✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोदी तो गयो? तो फिर ,अबकी बार किसकी सरकार ?  

व
वडगावकर यांनी
Mon, 04/29/2024 - 15:46  ·  लेख
लेख
यु-ट्युब वर एक  व्हीडियो बघत होतो (चॅनल -अभिव्यक्ती,रवीन्द्र पोखरकर ) विषय होता : श्री परकला प्रभाकर यांची मोदींबद्दल ची मते आणी सध्याच्या निवडणुकीचं विश्लेषण. आता हे परकला प्रभाकर कोण? तर विकीपीडिया च्या माहिती प्रमाणे ते एक जग प्रसिद्ध अर्थ शास्त्री , सामाजिक भाष्यकार आणी BJP च्या आंध्रप्रदेश युनिट चे प्रवक्ते होते (आता नाहीत) आणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एक थोर विचारवंत आहेत (बस्स सिर्फ ईतनाही काफी है , मग जेम्स बॉण्ड सारखं लायसेन्स टु किल सारखं लायसेन्स टु टॉक प्रत्येक विचारवंताला जन्मजातच मिळत असावं )  अरे हो....अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांचे पती, सॉरी चुकलं माझं .....अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या परकला सरांच्या पत्नी (आता तरी खुश नां सर?)   तर आता त्यांचे विचार ऐकू....मोदी हे हुकूम शहा आहेत (ध्रुव राठी , निरंजन टकले आदी विद्वान अगदी हेच म्हणतात)...लोकशाही पद्धतीने होणारी ही शेवटची निवडणूक असणार... मोदी ह्या वेळेस सत्तेमध्ये येणे पूर्ण पणे अशक्य आहे ,NDA ला ह्या वेळेस २२० च जागा मिळणार आहे.(आपण प्रकांड पंडित अर्थशास्त्री असूनही मोदींनी सामान्य बुद्धीमत्तेच्या आपल्या बायकोला अर्थमंत्री बनवलं हे मोदींवरच्या रागाचं कारण असावं का?,ऊगी आमची एक शंका हो ) माझा चिमुकला मेंदू एकदम कंफ्युज झाला , आयला ,२२० म्हणजे मोदी तर नापास ! , पास होनेके लिये तो २८२ मार्क्स चाहिये (आपण तर मोदी ३.० अगदी गृहीत धरूनच चाललो होतो ) मग मला भयंकर टेन्शन आलं ,डोक्यात मुंग्या आल्या , मग पटकन कपाट उघडुन एक शेंगदाण्याचा लाडू आणी मूठभर फरसाण खाल्लं तेव्हा कुठे नॉर्मल झालो. आणी त्या डोक्यातल्या मुंग्यांना अगदी सरळ रेषेत चालायचा हुकूम केला...त्या सरळ चालल्या की सरळ विचार करायला ते बरं पडतं...  मग अजून एक व्हिडीओ उघडून बघितला... श्री संत बेत्रा अशोकाजींचा....त्यात तर ते ४२२ चा आकडा अगदी छातीठोक पणे सांगत होते...पुन्हा मुंग्या , लाडू आणी फरसाण चा राउंड             आता फायनल रिझल्ट काय समजावा?...मोदी येणार की जाणार?...आयला ह्या निवडणुकीच्या टेन्शन मुळे चार जून पर्यंत पुरेल एव्हडा लाडू आणी फरसाण चा स्टॉक करून ठेवावा लागणार बाबा   ठिकै...हटाओ मोदी को... लेकीन मोदी को हटाया तो किसको लायेंगे? ममता? , राहुल? , मल्लिकार्जुन खर्गे? केजरीवाल? , लालु? ,मायावती? , शरद पवार?, उद्धव ठाकरे? , संजय राऊत? (होय , संजय राऊत सुद्धा मी लिस्ट मध्ये घेणार म्हणजे घेणारच, किसीको कोई ऑब्जेक्शन?, आपण त्यांची कुंडली बघितली नाहीये त्यामुळे त्यांच्या कुडंलीतल्या एखाद्या खतरनाक ग्रह योगामुळे.... सो लेट्स ऍझ्युम हिज नेम ) जर नशीबात असेल तर कोणीही पंतप्रधान होऊ शकतो....खोटं वाटतय?...आठऊन पहा भारताचे अकरावे पंतप्रधान श्री हर्दनहळ्ळी देवेगौडा  जाऊद्या.... आता चार जून पर्यंत नखं चावत बसावं लागणार आणी टेन्शन आलं की....    लेकिन मोदी की एक बात अपनेको बिल्कुल पसंद नही आयी बॉस...  बहेन LIC एजंट है , एक भाई रेशन का दुकान चलाता और एक भाई रिटायर्ड हैतीन बार CM और दो बार PM, हद हो गयी यार , कम से कम सबको एकेक पेट्रोल पंप तो दे देता भाई
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14362 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

