✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गुरू आतला

र — रोहन जगताप, Sat, 12/14/2024 - 12:47
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला प्रेम पाठी तसे
उरी पोकळी पोरकी राहिलेली भरूनी जिवाला मनी पाविले नदी कोरडी आटली वाहिलेली भिजूनी किनारा तृषा भागिले
नसे पाहिले धैर्यशाली वडील गुरू राखला हात माथी असे नसे जाहले आप्तवाली वडील गुरू जागला साथ जन्मा जसे
मने कोवळी कोंडली घुस्मटून करी मोकळा बंध जे राहिले फुले पाकळी सांडली कुस्करून सुवासास वेचू गुरू वाहिले

प्रतिक्रिया द्या
4095 वाचन

💬 प्रतिसाद (15)

सहमत आहे ...

मुक्त विहारि
Sat, 12/14/2024 - 13:54 नवीन
उत्तम गुरू मिळायला भाग्य लागते. कारण, काही गुरू हे "आपण गुरू आहात.." ह्याच लायकीचे असतात.
  • Log in or register to post comments

आपल्यातील गुरू

रोहन जगताप
Sat, 12/14/2024 - 16:02 नवीन
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

स्व आवाज....

मुक्त विहारि
Sun, 12/15/2024 - 17:29 नवीन
माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहन जगताप

माहितीसाठी आभार

रोहन जगताप
Tue, 12/17/2024 - 10:22 नवीन
माहितीसाठी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मातृतत्त्वाच्या उल्लेखावाचून

रामचंद्र
Sat, 12/14/2024 - 13:55 नवीन
मातृतत्त्वाच्या उल्लेखावाचून काव्य अपूर्ण वाटते...
  • Log in or register to post comments

माय पाठी तसे

रोहन जगताप
Sat, 12/14/2024 - 16:12 नवीन
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

छत्रछाया वडिलांची आणि पाठीशी

रामचंद्र
Sat, 12/14/2024 - 18:23 नवीन
छत्रछाया वडिलांची आणि पाठीशी माया आईची... आता पूर्णत्व लाभले असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहन जगताप

आभारी आहे

रोहन जगताप
Sun, 12/15/2024 - 16:52 नवीन
आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

रामचंद्र भौं शी सहमत.

कर्नलतपस्वी
Sat, 12/14/2024 - 16:41 नवीन
त्यावर कवीचे स्पष्टीकरण कवितेचा आयाम बदलून पूर्णत्वास नेते. कविता आवडली.
  • Log in or register to post comments

नेमकं सांगितलंत.

रामचंद्र
Sat, 12/14/2024 - 18:24 नवीन
नेमकं सांगितलंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

मनःपूर्वक आभार

रोहन जगताप
Sun, 12/15/2024 - 16:52 नवीन
मनःपूर्वक आभारी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

सुंदर रचना ! गुरुचे महत्व

चौथा कोनाडा
Tue, 12/24/2024 - 22:25 नवीन
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार!

रोहन जगताप
गुरुवार, 12/26/2024 - 10:12 नवीन
मनःपूर्वक आभार! मानवी जीवनास जसा गुरूचाच आधारस्तंभ असतो इतके त्याचे महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

गुरुमहात्म्य सांगणारे मुक्तक

वामन देशमुख
गुरुवार, 12/26/2024 - 10:45 नवीन
गुरुमहात्म्य सांगणारे मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments

आभारी आहे

रोहन जगताप
Sun, 12/29/2024 - 13:01 नवीन
मनःपूर्वक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा