अवयव दान
गेले दोन आठवडे वडिलांच्या आजारपणामुळे ICU बाहेर वेळ काढणे चालू आहे. इथे माझ्यासारखे अनेक नातेवाईक बाहेर बसलेले आहेत. इथे अनेक जण आपल्या आप्तांसाठी कोणी अवयव दाता मिळेल का याची वाट बघत, आशेवर बसलेले आहेत. या वेळात काहींचे आप्त दाता भेटल्याने बरे होउन घरी जाताना, तर काहींचा दात्यची वाट बघता बघता मृत्यू होताना, तर काहींसाठी वाट बघताना जे उपचार द्यावे लागतात त्या मधे पैशांचा प्रचंड चुराडा होताना बघतो आहे. काही लोकं पर राज्यतून येउन महिनोंमहीने दात्याची वाट बघत आहेत.
माणूस जिवंतपणी सुद्धा आणि मेल्यावर पण अवयव दान करू शकतो.
ऑगस्ट २०२३ च्या महितीप्रमाणे सुमारे ३ लाख रूग्ण अवयव दात्याची वाट बघत आहेत. भारतात रोज सुमारे २६ हजार मृत्यू होतात. फक्त ३ % लोकांनी जरी अवयव दान केले तरी अनेक रुग्णांची आणि कुटुंबांची आपण त्रासातून आपण सुटका करू शकतो.
भारतात सुमारे ३० लाख लोकं डोळ्यांच्या दात्याची वाट बघत आहेत, त्यातील सुमारे ६० % रुग्ण १२ वर्षाखालील आहेत.
आपण अनेक वेळा बातम्या, चित्रपटांमधून अवयव तस्करांबद्दल ऐकतो. मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमूळे तस्करीचा आणि गुन्हेगारीचा जन्म होतो आणि अनेक गरीब, असहाय्य लोकांचा यात बळी पडतो. जर पुरेश्या लोकांनी अवयव दान केले तर समाजातली ही घाणही स्वच्छ होऊ शकते.
भारतात आता अवयव दान खुप सोपे झाले आहे. तुम्ही या (https://notto.abdm.gov.in/) संकेत स्थळावर जाऊन तुम्हाला जे अवयव दान करायचे आहेत त्याची सहजपणे नोंदणी करू शकता.
आपल्या मिसळपाववर अनेक डॉक्टर्स आहेत, वरील माहीतीत काही चुका असतील तर कृपया दाखवून द्या किंवा जमल्यास भरही टाका.
मी अवयव दानासाठी नोंदणी केली आहे, या लेखातून (किंवा इतरही काही कारणाने) आपण प्रेरणा घेउन नोंदणी केली असल्यास नक्की सांगा आणि इतरांनाही प्रेरीत करा. इतरांना प्रेरीत करण्यासाठी काही कल्पना असतील तर त्याही सुचवा. (Can there be a widget, badge in social media profiles which can indicate registered organ donor which people can flaunt?)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम
केली नोंदणी. करायची करायची
धन्यवाद :)
आजच्या काळातील महत्वाची गरज
अवयव दान - काही गैसमज.
मोलाची माहिती !