✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

२०२४ लोकसभा निवडणूक.

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
Mon, 04/22/2024 - 23:02  ·  लेख
लेख
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील. पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34520 वाचन

💬 प्रतिसाद (396)

प्रतिक्रिया

कधी ७५ च्या वर आमदार आणि ५-६

सुबोध खरे
Wed, 05/22/2024 - 19:37 नवीन
कधी ७५ च्या वर आमदार आणि ५-६ च्या वर खासदार निवडून आणता आले नाहीत. आता तर काय, पक्ष आणि पक्ष चिन्ह (घड्याळ) सुद्धा हातात राहिलं नाही. अंधभक्तीमुळे आपले विचार इतके संकुचित होत चालले आहे की रातांधळेपणासारखंतुम्हाला दुसरं काहीही दिसत नाही, हे आपल्या समाधाना साठी मान्य केलं तरी वरील गोष्टींबद्दल आपण कोणीही भाष्य करताना दिसत नाही. चंद्राबाबू नायडू, करुणानिधी, जयललिता, मायावती, मुलायम सिंह , लालू यादव, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, प्रकाश सिंह बादल, ज्योती बसू , बुद्धदेव, बिजू पटनायक, शिवराज सिंह चौंहान, योगी आदित्यनाथ, अशोक गेहलोत असे प्रत्येक राज्यातील आणि पक्षातील नेते एकदाच नव्हे तर कितीतरी वेळा ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले तरी हे सर्व एकदाही या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या न मारता स्वतःच्याच बळावर निवडून आलेले लोक आहेत. त्यांनी कित्येक वेळेस २५- ३० -३५ -४० खासदार निवडून आणले आणि केंद्र सरकारवर वजन टाकून स्वतःसाठी फायदा मंत्रीपदे मिळवली किंवा आपल्या राज्यांसाठी केंद्राकडून भरघोस निधी मिळवला. मग ज्यांना आपण राष्ट्रीय नेते म्हणवताय त्या शरद पवारांना एकदाही जमवता आले नाही. यावर तुम्ही त्याचे लंगडं समर्थन करताय आणि वर आमची अंधभक्ती आणि रातांधळेपणा. बढिया है एकदातरी याचे उत्तर देता येईल का? कि साहेबाना ७५ च्या वर आमदार आणि ८ च्या वर खासदार निवडून आणता आले नाहीत. सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत जाता जाता -- रातांधळेपणा या आजारात दिवस स्वच्छ आणि साफ दिसतं. केवळ रात्रीच धूसर दिसतं. तुमची स्थिती फारच वाईट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Minister of agriculture in

