दर्द में डूबे हुए नग़मे हज़ारों हैं मगर
साज़-ए-दिल टूट गया हो तो सुनाए कैसे |
अनेक शायरांची प्रतिभा अशा डिप्रेशस मूड मधूनच फुलली.गम / उदासी ची पण एक नशा असते त्यांना.हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम असतो. सब्लिमेशन म्हणतात त्याला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही फेजेस या ना त्या प्रकारे कुठल्याना कुठल्या टप्प्यात येतात.
पुर्वी नात्यांच्या ईकोसिस्टीममुळे नैराश्यावर प्राथमिक अवस्थेतच उपचार होउन जात. आता नात्यांची वीण बदलली आहे. आता ही नात्यांची इको सिस्टीम मानसिक आरोग्य क्षेत्रातील सेवा सेक्टर मधे गेली आहे. अर्थात आताच्य सेवा या सेवा नसून तो व्यवसाय असतो. त्याचेही महत्व आहेच
मध्यंतरी अंनिसचे पदाधिकारी व सायकियाट्रिस्ट डॉ प्रदीप जोशी , जळगाव यांचा आत्महत्या या विषयावर व त्या अनुषंगाने फ़ेसबुक लाईव्ह चर्चा संवाद झाला. त्यात एक गोष्ट त्यांनी सांगितली जी इथे आवर्जूने ऎड करावीशी वाटते. जेव्हा तुम्ही एखादा मित्र, सहकारी यांच्या शी संवाद साधण्याचा प्रयत्न करता त्यावेळी तो जर तुम्हाला अपमान करुन झिडकारत असेल तर तो नैराश्यात असतो. त्याला त्याच्याच कोषात रहायचे असते.
मला हा अनुभव काही वर्षांपुर्वी आला होता. दीर्घकाळ फेबुवर वा नेहमीच्या समाजमाध्यमात न दिसल्याने सदिच्छा फोन म्हणून एकाला केला. संभाषणही व्यवस्थितपणे झाले. नंतर मला त्या व्यक्तिचा एसेमेस आला प्लिज डोंट रिंग मी अगेन. ती व्यक्ती सुसंस्कृत आहे व माझी शत्रूही नाही. मी ही गोष्ट समजावून घेउ शकलो पण एखाद्याला हा अपमान वाटू शकतो..
डॊ भरत वाटवानी यांनी पण एका कार्यक्रमात हेच सांगितले होते. संवादामुळे त्याला कोषातून बाहेर पडावे लागते व त्यामधे त्याला असुरक्षिततेची भावना निर्माण होते. म्हणुन तो संवाद करणार्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. मग ते टाळण्यासाठी जर अपमानास्पद वागणूक दिली तर तो पुन्हा आपल्या वाट्याला जाणार नाही असे त्याचे गणित असते. पहा ना कि एखाद्या व्यक्तिचा मूड नसेल तर तो एकट एकट राहण्याचा प्रयत्न करतो. ती त्याची "पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा आहे असे म्हणता येते. लोकही त्याचे खाजगीपण जपण्यासाथी त्या माणसापासून दूर रहाण्याचा मार्ग अनुसरतात. मग ती व्यक्ति माणसांपासून तुटत जाते. कधी कधी नैराश्याच्या गर्तेत अडकते. व्यक्तिकेंद्रित समाजात आता हे वेगाने वाढत आहे.
वाचने
4987
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि त्यामुळे अशी व्यक्ती
खाजगी स्पेस, वैयक्तिक स्पेस
In reply to आणि त्यामुळे अशी व्यक्ती by Bhakti
व्यक्तिकेंद्रित पणा है मूल्य capitalism चे अपत्य आहे.
Capitalism च्या प्रसार
In reply to व्यक्तिकेंद्रित पणा है मूल्य capitalism चे अपत्य आहे. by मारवा
पण त्याच कॅपिटॅलिझम च्या मुळॅ
In reply to व्यक्तिकेंद्रित पणा है मूल्य capitalism चे अपत्य आहे. by मारवा
विशेषतः अनिस च्या वर्तुळातील व्यक्तींचे संघर्ष तीक्ष्ण आहेत.
In reply to पण त्याच कॅपिटॅलिझम च्या मुळॅ by प्रकाश घाटपांडे
रोचक निरिक्षण: अंनिसवाले जास्त नैराश्यग्रस्त
In reply to विशेषतः अनिस च्या वर्तुळातील व्यक्तींचे संघर्ष तीक्ष्ण आहेत. by मारवा
सहमत आहे
In reply to विशेषतः अनिस च्या वर्तुळातील व्यक्तींचे संघर्ष तीक्ष्ण आहेत. by मारवा
मैदानात उतरून मदत करणारी माणसेच विरळा!
मी माझ्या वरील प्रतिसादावर
In reply to मैदानात उतरून मदत करणारी माणसेच विरळा! by युयुत्सु
मी माझ्या वरील प्रतिसादावर
In reply to मैदानात उतरून मदत करणारी माणसेच विरळा! by युयुत्सु
ए०आय० चिरायु होवो!
ए. आय. खरंच चिरायु होवो.... :)
तुम्ही प्रॉम्प्ट काय दिला हे
In reply to ए. आय. खरंच चिरायु होवो.... :) by टर्मीनेटर
तुम्ही प्रॉम्प्ट काय दिला हे
होय!
In reply to तुम्ही प्रॉम्प्ट काय दिला हे by टर्मीनेटर
हे 'ए आय' मराठीत केले की इंग्रजीत ? आणि कुठे ?
'ए आय' हे नेमके कोणते, आणि
In reply to हे 'ए आय' मराठीत केले की इंग्रजीत ? आणि कुठे ? by चित्रगुप्त
'ए आय' हे नेमके कोणते, आणि त्याचा वापर मराठीतून केला की इंग्रजीतून, हे कृपया कळवावे.सर्व प्रथितयश ए० आय० वापरुन हे करता येते. उदा० चॅट्जीपीटी, बार्ड (जेमिनी), डिपसिक, कोपायलट इ० प्रॉम्प्ट द्यायचा असेल तर इंग्रजीतूनच द्यावा अशा मताचा मी आहे. पण मी वरील विश्लेषणासाठी कोणताही प्रॉम्प्ट दिला नव्हता. मराठी मजकूर जसाच्या तसा डकवला आणि मूळ (डीफॉल्ट) प्रतिक्रिया मागवली. बार्ड सोडून सर्व ए०आय० उत्तम मराठीत संभाषण करतात. डिपसिक त्यात सरस आहे. कोपायलट ब-यापैकी संस्कृतमध्येपण मजकूर लिहू शकतो.मला नैराश्यालाबद्दल इथे जी