Skip to main content

प्रतिसाद

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 14/05/2009 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसाद देणार्‍या त्या कंपूस उद्देशून (चाल:- प्रतिमा उरी धरोनी) प्रतिसाद मनी धरोनी कुणी लेख लिहित रहावे ते लेख निर्मितीचे विचार करोनी लिहावे उस्फुर्त भावनानी स्वप्नात गुंग व्हावे पुष्पात गंध जैसा लेखात भाव तैसा अद्वैत लिखणीचे त्यां जीवनी असावे तुम्ही सप्तरंग वाचनाचे व्हावे अनेक मतांचे विषय जीवनाचे चर्चीत कुणी बसावे का वाचकास वाटे प्रतिसाद कुणा भावे ते भावस्वप्न कुणाचे बेकार कुणी करावे प्रतिसाद मनी धरोनी कुणी लेख लिहित रहावे श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1307
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

वा,व्वा !!

तुम्ही सप्तरंग वाचनाचे व्हावे अनेक मतांचे छान.

श्रीकृष्णा, सुरेख रे..! तुझा चाहता, तात्या.