सुबोध खरे
Wed, 05/22/2024 - 19:57 नवीन
Minister of agriculture in UPA government Pawar assumes the charge of Union Minister for Agriculture, Food & Civil Supplies, Consumer Affairs and Public Distribution in New Delhi on 24 May 2004 After the 2004 Lok Sabha elections, Pawar joined the United Progressive Alliance (UPA) government headed by Prime Minister Manmohan Singh as the Minister of Agriculture.[39] He retained his portfolio when the UPA coalition government was reelected in 2009. He faced several crisis and controversies during his tenure as Agriculture minister. Critics also point out that during his tenure as the minister agriculture, he spent time on cricket in his role as the president of BCCI than on his ministerial duties.[11] Wheat imports In 2007, the BJP asked for Pawar's resignation after alleging he was involved in a multi-crore Indian rupee (INR) scam involving wheat imports. In May 2007, a tender floated by the Food Corporation of India (FCI) for procurement of wheat was cancelled when the lowest bid received was for US$263/ton. The government subsequently allowed private traders to purchase wheat directly from farmers that year resulting in a paucity of wheat to stock FCI granaries. By July 2007 the shortage at FCI was large enough to require import of wheat at a much higher price of 320–360 USD/ton. Taking advantage of this, traders who had domestically purchased wheat at 900 INR/ton earlier, were now offering the same to FCI at 1,300 INR/ton.[40][41] Agricultural produce prices As the Minister of Agriculture, Pawar was consistently accused of colluding in the extreme hike in prices of agricultural produce: Wheat import in 2007 – The Bombay High Court issued notices to Union agriculture minister Pawar, questioning the decision to import defective red wheat, and asking for a directive to submit details of procurement of the crop from different states and the exact process of importing it.[42][43] Sugar prices in 2009 – Opposition parties, including the BJP and the CPI(M) accused Pawar of engineering a steep rise in the price of sugar to the advantage of hoarders and importers.[44] Wheat, Sugar, Rice, and Bean prices in 2009–2010 – The opposition accused Pawar to be responsible on the issue of spiraling prices.[45] Farmer suicides Since the 1990s there had been a high number of farmer suicides in India: in excess of 10,000 per year, and totalling over 200,000 between 1997 and 2010.[46] Pawar, as the agricultural minister, in 2006 had underplayed the rate of farmer suicide in India.[47] However, he claimed at that time that his department was taking the necessary steps to reduce the numbers.[48][citation needed] His ministry initiated a series of government inquiries to look into the causes of farmers' suicides in 2012. In 2013 Pawar admitted that the suicides was a serious issue with many factors being responsible, and he said the government was increasing investment in agriculture and raising minimum prices of crops to increase farmers' income.[49] Promotion of endosulfan Even though the pesticide endosulfan has been banned, India is slow to phase it out. In spite of its known negative health effects, Pawar made a remark that endosulfan is not yet proved dangerous. This remark prompted activist Dr. Vandana Shiva to call him a corrupt minister.[50][51][52] Other issues In 2012, Pawar gave up the chairmanship of the Empowered Group of Ministers investigating the 2G spectrum case, days after his appointment by the prime minister, fearing that his association with the decision-making process would drag him into the 2G Spectrum controversy.[53] In 2011, he also decided to resign from the committee that was reviewing the draft of the anti-corruption Lokpal bill after his inclusion in the committee was criticized by the anti-corruption campaigner, Anna Hazare.[54] स्त्रोत विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

साहेबानी स्वामिनाथन समिती

सुबोध खरे
Wed, 05/22/2024 - 19:57 नवीन
साहेबानी स्वामिनाथन समिती नेमली पण लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी. त्यांच्या शिफारशी लागू २०१८ मध्ये केल्या गेल्या. कुणी केल्या असतील? The government is implementing the Swaminathan Commission report for improving living standards of farmers and upliftment of farm sector, said agriculture minister Radha Mohan Singh. अरेच्या साहेब कृषी मंत्री नव्हते वाटतं Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/economy/agriculture/swaminathan-panel-report-being-implemented-agriculture-minister/articleshow/65329118.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पहिल्य प्रतिसादात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/22/2024 - 21:51 नवीन
डॉ.साहेब, आपण पहिल्या प्रतिसादात जे लिहिलं वाताहात झाली वगैरे, सांगायचा मुद्दा असा होता की, आजही शरद पवार साहेबांचा राजकारणात दबदबा आहे त्यासाठी सर्व हे सांगावं लागलं. साहेबांनी स्वामीनाथन सारखा तज्ञ मदत करु शकतो हे त्यांना सुचलं. तसंच, कृषिक्षेत्रात पूर्वी कधीच झाले नाही इतके बदल त्यांनी केले. अधिक वाचनासाठी लोक माझे सांगाती यातलं 'कृषिक्षेत्राची पुनर्पेरणी' हे प्रकरण वाचून काढा म्हणजे कृषिक्षेत्रातील बदल कळतील. इतर महत्वाची खाती मिळत असतांना कृषिविभाग निवडला. अशा अनेक गोष्टी आहेत. अरे हो, संरक्षण मंत्री असतांना लष्करी कारवाया सार्वजनिक करायच्या नसतात त्यावर राजकीय फायद्यासाठी त्याचा गवगवा करायचा नसतो, आजच्या सारख्या माध्यमांचा वापर करुन राजकीय पोळी शेकण्याचा संरक्षण विभाग विषय नव्हता. म्हणून ते मागे ते म्हणाले माझ्या काळात चार वेळी सर्जीकल स्ट्राईक केला पण त्याचा मतदानासाठी राजकीय स्वार्थासाठी आम्ही गवगवा केला नाही. बाकी, अजून खुप सांगता येईल पण आपल्याला हे सर्व कळणार नाही, आणि झेपणारही नाही, तेव्हा इतकं पुरेसं आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लहान तोंडी मोठा घास....

