पाट्या!
जग बदलत चाललं आहे हे वाक्य मला वाटतं वेदांमध्ये सुद्धा असेल कदाचित! म्हणजे प्रत्येक पिढी हे वाक्य कधी ना कधी म्हणतच असते. मी सुद्धा त्याला अपवाद नाही. काय बदललं आहे? तर बरच काही! पण असं असलं तरी काही जुन्या गोष्टी एकदमच दिसून येतात. पण बऱ्याच गोष्टी आठवायला लागतात.
त्याच असं झालं की सध्या मला एक नवीनच छंद लागला आहे. सांगतो. पाट्या वाचायचा. मी पुण्यात राहत नाही हे आधीच सांगतो. पाट्या काही फक्त पुण्यातच आहेत असं नाही. मला दुकानांच्या नावाच्या पाट्या वाचायला आवडत आहेत कारण मी नवी भाषा शिकतो आहे. त्यामुळे इयत्ता दुसरीत जेव्हा जोडशब्द लिहायला आणि वाचायला शिकत होतो तेव्हा बाजारात गेलो की मी त्या पाट्या वाचायचो. ते सगळं परत एकदा अनुभवतो आहे.
त्यामुळे काही भन्नाट पाट्या आठवल्या आणि त्यांची गंमत सुद्धा. सुपर मार्केट, मॉल आणि ऑनलाईन शॉपिंग ह्यामुळे आता दुकानात जाणं होत नाही. पूर्वी बाजारात जाणं हा एक event असायचा. आता मॉल मध्ये जाणं असतो तसा.
बऱ्याच दुकानांमध्ये पाट्या असायच्या बहुदा एक वाक्याच्या.काही उदाहरणं म्हणजे कपड्यांच्या दुकानात असणारी हमखास पाटी फैशन की इस दौर मे गारंटी की इच्छा ना करे! आता मालक आणि गिऱ्हाईक दोघंही मराठी असताना ही पाटी हिंदीत का असायची हे त्या मालकाला पण सांगता यायचं नाही. त्यात पुन्हा फैशन हा शब्द उच्चारापेक्षा वेगळाच लिहिलेला. कुठं कुठं फ्याशन असं पण लिहिलेलं असे. माझ्या लहानपणी लेकरानी कोणते कपडे घालावेत हे १०० पैकी १०५ वेळेला आयाच ठरवायच्या. लेकरांना फक्त size समजण्यासाठी घेऊन जायचे. त्यातही स्वस्त, टिकाऊ आणि वाढत्या मापाचे ह्या तीन अपेक्षा पूर्ण करणारे कपडे लगेच निवडले जात. वाढत्या मापाचे असल्यामुळे जवळपास सगळी लेकरं ढगळ शर्ट, आतून फुगा ठेवल्या सारख्या चड्ड्या, एकाच वेळी दिड किंवा २ मुली मावतील असे फ्रॉक ह्याच अवतारात असायचे. ह्या कारणामुळे त्या पाटीला कोणीही ढुंकून वाचत नसे. उलट दुकानदाराला धमकावून, दरडावून हे कपडे ३ वर्षे तरी वापरता येतील ह्याची कबुली घेतली जात असे.
उधारी बंद, एकच भाव अशा काही निर्थरक पाट्या बऱ्याच दुकानात असत. त्यांचा नेमका कोणाला उपयोग असे हे आजही माहिती नाही. कारण त्याच पाट्या खाली बसून उधारीची वही लिहिता लिहिता मालक घासाघीस करत असत. काही काही दुकानदार थोडे जास्त Sarcastic असत त्यामुळे ग्राहक हा राजा असतो आणि राजा कधीही उधार मागत नाही असं लिहायचे.
हॉटेलात पण काही पाट्या असायच्या. आमच्या इथे नोकरांना रोज पगार दिला जातो ह्या पाटीचा कष्टंबरला काय उपयोग आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. मेन्यू कार्ड हे फारच दुर्मिळ असल्यामुळे एक मोठा बोर्ड आणि त्यावर पदार्थांची यादी हे अगदी घट्ट नातं होतं. त्या यादीत कितीही पदार्थ असले तरी जे पदार्थ तयार असतील तेच मिळतील हे महत्वाचं वाक्य असायचं. त्यामुळे ती पाटीही काही उपयोगाची नसायची. आमच्याकडे सगळे पदार्थ refined तेलात बनवले जातात, ही पाटी बरेचदा हॉटेलच्या जवळपास बाहेर उभा राहून समोसे तळणाऱ्या आचाऱ्याच्या मागच्या भिंतीवर लावलेली असायची. बाहेरील पदार्थ खाण्यास सक्त मनाई अशी पण पाटी असायची. आमच्या कॉलेजच्या जवळ असणारा जो हॉटेल मधला अड्डा होता तिथे ही पाटी होती. तिथे बसून आम्ही घरून आणलेले डबे खायचो.
डॉक्टरकडे गेल्यावर सुद्धा पाट्या असायच्या. त्यात MR लोकांना कधीही आत सोडता येणार नाही, शांतता राखा, ह्या नेहमीच्या पाट्या असायच्या. उधारी बंद ही पाटी सुद्धा मी काही दवाखान्यात पाहिली आहे.
मी पाट्या वाचण्यासाठी अधून मधून इकडल्या जुन्या मार्केट मध्ये जात असतो. तिथे अजूनतरी काही पाट्या शिल्लक आहेत पण मला नीटशा वाचता येत नाहीत. पण मला खात्री आहे की त्या तशाच पाट्या असणार. शेवटी जग कितीही बदललं तरी काही गोष्टी कुठेतरी दडून बसतात आणि शिल्लक राहतात, हे नक्की!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8310
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाट्या
लेख जुनाट नाही त्यातला काळ
In reply to पाट्या by सुरिया
"इथे १८ खालील बालकामगार काम
In reply to पाट्या by सुरिया
अशा पाट्यांमुळेच भारताचे
नॉस्टेलिजिया आवडला !
रच्याकने, इंदुरला
भारीच...मजा आली वाचून...
हाहाहा .... !
In reply to भारीच...मजा आली वाचून... by भम्पक
बांबूच बांबू?
In reply to हाहाहा .... ! by नठ्यारा
अवांतर : बांबूचे घर
In reply to बांबूच बांबू? by गवि
मुर्दे ही मुर्दे ... हमारे यहां हर किसम के मुर्दों के लिए..
In reply to बांबूच बांबू? by गवि
रिश्ते ही रिश्ते - दुल्हन वही जो पाठकजी दिलाये
In reply to भारीच...मजा आली वाचून... by भम्पक
शादी से पहिले या बाद ... मिलिये प्रो.
दिल्ली रॅगरपुरा का...
In reply to शादी से पहिले या बाद ... मिलिये प्रो. by चित्रगुप्त
रैगरपुरावाल्याचे नाव
In reply to दिल्ली रॅगरपुरा का... by कर्नलतपस्वी
प्रोफेसर -की प्रोप्रायटर?
In reply to दिल्ली रॅगरपुरा का... by कर्नलतपस्वी
प्रोफेसर की प्रोप्रायटर?
In reply to दिल्ली रॅगरपुरा का... by कर्नलतपस्वी
मस्त मजेशीर लेख! आवडला!!
छान लेख.
त्यात पुन्हा फैशन हा शब्द उच्चारापेक्षा वेगळाच लिहिलेला.>>> हिंदी भाषकांत एक विकृती असते. जिथे जातात तिथे आपली भाषा लादतातच वरून स्थानिक किंवा इंग्रजी शब्दांची नावेही बदलतात. ह्यात सर्वात जास्त बळी पडलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. कारण भाषेबद्दल इथे अतिशय बुळचट लोक राहतात. महाराष्ट्रातील अनेक शहरांची नावे हिंदी भाषिकांनी बदललीच. जसे धुळेचे धुलिया, ठाणेचं थाना, सोलापूरचे शोलापुर. काही ठिकाणी स्थानिक नावे जसे आंबेगाव चे अंबेगांव, कात्रजचे कत्राज. पण नेत्यांचीही नावे बदलली. पुण्यातल्या टिळक रोड वरील सर्वच बँकांच्या शाखांवर टिळक ऐवजी “तिलक” रोड लिहिलय. अगदी बँक ऑफ “महाराष्ट्राच्या” शाखेवरही.सहमत
In reply to छान लेख. by पॅट्रीक जेड
न सुधारणारे काही लाळघोटे
In reply to सहमत by नठ्यारा
इकडे दक्षिणेत हिंदीची जी
In reply to छान लेख. by पॅट्रीक जेड
हिंदीची जी कत्तल केली आहे
In reply to इकडे दक्षिणेत हिंदीची जी by kool.amol
महाराष्ट्राचा हिंदीशी काय संबंध?
In reply to हिंदीची जी कत्तल केली आहे by पॅट्रीक जेड
हिंदी भाषी मुलुखावर होळकर, शिंदे, पवार, आणि इतर अनेक
In reply to महाराष्ट्राचा हिंदीशी काय संबंध? by चित्रगुप्त
काका, तुमचा प्रतिसाद वाचून
In reply to हिंदी भाषी मुलुखावर होळकर, शिंदे, पवार, आणि इतर अनेक by चित्रगुप्त
फैशन की फॅशन?
In reply to छान लेख. by पॅट्रीक जेड
हिंदी भाषकांत एक विकृती असते.
In reply to छान लेख. by पॅट्रीक जेड
इंदोर / इंदौर
@ चौकस २१२: उत्तरे.
पंचायत नक्की बघा , सरळ सहज
In reply to @ चौकस २१२: उत्तरे. by चित्रगुप्त
अलिकडचे इंदौर शहर फार बदललेले आहे, त्यात रस उरलेला नाही.
तरीही लिहाच.इंदौर बद्दल नेहमी
In reply to अलिकडचे इंदौर शहर फार बदललेले आहे, त्यात रस उरलेला नाही. by चित्रगुप्त