Skip to main content

अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 08/08/2019 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ९/११/१९ सकाळी १०.३० पासून निकाल वाचन आधीचे शीर्षक : अयोध्या : सर्वोच्च न्यायालयातील दैनंदीन सुनावणी कथित रामजन्मभूमी (काहींच्या मते बाबरी मस्जिद) जमीन विवाद सामंजस्याने मिटावा अशी स्वतः सर्वोच्च न्यायालयाची इच्छा होती आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तसा एक प्रयत्न करून पाहीला पण यश उभयपक्षात समेट घडवण्यात यश आले नाही तेव्हा परवापासून सर्वोच्च न्यायालयाने खटला दैनंदीन सुनावणीस परवा पासून घेतला आहे. * मी बर्‍याच दिवसांची प्रत्यक्ष सुनावणी ट्विटरवर वाचून त्याचे दुवे देण्याचा प्रयत्न केला पण मलाही सर्व दिवसांसाथी वेळ देणे झाले नाही. सुनावणी एकुण ४० दिवस म्हणजे १६ ओक्टोबर पर्यंत चालली. दिवसजिज्ञासूंपैकीकुणी उर्वरीत दिवसांच्या सुनावणीचे दुवे शोधून क्रमवार देण्यात साहाय करु शकले तर उत्तमच. तुर्तास तरी ते काम अर्धवट समजावे *** नमनाला घडाभर *** न्यायालयीन सुनावणींच्या प्रत्यक्ष प्रक्षेपणांना सर्वोच्च न्यायालयाची अनुकूलता नसली तरी न्यायालयीन सुनावणी आणि प्रक्रीयांचे पारदर्शक समतोल असे प्रत्यक्ष वृत्तांकन / विवेचन शक्य त्या प्रमाणात जनते समोर जावे अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने इतर केसेसच्या निमीत्ताने मागे केलेली आहे. अशा दैनंदीन सुनावणीच्या उपलब्ध वृत्तांकनांचा मागोवा या धागालेख चर्चेच्या माध्यमातून मिपाकरांपर्यंत पोहोचावा असा या धागा चर्चेचा उद्देश्य आहे. या खटल्याचे तुर्तास तरी एकतर मुख्यधारेतील माध्यमांनी प्रत्यक्ष वृत्तांकन न देता दिवसाच्या शेवटी देणे चालू आहे, शिवाय वृत्तसंस्थांच्या वृत्तांकनाचा भर हेडलाईन ग्रॅबींग हे महत्वाचे गमक असल्यामुळे न्यायाधिशांनी लिहिलेले अंतीम निकाल वाचे पर्यंत कोणतीही माहिती परिपूर्ण ठरू शकत नाही हि मर्यदा लक्षात घेऊनच ह्या चर्चेत सहभागी झाले पाहीजे . तसेही न्यायालयीन प्रक्रीया क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या असतात. निष्कर्ष घाईकरणे भावनावश होणे कायद्याचे कंगोरे नीट समजलेले नसतानाच दुसर्‍यांसमोर (मिपाबाहेर) अर्धवट विषद करून अफवांना खतपाणी जाणार नाही कायदा हातात घेण्याचे समर्थन होणार नाही याची प्रत्येकाने स्वतः बद्दल एक जबाबदार नागरीक म्हणून काळजी घेणे श्रेयस्कर असावे. ह्या धाग्यात माहिती चर्चा सहभागींच्या साठी उत्तरदायीत्वास नकार लागू हे नमुद करणे समयोचित ठरावे. *** विषय *** अज्ञेय असल्यामुळे माझी व्यक्तिगत भूमिका वस्तुतः तटस्थ आहे आणि माझ्या व्यक्तिगत भूमीकेची अंशतः मांडणी मागील एका धागा प्रतिसादातून केली आहे. त्यात मंदिरवादिंच्या भूमिकेची पुरेशी सकारात्मक दखलही घेण्याचा माझ्या परीने प्रयास केला आहे स्वतः पुरातत्व उत्खनन केलेले डॉ. के. के. मोहम्मद तसेच इतिहास अभ्यासक मिनाक्षी जैन यांच्या मंदिर समर्थनार्थ भूमिकांची दखल त्या धाग्यातील प्रतिसादातून घेतली गेली याची इथे नोंद घेणे श्रेयस्कर असावे. माझ्या दृष्टीने 'एकाचवेळी तिहेरी तलाक' विरोधी विधेयक ३७० रद्द करणे अशा सुधारणावादाच्या भिंत्ती उभ्या रहात जे सुधारणांचे अंतीम मंदिर असेल त्यात राम आपसूकच असेल. ईश्वरापुढे नत होण्यासाठी विशेष स्थळांची गरज कोणत्याही धर्मात असण्याचे कारण नाही, तशी ती इस्लाम मध्ये नाही, ब्रह्मा वीष्णू महेश गणेस ते ३३ कोटी देवतां बद्दलच्या श्रद्धा जन्मस्थान माहित नसूनही जोपासल्या जातच आहेत. अर्थात मी मागच्या धागा प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे अन्याय झाल्याचे सिद्ध होत असेल तर त्याचे परिमार्जन झाले पाहीजे. आणि पुरातत्व उत्खनन केलेले डॉ. के. के. मोहम्मद तसेच इतिहास अभ्यासक मिनाक्षी जैन यांना ऐकल्यावर पुरातत्वीय दृष्ट्या तिथे पुर्वी मंदिर असण्याची शक्यता योग्य वाटते . अर्थात न्यायालयात जमिन विषयक दावे सहसा पुरातत्वीय आधारावर नव्हे प्रॉपर्टी ओनरशीप अंशतः पझेशनच्या आधारावर लढवले जातात पब्लिक मेमरी तोंडी साक्षीं आजिबात चालत नाही असे नाही पण कागदोपत्री पुराव्यांवर अधिक भर असतो आणि सर्वोच्च न्यायालयाने खटला चालल्यास ह्या केसकडे प्रॉपर्टीकेस म्हणूनच पाहीले जाईल हे तसे पुर्वीच स्पष्ट केले आहे. मिनाक्षी जैन काही वेगळ्या बाबींकडे लक्ष्य वेधताता हे खरे असले तरी अलाहाबाद उच्चन्यायलयाचा निकाल आला तेव्हा मी बर्‍यापैकी अचंबित होतो कारण बर्‍याच वर्षांपुर्वी मी जेव्हा मासिकातील लेखात आलेल्या कागदपत्रांची माहिती घेतली तेव्हा तो जन्मभूमीवाद्यांच्या बाजूने हाती काही लागेल असे वाटले नव्हते असे आठवते. -मी राजीव गांधी अथवा लालकृष्ण अडवानींच्या जागी असतो तर केसची सुनावणी होईल हे पाहीले असते कायदेशीर दूष्ट्या भक्कम आधार नसलेल्या बाबतीत केवळ श्रद्धेवर अवलंबून राजकारण नक्कीच केले नसते, कायदेशीर आणि ऐतिहासिक दृष्ट्या अधिक सबळ पुरावे असलेल्या जागा राजकारणासाठी उपलब्ध होऊ शकल्या असत्याच किंवा किमान श्रद्धेच्या राजकारणात कायदा हातात घेतला जाणार नाही यासाठी अधिक सजग राहीलो असतो- आणि प्रॉपर्टी विषयक कागदपत्रे जन्मभूमीवाद्यांच्याबाजूने पुरेशी भक्कम नसण्याचा आत्मविश्वासामुळे विरोधीबाजूची मंडळी अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुचवूनही पड घेताना दिसत नसावीत असा माझा व्यक्तिगत कयास आहे. अर्थात पब्लिक मेमरीचा भाग आणि ततसंबंधी पुरातत्वीय पुरावे सर्वोच्च न्यायालय कितपत स्विकारेल यावर मंदीरवाद्यांचे यश अवलंबून असेल असे वाटते - आणि नेमक्या यावेळी कायदा हातात घेऊन केलेल्या पडझडीच्यावेळी मिळालेले पुरात्वतीय आधार साशंकीत म्हणून स्विकारण्यास नाईलाज दर्शवला तर कायदा हातात घेऊन झालेली पडझड योग्य होती का याचा विचारकरण्याचीही वेळ येऊ शकते नाही असे नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या अगदी कालच्या सुनावणीत श्री रामलल्ला विराजमान याचे पुजारीपण निभावण्याचा दावा असलेल्या निर्मोही आखाड्यास कागदपत्रे दाखवता आली नाहीत त्यांचे वकील श्री सुशिलकुमार जैन गोंधळलेले होते ? आणि न्यायालयाने त्यांना अधिक व्यवस्थित पुर्व तयारी करून येण्यास सांगितले. सुशिल कुमार जैनांचा भर अलाहबाद उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे समिक्षणाचा दृष्टीकोण सर्वोच्च न्यायालयाने ठेवावा कागदपत्रे मुळातून तपासण्यावर भर देऊ नये असा असावा,, पण केसचे एकुण महत्व पहाता सर्वोच्च न्यायालयीन न्यायाधिश महोदयांचा भर महत्वाच्या कागदपत्राम्ची व्यक्तिशः पडताळणी करण्यावरही भर असावा. ज्या प्रमाणे सजीव नसलेली कॉर्पोरेट कंपनी व्यक्ती समजून कंपनीच्या वतीने केस लढवता येते तसेच काहीसे मंदिरातील मुर्तींच्या नावे व्यक्ती समजून केस लढता येते तर अयोध्येत कथित रामजन्मस्थानी २०व्या शतकाच्या मध्यात अकस्मिक प्रकट झालेल्या श्रीरामलल्ला विराजमान मुर्तीचे प्रतिनिधीत्व करणारे वकील के पराशरन युक्तिवादात अधिक अनुभवी कसलेले असावेत. त्यांनी आज म्हणजे तिसर्‍या दिवशीच्या युक्तिवादात जसे मुर्तीस मुर्तीचे व्यक्ति म्हणून गृहीत धरता येते तसे एकुण विवादीत रामजन्मभूमीस सुद्धा व्यक्ती म्हणून गृहीत धरावे कारण हिंदू धर्मात केवळ मुर्तीच नव्हे तर वास्तुही दैवीशक्ती/व्यक्ती म्हणून पुजनीय असते असा नवाच युक्तिवाद मांडण्याचाचा प्रयत्न केला अशा प्रकारची टेक्निकॅलिती सर्वोच्च न्यायालयासमोर प्रथमच आल्याने न्यायालयाने पुढे विचारकरू आधी पुरावे बघू द्या हा फोकस जारी ठेवण्याचे ठरवले असावे असे वाटते, के पराशरांचाही भर लोक्श्रद्धा कायदेशीर शब्दात पब्लिक मेमरी आणि पुरातवतीय आधारांवर असेल असे कालच्या म्हणजे दुसर्‍या दिवसाचे वृत्तांकन वाचून वाटले… असो ही सुनावणी सोमवार ते शुक्रवार दररोज म्हणजे आठवड्याचे पाच दिवस होण्याची शक्यता आहे.. *** *** संवैधानिक पीठ में जस्टिस डी. वाई. चंद्रचूड़, जस्टिस एस. ए. बोबडे, जस्टिस अशोक भूषण जस्टिस एस. ए. नजीर लेखन चालू *** सोशल मिडीया वापरताना माहिती पडताळण्याची काळजी घ्या *** खात्रीपुर्वकतेची कल्पना नाही * ट्विटर टेग्स : #AyodhyaHearing , #AyodhyaCase * ट्वितर हँडल्स : @LiveLawIndia , @TheLeaflet_in ***मागिल चर्चा संदर्भ आणि बाह्य दुवे *** * https://barandbench.com/ayodhya-live-updates-supreme-court-day-1/ * https://barandbench.com/ayodhya-hearing-live-updates-supreme-court-day-… * दिवस ५ वा uniindia दिवस ५ वा लाईव्ह लॉ ट्विटर हँडल * https://en.wikipedia.org/wiki/Ayodhya_dispute विकिपीडियातील सर्व नोंदी विश्वासार्हच असतील याची खात्री देता येत नाही याची नोंद घ्या. *** *** हिंदूबाजूच्या मांडणीत ससंदर्भ मुद्देसुद मांडणी अभावानेच दिसते. मीनाक्षी जैनांच्या शिवाय hritambhara.com/ वरील स्मीता मुखर्जींचा प्रयत्न त्यातल्या त्यात बरा वाटतो. त्यांच्या लेख मालेच्या आतापर्यंतच्या आठ भागांचे दुवे जिज्ञासूंसाठी देऊन ठेवत आहे. , , , , , , , *** अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे , मराठी शुद्धलेखन व्याकरण चर्चा व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी शक्यतोवर ससंदर्भ आणि कायद्यास अनुसरून चर्चा करण्यासाठी अनेक आभार.

वाचने 52061
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

निकाल आला. स्वागतार्ह निकाल.

पाच न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने हा निकाल एकमुखाने दिलेला आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे याविरुद्ध पुनर्विचार याचिका करणे मुस्लिम वैयक्तिक कायदा बोर्डाला फार कठीण जाणार आहे.

In reply to by शाम भागवत

पण पूर्णपीठ म्हणता येईल की नाही ते सांगता येत नाही. आत्तापर्यंतचे सगळ्यात मोठे पूर्णपीठ १३ न्यायमूर्तीचे होते.

In reply to by सुबोध खरे

पाच न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने हा निकाल एकमुखाने दिलेला आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे याविरुद्ध पुनर्विचार याचिका करणे मुस्लिम वैयक्तिक कायदा बोर्डाला फार कठीण जाणार आहे. -- कृपया याबद्दल थोडे सविस्तर सांगा.

न्यूज १८च्या या दुव्यावर मूळ निकालाची प्रत दिल्याचे दिसते आहे. - सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर उपलभ होऊन खात्री करण्यास करण्यास वेळ लागेल क्लरीकल मिसटेक असल्यास त्या दुरुस्ती सुद्धा काही दिवसात केल्या जातात निकाल मोठा असणे सहाजिक आहे माझे न्यूज १८च्या या दुव्यावर मूळ निकालाची प्रतचे वाचन सुरु करत आहे.

माहीतगार, राम मंदीर होउ नये ह्या उद्देश्याने डाव्या विचारवंतांनी ईतिहासकारांचा वेष धारण करुन विवादीत जागेवर राम मंदिर कधी नव्हतच असा शपथेवर अहवालमा कोर्टाला सादर केला होता. राम मंदिरला विरोध ह्याचा अर्थ हिंदु समाजाला विरोध तसेच मुस्लिमांचे तुस्टिकरण. असा काय अपराध घडला हिंदु कडुन ? मुळात हिंदु असलेल्या डाव्यांना हिंदु समाजाची ईतकी एलर्जी का ?

In reply to by डँबिस००७

डँबिस००७, डावे आणि हिंदू? शक्यंच नाही. ते केवळ जन्महिंदू आहेत. आ.न., -गा.पै.

लोकहो, न्यायालयाचा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. रामजन्मभूमी पूर्णपणे हिंदूंच्या ताब्यात येण्यात इस्लामचंही हित दडलं आहे. गैरइस्लामी प्रार्थनास्थळाच्या जागेवर मशीद बांधणे हा इस्लामचा घोर अवमान आहे. त्यामुळे सच्च्या मुस्लिमांनी या निकालाबाबत आनंद व्यक्त करायला हवा. हिंदू व मुस्लिमांत भांडणं लावून देणाऱ्या कळलाव्यांची मात्र या निकालामुळे चडफड होईल. या कळलाव्यांपैकी एक म्हणजे ऑल इंडिया बाबरी मशीद अॅक्शन कमिटी. हिचा काहीच आगापिछा लागंत नाही. हिचा अध्यक्ष कोण आणि हिला पैसा कुठनं मिळतो यावर काहीच माहिती मिळंत नाही. हा बहुधा एक नक्षल गट असावा. त्याची चडफड होणार हे पाहून मनास आनंद वाटतो. शिया मुस्लिम उघडपणे राममंदिराच्या बाजूने होते. या निर्णयान्वये तर सुन्नीदेखील राममंदिर तोडग्यात सामील होतील. अशा रीतीने राममंदिर हा एक संघटनकारी विषय बनला आहे. जय श्रीराम! आ.न., -गा.पै.

लबरेज़ है शराबे-हक़ीक़त से जामे-हिन्द । सब फ़ल्सफ़ी हैं खित्ता-ए-मग़रिब के रामे हिन्द ।। ये हिन्दियों के फिक्रे-फ़लक उसका है असर, रिफ़अत में आस्माँ से भी ऊँचा है बामे-हिन्द । इस देश में हुए हैं हज़ारों मलक सरिश्त, मशहूर जिसके दम से है दुनिया में नामे-हिन्द । है राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज़, अहले-नज़र समझते हैं उसको इमामे-हिन्द । एजाज़ इस चिराग़े-हिदायत का है , यहीरोशन तिराज़ सहर ज़माने में शामे-हिन्द । तलवार का धनी था, शुजाअत में फ़र्द था, पाकीज़गी में, जोशे-मुहब्बत में फ़र्द था । :- Sir Mohammed Iqbal

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ram Ram Bhajan | Baby Niranjana and Baby Bhakti Hiranmayi |

सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पुर्नविचार याचिका दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम वैयक्तिक कायदा बोर्ड याविरुद्ध पुर्नविचार याचिका दाखल करू शकते का हा मुद्दा आहे( कारण मूळ याचिका कर्त्यात त्यांचे नाव नाही). या सर्व वादात एक फार महत्त्वाचे नाव विसरले जाते आहे ते म्हणजे डॉ सुब्रमण्यम स्वामी. अयोध्या जमीन वादात १९५० साली फैजाबाद न्यायालयात खटला चालू झाला त्याचा निकाल फेब्रुवारी १९८६ साली लागून न्यायालयाने हिंदूंना मूर्तिपूजेची परवानगी दिली. यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने १९८९ ऑगस्ट मध्ये स्थगिती दिली. याची सुनावणी २००२ मध्ये चालू होऊन ३० सप्टेंबर २०१० मध्ये लखनौ खंडपीठाने निकाल देऊन जागेचे त्रिभाजन करण्याचा निर्णय दिला होता. त्याला मे २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. आणि हे प्रकरण प्रलंबित होते. २१ मार्च २०१७ मध्ये डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी हे प्रकरण लवकर सुनावणीसाठी घ्यावे असा अर्ज केला आणि यानंतर हे प्रलंबित प्रकरणाचे गुऱ्हाळ परत सुरु झाले. डॉ सुब्रमण्यम स्वामी याना या प्रकरणात हात घालू नका म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असले तरीही त्यांच्या याचिकेमुळे हे प्रकरण परत सुरु झाले हि वस्तुस्थिती आहे.https://www.youtube.com/watch?v=U-jEqdI5sPU अन्यथा हे प्रकरण किती रेंगाळले असते ते माहिती नाही. यात सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई यांनी रोजच्या रोज सुनावणी घेऊन स्वतः पूर्णपीठाचे मुख्य असताना विशिष्ट कालावधीत निकाल देण्याचे असामान्य धैर्य दाखवले हि वस्तुस्थिती. अन्यथा अशा वादास्पद गोष्टींना पुढची तारीख देत राहणे असेच बरेच न्यायाधीश करत आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री सीरियाक जोसेफ यांनी १०० च्या वर खटल्याची सुनावणी केली परंतु त्याचा निकाल "राखून" ठेवला आणि आपण बढतीवर सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर या सर्व खटल्यांची पुन्हा सुनावणी करावी लागली The Attorney General said he was actively practising in the Delhi High Court when Justice Joseph was a judge and had argued before him. He can say that he did not deliver the judgements in over 100 of matters in which verdicts were reserved by him, he claimed. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/47737129.cms?from=mdr&utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst बहुतेक पत्रकार त्या दोघाना याचे श्रेय देण्याचे वस्तुतः टाळत आले आहेत असे बहुसंख्य दुव्यात दिसून येते आहे.

न्यायालयाने निकाल दिला त्याचा सन्मान करून .. भव्य मंदिर आणि जिथे जागा मिळेल तिथे भव्य मशित सर्वांनी मिळून उभरा .. भावनिक प्रश्न जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नाही . बोध्द पण म्हणतात आमची जागा . 21 व्य शतकात ही फालतुगिरी बंद करून . देश आर्थिक,लष्करी,आरोग्य,न्याय ,नीती ह्या मध्ये top ला घेवून जा . राम,रहीम,बुध्द,येशू,सर्व एकाच ईश्वराची नाव आहेत. मुर्खासारखे वागू नका

Bc पूर्व 7000 वर्ष पेक्षा जास्त आयुष्य कोणत्याच धर्माचे नाही .. ईश्वर आहे (मानवाला उत्क्रांत ज्यांनी केला तो) हे सत्य आहे. पण हे धर्म मानव निर्मित आहेत. गट वेगवेगळे आहेत . त्यांची प्रगती सामान नाही.. प्राचीन काळ आता पेक्षा प्रगत असू शकतो. हे सर्व सत्य असेल. आता22 ब्यां शतकात प्रवेश करताना ईश्वराला नाकारून चालणार नाही . मानवी बुध्दी हॅक करणे बुध्दी मान alien ( ईश्वर) ह्यांना काहीच अवघड नाही. त्या मुळे मानव अजुन कसा सुखी होईल हे ध्येय ठेवा . बाकी गोष्टी निरर्थक आहेत

In reply to by माहितगार

माहितगार, न्यायमैथुनात माझ्यासारख्या भक्ताला फारसा रस नाही. या न्यायालयाने सोडवायचा प्रश्न नसून यावर राजकीय तोडगा अपेक्षित आहे. खुद्द न्यायालयाचंही हेच म्हणणं होतं. केवळ राजकीय अनिच्छेमुळे न्यायालयाला हा प्रश्न हाती घ्यावा लागला. आ.न., -गा.पै.

In reply to by माहितगार

१०४५ पानी निकाल पत्र आपण तरी संपूर्ण वाचलंय का? यात ९२९ पाने निकाल सरन्यायमूर्ती श्री रंजन गोगोई यांनी लिहिला आहे आणि बाकी ११६ पाने दुसऱ्या न्यायाधीशांनी निकाल मान्य करताना पण वेगळ्या करणमीमांसेमुळे असे लिहून दिली आहेत. एवढे विस्तृत आणि मुद्देसूद लेखन दिलेल्या कालावधीत पूर्ण करून स्वतंत्र भारतातील अत्यंत वादग्रस्त परंतु राजकीय कारणांसाठी रेंगाळलेल्या खटल्याचा निर्भयपणे निकाल दिल्या बद्दल सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावे लागेल.

In reply to by सुबोध खरे

वरच्या प्रतिसादात निकालाचा दुवाही मीच दिला त्यात वाचन चालू केल्याचेही लिहिले; मिपावर विविध न्यायालयीन निकालांचे मूळातून वाचन करणार्‍या अत्यल्पसंख्यांकातला मी आहे या बद्दल एवढा काळ मिपावर सोबत काढून आपण शंका व्यक्त करु शकता याचे कौतुक वाटते. दैनंदीन सुनावणी दुवेही मीच (बरेच दिवस) शेअर केली. आळस आहे तर आहे तो कबुल करण्यास लाज का असावी? दैनंदीन सुनावणी आणि निकाल पूर्ण वाचले तर घरभेदी असोत अथवा ओवैसी टाईप असोत त्यांच्या अपप्रचाराला व्यवस्थीत तोंड देता येते ते नाही केले तर आळस आज ना उद्या भोवतो. माहित नाही हिंदूत्व वादी कोणत्या विश्वात जगतात? या निकालाचे विश्लेषण करून अपप्रचाराला तोंड देणे, अशा इतर न्याय न मिळालेल्या मंदिरांबाबत या निकालाच्या संदर्भाने मत व्यक्त करणे हि जबाबदारी स्वतः हिंदूत्ववाद्यांची नाही का ? असे प्रश्न विचारण्यास भाजपायी अथवा संघीष्ट नसलेल्यांना का यावे लागते ? हिंदूंना आळस गेली हजारवर्षे भोवत आला आहे कुणि स्पष्टपणे सांगितले तर सरसक्ट विरोधकात बेरीज करून आपल्यांनाही परके करणे हा हिंदूत्ववाद्यांचा दुसरा गुण असो.

In reply to by माहितगार

मागे राफाल च्या बद्दल मोठ्या तोंडाने काथ्याकूट करणारे मोदीद्वेष्टे याना राफाल निकालाबद्दल पण मी अशीच शंका उत्पन्न केली होती कि १४० पानी निकाल मुळात किती लोकांनी वाचला आहे? १०४५ पानी निकाल सुद्धा हजारात एखाद्यानेच संपूर्ण वाचला असल्याची शक्यता आहे. ज्यांनी निकाल वाचला असेल असतील बहुसंख्य लोकांनी त्याचे ९२५ ते ९२९ पानांवरील या निकालाचा सारांश वाचला असावा . हे निकालपत्र न्या चंद्रचूड यांनी लिहिले असून ९२९ ते १०४५ हि पाने वेगळ्या न्यायाधीशांनी लिहिलेली आहेत. त्यात त्यांनी निकालाशी सहमती दर्शविताना कारणमीमांसे साठी वेगळा निवाडा दिल्याचे म्हटले आहे. आपण जर हा निकाल पूर्ण वाचला असेल तर आपल्याला मनापासून साष्टांग दंडवत आणि आपली मनापासून क्षमायाचना. कारण हा फार विस्तृत आणि प्रचंड अभ्यास करून लिहिलेला निकाल आहे आणि पहिल्या १२० पानातच माझे डोळे गरगरले आहेत. अजून पुढचा ९० % भाग वाचायचा राहिला आहे.

मुस्लिम जे आहे ते बिंदास्त मांडतात ..दिलदार विरोधक आहेत. पण हे डावे,पुरोगामी नालायक लोक खरे दुश्मन आहेत ह्या देशाचे .

प्रार्थना स्थळा पेक्षा किंवा पुतळ्यांपेक्षा दवखाना शाळा व्हावी या मताचा जरी असलो / अंधश्रेढीचं विरुद्ध असलो तरी हा निर्णय योग्य आहे असेच म्हणावे लागेल कारण भारताच्या इतिहासात "मूर्तिभंजकांनी" देवळे पडल्याची भरपूर उद्धरणे आहेत, त्यातीलच हा एक भाग , हिंदूंना त्यांचं स्वतःच्या देशात न्याय हा मिळाला पाहिजे यात काय गैर? दुसरे असे कि .. वर्षनुवर्षे काँग्रेस ने हे भिजत घोंगडे ठेवले , " अल्पसंख्याकांना काय वाटेल" हे कारण देऊन याचाच राग म्हणून माझ्यासारखेच फारसे धार्मिक नालेलेल लोक सुद्धा आत " होऊनच जाऊदे मंदिर" या निर्णयापर्यंत आले का? कारण काँग्रेस चा "ढोंगी " सर्वधर्मसमभाव तसेच अति दाव्याची स्वतःच्या संस्कृती/ देशाबद्दल बद्दल असलेली घृणा . आरे जगात इस्लाम आणि क्रिस्टी सत्ते साठी झगडत आहेत मग हिंदूंनी/ ( शीख जैन यात आले) स्वतःच्या अस्तित्वासाठी का आवाज उठवू नये? मान्य आह एकी गरिबी हटाव हे जास्त महत्वपूर्ण आहे पण सतत जर तुम्ही हिंदू शब्दातला ह जरी कानावर पडला तर विचू अंगावर पडल्यासारखे किंचाळा लागलात तर माझ्यासारखा नॉन प्रॅक्टिसिंग हिंदू पण वैतागतो आणि म्हणतो .. पुरे झालं बरखा दत्त, रवीशकुमार, महेश भट्ट, अरुंधती रॉय, कमला हसन आणि तमाम अवॉर्ड वापसी ग्यांग यांची याबाबत ची विधान ऐकली कि वैतागून असे म्हणावेसे वाटते कि ओवेसी परवडले पण हे घरभेदी नकोत

In reply to by पॅट्रीक जेड

पॅट्रिक अमरेंद्र बाहुबली जेम्स यांना , दोन्ही प्रतिसादांना हा एक प्रतिसाद राम मंदिर बांधण्यात भ्रष्टचार झालला हा फार मोठाच आरोप आहे आणि त्याला खुद्द मोदी जबाबदार? ,,,,, संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल. बांधकाम कंत्रादाराने काम नीट केलं नसेल समंजू शकते , त्यावर टीका करा हववे तर असो असुरी आनदं घेत बसा आता राहता राहिला दुसरे विधान" ऑस्ट्रेल्यात होते का हो...." अर्रेरे संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल. .. " शुद्ध हेतूने विचारले असतेत तर नीट सांगितले असते "ऑस्ट्रेल्यात काय होते किंवा नाही ते प्रत्येक बाबतीत मी काही लिहिले कि कुठलं देश हे काधायचे हा बालिश पना थांबवा ऑस्ट्रेल्यात भारता एवढीच पटीने पेट्रोल ची महागाई झाली आहे ( मोदीच असावेत जबादार ) ऑस्ट्रेल्यात सरकारी पातळीवर भ्रस्टाचार होतो ( मोदीच असावेत जबादार ), उघडकीला येतो हि , सर्वसामान्य पातळीवर जवळ जवळ नाही , याउपर ऑस्ट्रेल्यात काय होते बसलाय बालिश प्रश्नाला xxxxxxx येईल संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल. -व्यवस्थापन

In reply to by चौकस२१२

>>>> अर्रेरे प्रोफेश्वरांची लागण झाली तुम्हाला... अरे देवा...झाली का आमची आठवण. संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल. -व्यवस्थापन -दिलीप बिरुटे

In reply to by चौकस२१२

मागच्या दहा वर्षात बदललं नाही. पुढे कधी बदलेल हे माहित नाही. भ्रष्टाचार, मस्तवालपणा तेवढा सर्व सीमा पार करतोय. मग कोणत्या एवढ्या आवेशाने तुम्ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांची पाठराखण करीत आहात? संपादित. -व्यवस्थापन

In reply to by पॅट्रीक जेड

सामान्य माणूस ते देश परदेशातील मिळून जवळपास पाच हजार कोटी राम मंदिरासाठी देणगी जमा झाल्याचे वाचनात आले. इतका गाजावाजा आणि रामलल्लाचा जो राजकीय इव्हेंट करण्यात आला ते पाहता रामलल्लाला मंदिरात स्थापन करण्याची घाईच झाली त्यात काही वाद नाही. सामान्य माणसाचे घर जरी असले तरी ते गळत तर नाही ना,हे पाहुन घर अगदी राहण्यायोग्य जो पर्यन्त होत नाही, तो पर्यन्त सामान्य माणूस वास्तू प्रवेश करीत नाही. इथे तर थेट हजारो-लाखोंच्या श्रद्धाळुच्या आस्थेचा प्रश्न असलेल्या प्रभु रामाचा प्रश्न होता. काल पहिल्याच पावसात छत गळायला लागलं. मुख्य मंदिरात पाणी साचलं त्याचा निचरा व्हायची व्यवस्था नाही, बांधकामात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप मुख्य मंदिरपुजारी दास यानी केला. बळजबरी राहावयास गेलेल्या रामलल्लाने जी काय नाराजी दाखवायची ती निकालाच्या माध्यमातून दाखवली. अजुन मंदिराचे काम सुरु आहे, किंवा राहिले असेल काम नीट-नेटकेपणाने व्हायला हवे तशी अपेक्षा भक्त आणि सामान्यांनी करणे गैर नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रभू श्रीरामानी घाईघाईत उद्घाटन केल्याची नाराजी लोकसभा निवडणुकीत दाखवली. आता ह्या मंदिर गळतीची नाराजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दाखवतील. जय श्रीराम.

In reply to by पॅट्रीक जेड

मग त्याच प्रभू रामाने एका पक्षाची गाडी ९९ वर थांबवली आणि एक पक्षाचे २४० तर भेळेचे मिळून २३५ अशी समज पण समाजाला दिली ..हे हि उघड पने कुठलेही आढेवेढे ना घेता मान्य करा! पुढील ५ वर्षे तरी (खरी जळतोय कुठे कि, हे मंदिर झालेच कसे ? त्यातून हा पक्ष सत्तेवर आलाच कसा+ १० वर्षे टिकलाच कसा आणि + सगळं काही करून परत सत्तेत आलाच कसा ?? )

In reply to by चौकस२१२

ईडी, सीबीआय, इंकम टॅक्स, इलेक्टरल बाँड्स, विरोधकांचे अकाऊंट गोठवणे, भ्रष्टांची खोगीरभरती, प्रचंड पैसा, अर्धवट मंदिर उद्घाटन असूनही फक्त २४० तर काहीही नसताना ९९ जागा. असा न्याय केला प्रभू श्रीरामचंद्रानी.

In reply to by पॅट्रीक जेड

तर काहीही नसताना ९९ जागा. मिया गीर येतो भी टांग उपर ९९ हे २४० पेक्षा भारी हे कुठले गणित बसा घोळवत २०१४ आधीची पापे विसरलात काय?

In reply to by चौकस२१२

३०३ चे २४० जळवले मोठे की ४४ चे ९९ झालेले?? २०१४ आधीची पापे विसरलात काय? आय आयटी, आयआयएम कॉलेजेस, मारुती कंपनी, बँकांचे राष्ट्रीयकरण, पाकिस्तानचे दोन तुकडे, अणुबॉम्ब, उदारीकरण,राईट टू एदुकेशन, राईट टू फूड आणखी किती पापे सांगू?

In reply to by पॅट्रीक जेड

आयआयटी, आयआयएम बद्दल चंद्रसूर्यकुमार यांनी आधीच लिहिले आहे, ते वाचा. मी द्विरुक्ती टाळतो. बँकांचे राष्ट्रीयकरण - ज्याचे पैशांवर नियंत्रण त्याच्यासाठी सत्ता मिळवणे सोपे. बँकांचे राष्ट्रीयकरण याचा देशाला जितका फायदा झाला (नक्की काय फायदा झाला हा प्रचंड विवादास्पद मुद्दा आहे, बहुतेक तोटाच झाला) त्याहून जास्त त्या काळाच्या तथाकथित गुंगी गुडियाला जुन्यांना डावलून सत्तेवरची मांड, पकड मजबूत करायला मदत झाली. उदारीकरण - हे गांधी परिवारापेक्षा राव यांचे योगदान आहे, तेच राव ज्यांचे उघडपणे नाव कोणीही काँग्रेसवाला घेत नाही, घेऊ शकत नाही. मला जरी राव यांची कारकीर्द पूर्ण आठवत नसली तरी बहुतेक भारताला लाभलेले सर्वोकृष्ट पंतप्रधान तेच असतील असे वाटते. ज्या परिस्थितीत मोदी सत्तेवर आले त्या परिस्थितीत राव सत्तेवर आले असते तर एखाद्यावेळेस त्यांनी मोदींहून जास्त चांगले काम केले असते. पाकिस्तानचे दोन तुकडे - हे परत विवादास्पद आहे. शत्रूची जखम भळभळती राहण्यात आपला फायदा असतो. इकडे आपणच शत्रूचे ऑपेरेशन स्वतःच्या पैशाने करून दिले. उलट काहीही न घेता (जसे काश्मीर, आपले सैनिक जे युद्धकैदी होते - निदान हे तरी परत आणायला पाहिजे होते) आपण पाकिस्तानचे युद्धकैदी परत दिले. खरंतर १९७१ ला सैनिकी विजय झाला पण राजकीय पराजय झाला. तरीही आज ५५ वर्षांनी बोलणे सोपे आहे, त्या काळी काय परिस्थिती होती, काय अजून पर्याय होते हे माहीत नसल्याने इंदिरा गांधींच्या गट्स बद्दल आणि सुरवातीच्या आंतरराष्ट्रीय व्यूहाबद्दल त्यांना गुण द्यायला हरकत नसावी. त्यांचे अंध विरोधक सोडले तर बहुतेक सगळेच जण हे मान्य करतील. राईट टू एदुकेशन - माझ्या आठवणीप्रमाणे साहाना यांनी मिपावर याबद्दल विस्तृत लिहिले आहे, त्यामुळे परत द्विरुक्ती टाळतो तर कृपया जर चुकून काही चांगले केले असेल तर त्याचा वापर करून समर्थन करा. असल्या फालतू गोष्टींनी नका करू. आणि जर आठवत नसतील तर वाचन वाढावा किंवा निष्पक्ष लोकांना विचारा. काँग्रेस काळातही काही चांगल्या गोष्टी झाल्या पण आश्चर्य आहे की ज्या खरंच चांगल्या गोष्टी केल्या त्या कोणी का नाही बोलत? परत एकदा विनंती, एकांगी नका लिहू

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुन मंदिराचे काम सुरु आहे, किंवा राहिले असेल काम नीट-नेटकेपणाने व्हायला हवे तशी अपेक्षा भक्त आणि सामान्यांनी करणे गैर नाही. अगदी मान्य बळजबरी राहावयास गेलेल्या रामलल्लाने जी काय नाराजी दाखवायची ती निकालाच्या माध्यमातून दाखवली. या शेरेबाजी ची काहीच गरज नाही ... असो एकूण काय चुका दाखवयाला दोन पाऊले पुढे असता तुम्ही पण कौतिक कार्याची कधीच दानत नाही ३ ऱ्या वेळेला पूर्ण लोकशाही मार्गाने निवडून आलेलया पक्षाचे राजय मान्य करा .... आणि हो जाता जाता तुम्ही "ऑस्ट्रेल्यात कस काय होते" हे विचारण्यासाधीच सांगतो इथे आम्ही कसेही मतदान झाले तरी एकदा उजवे एकदा डावे आलटून पालटून राजय करतात ते जनता गोड मानून देश चालत राहतो ... आजच बघा आमचं डाव्या विचारसरणी च्या पंतप्रधांनी ज्युलियन असांज या अमेरिकेचं दृष्टीने देशद्रोही असलेलया पत्रकाराला १४ वर्षांनंतर सोडून आणले अमेरिकेचं जबड्यातून ऑस्ट्रेल्यात नागरिक म्हणून , त्यात विरोधी उजव्यानी बिब्बा घातलं नाही .. मोदींनी पाकिस्तानातून कोणाला सोडवून आणले तर विरोधक मात्र रडीचे राजकारण खेळतात .... घ्या

पहिली गोष्ट आंधळे पनाणे प्रत्येक गोष्टीचे समर्थन करीत नाहीय अजिबात ,, चूक ती चूक अचंबा याचा वाटतो ( सभ्य शब्दात ) - तुम्चे सारखे फक्त चुका काढण्यात च धन्य मानतात - लोकशाही ने दिलेला तिसरा कौल पण मान्य कार्याची कुवत नाही तुमचात , - तसेच १० वर्षांपूर्वी कीवा पुढील १००० वर्षे कधीच काँग्रेस आणि डावखुर्यांच्या शिया कोणीच सत्तेत आले हेच तुम्हाला खपत नाही - त्याआधी ५० वर्षे तरी किँग्रेस ने आगमय चुका केल्या तेव्हा कुठे होता , एकीकडे मोदींना हुकूमशाह म्हणताना ७५ साली भारतात एकमेव हुमशाही आली ते विसरता .. आज एकदम "भ्रष्टाचार, मस्तवालपणा तेवढा सर्व सीमा पार करतोय." अरे पण परवाच ९९ आले ना आणि तोरा काय तर स्वतः २७२+ जमवले - राष्ट्रीय सुरक्षे बद्दल पक्ष हित बाजूला ठेव्वयचे असते पण तिथे हि " आपण विधवा झालो तरी हरकत नाही पण सवाट रंडकी झाली पाहिलेज या साठी नवऱ्याला मारलेले चालेल" हि घृणास्पद वृत्ती + नेहरू कुटंबाची "पाठराखण" किती वर्षे करणार तुमच्या सारखे ..

In reply to by चौकस२१२

अस्स? म्हणजे पंप्र जे काही करतील किंवा जे काही होईल ते चांगलेच असं समजायचं?
  • श्रीनगरला लष्करी तळावर हल्ला. मोठ्या प्रमाणावर भारतीय सैन्याची जीवित हानी. तळावर गस्त जवळपास नव्हतीच अशा पद्धतीने बेसावधपणे शत्रूने गाठले.
  • पठाणकोट येथे उभ्या विमानांच्या ताफ्यापासून थोड्याच अंतरावर अतिरेक्यांना थोपवण्यात यश. ज्या पोलीस अधिकाऱ्याची सरकारी जीप अतिरेक्यांनी पळवली त्याच्या चौकशीची कोणतीही माहिती जनतेला नाही.
  • पुलवामा हल्ल्यासाठी मोठ्याप्रमाणावर आरडीएक्सची आयात. हवाला रॅकेट आणि अतिरेक्यांचे कंबरडे मोडले अशा वल्गना करूनदेखील ही परिस्थिती.
तुमचं बरं आहे. संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल. -व्यवस्थापन आणि गांधी नेहरु यांच्या विषयी कोणी कितीही घाणेरडी कमेंट केली तरी आम्ही त्याने दुःखी होत नाही. तुमचे पंप्र जे आयतं विकून खातायत ना ते गांधी नेहरूंनी मिळवलं आहे.

In reply to by सर टोबी

सर टोबी,
तुमचे पंप्र जे आयतं विकून खातायत ना ते गांधी नेहरूंनी मिळवलं आहे.
मोदी आयतं खातात, असं म्हणता? हा आरोप कुठलाही विरोधी पक्ष कितीही कट्टर विरोधक असला तरीही करीत नाही. बहुधा गांधीनेहरूंनी काहीच मिळवलेलं दिसंत नाहीये. -नाठाळ नठ्या

लोकहो, राममंदिरास गळती लागल्याची बातमी निराधार आहे. काही भागाचे काम चालू असल्याने सदर प्रकार तात्पुरता जलनिचरा आहे. संबंधित बातमी :
.... मिश्रा यांना विचारणा करण्यात आली. छताला गळती लागल्याचा आरोप त्यांनी पूर्णत: फेटाळला. अद्याप राममंदिराचे निर्मितीकार्य पूर्ण झालेले नाही. त्यामुळे छतावर उघड्या राहिलेल्या विद्युत तारांच्या पाईपांमधून पावसाचे पाणी आत आले होते. तथापि, संपूर्ण निर्मितीकार्य पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा एक थेंबही आत येऊ शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. निर्मितीकार्य करताना गुणवत्तेशी तसूभरही तडजोड करण्यात आलेली नाही. रुरकी येथील आयआयटी महाविद्यालयाचे तज्ञ वास्तूविशारद राम मंदिराच्या निर्मितीकार्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवीत आहेत. कोणत्याही प्रकारच्या दुर्लक्षाला येथे स्थान नाही. काही हितसंबंधी लोक हेतुपुरस्सर समाजात भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांचे हे प्रयत्न विफल ठरतील. हे राममंदिर वास्तूनिर्मितीकार्याचे आदर्श उदाहरण ठरणार असून पुढील एक सहस्त्र वर्षे ते अबाधित राहील, अशा प्रकारे त्याची वास्तूरचना करण्यात आली असून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचा भक्कमपणा आपोआप सिद्ध होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले
-नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

हा मिश्रा चालू माणूस दिसतोय. गळतीचे व्हिडीओ व्हायरल झालेत तरीही हा खोटारडा बेधडक खोटे बोलत सुटतोय. हिंदूंचं दुर्दैव की असे खोटारडे नराधम समितीच्या पदावर आहे. अश्या नराधमास नी त्याला ह्या पदावर बसवणाऱ्या मोठ्या नराधमास चपलेने बडवायला हवे.

पहिल्या पावसात अयोध्येतील ८५० कोटी रुपये खर्चून बनवलेला रामपथ १५ ठिकाणी खड्डे पडून धसलाय. तीन चाट इंजिनिअर सस्पेंड करुन योगी सरकार आपला भ्रष्टाचार लपवायचा प्रयत्न करतंय. रेल्वे स्टेशन बस स्टँड पाण्याखाली गेलेत. एकंदरीत योगी सरकार आणी भाजपची पोल खुललीय.

In reply to by पॅट्रीक जेड

अहो, पाऊस म्हटला की पावसात खड्डे पडायचेच. थोडं लिक बिक व्हायचंच. आता तुम्ही लोकांनी निवडून दिले असते तर, खड्डे बिड्डे भरले असते. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा. हाथरस ला पण त्यामुळेच सुरक्षा दिली नसावी योगीने. मरा साल्याहो. आम्हाला मते देत नाही ना

In reply to by पॅट्रीक जेड

मनोरंजक प्रतिसाद... हाथरस हादसा कब और कैसे हुआ?: बाबा के पंडाल में पहुंचने से लेकर भगदड़ तक, सिलसिलेवार ढंग से पूरा घटनाक्रम https://www.amarujala.com/uttar-pradesh/hathras-accident-know-how-accid… ------ नलोड करें होम उत्तर प्रदेश लखनऊ वाराणसी गोरखपुर मेरठ कानपुर आगरा नोएडा प्रयागराज अलीगढ़ झांसी बरेली गाजियाबाद मुरादाबाद मथुरा अमरोहा अमेठी अम्बेडकरनगर आजमगढ़ इटावा उन्नाव एटा औरैया कन्नौज कुशीनगर कौशाम्बी ग़ाज़ीपुर बस्ती गोंडा बहराइच लखीमपुर खीरी घाटमपुर जालौन चंदौली चित्रकूट पीलीभीत देवरिया फतेहपुर फर्रुखाबाद फ़िरोज़ाबाद अयोध्या बदायूं बलरामपुर बलिया बांदा बागपत बाराबंकी बिजनौर बुलंदशहर भदोही मउ महराजगंज महोबा मिर्ज़ापुर मुज़्ज़फरनगर मैनपुरी रायबरेली रामपुर ललितपुर शामली शाहजहांपुर श्रावस्ती संत कबीरनगर संभल सहारनपुर सिद्धार्थनगर सीतापुर सुल्तानपुर सोनभद्र हमीरपुर हरदोई हाथरस हापुड़ जौनपुर Vegetable CRPF Khabron Ke Khiladi Juhi Chawla Lisa Nandy Agniveer Death यूपी का मौसम Gujarat Rohini Acharya Paris Olympics हाथरस हादसा कब और कैसे हुआ?: बाबा के पंडाल में पहुंचने से लेकर भगदड़ तक, सिलसिलेवार ढंग से पूरा घटनाक्रम अमर उजाला नेटवर्क, नोएडा Published by: आकाश दुबे Updated Fri, 05 Jul 2024 01:40 PM IST विज्ञापन सार पुलिस व प्रत्यक्षदर्शी 2 जुलाई से ही घटना के लिए लाठी-डंडे वाले सेवादारों व सुरक्षागार्डों को जिम्मेदार मान रहे हैं। अगर वे रोकटोक न करते, धक्का मुक्की न करते तो शायद इतनी बड़ी घटना न होती। उत्तर प्रदेश फटाफट: पढ़ें सभी खबरें 60s में Hathras Accident know how accident happened complete incident in one click Hathras Accident - फोटो : अमर उजाला Follow Us विज्ञापन विस्तार वॉट्सऐप चैनल फॉलो करें हाथरस के सिकंदराराऊ के फुलरई मुगलगढ़ी गांव में 2 जुलाई, मंगलवार के दिन जो अमंगल हुआ शायद ही उसे कभी भुलाया जा सके। भगदड़ में 121 लोगों की जान गई, जिनमें ज्यादातर महिलाएं हैं। कई लोग घायल हो गए। घटना के बाद लोगों में दर्द है तो आयोजकों की लापरवाही पर गुस्सा भी। जिस आयोजन के लिए 80 हजार लोगों की अनुमति ली गई, वहां पर 2.50 लाख से अधिक लोग आ गए थे। यह हादसा कब और कैसे हुआ? इस हादसे के पीछे कौन गुनहगार हैं? अब तक पुलिस कार्यवाई कहां तक पहुंची है? आइए जानते हैं इन सवालों के जवाब। हाथरस हादसे की टाइम लाइन 2 जुलाई, 12 बजे दोपहर: सत्संग शुरू Trending Videos मंगलवार को हाथरस के सिकंदराराऊ के फुलरई मुगलगढ़ी गांव में 2 जुलाई, मंगलवार को साकार विश्वहरि बाबा उर्फ भोले बाबा का सत्संग शुरू हुआ। सत्संग में 80 हजार लोगों की अनुमति के बावजूद करीब 2.50 लाख से अधिक लोग आ गए। विज्ञापन 12.30 बजे दोपहर: साकार नारायण हरि बाबा पंडाल में पहुंचे दोपहर 12.30 बजे साकार हरि बाबा पंडाल में पहुंचे और उनके पहुंचे ही भीड़ उत्साहित हो उठी। बाबा की प्राइवेट आर्मी ट्रैफिक व्यवस्था से लेकर, पानी और दूसरे इंतजाम देख रही थी। प्रत्यक्षदर्शियों के मुताबिक, सत्संग में लोगों को मोबाइल निकालने तक की अनुमति नहीं थी। जो भी व्यक्ति वीडियो बना रहा था, उस पर बाबा की प्राइवेट आर्मी लाठी बरसा रही थी। स्थानीय लोगों के अनुसार, जब बाबा का काफिला निकला तब भीड़ को रोक दिया गया। इस दौरान चरणों की रज लेने के चक्कर में अनुयायी अनियंत्रित हो गए। भगदड़ के दौरान लोग मरते रहे और बाबा के कारिंदे गाड़ियों से भागते रहे। किसी ने भी रुककर हालात को जानने की कोशिश नहीं की।