मराठी रक्त थंड पडलंय.

सुबोध खरे
Fri, 05/10/2024 - 09:43 नवीन
मराठी रक्त थंड पडलंय. तुम्ही वणवा पेटवा आम्ही आहोत तुमच्या मागे. करा मराठी रक्त गरम हा का ना का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बिझिनेस इज बिझिनेस

चौकस२१२
Fri, 05/10/2024 - 15:42 नवीन
बिझिनेस इज बिझिनेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

१४ फेब्रुवारीच्या

सर टोबी
Tue, 05/07/2024 - 08:29 नवीन
हल्ल्याचं पुढे काही कळलं का हो? आणि परवाचा सियाचिन मधला हल्ला? डोंबोलीला कुठलं जागृत देवस्थान असलं तर सांगा. नवस बोलायचा आहे देश सुरक्षित रहावा म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पटाईत

सर टोबी
Tue, 05/07/2024 - 12:59 नवीन
यांना एक खरमरीत प्रतिसाद आम्ही दिला जो बहुतेक संपादकांनी उडवला. त्यामुळे ”चांगलं” लिखाण म्हणजे काय असतं असा प्रश्न पडला आहे. भाट वृत्तीने निखालस खोटं लिहीलेलं मिपाची शान वाढवणार आहे कि केवळ एक ग्राम्य शब्द वापरून त्यांना योग्य तो संदेश देणं हे मिपाची शान वाढवणारं आहे.
  • Log in or register to post comments

”चांगलं” लिखाण म्हणजे काय

सुबोध खरे
Fri, 05/10/2024 - 09:48 नवीन
”चांगलं” लिखाण म्हणजे काय असतं असा प्रश्न पडला आहे ते निखिल वागळे, विश्वभार चौधरी, अफिम भरुन दे यांचे जोरकस लेखन वाचा. पहा सकाळी कसं झडझडून पोट साफ होतं ते झालंच तर ऐसी लक्तरे वरील लिब्बू लोकांचे जोशपूर्ण लेख आणि वेगवेगळी सांख्यिकी पण वाचा कुठे या मिसळपाव वर मोदीभक्तांशी वाद घालताय? सनातनी कुठचे ( मोदी भक्त हो, तुम्ही नव्हे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

लेखन स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे.

सागर
Sat, 05/11/2024 - 16:45 नवीन
आक्षेपार्ह मजकूर असला तरी लेखन स्वातंत्र्यावर गदा आणणे योग्य नाही. मला माहिती नाही की प्रतिसाद नेमका काय होता. तरीही कोणाची कमेंट उडवणे योग्य नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

बरोबर फक्त मोदिजि

balasaheb
Wed, 05/08/2024 - 09:53 नवीन
बरोबर फक्त मोदिजि
  • Log in or register to post comments

४०० पार जाणे अवघड आहे. तरीही मोदी ३ येणारच.

सागर
Sat, 05/11/2024 - 16:43 नवीन
  • Log in or register to post comments

४०० पार अवघड आहे. पण मोदी किंवा भाजप ३.० नक्की.

सागर
Sat, 05/11/2024 - 16:46 नवीन
  • Log in or register to post comments

४०० पार अवघड आहे. पण मोदी किंवा भाजप ३.० नक्की.

सागर
Sat, 05/11/2024 - 16:46 नवीन
  • Log in or register to post comments

नेल बायटिंग की लाडू ईटिंग?  

वडगावकर
Sun, 06/02/2024 - 12:46 नवीन
सहा शेंगदाण्याचे लाडू आणी अर्धा पुडा फरसाण उरलंय, काय करावं?खाऊन टाकावेत की चार तारखेसाठी ठेवावेत. इंडी आघाडी म्हणतीये की ये EXIT पोल्स सब झूट है हम २९५ सीटे लाने वाले है. TO BE OR NOT TO BE ,नेल बायटिंग की लाडू ईटिंग?  
  • Log in or register to post comments

तिसऱ्यांदा भाजप येतेय तरी

कंजूस
Tue, 06/04/2024 - 19:07 नवीन
तिसऱ्यांदा भाजप येतेय तरी मार्केट का कोसळलं?
  • Log in or register to post comments

काल किती वर झालं... आज

अहिरावण
Tue, 06/04/2024 - 19:19 नवीन
काल किती वर झालं... आज कोसळणारच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नितीश पंतप्रधान होऊ शकतात....

अहिरावण
Tue, 06/04/2024 - 19:56 नवीन
नितीश पंतप्रधान होऊ शकतात.... विश्लेषकांचा अंदाज !! अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अजुनही विश्लेषकांवर विश्वास?

अनन्त अवधुत
Wed, 06/05/2024 - 14:03 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

मस्त झाली निवडणू़क

धर्मराजमुटके
Wed, 06/05/2024 - 14:05 नवीन
मस्त झाली निवडणू़क आमच्या मतदार संघात मी मत दिलेले उज्ज्वल निकम पडले मात्र भाजपा ला बहुमत मिळाले त्यामुळे एकाचवेळी माझे मत वाया गेले आणि कामी देखील आले असे म्हणता येईल. आतापर्यंत अनेकवेळा मी मत दिलेला उमेदवार पडला आहे त्यामुळे पुढील निवडणूकीत काँग्रेस ला मत देऊन पाहावे काय असा एक छद्मी विचार मनात येऊन गेला :) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार निवडून आले याचे कौतुक वाटले. केवळ एक-दोन वर्ष जुन्या पक्षाला इतके चांगले यश मिळाले हे पाहून आश्चर्य वाटले. अर्थात विधानसभेला जास्त चुरस असेल म्हणा. पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला त्यामुळे त्यांच्याबद्द्ल थोडेसे वाईट वाटले. यश त्यांना सतत हुलकावण्या देत आहे. यंदाच्या निवडणूकीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इवीएम मशीन वर कोणत्याही प्रकारचे आरोप झाले नाही मात्र ते बनविनार्‍या कंपनीचे शेअर्स काल जोरदार आपटले. अडानी समुहाचे शेअर, हिंदाल्को वगैरे खुप खाली गेले त्यामुळे काल बरीचशी खरेदी केली. महिन्या पंधरा दिवसात पैसे वाढतील असे वाटते. बघूया काय होते ते. निवडून आलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांचे अभिनंदन आणी हारलेल्या उमेदवारांना पुढील निवडणू़कांसाठी (तिकिट मिळाले तर) शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

के. अण्णामलाई निवडून यायला पाहिजे होता राव

वडगावकर
Wed, 06/05/2024 - 16:29 नवीन
टेबल वरचा अर्धवट उघडलेला लाडू चा डबा , तीन चार उरले असतील मुंग्यांची एक रांग त्या उघड्या झाकणातून आत शिरतीये. आपल्याला आता गरज नाहीये...खाऊंदे बिचार्याना एक गोष्टीचं खूप वाईट वाटलं ... के. अण्णामलाई निवडून यायला पाहिजे होता राव     
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा