Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 10/17/2024 - 08:31
उतारवयात सुद्धा जवळ घ्यावंसं वाटतं प्रेम आणी माया एकत्र अनुभवास वाटतं निश्चिंतता, मिठीत तीच्या मजला वाटते बायको माझी मज आयुर्विम्या सम भासते वेणी,थोडी साखर पेरणी एव्हढाच हप्ता बसतो पाॅलिसी मॅच्युरिटीचा आनंद ,वेगळाच असतो काय सांगू तुम्हांला आनंदाचे डोही आनंद तरंग जेंव्हा बनतो उडन खटोला, बेतुक्याचा पलंग. -बेतुक्याची गवळण.

Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 10/17/2024 - 08:52

Permalink

प्रेम आणी माया...

प्रेमा मधे आसक्ती, प्रेम दिले तर मिळते. प्रेमात व्यवहार असतो. माया या शब्दात व्यवहार नसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 10/17/2024 - 09:14

Permalink

वाह.

वाह. सांसारिक चकली आवडली. (मला वाटलं की काही राजकीय चकली भाजणीचे विडंबन आहे काय.)
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 10/17/2024 - 09:41

Permalink

राजकारण आपले क्षेत्र नाही.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 10/17/2024 - 10:06

Permalink

मस्त

भाजणी चांगली भाजल्यामुळे चकली एकदम खुसखुशीत झालेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 10/17/2024 - 10:24

Permalink

मला वाटली पाककृतीच आहे.

मला वाटली पाककृतीच आहे.
उतारवयात सुद्धा जवळ घ्यावंसं वाटतं प्रेम आणी माया एकत्र अनुभवास वाटतं
हे राम काळजी घ्या. रस्त्याने सुंदर महिला, युवती दिसल्यास आपण आपलं खाली मान घालून नाकासमोर चालायचं. उतार वयात प्रेमा आणि माया यांच्यापासून दूर राहीलं पाहिजे. (हलकेच घ्या साहेब) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 10/17/2024 - 17:17

In reply to मला वाटली पाककृतीच आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

@ बिरूटे सर...

परतीच्या पावसाचा न्यारा ढंग एकाच सरीत भिजवतो अंग श्रावणातल्या बुरबूरी पेक्षा परतीचा पाऊस बरा नवशिक्या पेक्षा अनुभवी खरा हलकेच घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on गुरुवार, 10/17/2024 - 10:31

Permalink

दिवाळीची तयारी सुरू झाली?

दिवाळीची तयारी सुरू झाली? रोजच दिवाळी दिसतं आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Fri, 10/18/2024 - 11:08

Permalink

अरे वा!!

कविता खुसखुशीत झाली आहे. शेवटची ओळ तर सिक्सर!! येउंद्या अजुन!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता२४ on Sun, 10/20/2024 - 16:02

Permalink

हा हा हा ....

भारीच की..मस्त जमलीय भाजणी...
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 10/21/2024 - 09:31

Permalink

मिपाने अठरा वर्ष पुर्ण केले याचे औचित्य साधून

एक वयस्कर जिल्बी पाडली आहे. शृंगार, अश्लील, प्रेम, व तत्सम शब्दांत खुपच पातळ सीमारेषा आहे. सीमारेषेव,परिणीती व वयस्क वाचक वर्ग यांचे भान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रतिसादक, वाचकांचे मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3277 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com