मराठीचे मारेकरी?
आजच्या लोकसत्तामधील 'परीसशब्द' या सदरात श्री. अविनाश बिनीवाले यांचे हे मौलिक विचार
"शास्त्रीयदृष्ट्या रंगांच्या कल्पना एकच असल्या तरी प्रत्येक समाजात तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे नि त्यांच्या इतिहासामुळे रंगांच्या छटा वर्णन करण्याच्या पद्धती वेगळ्या होतात. उदाहरणार्थ हिरव्या रंगाच्या छटा सांगायच्या झाल्या तर मराठी भाषक त्याच्या पर्यावरणानुसार त्या सांगेल. तो (भोंगळपणे) म्हणेल की झाडासारखा हिरवा किंवा चटणीसारखा हिरवा. हिरव्या रंगाबद्दल बोलताना एखादा इंग्लिश माणूस स्वाभाविकपणे त्याच्या भोवतालच्या निसर्गानुसार नि सामाजिक परिस्थिनुसार सांगेल. हिरव्या रंगाच्या वर्णनात एक शब्द तो खूपदा वापरतो तो म्हणजे'बॉटल ग्रीन' नि हा शब्द आपल्याकडच्या कोणत्याच भाषेत नसतो. युरोपियनांच्या जीवनात वाईनच महत्व खूपच असत नि वाईन साठवण्यासाठी हिरव्या रंगाची बाटली उत्तम असल्यामुळे त्याच्या बघण्यात ती रोजच असते. त्यामुळे तो सहजपणे 'बॉटल ग्रीन म्हणतो"
हे वाचून मला पडलेले काही प्रश्नः
- हिरव्या रंगाला झाड वा चटणी हे तुलनारुप वा परिमाण मानणारा मराठी या महाशयांना भोंगळ का वाटावा? आणि युरोपातल्या जीवनात वाईनचे महत्त्व असते व वाईन हिरव्या बाटलीत ठेवतात सबब हिरव्या रंगाला बॉटल ग्रीन म्हणणारा इंग्लिश या महाशयांना महान का वाटावा?
- 'बॉटल ग्रीन' हा शब्द आपल्याकदच्या कोणत्याच भाषेत नसतो हे सांगुन लेखक महाशयांना काय म्हणायचे आहे? हा शब्द नसला तर भाषा मागास व अप्रगत असते असे तर त्यांना म्हणायचे नसावे?
- झाडे व चटणी यांचा रंग नेमका नसतो तर तो अनुक्रमे प्रत्येक झाड व करायची पद्धत याप्रमाणे बदलत असतो व म्हणून ती तुलना भोंगळ असे म्हणायचे असेल तर बाटल्यांमध्ये देखिल हिरव्या रंगाच्या असंख्य छटा असतात. शिवाय वाईन ठेवतात ती हिरवी बाटली असा संदर्भ असेल तर यांचा आदर्श असलेला इंग्लिश 'वाईन बॉटल ग्रीन' का म्हणत नाही?
- एकदा स्वतःच नमूद केले की रंगाचे वर्णन हे परिस्थितीनुसार होते; तर मग मराठी भाषकाला झाड वा चटणी चा संदर्भ दिला म्हणून भोंगळ हे विशेषण का?"
एकुण काय तर मराठीचा पाण उतारा मराठी माणसाने नाही करायचा तर कुणी करायचा? असे सज्जन मराठी असताना ते काम करण्याची वेळ अन्य भाषिकांवर येणारच नाही!
मिपाकरांना या विषयी काय वाटते?
(मिपाकरांनो, मला संपूर्ण सदराचा दुवा देणे शक्य झाले नाही व तसे न करता संपूर्णं लेखन इथे उतरविणे मिपाच्या धोरणाविरुद्ध असल्याने कृपया कुणालादुवा देणे शक्य असल्यास तो द्यावा ही विनंती तसेच दुवा प्रकट होताच हे लेखन काढून टाकावे ही प्रशासकांना विनंती. मात्र मराठीचा अपमान सहन न झाल्याने मी तात्काळ लेख देऊन धोरणाचा भंग केला आहे त्याबद्दल क्षमस्व)
वाचने
6699
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
कोण म्हणतो भोंगळ? असला तर ........
बिनीवाले
In reply to बिनीवाले by आजानुकर्ण
मला आठवणारे वाक्य
अनाहूत चूक घडली असावी!
In reply to अनाहूत चूक घडली असावी! by पिवळा डांबिस
अनाहूत +१
हम्म!
आजानुकर्ण याचा अर्थ काय होतो
आजानुबाहू हे रामाचे वर्णन आहे त्याचा अर्थ गुड्घ्यापर्यंत हात असणारा( जानु=गुडघा/ बाहू= हात)
पण आजानुकर्ण याचा अर्थ काय होतो?
गुडघ्या पर्यंत हात ठीक आहेत्...पण गुडघ्या पर्यंत कान्?(कर्ण)
In reply to आजानुकर्ण याचा अर्थ काय होतो by विजुभाऊ
आजानुकर्ण
In reply to आजानुकर्ण by मुक्तसुनीत
एक प्रश्न
पण मग कुंभकर्णाचे नाव कुंभकर्ण कशावरून पडले होते?
पुण्याचे पेशवे
मला वाटतं..
या ठिकाणी कुठल्याही कर्णाबद्दल चर्चा न केली तर बरं होईल.
फारच विषयांतर होतंय!
असो..
तात्या.
हा हा .....
मराठी भाषा