Skip to main content

तुम्ही कोणती औषधे रोज खाताय ?

लेखक सतिश पाटील यांनी बुधवार, 15/05/2024 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या धकाधकीच्या काळात औषधाशिवाय जगणारा माणूस सापडणे फार कठीण आहे. वेळप्रसंगी ते अगदी रोज न चुकता नित्यनियमित औषधे खाणारी माणसे सुद्धा आहेत. कारण दुसरा पर्यायच उरला नाही. नियमित औषधे न खाणाऱ्या माणसाबद्दल मला खूप अप्रूप वाटते. काही औषधे रोज खाणे गरजेचे असते, काही औषधे मात्र आपण उगाच रोज खातोय असे वाटायला लागते. ४-५ वर्ष ऍक्रोफोबिया मुळे सायकॅट्रीस्टची औषधे मला रोज खायला लागायची. काही अंशी नशाच यायची त्याने. पण नंतर एके दिवशी सगळी फेकून दिली, ती औषधे न खाल्ल्याने काही विशेष फरक पडला नाही, पण भीती मात्र आपोआप हळूहळू कमी झाली. नियमित धूम्रपान करीत असल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे 40MG प्रमाण असलेले औषध रोज सकाळी खावे लागते. बाकी तुम्ही रोज कोणती औषधे खाताय ?

वाचने 12547
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया