✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अघमर्षण

प
प्रसाद गोडबोले यांनी
गुरुवार, 12/19/2024 - 18:51  ·  लेख
लेख
अघमर्षण : संध्येमधील एक महत्वाचा विधी. अघमर्षण म्हणजे पापाचा नाश करणे , त्याग करणे ! पण मुळात पाप म्हणजे काय ? पाप, शिक्षा आणि प्रायश्चित्त म्हणजे नक्की काय ? शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप. त्या पापाची शिक्षा म्हणजेच द्वैत. शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच. त्या पापाची शिक्षा म्हणजे असं "वाटणं". अरे पण मग ह्याचे प्रायश्चित्त काय ? कसा त्याग करायचा ह्या पापांचा ? तर मनाच्या, बुध्दीच्या , विचारांच्या पापाला विचार हेच प्रायश्चित्त . म्हणून आता अघमर्षण. https://www.youtube.com/watch?v=aa2LM2tLnlk झाला विचार . कृती संपल्याचे प्रतीक म्हणून त्याला शारीरिक विधीची जोड, बस, त्या शारिरिक विधीला विशेष अधिक असा काही आधार नाही. उजव्या हातात पाणी घ्या , ऋतं च सत्यं ... म्हणा , ओंजळीतील पाण्यावर उछ्वास टाकून ते डाव्याबाजूला टाकून द्या. झालं अघमर्षण। आता पापं संपली. आता तुला द्वैताचे पापं नाही आणि अद्वैत आहे हे असं "वाटण्याचे" ही पाप नाही.
सोहमपापो विरजो निर्मुक्तो मुक्तकिल्विषः |
तो अपाप अर्थात पापासुन अलिप्त , विरजो अर्थात कसलाच कलंक नसलेला , मुक्त किल्बिश अर्थात आधीच्या किल्बिश अर्थात पापांपसुन मुक्त झालेला असा तो मी आहे ! आता विष्णू, लीला नाही आणि विष्णू ही नाही. शिव, शक्ती नाही आणि शिव ही नाही. द्वैत नाही आणि अद्वैतही नाही. आता बस " मी आहे" !
ऋतं च सत्यं चाभीद्धात्तपसोऽध्यजायत ।ततो रात्रिरजायत ततः समुद्रो अर्णवः ॥ ६३॥ समुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत ।अहोरात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वशी ॥ ६४॥ सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् ।दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो सुवः ॥ ६५॥
रात्री , दिवस, समुद्र, काल, आकाश, चंद्र, पृथ्वी, आणि सूर्यही हेही निर्माण व्हायच्या आधी जो होता , तो हिरण्यगर्भ, तो सवितृ, तो भर्ग, "तो" तोच मी आहे. पण मग तो तर अपरिवर्तनीय, सर्वव्यापी, आहे. हे जे जे काही म्हणून दिसतंय ते सारेच तो आहे.
सर्वं खल्विदं ब्रह्म।
हा प्रत्यक्ष डोळ्याला दिसतोय तो सूर्यच ब्रह्म आहे !
वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ अमृतानुभव 6.3.
अव्यक्त परब्रह्माच्या रुपाची अनुभुती करवुन देणारा जो हा सूर्य आहे , तोच मी आहे !
असावादित्यो ब्रह्म । ब्रह्मैवाहं अस्मि ।।
.
आर्द्रं ज्वलति ज्योतिरहमस्मि । ज्योतिर्ज्वलति ब्रह्माहमस्मि ॥ योहमस्मि ब्रह्माहमस्मि । अहमस्मि ब्रह्माहमस्मि ॥ अहमेवाहं मां जुहोमि स्वाहा ॥
पाण्याचा पाणीपणा ज्या मुळे लक्षात येतो, ती ज्योति अर्थात ज्ञान मी आहे. ज्या ज्योति अर्थात ज्ञानाचे ज्याच्यामुळे ज्ञान होते ते ब्रह्म मी आहे. हा जो मी आहे , तोच ब्रह्म , मी आहे. मी आहे तोच हा ब्रह्म आहे ! आता ह्याव्यतिरिक्तही अजुन दुसरे काहीतरी मी आहे अशी शंका , असा अध्यास असेल तर त्या अध्यासासकट तसे वाटणाराही तो , त्याला मी माझ्या ब्रह्मस्वरुपात स्वाहा करतो , अर्पण करतो.
पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजः । यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥ १६॥
यश्चकिंचित जगताचे सृष्टीचे पोषण करणार्‍या, ती सृष्टी पाहणार्‍या , त्या सृष्टीला सूर्यारुपाने प्रकाशित करणार्‍या , नियमीत करणार्‍या , रश्मी अर्थात प्रकाशकिरणांचा तेजाचा समुह असणार्‍या परमपुरुषा , तुझे हे कल्याणतम रूप मी पहात आहे ! हा जो तू पुरुष आहेस , तो च मी आहे !
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
__________________________ संदर्भ : सार्थ यजुर्वेदीय त्रिकालसंध्या विधी : संपादक श्री. विनायक प्रभाकर चंद्रात्रे ,वेद प्रकाशन, नाशिक अघमर्षण सूक्त : https://vignanam.org/hindi/aghamarshana-suktam.html अघमर्षण सूक्त व्हिडीओ : https://www.youtube.com/watch?v=aa2LM2tLnlk महानारायणोपनिषद : https://sanskritdocuments.org/doc_upanishhat/mahanarayana.html इशोपनिषद : https://sanskritdocuments.org/doc_upanishhat/iisha.html आणि मी. || श्री कृष्णार्पणमस्तु ||
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
9637 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

