अघमर्षण :
संध्येमधील एक महत्वाचा विधी. अघमर्षण म्हणजे पापाचा नाश करणे , त्याग करणे !
पण मुळात पाप म्हणजे काय ?
पाप, शिक्षा आणि प्रायश्चित्त म्हणजे नक्की काय ?
शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप.
त्या पापाची शिक्षा म्हणजेच द्वैत.
शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच.
त्या पापाची शिक्षा म्हणजे असं "वाटणं".
अरे पण मग ह्याचे प्रायश्चित्त काय ? कसा त्याग करायचा ह्या पापांचा ?
तर मनाच्या, बुध्दीच्या , विचारांच्या पापाला विचार हेच प्रायश्चित्त .
म्हणून आता अघमर्षण.
https://www.youtube.com/watch?v=aa2LM2tLnlk
झाला विचार . कृती संपल्याचे प्रतीक म्हणून त्याला शारीरिक विधीची जोड, बस, त्या शारिरिक विधीला विशेष अधिक असा काही आधार नाही.
उजव्या हातात पाणी घ्या , ऋतं च सत्यं ... म्हणा , ओंजळीतील पाण्यावर उछ्वास टाकून ते डाव्याबाजूला टाकून द्या.
झालं अघमर्षण।
आता पापं संपली.
आता तुला द्वैताचे पापं नाही
आणि
अद्वैत आहे हे असं "वाटण्याचे" ही पाप नाही.
सोहमपापो विरजो निर्मुक्तो मुक्तकिल्विषः |तो अपाप अर्थात पापासुन अलिप्त , विरजो अर्थात कसलाच कलंक नसलेला , मुक्त किल्बिश अर्थात आधीच्या किल्बिश अर्थात पापांपसुन मुक्त झालेला असा तो मी आहे ! आता विष्णू, लीला नाही आणि विष्णू ही नाही. शिव, शक्ती नाही आणि शिव ही नाही. द्वैत नाही आणि अद्वैतही नाही. आता बस " मी आहे" !
ऋतं च सत्यं चाभीद्धात्तपसोऽध्यजायत ।ततो रात्रिरजायत ततः समुद्रो अर्णवः ॥ ६३॥ समुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत ।अहोरात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वशी ॥ ६४॥ सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् ।दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो सुवः ॥ ६५॥रात्री , दिवस, समुद्र, काल, आकाश, चंद्र, पृथ्वी, आणि सूर्यही हेही निर्माण व्हायच्या आधी जो होता , तो हिरण्यगर्भ, तो सवितृ, तो भर्ग, "तो" तोच मी आहे. पण मग तो तर अपरिवर्तनीय, सर्वव्यापी, आहे. हे जे जे काही म्हणून दिसतंय ते सारेच तो आहे.
सर्वं खल्विदं ब्रह्म।हा प्रत्यक्ष डोळ्याला दिसतोय तो सूर्यच ब्रह्म आहे !
वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ अमृतानुभव 6.3.अव्यक्त परब्रह्माच्या रुपाची अनुभुती करवुन देणारा जो हा सूर्य आहे , तोच मी आहे !
असावादित्यो ब्रह्म । ब्रह्मैवाहं अस्मि ।।.
आर्द्रं ज्वलति ज्योतिरहमस्मि । ज्योतिर्ज्वलति ब्रह्माहमस्मि ॥ योहमस्मि ब्रह्माहमस्मि । अहमस्मि ब्रह्माहमस्मि ॥ अहमेवाहं मां जुहोमि स्वाहा ॥पाण्याचा पाणीपणा ज्या मुळे लक्षात येतो, ती ज्योति अर्थात ज्ञान मी आहे. ज्या ज्योति अर्थात ज्ञानाचे ज्याच्यामुळे ज्ञान होते ते ब्रह्म मी आहे. हा जो मी आहे , तोच ब्रह्म , मी आहे. मी आहे तोच हा ब्रह्म आहे ! आता ह्याव्यतिरिक्तही अजुन दुसरे काहीतरी मी आहे अशी शंका , असा अध्यास असेल तर त्या अध्यासासकट तसे वाटणाराही तो , त्याला मी माझ्या ब्रह्मस्वरुपात स्वाहा करतो , अर्पण करतो.
पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजः । यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥ १६॥यश्चकिंचित जगताचे सृष्टीचे पोषण करणार्या, ती सृष्टी पाहणार्या , त्या सृष्टीला सूर्यारुपाने प्रकाशित करणार्या , नियमीत करणार्या , रश्मी अर्थात प्रकाशकिरणांचा तेजाचा समुह असणार्या परमपुरुषा , तुझे हे कल्याणतम रूप मी पहात आहे ! हा जो तू पुरुष आहेस , तो च मी आहे !
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥__________________________ संदर्भ : सार्थ यजुर्वेदीय त्रिकालसंध्या विधी : संपादक श्री. विनायक प्रभाकर चंद्रात्रे ,वेद प्रकाशन, नाशिक अघमर्षण सूक्त : https://vignanam.org/hindi/aghamarshana-suktam.html अघमर्षण सूक्त व्हिडीओ : https://www.youtube.com/watch?v=aa2LM2tLnlk महानारायणोपनिषद : https://sanskritdocuments.org/doc_upanishhat/mahanarayana.html इशोपनिषद : https://sanskritdocuments.org/doc_upanishhat/iisha.html आणि मी. || श्री कृष्णार्पणमस्तु ||
वाचने
9795
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
साष्टांग दंडवत.
धन्यवाद चित्रगुप्त काका.
In reply to साष्टांग दंडवत. by चित्रगुप्त
@ प्रगो, मुळात 'पाप' म्हणजे (नेमके) काय ?
In reply to धन्यवाद चित्रगुप्त काका. by प्रसाद गोडबोले
तुमच्या मते पाप कशा - कशाला
In reply to @ प्रगो, मुळात 'पाप' म्हणजे (नेमके) काय ? by चित्रगुप्त
अध्यात्म वैगेरे फारसे समजत
In reply to तुमच्या मते पाप कशा - कशाला by प्रसाद गोडबोले
+१
In reply to अध्यात्म वैगेरे फारसे समजत by कॉमी
प्राडॉ ..... पण फूल टू करमणूक
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकमान्यांचे गीतारहस्य वाचन करा
In reply to धन्यवाद चित्रगुप्त काका. by प्रसाद गोडबोले
अहंकार
In reply to लोकमान्यांचे गीतारहस्य वाचन करा by मुक्त विहारि
ओके....
In reply to अहंकार by प्रसाद गोडबोले
सखोल अभ्यास
In reply to ओके.... by मुक्त विहारि
वाचले...
आर्द्रं ज्वलति ज्योतिरहमस्मि
तर्कसुसंगती
In reply to आर्द्रं ज्वलति ज्योतिरहमस्मि by प्रचेतस
प्रगो सर, काही तात्विक चर्चा-
In reply to तर्कसुसंगती by प्रसाद गोडबोले
किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे.
In reply to प्रगो सर, काही तात्विक चर्चा- by प्रचेतस
=))
चला लागा कामाला...! =))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला, म्हणजे मला त्याग वगैरेंची गरज नाही. हुश्श्य.
In reply to चला लागा कामाला...! =)) by प्रसाद गोडबोले
भानगडीत पडण्याचे कारण नाही.
In reply to चला, म्हणजे मला त्याग वगैरेंची गरज नाही. हुश्श्य. by चित्रगुप्त
@ प्रगो: अजय-अतुलचे आणि ब्रशचे उदाहरण
In reply to भानगडीत पडण्याचे कारण नाही. by प्रसाद गोडबोले
हम्म...
In reply to @ प्रगो: अजय-अतुलचे आणि ब्रशचे उदाहरण by चित्रगुप्त
=))
In reply to चला लागा कामाला...! =)) by प्रसाद गोडबोले
पाप पुण्य कर्म अकर्म ह्या
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धक्का वगैरे काही बसवून
In reply to पाप पुण्य कर्म अकर्म ह्या by प्रसाद गोडबोले
संध्या विधि आणि त्यातील हा
In reply to चला लागा कामाला...! =)) by प्रसाद गोडबोले
गैरसमज
In reply to संध्या विधि आणि त्यातील हा by टर्मीनेटर
तुम्हाला तुमचा वर्ण कोणता हे ठरवायची मुभा आहे !
In reply to गैरसमज by प्रसाद गोडबोले
हे कितीही आदर्शवादी वाटत असलं
In reply to तुम्हाला तुमचा वर्ण कोणता हे ठरवायची मुभा आहे ! by मुक्त विहारि
आज शंकराचार्य आणि त्यांचे लोक
In reply to हे कितीही आदर्शवादी वाटत असलं by प्रचेतस
असे लोक धर्माचे रक्षक नाहीत
In reply to आज शंकराचार्य आणि त्यांचे लोक by कॉमी
अरे वा !
In reply to हे कितीही आदर्शवादी वाटत असलं by प्रचेतस
कर्मधर्मसंयोगाने
In reply to अरे वा ! by प्रसाद गोडबोले
- कौशिक एक प्राचीन भारतीय गोत्र है.
- कौशिक गोत्र के लोगों को कौशिके भी कहा जाता है.
- कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि वे काफ़ी गुस्से वाले होते हैं.
- कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि वे नेपाल में हिमालय से निकलने वाली कोसी नदी के किनारे रहते थे.
- विश्वामित्र को इसी नदी के किनारे तपस्या करते हुए ऋषि का दर्जा मिला था.
- कौशिक एक भारतीय उपनाम भी है जो बरनवाल का एक गोत्र है.
जनरेटिव एआई की सुविधा फ़िलहाल एक्सपेरिमेंट के तौर पर उपलब्ध है. 😀सेम हियर....
In reply to कर्मधर्मसंयोगाने by टर्मीनेटर
आमचे गोत्र अत्री त्यामुळे
In reply to सेम हियर.... by मुक्त विहारि
Yes....
In reply to आमचे गोत्र अत्री त्यामुळे by प्रचेतस
हा हा हा... असुही शकेल तसे
In reply to सेम हियर.... by मुक्त विहारि
- कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि उनके आपस में ढेर सारे वैचारिक मतभेद होते हैं
असेही एक वाक्य असायला हवे होते असंही वाटायला लागलंय, कारण आपल्यातही अनेक बाबतीत पराकोटीची मतभिन्नता आहे आणि प्रगो त्यांच्या लेखनातुन/प्रतिसादांतुन जे विचार मांडत असतात त्यातल्या कित्येक विचारांच्या अगदी विरुद्ध टोकाचे माझे विचार असतात! गंमतच आहे सगळी 😂 😂 😂मतभेद असणे ही गोष्ट वेगळी...
In reply to हा हा हा... असुही शकेल तसे by टर्मीनेटर
मतभेद असणे ही गोष्ट वेगळी...
In reply to मतभेद असणे ही गोष्ट वेगळी... by मुक्त विहारि
सहमत आहे ...
In reply to मतभेद असणे ही गोष्ट वेगळी... by टर्मीनेटर
कितीही आदर्शवादी वाटत असलं तरी वास्तवात तसं नसतं.
In reply to हे कितीही आदर्शवादी वाटत असलं by प्रचेतस
ज्यांना गणितातील सेट थिअरी.
गणितातील सेट थिअरी
In reply to ज्यांना गणितातील सेट थिअरी. by कंजूस
'मी' नावाचा एक गोल दुसऱ्या
In reply to गणितातील सेट थिअरी by प्रसाद गोडबोले
चैतन्याला पाप पुण्याचा भोग
यासाठी अजून उदाहरणे द्याल का
In reply to चैतन्याला पाप पुण्याचा भोग by Bhakti
गाढ झोप (स्वप्नावस्था) आणि
In reply to यासाठी अजून उदाहरणे द्याल का by प्रसाद गोडबोले
वाह भक्ती ताई !
In reply to गाढ झोप (स्वप्नावस्था) आणि by Bhakti
हे ऐका
In reply to गाढ झोप (स्वप्नावस्था) आणि by Bhakti
अहाहा! खूपच सुंदर!
In reply to हे ऐका by प्रसाद गोडबोले
एकदा वाचून झालंय; विशेषतः
झकास लेख!!
अवतार मेहेर बाबा
In reply to झकास लेख!! by राजेंद्र मेहेंदळे
हे नगरचे अवतार मेहेरबाबा!
In reply to झकास लेख!! by राजेंद्र मेहेंदळे
@राजेंद्र, प्रांजळ,प्रामाणिक प्रतिसाद आवडला.
In reply to झकास लेख!! by राजेंद्र मेहेंदळे
आपला इतरांशी संपर्क करण्याची
In reply to @राजेंद्र, प्रांजळ,प्रामाणिक प्रतिसाद आवडला. by कर्नलतपस्वी
करेक्ट करूणा (जो जसा आहे,जे
In reply to आपला इतरांशी संपर्क करण्याची by कंजूस
ह्या विषयी शांतिपर्वातील जनक
In reply to करेक्ट करूणा (जो जसा आहे,जे by Bhakti
यावर एखादा लेख पाडावा फावल्या
In reply to ह्या विषयी शांतिपर्वातील जनक by प्रचेतस