Skip to main content

महाराष्ट्रातलं राजकारण!

लेखक राघव यांनी बुधवार, 21/08/2024 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षी होऊ घातल्यात. या अनुषंगानं काही बाबी चर्चाव्याशा वाटल्या! :-) सद्य परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण इतकं किचकट, विचित्र आणि गलिच्छ झालेलं आहे की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात जातो ते सांगता येत नाही. सततची नवनवीन भांडणं, राजकीय हाणामाऱ्या, मोर्चे.. जणू केवळ राजकारण करण्यासाठीच यांना आपण निवडून देत असतो. कामं वगैरे आपापल्या गतीनं होतात, त्यात यांचा काही हातभार आहे असे वाटतच नाही. काही आठवड्यांपासून सजगपणे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत/बघत्/वाचत होतो. सरळ दिसतं की सर्वसामान्य जनता या सगळ्याला आता जाम कंटाळली आहे. उत्तम अन् समर्थ पर्याय पुढे आला तर नक्कीच त्याला चांगली संधी आहे. - सध्या ७ प्रमुख पक्ष महाराष्ट्रात झालेत. काँग्रेस, २ रा. काँग्रेस, २ शिवसेना, भाजप आणि मनसे. - त्यात वंचित आघाडी आणि ओवेसी यांची मतं घेण्याची ताकद किती हे वेगळे. - मतविभाजनाचा फायदा घेण्यास सगळेच पक्ष उत्सुक असतात, पण यावेळच्या परिस्थितीत कोणाला मुळात खरोखर फायदा होऊ शकेल हा मुद्दा लक्षवेधी असू शकेल. महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय. पार्टी विथ डिफरन्स वगैरे सगळं नावाला उरलंय. भाजपला स्वत:वर विश्वासच उरला नाहीये असं वाटायला लागलंय. मला अजूनही वाटतं की भाजपनं तो पहाटेचा शपथविधी न करता विरोधात बसणं स्विकारलं असतं तर पुढची निवडणूक त्यांना एकट्याला लढवता आली असती आणि जिंकताही आली असती. संधिसाधू राजकारणाचा फास स्वतःहून स्वतःच्या गळ्यात घालून घेण्याचा त्रास आज सगळ्यात जास्त त्यांनाच होतोय आणि आपण आलिया भोगासी करतोय. बाकी दोन्ही शिवसेना, दोन्ही रा.काँ आणि काँग्रेस मला स्वतःला पसंत पडत नाहीत कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही आराखडा नाही. केवळ संधिसाधूपणाच हे सर्व पक्ष करताना दिसतात ज्याचा आता अक्षरशः उबग आलाय. दुर्दैवानं भाजपही त्याच रांगेत जाऊन बसू पाहतोय. मला तरी वाटतं की राज ठाकरेंना या निवडणूकीत उत्तम संधी आहे. ते कोणत्याही आघाडीत अजून नाहीत. त्यामुळे जर महाराष्ट्र पिंजून काढला, मुख्य विरोधकाची जागा घेतली, इतर सर्व पक्षांच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि लोकांना विश्वास दिला तर; मतांचं पोलरायजेशन मनसेच्या बाजूनं घडू शकेल. यात मुख्य अडचण अशी वाटते की मनसेचा पाया महाराष्ट्रभर अजूनही नाही. पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडला तरी त्यांचा पुरेसा जम बसलेला आढळत नाही. त्यामुळे या संधीचा फायदा मनसे जागांच्या बाबतीत कितपत उचलू शकेल याबद्दल शंका आहे. अर्थात् पक्ष महाराष्ट्रभर पोचवायला का होईना याचा उपयोग होऊ शकतो, जर तसं केलं तर! अर्थात् हे सगळं नुसतंच विचारमंथन झालं. यासाठीचा अभ्यासपूर्ण विदा माझ्याकडे नाही. तरीही आपल्या सर्वांचं यावर मत जाणून घ्यायला आवडेल. इत्यलम्

वाचने 16985
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

In reply to by धर्मराजमुटके

+१ पुण्यातील माझ्या ओळखीचे अनेक भाजप समर्थक मतदान करणार नाही केलेच तर नोटा दाबणार असे बोलत आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

महाविकास आघाडी येऊ द्या एकदाची. पाच वर्षे टोमणे तरी बंद होतील. आणि सर्व नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येतील परत धडाधड.

In reply to by कंजूस

आणि सर्व नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येतील परत धडाधड. नाही आले नवीन तरी चालेल, पण जे गुजरातला पळवले जाताहेत ते पळवणे तरी बंद होईल. महाराष्ट्रद्रोही सरकार नसेल, महाराष्ट्र प्रेमी सरकार असेल.

राज्यात गुन्हेगारी आणी भ्रष्टाचाराने हाहाकार माजवलाय. बदलापूर घटनेतील पीडितेच्या आईवडिलाना १२ तास पोलिसांनी बसवून ठेवले, आंदोलन करणाऱ्या लोकांवरच गुन्हे दाखल करण्यात आलेत. १५ दिवसांचे शाळेचे सिसिटीव्ही फुटेज गायब करण्यात आलेत. एकंदरीत गुन्हेगाराला वाचवण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्याचे दिसतेय. न्यायालयाने देखील ह्या युती सर्कसरचे तोंड फोडलेय. मोदीनी उद्घाटन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडून तुकडे तुकडे झालेत, निवडणुकीच्या तोंडावर जसे अर्धे अपुरे राममंदिराचे घाईघाईत उद्घाटन करन्यात आले होते तसेच पुतळ्याचे ही क्रेडिट खाव योजने अंतर्गत घाई गडबडीत काम करुन उद्घाटन करण्यात आले. पुतळ्याला ५ कोटीच्या आसपास खर्च झाल्याचं सांगण्यात येतंय, पान भरपूर पैसे खाऊन अतिशय निकृष्ट दर्ज्याचं काम करण्यात आल्याचं दिसतंय, भाजपच्या भ्रष्टाचारा पासून महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजही वाचू शकलेले नाहीत. भाजपच्या राज्यातील उरलेल्या दोन महिन्यात आणखी काय काय पहायला मिळणार देव जाणे.

गेल्या काही दिवसांत मिपा बंद होते बहुतेक.. आत्ता बघितले प्रतिसाद. अजूनही योजनाबद्ध विकासावर कुणी मतं मागण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करेल असं वाटत नाही. फालतू राजकीय विषयांवरची भांडणं अन् शिवराळ भाषेच्या जोरावर दिशाभूल करण्याचेच प्रयत्न चाललेत. वरील काही प्रतिसादच या अनुषंआनं पुरेसे बोलके आहेत. पुर्वीही अनेक वेळा, सरकार पटलं नाही तरीही लोकं त्याच सरकारला मतं देऊन मोकळी होतांना दिसत. कारण बाकीचे जे नुसते बोलतात त्यांना मत देऊन ते वाया गेल्यासारखे वाटत असे. अत्रे, कॉ. डांगे यांच्या सभांना प्रचंड गर्दी लोटत असे पण मतपेटीत ते उतरत नसे. राज ठाकरेंचेही असेच काहीसे होतांना दिसतं. कारण सरळ आहे - लोकांमधे अजून खोलवर शिरकाव झाला नाही. संघटना मजबूत नाही अन् लोकांची कामं धसास लावण्याची धडाडी दिसत नाही. चार शिव्या घालून, गल्लीछाप राजकारण खेळून हशा आणि टाळ्या मिळू शकतील, पण लोकांना ते फक्त मनोरंजन वाटत असेल तर मतं कशी मिळणार? म्हणूनच पुन्हा म्हणतो, आत्ताची परिस्थिती एखाद्या सुदृढ पर्यायासाठी अत्यंत अनुकूल आहे. पण ती पर्यायाची जागा मिळवावी लागेल आणि त्यासाठी कमरतोड मेहनत आली. ते मनसेला जमेल की नाही यावर त्यांचे भविष्य असेल. नाही तर चंगो म्हणतात तसे - "डाव तुझ्या हाती दिला तरी जिंकता तुला येत नाही" अशी वेळ येणे आहे. पर्याय म्हणतोय तेही महाराष्ट्र भाजप आघाडी आणि मविआ, दोघांच्याही संधीसाधू आणि खालच्या पातळीवरच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे म्हणून. कुणातरी पर्यायानं "एकला चलो रे" केले पाहिजे आणि मतांचं ध्रुवीकरण घडवले पाहिजे.

मनोज जरांगे सुद्धा त्यांची टीम उभी करणार आहे म्हणतात . तसे झाले तर काय परिस्थिती होईल?

In reply to by सिद्धार्थ ४

विकास आघाडीसाठी आणखी एक सत्ता केंद्र डोकेदुखी ठरेल. इकडे मनसेही २८२ जागा लढवण्यावर ठाम आहे. प्रकाश आंबेडकरही उमेदवार उभे करतील. बीएसआरचं माहीत नाही.

जरांगे हे बुजगावणे आहे. त्यांना कोणताही शेंडा बुडखा नाही. चार हिरवट टाळक्याची तरुण पोरं त्यांच्या आंदोलनाचं पाठी गेल्यामुळे केवळ काही मते विभाजित होतील. पण मुळात मराठा आरक्षण हा मुद्दा राज्य चालवण्यासाठी किती उपयुक्त आहे? हे सर्व केवळ फडणवीस हे शस्त्र बोथट करण्यासाठी शरद पवार यांनी चालवलेलं प्यादं आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण मान्य केलं तर यांची उपयुक्तता संपेल. मग त्यांना खड्यासारखा बाजूला टाकलं जाईल. आणि अगदी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अमान्य केलं आणि त्यासाठी कोणतयाही आंदोलनाला बंदी घातली( जशी मागच्या शनिवारी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद ला घातली तशी) तरी जरांगे याना कोण विचारेल? ते केवळ एक प्यादं आहे हे बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही हेच आश्चर्य आहे.

मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष "असून अडचण आणि नसून खोळंबा" असे आहेत. केवळ चालत्या गाड्याला खीळ घालणे सोडून ते दुसरे काहीही करू शकत नाहीत. ना त्यांच्याकडे धड पक्ष संघटना आहे ना काही ठोस कार्यक्रम. मंत्री म्हणून काम करू शकतील इतकी दोन आकड्यातही माणसे त्यांच्याकडे नाहीत. अशा लोकांना दोन पाच जागा सोडल्या तर जास्त काही हाती लागणार नाहीये. पण भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांची काठावरची मते फिरवून त्यांना अपशकुन मात्र करू शकतील असे आहेत.

In reply to by सुबोध खरे

मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष "असून अडचण आणि नसून खोळंबा" असे आहेत. सहमत. पण आता परिस्थिती बदलली आहे. वंचित सोबत mim पक्ष होता तेव्हा वंचितची ताकद निश्चितच जास्त होती. २०१९ लोकसभेला त्याचा मोठा फायदा भाजप आणी ठाकरेंना झाला. पण ह्या लोकसभेला वंचितचा काहीही प्रभाव नव्हता. कारण mim सोबत नव्हता, आणी मुस्लिम एकगठ्ठा मते मविआ कडे वळली. ह्या पेक्षा वंचितने एमवीआ सोबत जायला हवे होते, आंबेडकर अकोल्यातून खासदार असते. मनसे पक्ष कधीही कुठेही मते फिरवू शकला नाही. ह्या लोकसभेला राज ठाकरेंच्या सभा होऊनही भाजपला काडीचा फायदा झाला नाही. अनेक जागा भाजप स्थानिक उमेदवारांच्या ताकदीवर जिंकले. मोदी आणी राज दोन्हीही ह्या लोकसभेला राज्यात सपशेल अपयशी ठरले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मागे वंचितने कॉन्ग्रेसची मतं खाल्ली होती. मनसे ठाकरे पक्षाची मते खाणार. म्हणजे ही सत्ताकेंद्रे कुणाच्या मुळावर आहेत ते समजेल. फडणवीसांना शह देण्यासाठी याचा काही उपयोग नाही.

In reply to by कंजूस

फडणविसाना शह?? खो खो. ह ह पू वा. महाराष्ट्रात भाजपचे दुकान मोदी नावाने चालू होते तेही ठाकरे पवार द्वयीने लोकसभेला उध्वस्त केले.

महाराष्ट्रात मविआ ने बंद पुकारला तर तो अवैध असतो. पण भाजप्यांनी बंगालात बंद पुकारला तर तो वैध असतो. :) आयरनीच्या देवा.

राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महराजांचा पुतळा पडला त्यावरून शिंदे आणी अजित पवार ह्यांच्यानंतर पंतप्रधान मोदी ह्यानी देखील महाराष्ट्राची माफी मागितली आहे. पण महाराष्ट्र माफ करेल का करेल? हा प्रश्न आहे. विमानतळा पासून रस्ते, रेल्वे सगळीकडेच भाजपची सरकारे निकृष्ट बांधकाम करून मोठ्या प्रमाणात पैसे खात आहेत. त्यांच्या ह्या पैसे खाऊ मोहिमेत त्यांनी महराजानाही सोडलेले दिसत नाही. आणी आता नौदलाकडे बोट दाखवत आहेत, मुळात नौदलाला काय गरज असेल पुतळा लोकसभा निवडणुकीसाठी घाईघाईत उभा करायची? हे सगळं भाजप नी स्पेशली मोदींसाठी करण्यात आलं हे न ओळखण्या एवढी जनता भाजपेयीना दुधखुळी वाटते का?? आता तर भाजपेयी भारतीय नौदलालाच भ्रष्टाचारी ठरवत आहेत. नंतर त्यानी वाऱ्यांमुळे पुतळा पडला हे कारण दिले, समुद्रकिनारी वारे वाहतात हे माहित नसावे का? म्हणजे भ्रष्टाचार लपवण्यासाठी काहीही थातूरमातूर कारणे सांगितली जात आहेत. पुतळ्यापेक्षा उद्घाटनाला नेत्यांची बडदास्त ठेवण्यात जास्त खर्च आला असे कळाले. पुतळा उभारणीनंतर दोन की तीनच महिन्यात फरश्या निघुन वर आल्या होत्या. भ्रष्ट भाजपेयींनी शिवाजी महाराजांनाही सोडले नाही. महाराष्ट्र हे विसरेल आणी माफ करेल असे वाटत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

( बोलभिडू चानेलचा विडिओ) आता मी पुतळाच म्हणतो. तो पायाच्या चौथऱ्यातून उखडला गेलेला दिसत नाही. पुतळ्याचे पाय मोडून पडला आहे. म्हणजे पुतळा घडवणाऱ्या भट्टीने धातू चांगला वापरलेलला नाही. त्याचे तुकडे झाले आहेत.

@अबा, तुम्हाला प्रतिक्रिया देऊन उपयोग नसतो त्यामुळे तसे काही करणार नव्हतो. पण स्कोर सेटलिंग साठी या धाग्याचा उपयोग करू नये अशी मनःपूर्वक विनंती.

In reply to by राघव

सर हा धागा निवडणूक चर्चेसाठी आहे ना? त्या संदर्भातच बातमी आली तर स्कोर सेटलिंग? कोणाचा स्कोर? कुठे सेटल करतोय?? बाकी तुम्हीही भाजप समर्थक त्यातही फडणवीस समर्थक असाल नी त्यांच्या विरुद्धच्या बातम्या नको असतील तर तस स्पष्ट सांगा.

माझा २०१९ चा भाजपला जास्तीतजास्त ११० जग मिळतील हा अंदाज जवळपास बरोबर आला होता. २०२४ लाही भाजपला लोकसभेला २३४ जागा मिळतील हा जग थोडक्यात बरोबर आला. आता मी माझ्या अभ्यासानुसार विधानसभेचे आकडे देतोय. काँग्रेस ७१ शिवसेना ६५ राष्ट्रवादी काँग्रेस ५५ भाजप + अजित पवार गट + शिंदे सेना = ७५-७८ जागा. इतर १० ते १२.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

निदान मराठा आरक्षण लढा थंड होईल. कुठलेही संप/बंद होणार नाहीत. पण हे जे काही सरकार बनेल ते पाच वर्ष टिकू शकेल का?

In reply to by सिद्धार्थ ४

मराठा आरक्षण खालील प्रतिसाद उडवलं जाईलच पण तरीही लिहतो १)ज्या समाजाचे सर्वात जास्त मुख्यमंत्री आणि मंत्री २) ज्या समाजाकडे भरपूर जमीन ३) शिक्षणात आणि उद्योगात पुढे ( कोलहापौर सातारा भाग बघा ) ४) शिक्षण उद्योग आणि सहकार हाती ५) स्वतः छत्रपती ज्यांचे पूर्वज ९६% तो समाज "मागासलेला " कस काय बुवा आणि समजा असलाच अरी मग या १० पैकी ७ मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या बारामतीच्या " जाणत्या राजाने" एवढी दशके का नाही "बहाल" केले आरक्षण ? हि केवळ झुंड शाही आहे तळागाळातील लोकांना मदत करायाची तर ती आर्थिक मागासलेपणावर असावी आणि ती सुध्दा फी सवलत, वसतिगृह , पुस्तके , जास्तीचे वर्ग , कपड्या साठी , जेवणासाठी कुपन वैगरे , रोख पैसे पण नाही ...

In reply to by चौकस२१२

तळागाळातील लोकांना मदत करायाची तर ती आर्थिक मागासलेपणावर असावी हे स्पष्ट सांगायची हिंमत आहे का भाजप नेत्यांची?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एकूण चौकस२१२ यांचे मुद्दे तुम्हाला पटलेले दिसतात. तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकी आधी तुमच्या आवडत्या पक्षांनी हे सत्य ठणकावून जनतेला सांगीतले पाहिजे की गेली ७०-७५ वर्ष जनतेत फूट पाडून, समाजात विष कालवून स्व आर्थिक आणि सत्ता प्रगती साधली तशीच आत्ताही केले पाहिजे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भाजप गेला खड्यात,, आधी एवढी वर्षे कोंकग्रेस्स जे जात पाट मनात नाही ना त्यांनी काय केला?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे कोणी ठरवलं? अहो हे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे, अत्यंत जातीयवादी पक्ष आहेत हे आणि तूम्ही त्यांची भालमण करता? तुम्ही पण त्याच कॅटेगरी मधले का? आणि हो, बिजेपी ला शिव्या घातल्याने आणि त्यांच्या खऱ्या खोट्या चुका दाखवल्याने इतर लोक (उबाठा, शप, रागा, अके, अया इत्यादी) सज्जन नाही होत. अर्थात तुम्हाला हे कळले तरी तुम्ही मान्य नाही करणार, तुमचे पोट चालते ना यावर. अणि हो, हे सतत मनुवाद मनुवाद बोलणारेचं सगळ्यात जातीयवादी, हलकट असतात असं आता माझे ठाम मत झाले आहे, त्यांना स्वतः सोडून कोणाचेही कल्याण होण्यात इंटरेस्ट नसतो, हे फक्त इतरांच्या नावाने शिमगा करून स्वतच्या तुंबड्या भरतात. अत्यंत हीन माणसे. नक्षलवादी.

In reply to by टीपीके

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्याखाली बळकट असणारी माणसं कधी तर्कशुद्ध युक्तिवाद करतात का ?

In reply to by टीपीके

हे कोणी ठरवलं? अहो हे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे, अत्यंत जातीयवादी पक्ष आहेत तसा एकमेव पक्ष भाजप आहे. आणि हो, बिजेपी ला शिव्या घातल्याने आणि त्यांच्या खऱ्या खोट्या चुका दाखवल्याने इतर लोक (उबाठा, शप, रागा, अके, अया इत्यादी) सज्जन नाही होत. त्याचप्रमाणे काँग्रेसला, शिवसेनेला शिव्या घातल्याने आणि त्यांच्या खऱ्या खोट्या चुका दाखवल्याने इतर लोक (नमो, अशा, देफ, अबी,चंपा,गिमा,मोभा इत्यादी) सज्जन नाही होत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

फिर्यादी पण तुम्हीच आणि न्यायाधीश पण तुम्हीच. गंमतच आहे. मग बाकीच्यांनी बोलायलाच नको. पूर्णपणे निर्लज्ज नक्षलवादी मोडस ऑफ ओपरांडी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काँग्रेस पूर्रोगामी आहे ना , मग जात पात नष्ट करण्यासाठी प्रयतन नको का करायला त्यांनी ?आर्थिक मागासलेयांना मदत द्या असे का नाही म्हणत , सध्या तर काँग्रेस चे नेते जातीवर लोकसंखय मोजणी पाहिजे म्हणतात, हे कसे काय बुवा? पगडी पागोटे राजकारण कोण करत? तरी बरं मोदी ओबीसी आहेत ! असो जातीचे राजकारण कोण करताय , ते सगळ्यानं दिसतंय ... चालुद्या येटाय का इकडे , नळाला भरपूर पाणी आणि जातीवर आधारित आरक्षण नाहीये त्यामुळे पचणार नाही तुमच्या सारखया विचारसरणीला ! एक देश एक सर्वधर्मभावी कायदा हाय . येताय ?

In reply to by चौकस२१२

जातं पात नष्ट करण्याचा आरक्षणाशी काय संबंध आहे? तुम्हाला काय भारतात जातीव्यवस्था आरक्षण लागू झाल्यावर मग आली असे वाटते काय?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे आधी तुम्हाला पटतंय का ते सांगा ना मी भाजप चा प्रवक्ता ना तुम्ही काँग्रेस चे मग व्यक्ती म्हणून बोला नसेल तर स्पष्ट सांग कि पुढारलेल्या मराठा समाजाला सुद्धा आरक्षण पाहिजेच

In reply to by चौकस२१२

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्याखाली बळकट असणारी माणसं कधी तर्कशुद्ध युक्तिवाद करतात का ?

In reply to by सुबोध खरे

तुम्ही खांद्याखाली आणि कमरेवर बळकट असल्याने तुमची ५६ इंची ढेरी वाल्याच्या समर्थनार्थ असतात...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असेच अंदाज व्यक्त होऊ लागले तर सरकार राज्यातली निवडणूकच शक्य तितकी पुढे ढकलेल त्याचं काय?

दोन्ही आघाडींना प्रत्येकी १३० जागा मिळतील, इतर छोटेमोठे पक्ष २२ जागा मिळतील. मग बघा काया रस्सीखेच होते. ती पाच वर्ष टिकेल. रोज भोंगे वाजतील आणि चानेल्सना( टीवी आणि यूट्यूबचे) भरपूर कमाई होईल

In reply to by कंजूस

१३० चे विभाजन कसे होते त्यावर आहे पण तसे होऊ नयेच परत साली खिचडी,, सरळ काँग्रेस किंवा भाजप ला १७० द्या रे आणि व्हा मोकळे जा मग ५ वर्षे चहा प्यायला... आपण जनता त्याचूच आहे की नाही समजत सरळ सरळ दोन विचारसरणीत विभाग आणि व्हा मोकळे

In reply to by चौकस२१२

आजीबात नको, देशात आणी राज्यात खिचडीच सडकर हवे. एकहाती सत्ता दिल्याने सरकारी संस्थांचा कसा गैरवापर होतो हे आपण मागच्या दहा वर्षात पाहिलेय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आजीबात नको, देशात आणी राज्यात खिचडीच सडकर हवे. १) एक क्षण भर असे धरुयात कि राजीव गांधींना जेव्हा इंदिरा गांधीं हत्येची सहानुभूती म्हणून ४०० पार जागा मिळाया होत्या तेव्हा तुम्ही प्रौढ होता मग तेव्हा हेच असते का तुमचे मत? २) जगभर जिथे चांगली प्रस्थापित लोकशाही आहे तिथे अशी खिचडी कमी असते .. आणि देशाला फायदा होतो ... ज्याला कौल मिळतो तो नेहमी राक्षसी बहुमत नसते पण तुम्हाला काय त्याचे म्हणा ! खिचडी असली कि विचका व्हायला संधी चांगली असते ना !

पुतळा पडला .. खरा शिवभक्त मनोमन दुखावला ..... पंप्रंनी माफी मागितली ! मलिदाखाऊगिरी.. अयोग्य कलाकार / कलासंस्थेची निवड, घिसडघाई या सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आल्यात .. नेहमी प्रमाणे वरवर वाटणारे दोषी फरार होते.. आताच सापडलेत .... संबंधित संस्था तपासाचे नाटक करताहेत (नेहमी प्रमाणे) महाराष्ट्राची इज्जत जगाच्या वेशीवर टांगली गेलीय ... पंप्रनी या प्रकरणाच्या खर्‍या दोषींना शिक्षा केली नाही तर शिवभक्त त्यांना माफ करणार नाहीत ! न खांउंगा न खाने दुंगा यांच्या छत्रछायेखाली उघडउघड भ्रष्टाचार सुरु आहे .. अनेक प्रकरणे रोज उघडकीस येत आहेत .. ज्यांना वर्षानुवर्षे विरोध केला, त्यांना आणी त्यांच्या बगलबच्चांना आश्रय देऊन वाचवले आणि पुढील चराऊ कुरणाची सोय केली. देवेंद्र फडणवीस यांचा युनिकनेस संपला, भाजपा टीम यांच्या बद्द्ल भ्रमनिरास झाला. लोस पेक्षा विस मध्ये अधिक पडझड होणार हे नक्की ! बाकी राज ठाकरेंना भरघोस मतदान करायला सामन्य मतदारांना काहीच ठोस कारण सापडत नाही त्यामुळं त्यांची गाडी उ त र णीला लागलेली स्प्ष्ट दि स ते य ! (त्यांचा युनिकनेस पहिल्या विस नंतरच संपुष्टात आला ... ते राजकिय नेते नाहीत तर वेगळ्या प्रकारच्या नेते आहेत हे कळून चुकलेय ! अर्थात त्यांचा उपद्रव मुल्य असणारा वेगळा दबावगट राहील .. आणि अर्थातच ते अ त्यंत गरजेचे आहे !) दिवस आणखी वाईट येताहेत !

In reply to by चौथा कोनाडा

लोस पेक्षा विस मध्ये अधिक पडझड होणार हे नक्की ! +१ लोकसभेला अनेकांनी मोदींकडे पाहून भाजपला मत दिलेतरी. विधानसभेला भाजपला मत द्यावे ह्यासाठी एकही ठोस कारण नाही. मोदी नी त्यांच्या फलटणीने महाराष्ट्रातला गावन गाव पिंजून काढला तरीही आता काहीही फरक पडणार नाहीये.

In reply to by रामचंद्र

रामचंद, हा तटस्थपणाच घातक आहे. यावरून गिरीश खरे म्हणायचे ते आठवलं. ते म्हणायचे की हिंदू मतदारांची एक मनोवृत्ती कळंत नाही. ती म्हणजे भ्रष्ट राजकारण्यांनी ७०+ वर्षं घाण केली. ती मोदींनी पाचदहा वर्षांत साफ केली पाहिजे, नाहीतर आम्ही मतदार मोदींना हटवून घाण करणाऱ्या लोकांनाच परत सत्तेत बसवणार. हे अजब तर्कट आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तो तटस्थपणाच घातक आहे. हिंदूंनी सरळ मोदींची बाजू घ्यायला हवी. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

मोदींची बाजू घ्यायला काहीही अडचण नाही. पण मी फक्त महाराष्ट्र भाजप बद्दल बोलतोय. यांनी विस मधे सुद्धा मोदींच्याच नावावर मतं मागायची हे पटत नाही. आणि मत दिल्यानंतर त्याची घाण करायची. हे सहन होत नाही. आपण जे कॉ/राकॉ नको म्हणतोय त्यातलेच सगळे आयाराम यांनी घ्यायचे असतील तर भाजप उरलं कुठे? यांना स्वतःची काही व्हिजन का नाही? राजकारण करूनही काम करण्याचा मोदींचाच आदर्श हे का घेत नाहीत? खिचडी सरकार आलं की सगळ्यांना सांभाळावं लागतं तर करा ना एकला चालो रे.. कोण नाही म्हणतं? कॉ/दोन्ही राकॉ/दोन्ही शिस कुणालाही सोबत घेऊ नये. स्वतः यांच्यासारखंच गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा त्याच गलिच्छ राजकारणाच्या विरोधात भाजप का उभं राहत नाही? कशाची भिती आहे यांना?

In reply to by राघव

आपण आजवर ज्यांना नावं ठेवली त्यांनाच केवळ बरोबरच नव्हे तर उरावर घेऊन जावं लागणं ही राजकारणात यशस्वी होण्यासाठीची अपरिहार्यता आहे, डावपेचांचाच एक भाग आहे, असं भाजपसमर्थकांचं म्हणणं आहे...

In reply to by रामचंद्र

. उद्या दाऊदने भाजप जॉइन केली तर भाजप समर्थक दाऊद राष्ट्रभक्त आहे हे देखील सिद्ध करतील. नितेश राणेंनी सावरकरांचा ट्विट करून अपमान केला होता, कधी सावरकरांची माफीही मागितली नाही तरीही त्याना भाजप प्रवेश देऊन आमदार केले. कारण भाजपला सावरकरांपेक्षा सत्ता प्रिय आहे. आणी मोदी सावरकरांवर भाषणं देत फिरतात, तसेच भाजप समर्थक राहुल गांधींच्या नावाने गळे काढत असतात पण नितेश राणेंवर चुप बसतात. भाजप नी भाजप समर्थक अश्या प्रकार दुटप्पी असतात त्यामुळे विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत.

In reply to by राघव

त्याच गलिच्छ राजकारणाच्या विरोधात भाजप का उभं राहत नाही? कशाची भिती आहे यांना? अनेक भाजप समर्थकांना हि हे गेली काही वर्षे वाटते आहे कि "महाराष्ट्रात एकट्याने त्यांनी लधावे " पण महाराष्ट्र भाजप ला हि भेटी वाटत असावी १) एवढी वर्षे लागली महाराष्ट्रात १००+ जागा मिळायायला २) जातीचं राजकारणामुळे महारष्ट्र भाजप ला लक्ष केलं जाते १९४८ पासून एक प्रकारचा डाग घेऊन ( असा डाग त्यानं देणें हे कितीही अन्यायकारी असले तरीही ) जगतो आहे महाराष्ट्र्र भाजप ,,, तो एकदाचा पुसून जावा असे वाटते पण जनता तसे धड करीत हि नाही सगळळाच गुंता सत्ता , धरलं तर लावताय सोडलं तर पळतंय .. असं काहीसे

In reply to by नठ्यारा

हिंदूंनी सरळ मोदींची बाजू घ्यायला हवी. का?? मोदीनी असे काय केले हिंदूंसाठी की हिंदुनी मोदींची बाजू घ्यायला हवी? ईडी चा गैरवापर, स्वतःचा फोटो जिकडे तिकडे छापून लावून जनतेचा टॅक्सचा पैसा उधळणे, भ्रष्टाचारी लोकांनी भाजपात प्रवेश करावा म्हणून ईडी सीबीआय सोडणे नी त्यांनी भाजपात प्रवेश केला की चौकशा बंद करणे, मध्यमवर्गावर भरमसाठ टॅक्सचा बॉक वाढवणे, प्रत्येक पुतळा, मूर्ती, विमानतळ, रस्ते, रेल्वे सगळ्या ठिकाणी जमेल तिथे भ्रष्टाचार, कारवाई कुणावरही नाही, सोयीने निवडणूक आयोगाचा वापर करणे, शिवसेनेला धोका देणे, ज्यांनी पक्ष स्थापला त्य शरद पवारांकडून पक्ष काढून घेणे, ज्यांनी पक्ष स्थापला त्यांच्या मुलाकडून पक्ष काढून घेणे ह्यातले नेमके कायनहिंदू हिताचे आहे??

In reply to by नठ्यारा

हिंदू मतदारांची एक मनोवृत्ती कळंत नाही. ती म्हणजे भ्रष्ट राजकारण्यांनी ७०+ वर्षं घाण केली. ती मोदींनी पाचदहा वर्षांत साफ केली पाहिजे, नाहीतर आम्ही मतदार मोदींना हटवून घाण करणाऱ्या लोकांनाच परत सत्तेत बसवणार. हे अजब तर्कट आहे.

कोणे एके काळी विरोधी नेत्यांना मातुश्रीवर जावे लागायचे कान धरून... आता काय परिस्थिती आली पाहा. खरेतर तिघे पक्ष शत्रुच आहेत.

In reply to by कंजूस

महाराष्ट्र भाजप नी गुजरातवाद्यांच्या तावडीतून वाचवण्यासाथी वाघ स्वतः गुफेतून बाहेर आलाय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सरकार कुणाचं आहे? पंतप्रधान कोण आहेत ? काही लोक असे म्हणतात कि मी दरोडेखोरांची खाशी जिरवली. ते माझे डोके उडवायला आले होते पण मी केवळ नाकच कापू दिलं. कशी जिरवली त्यांची? जाऊ द्या तुमचं आत्मकुंथन चालू द्या

In reply to by सुबोध खरे

आजचा भाजप या प्राणिसंग्रहालयाच्या परिभाषेत न अडकून पडता कुठल्याही भल्याबुऱ्या मार्गाने उद्दिष्टपूर्ती करतोय, हेच त्याच्या अलिकडच्या यशाचे गमक आहे आणि शंभर वर्षे आपलं ईप्सित साध्य करण्यासाठी विनाप्रसिद्धी झटणारी संघटना आपलं बळ कुठल्याही अपेक्षेविना मागं उभं करत आहे हे विरोधक जितकं लवकर लक्षात घेतील तेवढं बरं.

अजितदादांच्या राष्ट्रवादीने लाडकी बहीण योजनेचा वेगळा प्रचार सुरू केलाय, त्यातून फडणवीस, मोदी, शिंदे ह्यांचे फोटो वगळण्यात आलेत. विधानसभेला फडणवीस, मोदी शिंदे ह्यांचे फोटो वापरले तर आपल्यालाही फटका बसून लोक ममते देणार नाहीत हे दादांच्या लक्षात आले असावे. अमित शहा मुंबईत “बॉम्बेच” मुंबई करण्यात मी देखील होतो असे बोलले. हा मराठी मतदाराना चुचकरण्याचा प्रयत्न असू शकतो. मराठी मतदार शिवसेना सोडून त्यांच्याकडे वळेल अस त्याना वाटतय. पण मराठी मतदारात महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला हलवल्याचा तसेच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रचंड राग आहे.

भाजप प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ह्यांच्या चिरंजीवांच्या नावावर असलेल्या “audi” गाडीने नागपुरात ३ गाड्यांना धडक दिली. त्यावेळी गाडीत संकेत बावनकुळे देखील होते. गाडीतील इतर दोघांची अल्कोहोल टेस्ट करण्यात आली पण बावनकुलेंच्या चिरंजीवाला वगळण्यात आले, fir मध्येही गाडीचा नंबर नोंदवलेला नाहीये. अपघाताची गाडी गॅरेजमध्ये पाठवून रिपियर का करण्यात आली? तसेच गाडी पोलीस स्टेशनला पार्क असताना गाडीच्या नंबर प्लेटही काढून का ठेवण्यात आल्या असे अनेक प्रश्न शिवसेना नेत्या सुषमा अंधारे ह्यानी पोलिसाना विचारलेत. गाडी मध्ये बीफ कटलेट तसेच दारूचं बिल देखील आढळून आलंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय. बीफ कटलेट ऑर्डर करणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा प्रश्न राऊतांनी विचारलाय. ज्या प्रकारे प्रकरण हाताळले जातेय त्यावरून पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव दिसतोय. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली दिसतेय. भाजप नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणी सामान्य जनतेला वेगळा न्याय का?? आता जनतेनेच भाजपविरुद्ध उतरून भाजपला धडा शिकवायला हवा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गाडी मध्ये बीफ कटलेट तसेच दारूचं बिल देखील आढळून आलंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय.
मग "तो आरोप खरा आहे का?" असा प्रश्न सुद्धा विचारण्याची गरज आहे का? ;-)

In reply to by वामन देशमुख

आणी आरोप खोटे आहेत अस पोलीस, गृहमंत्री, भाजप , बावनकुळे कुणीही संगितले नाहीये.:) मणिपूर वर मोदीजी जसे मूग गिळून गप्प असतात तसेच गप्प बसलेत सगळे. ;-)

In reply to by वामन देशमुख

मग "तो आरोप खरा आहे का?" असा प्रश्न सुद्धा विचारण्याची गरज आहे का?
महाराष्ट्रात लपून छपून चोरून बेकायदेशीर बीफ शिजवणारे लोक असतील देखील. पण रीतसर बिलावर बीफ कटलेट, अमुक रुपये, असे छापून देणारे हॉटेल महाराष्ट्रात मोठ्या शहरात आहे आणि तेही उच्चभ्रू लोक जातात असे हॉटेल.. हे वाचून द्वाले पाणावले.

In reply to by गवि

धर्म ही गरिबांना मूर्ख बनवण्यासाठी स्थापलेली योजना आहे. बिचारे गरीब, बेरोजगार अंधभक्त रस्त्यांवर हाणामाऱ्या करून गायी वाचवतात. नी त्यांच्याच नेत्यांची मुले हाटेलात मस्त बीफ कटलेट हाणतात. आता काही अंधभक्त म्हणतील की बीफ म्हणजे फक्त गायच नसते. पण बीफ मध्ये गायपण असते. हे विसरतात.

In reply to by गवि

माफ करा, हे माझे भारतांतील ह्यासंबंधीच्या कायद्याबद्दल अज्ञान असेल. पण माझ्या आकलनानुसार, येथे 'बीफ'वर सरसकट बंदी नाही. बीफमध्ये गायी, त्यांची वासरे, व तसेच बैलाचे मांसही येते. तर बंदी ह्यांमधील पहिल्या दोघांच्या मांसावर आहे, बैलाच्या मांसावर नाही. (अर्थात, बैलाचे मांस चिवट लागते, तो भाग वेगळा).

बीफ असो वा नसो. दारूचे बिल मात्र १२००० वर झाले होते असे पोलिसांनी कन्फर्म केले आहे. पण बेधुंद गाडी चालवणारा मात्र ड्रायव्हरच बरका.

In reply to by कॉमी

चांगलेच पैसेवाले दिसताहेत बावनकुळे. काय बरं व्यवसाय आहेत ह्यांचे?? बिल मित्राने भरले असेल समजू शकतो. पण “आवडी” गाडी तर बावनकुळेंचीच आहे. :) बाकी बावनकुळेंच्या मुलाची अल्कोहोल चाचणीच नाही केली. तो म्हणे ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सिटवर बसला होता. गाडी ३ वेळा ठोकल्या गेली. मग जेव्हा पहिल्याच वेळी गाडी ठोकल्या गेली तेव्हाच संकेत बावनकुळे ह्यानी गाडी चालवणाऱ्याला रोखले का नाही? पुणे पोलिसांनी काहीतरी आदर्श घ्यायला हवा नागपूर पोलिसांकडून. :) बावनकुळेंच्या मागे काय शुक्लकाष्ट लागलंय? कळेना. २०१९ ला एकनाथ खडसे, विनोद तावडे ह्यांच्यासोबत “पंख छाटा” मोहीमे अंतर्गत बावनकुळे ह्यांचे देखील विधानसभेचे तिकीट कापण्यात आले होते. पण ह्याचा आजीबाबत राग न मानून घेत ते पक्षकार्य करत राहिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा बिचारे अडकलेत. किरीट सोमय्या ह्यांच्या नंतर मला सर्वात वाईट वाटत असेल तर बावनकुळेंबद्दल. :)