महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीवर हा माझा शेवटचा लेख. विविध पक्षांची आजपर्यंतची कामगिरी, २०२४ लोकसभा निवडणुकीतील विविध पक्षांची कामगिरी, महाराष्ट्रातील मतदारांचा नेहमी दिसणारा कल यावर आधारीत काही आकडेमोड करून कोणत्या पक्षाला किती मते मिळण्याची शक्यता आहे व त्यानुसार किती जागा जिंकण्याची शक्यता आहे याचे अंदाज लिहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मागील काही वर्षात निर्माण झालेली खिचडी व गुंतागुंत पाहता जागांचा अंदाज व्यक्त करणे खूप धाडसाचे आहे. मतांच्या टक्केवारीचे अंदाज बर्याच अंशी बरोबर येऊ शकतील, परंतु जागांचा अंदाज बर्याच प्रमाणात चुकू शकतो. तसे झाल्यास माझ्या प्रारूपाकडे नव्याने पहावे लागेल.
मत टक्केवारी
लोकसभा निवडणुकीत ६१.२९% मतदारांनी मत दिले होते. या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी यापेक्षा कमी असेल असे वाटते. कदाचित ६०% किंवा ५८% पेक्षाही कमी असल्यास नवल वाटणार नाही.
एप्रिल-मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतांची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.
महाराष्ट्रातील एकूण दिलेली मते - ५ कोटी ७० लाख (मत टक्केवारी ६१.२९%)
काँग्रेस - १७.९२% (लढविलेल्या जागा - १७ + १ = १८ सांगली धरून)
उबाठा - १६.५२% (लढविलेल्या जागा - २१)
शप गट - १०,२७% (लढविलेल्या जागा - १०)
भाजप - २६.१८% (लढविलेल्या जागा - २८)
शिंदे गट - १२.९५% (लढविलेल्या जागा - १५)
अप गट - ४.४२% (लढविलेल्या जागा - ४ + १ = ५ जानकर धरून)
मविआ आघाडीत सर्वाधिक जागा उबाठाने लढविल्या होत्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते उबाठाला मिळाली आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने लढविल्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते शिंदे गटाला मिळाली आहेत.
लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकार व पंतप्रधान निवडायचा असल्याने महाराष्ट्रात स्थानिक भाजप नेतृत्वाविरूद्ध काहिशी नाराजी असूनही महायुती व विशेषतः भाजपला काही प्रमाणात लाभ झाला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे असतात. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकार निवडायचे आहे. त्यामुळे मोदींच्या चेहर्याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही. महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर साधारणपणे दोन्ही निवडणुका एक वर्षापेक्षा कमी कालावधीत पुढेमागे होतात. आधी लोकसभा निवडणूक होते व नंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होते (मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक व जवळपास १ वर्षानंतर १९७८ मध्ये विधानसभा निवडणू़क झाली होती. मार्च १९९५ मध्ये विधानसभा निवडणूक व मे १९९६ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. सप्टेंबर १९९९ मध्ये दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या होत्या.). २००४ पासून मे महिन्यात लोकसभा निवडणूक व ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक होते.
१९८०: लोकसभा - विरोधी पक्ष ९ आणि काँग्रेस ३९, विधानसभा - विरोधी पक्ष ८०, कॉंग्रेस १९२
१९८५: लोकसभा - विरोधी पक्ष ५ आणि काँग्रेस ४३, विधानसभा - विरोधी पक्ष १०४, कॉंग्रेस १६२
१९९०: लोकसभा - महायुती १४, जनता दल ५ आणि काँग्रेस २८, विधानसभा - महायुती ९४, जनता दल २५, कॉंग्रेस १४१
१९९५: विधानसभा - महायुती १३८ आणि काँग्रेस ८०, १९९६ लोकसभा - महायुती ३३, कॉंग्रेस १५
१९९९: लोकसभा - महायुती २७ आणि काँग्रेस २१, विधानसभा - महायुती १२५, कॉंग्रेस १३३
२००४: लोकसभा - महायुती २५ आणि काँग्रेस आघाडी २३, विधानसभा - महायुती ११६, कॉंग्रेस आघाडी १४०
२००९: लोकसभा - महायुती २० आणि काँग्रेस आघाडी २५, विधानसभा - महायुती ९०, कॉंग्रेस आघाडी १४४
२०१४: लोकसभा - महायुती ४२ आणि काँग्रेस आघाडी ६, विधानसभा - महायुती १८६, कॉंग्रेस आघाडी ८३
२०१९: लोकसभा - महायुती ४१ आणि काँग्रेस आघाडी ५, विधानसभा - महायुती १६१, कॉंग्रेस आघाडी ९८
साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्याच प्रमाणात तसाच राहतो.
_________________________________________________________________________
या पार्श्वभूमीवर २०२४ विधानसभा निवडणुकीत साधारणपणे खालीलप्रमाणे परिस्थिती असू शकते.
काँग्रेस
काँग्रेस १०१ जागा लढवित आहे. काँग्रेस अंदाजे १८% मते व ६०-७० जागा मिळवेल.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८७ जागा लढवून अंदाजे १५% मते व ५०-६० जागा मिळवेल.
ऊबाठा गट
शिवसेना १९८९ पासून (२०१४ चा अपवाद वगळता) विधानसभा निवडणूक युतीत लढत आहे. परंतु शिवसेनने जिंकलेल्या एकूण जागांचे लढवित असलेल्या एकूण जागांशी प्रमाण (म्हणजे स्ट्राईक रेट) खूप कमी आहे.
१९९० - लढविलेल्या एकूण जागा १८३, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २८.४१
१९९५ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ७३, विजयाचे प्रमाण = ४२.६९
१९९९ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ६९, विजयाचे प्रमाण = ४०.३५
२००४ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ६२, विजयाचे प्रमाण = ३६.६८
२००९ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २६.०३
२०१४ - लढविलेल्या एकूण जागा २८६, जिंकलेल्या जागा ६३, विजयाचे प्रमाण = २२.०२
२०१९ - लढविलेल्या एकूण जागा १२४, जिंकलेल्या जागा ५६, विजयाचे प्रमाण = ४५.१६
शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राईक रेट २०१९ मघ्ये ४५.१६ होता जेव्हा शिवसेना युतीत निवडणू़क लढली होती व सर्वात कमी स्ट्राईक रेट २०१४ मध्ये २२.०२ होता जेव्हा शिवसेना स्वबळावर लढली होती.
आता शिवसेनेचे तुकडे पडले आहेत. २००९ मध्ये राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा स्ट्राईक रेट फक्त २६.०३ होता. उबाठा सेना पुन्हा एकदा युतीत आहे व फक्त ९६ जागांवर लढत आहे. अश्या परिस्थितीत उबाठा सेनेला ४० पेक्षा जास्त जागा मिळणे अवघड वाटते. प्रत्यक्षात शिंदे सेनाला मूळ सेनेची जाणार असलेली मते लक्षात घेतली तर उबाठा सेना अंदाजे १२% मते घेऊन २०-३० जागा मिळवेल.
म्हणजे मविआ एकत्रित ४५% मते व १३०--१६० जागा मिळवेल.
____________________________________________________________________
भाजप
भाजपने २०१४ मध्ये स्वबळावर २५२ जागा लढवून २८.५०% मते मिळवून १२२ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेशी युती करून भाजपने १६४ ( भाजप १४६ + मित्रपक्ष १८ कमळ चिन्हावर) जागा लढवून २५.७५% मते मिळवून १०३ जागा जिंकल्या आणि सत्ता गमावली. २०२४ मध्ये भाजप १४८ जागांवर लढत आहे. आता मोदींचा चेहरा नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही हिंदुत्व हा मुद्दा अजिबात नाही (लव जिहाद, बटेंगे तो कटंगे, बांगलादेशातील हिंदूंना मारपीट, अयोध्येतील श्रीराम मंदीर अश्या मुद्द्यांचा मतदारांवर शून्य प्रभाव पडेल). इतर सर्व पक्षांप्रमाणे भाजपचा प्रचारही दिशाहीन व निष्प्रभ आहे.
भाजपला साधारणपणे २२-२३% मते मिळतील व ५०--६० च्या आसपास जागा मिळतील.
शिंदे गट
शिंदे गट ८५ जागा लढवित आहे. शिंदेंची प्रतिमा बरीच उजळली आहे. परंतु शिंदेंनी सुद्धा बरेच चिकीचे उमेदवार दिले आहेत. नेत्याची मान्यता पक्षाच्या मान्यतेपेक्षा कायमच जास्त असते. मोदींची लोकप्रियता बहुतेक वेळा ६०% किंवा अधिक असते, परंतु भाजप किंवा रालोआला ४४% हून जास्त मते मिळाली नाही.
शिंदे गटाला साधारणपणे १२% मते व २०-२५ जागा मिळतील.
अजित पवार गट
अप गट ५१ जागा लढवून साधारणपणे ७% मते व १०-१५ जागा मिळवेल.
म्हणजे महायुती एकत्रित ४१-४२% मते व ८०-१०० जागा मिळवेल.
===================================================
बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी मतदानपूर्व सर्वेक्षण करणे टाळले आहे कारण सद्यस्थितीत प्रचंड खिचडी झालेल्या राजकीय वातावरणात कोण किती जागा जिंकेल याचा अंदाज काढणे खूपच अवघड आहे आणि दुसरं कारण म्हणजे हरयाना निवडणुकीचे सर्व वाहिन्यांचे सर्व अंदाज पूर्ण चुकले होते. तरीसुद्धा अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. मी अंदाज व्यक्त केलेली मतांची टक्केवारी बरोबर असण्याची बरीच शक्यता वाटतेय, पण जागांचा अंदाज बर्यापैकी चुकू शकतो.
____________________________________________________________________________________
मनसे १५० जागा लढवित आहे. मनसे २-३% टक्के मते व ३-४ जागा जिंकू शकते.
________________________________________________________________
इतर काही अंदाज -
- मनसे, शेकाप, सप, एमआयएम, वंचित, बच्चू कडूचा पक्ष, जनसुराज्य असे चिल्लर पक्ष एकत्रित १५-२० जागा व अपक्ष १५-२० जागा जिंकतील.
- सर्व पक्षांमधील सर्वात मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल.
- कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल भाजप किंवा शप गट, त्याखालोखाल शिंदे गट, नंतर उबाठा आणि शेवटी सहाव्या क्रमांकावर अप गट असेल.
- कोणत्याही एका पक्षाला तीन अंकी जागा मिळणार नाहीत. कोणत्याही २ पक्षांना एकत्रित १४५ जागा मिळणार नाहीत. सरकार बनविण्यासाठी ३ किंवा अधिक पक्षांना एकत्र यावे लागेल, यातून एखादी नवीन खिचडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
- मविआ सत्तेवर आल्यास वर्षा गायकवाड किंवा प्रणिती शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता किंवा कदाचित यशोमती ठाकूर असतील.
- महायुती सत्तेवर आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार
- उद्धव ठाकरे व फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही
- महायुती सत्तेत न आल्यास महाराष्ट्र भाजपत नेतृत्वबदल होण्याची दाट शक्यता. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन सत्तेत न येणे हे महाराष्ट्र भाजपसाठी व महाराष्ट्रासाठी इष्टापत्ती ठरेल.
- मविआ सत्तेवर येण्याची शक्यता
- कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालापश्चात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिंदे गट ही नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यता. अश्या परिस्थितीत उबाठा पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेण्याची शक्यता.
- विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार काकांकडे परत जाण्याची शक्यता
- जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार राखीव जागा वाढविते, ते सरकार नंतर लगेचच्या निवडणुकीत सत्तेत परतत नाही हे १९९१ पासून अनेकदा दिसले आहे.
* १९९० - वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या अहवालानुसार २७% राखीव जागा इतर मागासवर्गीयांना दिल्या पण १९९१ लोकसभा निवडणूक हरले.
* १९९३ - जयललिताने तामिळ्लनाडूत राखीव जागांचे प्रमाण ६९% पर्यंत वाढविले, पण १९९६ विधानसभा निवडणूक हरली.
* १९९३ - शरद पवारांनी अनेक नवीण जातींचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश केला, पण १९९५ विधानसभा निवडणूक हरले.
* २००३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी चक्क ब्राह्मणांना राखीव जागा दिल्या, पण २००३ विधानसभा निवडणूक हरले.
* २००८ - राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरां राजेंनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २००८ विधानसभा निवडणूक हरल्या.
* २०१३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २०१३ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१३ - मनमोहन सिंगांनी जाटांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये केला, पण २०१४ लोकसभा निवडणूक हरले.
*२०१४ - पृथ्वीराज चव्हाणांनी मराठ्यांना १६% व मुस्लिमांना ५% राखीव जागा दिल्या, पण २०१४ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१९ -- फडणवीसांनी मराठ्यांना १६% राखीव जागा दिल्या, पण २०१९ विधानसभा निवडणूकीत सत्तेत परतले नाहीत.
आता २०२४ मध्ये शिंदेंनी मराठ्यांना १०% राखीव जागा दिल्या आहेत. वरील कलानुसार विधानसभा निवडणूकीनंतर ते सत्तेत परततील का हे २३ नोव्हेंबरला समजेलच.
- पुण्यातील सर्व ८ मतदारसंघ भाजपने स्वबळावर २०१४ विधानसभा निवडणुकीत जिंकले होते. २०१९ मध्ये शिवसेनेबरोबर युती असूनही यतील हडपसर व वडगाव शेरी हे मतदारसंघ भाजप हरला होता. आता हे २ मतदारसंघ भाजपने अजित पवार गटाला दिले आहेत. उर्वरीत सर्व ६ मतदारसंघांपैकी पर्वती, कसबा, खडकवासला, कँटोंमेंट व शिवाजीनगर मध्ये खूओ चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कोथरूडही धोक्यात होता. परण्तु चंपाने धूर्तपणे कोथरूडमधील प्रतिस्पर्धी मेधा कुलकर्णी व मुरलीधर मोहोळ यांना वाटेतून दूर केले व बंडखोर अमोल बालवडकरांना बसविण्यात आले. त्यात भर म्हणून तिरंगी लढत निर्माण झाली (चंपा, उबाठाचे मोकाटे व मनसेचे किशोर शिंदे) ज्याचा लाभ भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत बापटांना कोथरूडमध्ये १ लाख मतांची आघाडी होती. परंतु विधानसभा निवडणूकीत कोंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे संयुक्त उमेदवार किशोर शिंदे यांनी चांगली लढत देऊन ८०,००० मते मिळविल्याने चंपा फक्त २५,००० मतांनी जिंकले. पण आता ३ उमेदवार असल्याने भाजपला काळजी नाही. २०१४ मध्ये ८ पैकी ८ व २०१९ मध्ये ८ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता भाजप ६ व अप गट २ जागा लढवित आहे. २०२४ मध्ये भाजप व अप गट एकत्रित ६ पेक्षा कमी जागा जिंकेल असा अंदाज आहे.
__________________________________________________________
इच्छा यादी
खालील निकाल लागावे अशी मनोमन इच्छा आहे. यातील किती इच्छा पूर्ण होतील ते २३ नोव्हेंबरला समजेलच.
- कोणत्याही आघाडीला बहुमत मिळू नये व सरकार बनविता येऊ नये.
- महाराष्ट्रात पुढील १० वर्षे राष्ट्रपती राजवट असावी.
- भाजप व उबाठा गटाला शून्य जागा मिळाव्या.
- कोणीही ठाकरे, राणे व बारामतीकर विधानसभेत नसावा.
- आव्हाड, नबाब मलिक पिता-पुत्री, पटोले, भास्कर जाधव, सर्व मुस्लिम उमेदवार, कडू, संजय राठोड, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सर्वजण इ. पराभूत व्हावे.
वाचने
39428
प्रतिक्रिया
517
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते सामान्य जनतेच्या मनातले
In reply to कोल्हे माणसांना कुत्रे म्हणत by वामन देशमुख
ते सामान्य जनतेच्या मनातले
In reply to ते सामान्य जनतेच्या मनातले by अमरेंद्र बाहुबली
सिंव्ह? खो खो.
In reply to ते सामान्य जनतेच्या मनातले by वामन देशमुख
पोस्टल मते इव्हिएम प्रमाणे
टपालमते आणि जनमतदान
In reply to पोस्टल मते इव्हिएम प्रमाणे by अमरेंद्र बाहुबली
मग २०१९ नी २४ ला इतका फरक
In reply to टपालमते आणि जनमतदान by नठ्यारा
खरे मर्द असाल तर पुन्हा
खरे मर्द असाल तर पुन्हा
In reply to खरे मर्द असाल तर पुन्हा by अमरेंद्र बाहुबली
खरे मर्द असाल तर पुन्हा
In reply to खरे मर्द असाल तर पुन्हा by अमरेंद्र बाहुबली
खरे मर्द असाल तर पुन्हा निवडणुक घ्या.बच्चू खरा मर्द असेल तर पुन्हा निवडणूक घेण्याचा सर्व खर्च एकटा करेल आणि तो सर्व खर्च करणार असेल तर एकदा काय दहादा निवडणूक घ्यायला आक्षेप नाही. होऊ दे खर्च.तरीही नाही घेणार निवडणूक आयोग
In reply to खरे मर्द असाल तर पुन्हा by श्रीगुरुजी
शिवाजी महाराजांविरुध्द
ईव्हीएम वर शंका का?
काय करणार ऐकून?
In reply to ईव्हीएम वर शंका का? by अमरेंद्र बाहुबली
इ व्ही एम यंत्रे कशी काय
In reply to काय करणार ऐकून? by सुबोध खरे
इ व्ही एम यंत्रे कशी काय बरोबर चालली?राज्य, त्याचे उत्पन्न, संशय येऊ नये म्हणून काही राज्य सोडणे, अदानीची राज्यातील गुंतवणूक ह्या सगळ्या गोष्टी इव्हिएम सेट करायला मॅटर करत असाव्यात.म्हणजे २०२९ मध्ये श्री मोदी
In reply to इ व्ही एम यंत्रे कशी काय by अमरेंद्र बाहुबली
मतमोजणी व पारदर्शकत्व
In reply to ईव्हीएम वर शंका का? by अमरेंद्र बाहुबली
निवडणूक आयोगाने उत्तर देणे
In reply to मतमोजणी व पारदर्शकत्व by नठ्यारा
काळंबेरं शोधण्यासाठी ५ वर्षे
In reply to निवडणूक आयोगाने उत्तर देणे by अमरेंद्र बाहुबली
काय कामे करायची? इव्हीएम
In reply to काळंबेरं शोधण्यासाठी ५ वर्षे by श्रीगुरुजी
काळंबेरं शोधायचं, निवडणूक
In reply to काय कामे करायची? इव्हीएम by अमरेंद्र बाहुबली
अबांच्या विरोधी पक्षातले
In reply to मतमोजणी व पारदर्शकत्व by नठ्यारा
खरंच निःपक्षपाती प्रतिसाद.
In reply to मतमोजणी व पारदर्शकत्व by नठ्यारा
मारकरवाडीत दडपशाही सुरू.
बॅलेट पेपरवर गावकरी करणार
In reply to मारकरवाडीत दडपशाही सुरू. by अमरेंद्र बाहुबली
हसू आले नाही. पण तुमच्या
In reply to बॅलेट पेपरवर गावकरी करणार by गवि
व स्वतःच वेगळ्या स्पर्धा
In reply to हसू आले नाही. पण तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
घ्यायच्या त्या स्पर्धा घ्या.
In reply to व स्वतःच वेगळ्या स्पर्धा by गवि
संशय येऊ नये म्हणून सगळीच
In reply to घ्यायच्या त्या स्पर्धा घ्या. by सुबोध खरे
अजून ५ वर्षे हेच अरण्यरूदन
मी ही निवडणूक मोठ्या
जितेंद्र आव्हाड ह्यांचे ट्विट
In reply to मी ही निवडणूक मोठ्या by अमरेंद्र बाहुबली
देशभक्त, लोकशाहीवादी, अंधभक्त
In reply to जितेंद्र आव्हाड ह्यांचे ट्विट by वामन देशमुख
आहेत की येथे काही नग.
In reply to जितेंद्र आव्हाड ह्यांचे ट्विट by वामन देशमुख
EVM मशीन संदर्भात
In reply to मी ही निवडणूक मोठ्या by अमरेंद्र बाहुबली
झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं
In reply to EVM मशीन संदर्भात by अनन्त अवधुत
+१ जिंकले असल्याने भाजपेयींनी
In reply to झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं by राघव
:)
In reply to झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं by राघव
देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम
त्याचे असे आहे
In reply to देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम by अमरेंद्र बाहुबली
सहमत
In reply to देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम by अमरेंद्र बाहुबली
गांभीर्याने काय तुमच्या
In reply to सहमत by वामन देशमुख
वामनराव,
In reply to सहमत by वामन देशमुख
+१
In reply to वामनराव, by श्रीगुरुजी
जो युक्तिवाद पराभूत
खो खो. विनोद.
In reply to जो युक्तिवाद पराभूत by श्रीगुरुजी
हरलेल्या उमेदवारांच्या
In reply to जो युक्तिवाद पराभूत by श्रीगुरुजी
अमेरिकेतील २००० च्या
मुंबई मारवाड्यांची, आता
ईव्हीएमबद्दल काही प्रश्न
खुळेपणाला मर्यादा नसते
मला पाहिजे तसा निवडणुकीचा
In reply to खुळेपणाला मर्यादा नसते by चंद्रसूर्यकुमार
मला पाहिजे तसा निवडणुकीचा निकाल लागला नाहीगावकऱ्यांनी असे कुठेही म्हटले नाहीये. त्या मतदारसंघातून खऱ्या राष्ट्रवादीचाच उमेदवार जिंकलाय. मुळात इव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे हा संशय ते एक गावच नाजी तर पूर्ण महाराष्ट्र घेतोय. आणी निवडणूक आयोग उत्तर न देता लपवाछपवी करतंय असा संशय सगळीकडेच आहे. भाजप निवडणूक आयोगाचा बचावाचा प्रयत्न करतोय. मुळात भाजपला ह्याची गरज काय? की चोराच्या मनात चांदणे?पहिली रडारड भाजपची.
In reply to खुळेपणाला मर्यादा नसते by चंद्रसूर्यकुमार
ओ सर
In reply to पहिली रडारड भाजपची. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इव्हीएमचा विषय आला की सिद्ध
इव्हीएम कितीही सद्गुणी असलं
In reply to इव्हीएमचा विषय आला की सिद्ध by अमरेंद्र बाहुबली
एकदा हरकतीचे निरसन किंवा
In reply to इव्हीएम कितीही सद्गुणी असलं by गवि
+१
In reply to एकदा हरकतीचे निरसन किंवा by गवि
जो आरोप करतो त्याच्यावर ते
तुमचा का निवडणूक आयोगाच्या
In reply to जो आरोप करतो त्याच्यावर ते by श्रीगुरुजी
इ व्ही एम कार्यक्षम आहे हे
In reply to तुमचा का निवडणूक आयोगाच्या by अमरेंद्र बाहुबली
इ व्ही एम कार्यक्षम आहे हे
In reply to इ व्ही एम कार्यक्षम आहे हे by सुबोध खरे
इ व्ही एम कार्यक्षम आहे हे अनेक वेळेस सिद्ध झालंय.अनेक वेळा इव्हीएम चे डब्बे खराब चालत आहेत हे पकडले गेले.ते हॅक करून दाखवा असे निवडणूक आयोगाने अनेक वेळेस आव्हान दिलेलं आहे.हात न लावता, आता काय आहे ते पाहू न देता कसे शक्य आहे? तुम्ही आता जिथे आहात तिथून माझा एक्स रे काढून दाखवा पाहू. आहे का शक्य?जनता त्यांना भीक घालत नाही हे अनेक निवडणुकांत सिद्ध झालंय.जनता कोणाला भीक घालते हे निवडणकू आयोग नी भाजप कुणाला कळू देत नाही. म्हणून तर लोक ओरडतात ना? देशात लोकशाही आहे मोळीवाद (फॅसिझम) नाही.आता पाच वर्षे त्यांना रडगाणं गायला भरपूर वेळ आहे.हेच तर आम्हाला आमचा महाराष्ट्र आणी देश भ्रष्टाचार करुन लुटू द्यायचा नाहीये, तसेच इव्हीएम हॅक करुन भाजपला जिंकू द्यायचे नाहीये. भाजपला सत्तेत यायचे असेल तर त्यानी लोकशाही मार्गाने यावे.आता पाच वर्षे तुम्हाला रडगाणं
In reply to इ व्ही एम कार्यक्षम आहे हे by अमरेंद्र बाहुबली
भाजपला सत्तेत यायचे असेल तर त्यानी लोकशाही मार्गाने यावे.
In reply to इ व्ही एम कार्यक्षम आहे हे by अमरेंद्र बाहुबली
निवडणूक आयोगाचा गैरवापर न
In reply to भाजपला सत्तेत यायचे असेल तर त्यानी लोकशाही मार्गाने यावे. by वेडा बेडूक
भुजबळ बुवा
In reply to निवडणूक आयोगाचा गैरवापर न by अमरेंद्र बाहुबली
अस निषेध करुन, धरणे, मोर्चे,
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to अस निषेध करुन, धरणे, मोर्चे, by अमरेंद्र बाहुबली
स्वातंत्र्य मिळवून
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
गांधी नेहरुंनी देशाला
In reply to स्वातंत्र्य मिळवून by अमरेंद्र बाहुबली
गांधी नेहरुंनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेअजून हसतोय मी. पाकिस्तानला त्यांनीच स्वातंत्र्य मिळवून दिलं हे मात्र सत्य.भारत पाकिस्तान एकच होता
In reply to गांधी नेहरुंनी देशाला by श्रीगुरुजी