05/15/2009 - 22:57

In reply to झकास by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ही ही ही......

मला त्या क्षणी काय काय वाटलं ते केवळ वर्णनातीत आहे... जमीन दुभंगून तिच्या पोटात जाऊ???? की असल्या तर्क्शास्त्रापुढे डोकं आपटून घेऊ.. की या मूर्खपणावर आय ड्रीम ऑफ जिनी मधली जिनी कशी गडाबळा लोळून हसते.. तशी हसू??????? वेड्यासारखी पहातच राहिले होते मी सगळ्यांकडे... :D मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर म्हणजे घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com