कारलं माझ्या आवडीचं!
जगातील सगळं सुख एकीकडे आणि परफेक्ट कारल्याची भाजी करण्याचं सुख एकीकडे!! 😋
किंचित कडू -गोट-आंबट-ठसकेदार-चमचमीत!
जीभेच्या रसना तृप्त करणारी!
शरीरालाही गुणकारी!
कृती-
१.कारल्याच्या गोल चकत्या प्रमाणे फोडी करा.एका कारल्याच्या पाच फोडी होतील.देठ आणि शेंड्याकडचा भाग काढून टाकायचा.
२.त्या फोडीतील बिया काढून टाकाव्यात.कारल्याच्या फोडी आता पोकळ असतील.
३.त्या फोडींना हळद,मीठ,लिंबाचा रस(२-३ लिंबाचा)लावून वीस मिनिटे तशाच ठेवाव्या.
४.नंतर उकळी आलेल्या पाण्यात त्या मध्यम शिजवाव्या.
५.मसाला-एक मोठी वाटी दाण्याचा कूट,अर्धी वाटी तिळाचा कूट,दोन चमचे तिखट,एक चमचा कोणताही आवडीचा मसाला,अर्धी वाटी चिरलेला गूळ,चिरलेली कोथिंबीर,मीठ ,किंचित लिंबू पिळावे.हा कोरडा मसाला तेलात एकत्र करावा.
६.कारल्याच्या फोडींत तो भरावा किंवा फोडी या मसाल्यात घोळून घ्याव्यात.
७.तेलात मोहरी जिर्याची तडतडीत फोडणी करावी.त्यात भरलेल्या कारल्याच्या फोडी चांगल्या परताव्यात.अर्धा फुलपात्र पाणी टाकून मंद आचेवर भाजी वाफवून घ्यावी.
कडू कारलं साखरेत घोळले,तुपात तळले तरी ते कडू ते कडू,असं म्हणत उगाच त्याला चिडवू नये 😛
अशी भाजी करून कारल्याविषयक सकारात्मकता पसरवा ;)
तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?😊
कडू कारलं साखरेत घोळले,तुपात तळले तरी ते कडू ते कडू,असं म्हणत उगाच त्याला चिडवू नये 😛
अशी भाजी करून कारल्याविषयक सकारात्मकता पसरवा ;)
तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?😊
याद्या
16134
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
कारलं माझ्या आवडीचं!
बरोबर शेंगदाणे तेलाचा स्वतःचा
In reply to कारलं माझ्या आवडीचं! by कांदा लिंबू
कारल्याच्या तळलेल्या चकत्या.
हो कार्ल्याच्या चकत्या मस्त
In reply to कारल्याच्या तळलेल्या चकत्या. by कर्नलतपस्वी
तुम्ही कारल्याची भाजी कशी
सरळ कार्ल्याच्या चकत्या
In reply to तुम्ही कारल्याची भाजी कशी by कंजूस
कारल्याची परतून सुकी भाजी आणि
ओली भाजी निरुपयोगी. कारण
In reply to कारल्याची परतून सुकी भाजी आणि by गवि
पण या धाग्यातली ही भाजी ओली
In reply to ओली भाजी निरुपयोगी. कारण by Bhakti
मग ठीक आहे.
In reply to पण या धाग्यातली ही भाजी ओली by गवि
लहानपणी मी जवळपास सर्वच
In reply to मग ठीक आहे. by Bhakti
ता क
In reply to लहानपणी मी जवळपास सर्वच by गवि
काय सांगता कौन है वो? ;)
In reply to ता क by गवि
खरच ,अंबाडीची डाळ घातलेली
In reply to लहानपणी मी जवळपास सर्वच by गवि
परत भक्तीघाई ;)
In reply to खरच ,अंबाडीची डाळ घातलेली by Bhakti
पण फोटो जरा दुरून आणि पूर्ण
In reply to कारल्याची परतून सुकी भाजी आणि by गवि
कारल्याची भाजी अजिबात आवडत
:-D मिळाले का उत्तर भक्तीताई?
In reply to कारल्याची भाजी अजिबात आवडत by प्रचेतस
गरूड पुराणात कार्ल्याची भाजी
In reply to :-D मिळाले का उत्तर भक्तीताई? by गवि
स्वर्ग आणी नरकात फक्त....
In reply to गरूड पुराणात कार्ल्याची भाजी by Bhakti
कारले खाण्याच्या शिक्षेपेक्षा
In reply to गरूड पुराणात कार्ल्याची भाजी by Bhakti
कार्ले आवडत नाही तर कार्ले
In reply to कारले खाण्याच्या शिक्षेपेक्षा by प्रचेतस
कारले महापुराणात का?
In reply to कार्ले आवडत नाही तर कार्ले by Bhakti
हॉट चिप्समध्ये मिळणारे
In reply to कारले महापुराणात का? by प्रचेतस
प्राध्यापक का?
In reply to :-D मिळाले का उत्तर भक्तीताई? by गवि
कारल्याची भाजी अजिबात आवडत
In reply to कारल्याची भाजी अजिबात आवडत by प्रचेतस
कारले
त्याचबरोबर शेंगदाणे,काजू,बदाम
In reply to कारले by हणमंतअण्णा शंक…
हां
व्वा
बाकी
उलट बोलला,कार्ले न खाणारे
In reply to बाकी by नगरी
किसलेले सुके खोबरे, तीळ आणि कारल्याच्या
छान पाककृती आणि भन्नाट
**भरली कारली
हायला...
अगं बाई! कारल्याची रस्सा भाजी
In reply to हायला... by कर्नलतपस्वी
रेसिपी द्या...
In reply to अगं बाई! कारल्याची रस्सा भाजी by Bhakti
हा हा! मज्जा आहे तुमची!
In reply to रेसिपी द्या... by कर्नलतपस्वी
इतर पदार्थ कोथिंबीरीला भाव
हा हा! खरंय!
In reply to इतर पदार्थ कोथिंबीरीला भाव by कंजूस
रेसीपी आवडली. कारल्याच्या
हो बियाही तेलात खरपूस छान
In reply to रेसीपी आवडली. कारल्याच्या by विवेकपटाईत