एकदा वाचून झालंय; विशेषतः

वामन देशमुख
Fri, 12/20/2024 - 22:04 नवीन
एकदा वाचून झालंय; विशेषतः प्रतिसादांच्यासोबत समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. द्विजाची कल्पना प्रतिसादातून कळली आणि पटली.
  • Log in or register to post comments

झकास लेख!!

राजेंद्र मेहेंदळे
Sat, 12/21/2024 - 00:36 नवीन
२-३ वेळा वाचला--पण झेपत नाहीये. असो. आपल्याला सगळे समजलेच पाहीजे असा आग्रह नाही. ते रमण महर्षी आणि नीमकरोली बाबा यांच्यामधे कोण आहेत हो गालातल्या गालात हसणारे?
  • Log in or register to post comments

अवतार मेहेर बाबा

प्रसाद गोडबोले
Sat, 12/21/2024 - 01:11 नवीन
अवतार मेहेर बाबा https://en.wikipedia.org/wiki/Meher_Baba
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

हे नगरचे अवतार मेहेरबाबा!

Bhakti
Sat, 12/21/2024 - 07:14 नवीन
हे नगरचे अवतार मेहेरबाबा! नक्की भेट द्या ,इतके शांत स्थळी आहे.यावरचा आधीचा लेख https://www.misalpav.com/node/49208 फोटो गेले आहेत.विकिपिडिया सर्च करा फोटोसाठी मेहेराबाद,अहिल्या नगर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

@राजेंद्र, प्रांजळ,प्रामाणिक प्रतिसाद आवडला.

कर्नलतपस्वी
Sat, 12/21/2024 - 07:29 नवीन
+१ मातुल घराण्यात दत्तसंप्रदायाच्या अधिकारी,अनुग्रहित व्यक्ती होऊन गेल्यात. माझी पणजी,पणजोबा आणी आजोबा मामा देशपांडे. प्रेम मिळाले पण ज्ञान नाही. मी चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या साधू सारखा. साधू तपस्या करत असताना त्यांना देव भेटला. महाराजांनी विचारले ,देवा मोक्ष कधी मिळणार?देव म्हणाला, या झाडावर जीतकी पाने आहेत तितक्या वर्षानंतर. सध्या पाने मोजत आहे. लिहीत रहा वाचत राहू. जेव्हां उजाडेल तेव्हां उजाडेल. काही घाई नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

आपला इतरांशी संपर्क करण्याची

कंजूस
Sat, 12/21/2024 - 12:56 नवीन
आपला इतरांशी संपर्क करण्याची कुवत नष्ट होते तोच मोक्ष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

करेक्ट करूणा (जो जसा आहे,जे

Bhakti
Sat, 12/21/2024 - 13:02 नवीन
करेक्ट करूणा (जो जसा आहे,जे जसं आहे तस स्वीकारणं) आणि अलिप्तता हा मोक्षाचा मार्ग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ह्या विषयी शांतिपर्वातील जनक

प्रचेतस
Sat, 12/21/2024 - 13:25 नवीन
ह्या विषयी शांतिपर्वातील जनक-पंचशिख संवाद व तद्नुषंगाने होणारे बौद्धमताचे खंडन मुळातून वाचणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

यावर एखादा लेख पाडावा फावल्या

कंजूस
Sat, 12/21/2024 - 19:13 नवीन
यावर एखादा लेख पाडावा फावल्या वेळात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा