चूक-२
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं.
पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा. सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मग त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली.
एक दिवस घरात आईसमोर रडत रडत सांगितलं की, “माझ्या मागे लागतोय तो.” माझ्या मनात विश्वास होता की बाबा माझं रक्षण करतील, त्याला थांबवतील. पण बाबांनी मला कॉलेज सोडायला लावलं. मला वाटलं होतं की मी शिक्षण पूर्ण करीन, नोकरीला लागीन, घराची जबाबदारी उचलू शकेन. पण एका अनोळखी मुलाशी लग्न लावून दिलं गेलं.
आता माझं आयुष्य एका झोपडीत बंदिस्त झालंय. नवरा गॅरेजमध्ये काम करतो, पण घरी येऊन दारूच्या नशेत मला मारतो. त्याच्या हातात लोखंडी पाइप असतो; मला वाटतं तो कधीतरी माझा जीव घेईल. मुलीसाठी सगळं सहन करत आहे, पण माझं मन आतून तुटलं आहे. माझ्या स्वप्नांसोबत माझ्या आत्म्याही मेलाय.
रोज तो रस्त्यावरून जातो. त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको माझ्या डोळ्यांसमोर असते. आमचं आयुष्य किती वेगळं आहे, पण माझ्या मनात एकच प्रश्न आहे – माझी काय चूक होती?
मी त्याच्याकडे पाहते, आणि त्याला प्रश्न विचारते, माझं आयुष्य असं का झालं? मी काय चुकीचं केलं होतं? माझ्या या प्रश्नांना कधीच उत्तर मिळणार नाही, आणि मी आयुष्यभर हेच प्रश्न विचारत राहणार.
प्रतिक्रिया
कथा आवडली नाही
हा हा हा!
बाब्बो! छाती, पोट कंबर नी
कथा काल्पनिक आहे असे गृहीत धरत आहे कारण ही जर सत्य कथा असेल तर सदरहु लेखकाने मुलीची छेड काढल्याची सरळ सरळ कबुली दिली आहे असे सिध्द होईल जे की कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे.सर्वप्रथम कथा काल्पनिक आहे. नायकाच्या जागी मी स्वतःला उभे केलेय नायिकेच्या जागी…. असो. खरी जरी असती तरी दखलपात्र गुन्हा कसा? मुलीला कुठून शोधून आणले असते? आणी शोधायला गेला असतात तर तिचा नवरा आणलेला लोखंडी पाईप घेऊन अंगावर धावला असता तर?… ह्यावरून एक किस्सा आठवला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात काही दाढीवाले सांगत होते की आम्ही बांग्लादेशी आहोत. काही लोक व्हिडिओ घेऊन पोलिसात गेले तर पोलिसांनी सांगितले की व्हिडिओ वरून कारवाई करता येणार नाही. लउद्या ते कोर्टात उलटून पडले तर? :) तत्समात कथेवरून स्वर्ग गाठू नका.नुसते मुलीकडे पाहणे , बोलणे ह्याला छेड काढणे म्हणतात का ? आणि समजा त्या मुलीला ते आवडत नसेल तर तिने सदरहु कथेतील लेखकाला तसे स्पष्ट सांगितले होते का ?कदाचित तिने सांगितलेही असेल पण त्याने ऐकले नसेल म्हणून ती बापापर्यंत गेली. छेड नेमकी कोणत्या रीतीने काढली ह्याबाबतीत स्पष्टोक्ती नाही.बोलण्याची मर्यादा ओलांडली म्हणजे काय ? कथेतील नायक अश्लील असे काही बोलायला लागलेला का ? कथीतील नायक दिल्ली हरियाणा येथील आहे काय ?>>> काहीतरी वाईट बोलला असेल. आपल्याला काय? सगळ्याच गोष्टी नायिकेने सांगायलाच हव्या का? आणी आपण कसे ठरवणार हे मर्यादेत आहे की नाही ते? जीला बोलला तीच ठरवेल ना? नायक मराठीच आहे.पोरगी पटवायचा प्रयत्न करणे ह्याला छेड काढणे म्हणता येणार नाही .असे कसे? तिने सांगितले ना पहिले २ वेळा दुर्लक्ष केले. कदाचित तिने पहिल्या दोन वेळा त्याला समजावयचा प्रयत्न केला असेल पण तिसऱ्या वेळी त्याने मर्यादा ओलांडली (ती काहीही असेल. हात धरला असेल, काहीतरी अपशब्द बोलला असेल किंवा काहीही असेल?) त्यामुळे छेड काढली हे ठरवणार नायिकाच!ही दोन्ही वाक्ये इतकी विरोधाभासी आहेत की ह्याला अनाकलनीय निर्बुध्दता ह्या व्यतिरिक्त दुसरा काहीही शब्द सुचत नाही. दारुडा माणुस स्वत्:चे रक्षण करु शकत नाही तो इतरांचे काय काय करणार ?असे काही नाही, अनेक बेवडे बायको मुलाना सुखवस्तू ठेवतात काहीही कमी पडू देत नाहीत. पिऊन तर्र होऊन पडून असले तरी त्यांच्या पिण्यामुळे कुटुंबाची आबाळ होईल किंवा मुलांचे संरक्षण होणार नाही ह्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. नायिकेचा बाप पिऊन तर्र असला तरी आपण त्याची मुलगी असल्याने ह्या बाबतीत तरी तो समजूतदार पणा दाखवेल असे नायिकेला वाटले होते. पण कसले काय? त्या बेवड्याने किटकिट नको म्हणून तिचे लग्न लावून दिले.त्यामुळे मुलीच्या दृष्टिकोनातून पहा. बाप बेवडा आहे पण बाप आहे. आपला बाप पण तो दाखवेल असे तिला वाटले ह्यात तिची काहीही चूक नाही.ह्या एका वाक्यावरुन तुमच्या पिढीचा तुमच्या वयाचा अंदाज येत आहे. तुम्ही साधारण ४०-५० वर्षाचे असावेत आणि तुम्ही कॉलेज हे १९९०-२००० च्या दशकात पाहिले असवे.नाही मी ३१ वर्षांचा आहे. माझे कॉलेज हे २००९ ते २०१४ ह्या काळात होते. छोट्या शहरात (माझे धुळे) पगारपाणी, संधी कमीच असतात. त्यामुळे अनेक कुटुंब गरीब असतात. अश्या कुटुंबात बापाला (तो ही बेवड्या) नि हलाखीच्या परिस्थितीला फाट्यावर मारून जाणार कुठे?आत्मा कधीही मरत नसतोतेच तर! तिचे स्वप्न हा तिचा शरीर चालवणारा आत्मा होता नी स्वप्नांसोबत तिचा आत्माही मेलाय. (कविकल्पना समजा)बायकांना आयुष्यात मेलोड्रामा लागतो. हे निसर्गाचे इंटेलिजंट डिझाईन आहे. त्याला पर्याय नाही. आहे हे असं आहे.ह्याबाबतीत सहमत. कदाचित तिच्या बापाने दुसर काहीतरी खुसपट काढून तिचे लग्न लावले असते?आपल्यामागे कोणीतरी मुलगा दिवाना झालेला आहे हे दिसत असताना त्याचा फायदा करुन घेणे ऐवजी त्याविषयी तक्रार करणे.चूक! तो छेड काढत होता. प्रेमाराधना करत नव्हता. नायिकेने नि नायकाने तेच सांगितले आहे. ( मला कथा लिहितानाची माझी चूक लक्षात आलीय, मागे लागल्याचा अर्थ वेगळा होतो. तो त्रास देतोय असे तिने आईला सांगायला हवे होते. मालक, चालक, संपादक, मेहेरबान, कदरदान, कथेत योग्य तो बदल करून द्यावा अशी विनंती करतो.)भले तिला तो मुलगा आवडालेला नव्हता पण तरीही ती त्याला म्हणु शकली असती की - हे बघ , माझा बाप दारुडा आहे, मला बहीणीची जबाबदारी आहे, आपण लग्न केले तर हे सगळं तुझ्या डोक्यावर पडेल , चालेल का ? हे ऐकुनच तो मुलगा दूर प़ळुन गेला असता.बरोबर. तिने आपली परिस्थिती सांगितली असती तर नायकाने दया येऊन किंवा स्वतची लाज वाटून हे थांबवलं असते.हे असे स्पष्ट बोलली असती तर तिचे आयुष्य खुप वेगळे असते हे मी पैज लाऊन सांगु शकतो.शतश सहमत. बापाला सांगणे हा मूर्खपणा होता हे नायकाने देखील कथेत कबूल केले आहे. तुम्ही कथेची छान चिरफाड केलीय. उदाहरणेही छान दिलीत. नायिकेच्या चुकाही लक्षात आणून दिल्या. ह्यावरून एक कळले की आपल्या आयुष्याला लागलेल्या ग्रहणासाठी आपणच जबाबदार असतो, दुसऱ्याकडे बोट दाखवून काही फायदा नसतो. निर्णय आपल्याला घेता आलेला नसतो. खूप खूप आभार.कथेवरील टीका आवडली.
कथेपेक्षा प्रतिसाद जास्त
कथेची दुसरी बाजू सुद्धा आवड्ली
कथेची दुसरी बाजू सुद्धा आवड्ली
अरेरे... फुले-शाहुंच्या महराष्ट्रात सावित्रीच्या एका लेकीच्या