मुक्त विहारि
Wed, 05/22/2024 - 22:43 नवीन
मी तुमच्या इतका शिक्षित नाही आणि माझ्या कडे तुमच्या इतका लोक संग्रह पण नाही... पण, माननीय शरद पवार हे नेहमीच शाब्दिक खेळ खेळतात.. काही उदाहरणे देतो... १. शरद पवार यांनी, पुस्तकात जे कायदे व्हायला पाहिजेत, ते दिले आणि तेच कायदे जेंव्हा दुसऱ्या सरकारने केले, तेंव्हा त्या कायद्यांना जाहीर समर्थन दिले नाही. २. मुंबई बॉम्ब स्फोटाच्या वेळी , मस्जिद बंदर मध्ये पण बॉम्ब स्फोट झाले, असे सांगितले. खरं तर त्यावेळी तिथे बॉम्ब स्फोट झालेच न्हवते... हा नक्की कुणाला वाचवायचा प्रयत्न? ३. अजित पवार यांना, ऐनवेळी तोंडघशी पाडले. मला देखील नातेवाईक आहेत, मी कधीच कुठल्या नातेवाईकाला तोंडघशी पाडले नाही... जाऊ द्या... मी, आपला साधा अशिक्षित माणूस आहे... तुम्ही मनावर घेऊ नका....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या काळात चार वेळी सर्जीकल

सुबोध खरे
गुरुवार, 05/23/2024 - 09:49 नवीन
माझ्या काळात चार वेळी सर्जीकल स्ट्राईक केला बिरुटे सर मी १९८७ पासून २००६ पर्यंत लष्करात होतो. त्यापैकी श्री शरद पवार संरक्षण मंत्री असताना मी प्रत्यक्ष विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात होतो आणि ते मी असताना विक्रांतवर सुद्धा आलेले आहेत. त्यावेळेस कोणताही सर्जिकल स्ट्राईक झाला असता तर विक्रांतला संपूर्णपणे शस्त्रसज्ज ठेवले असते. असे काहीही झालेले नाही हे मी छातीठोक पणे सांगतो आजही माझ्या वर्गातील सहा जण आज मितीस लष्कराच्या सहा कमांडच्या कमांड रुग्णालयाचे कमांडिंग ऑफिसर आहेत. माझया कोर्समधील अनेक जण मेजर जनरल या हुद्द्यावर आहेत. माझे कित्येक डॉकटर मित्र कमांडो कोर्स केलेले आहेत आणि कोणत्याही कमांडो कार्यवाहीत एक तरी कमांडो डॉक्टर असतोच प्रत्यक्ष सर्जिकल स्ट्राईक झाला त्या वेळेस लष्कराच्या कार्यवाहीचे महानिदेशक डायरेकटर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) लेफ्ट जन परमजित सिंघ यांची बायको माझी वर्ग मैत्रीण ( बंदीता राणा) आहे. प्रत्यक्ष कार्यवाहीच्या वेळेस तेथे भाग घेणारा कमांडो डॉक्टर आणि सर्जन माझा वर्गमित्र आहे. मला लष्करी कार्यवाहीची माहिती तुमच्या कित्येक पट आहे तरी तुम्ही शरद पवार करत असलेल्या असल्या थर्ड रेट दाव्या वर विश्वास ठेवत आहात ? हा दावा शरद पवारांनी केला असेल तर ते धडधडीत खोटं बोलत आहेत. आणि नसेल तर तुमची माहिती साफ चुकीची आहे. आमच्या लष्करी ग्रुप मध्ये काँग्रेस बद्दल असा विनोद केला जातो कि काँग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाले ते इतके गुप्त होते कि लष्कराला सुद्धा ते माहिती नव्हते.. बाकी तुमचे भंपक शरद स्तोत्र आणि पोवाडे चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान आणि शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/23/2024 - 10:16 नवीन
मी १९८७ पासून २००६ पर्यंत लष्करात होतो.
अरे वाह ! आपल्याबद्दल आदर आहेच.
बाकी तुमचे भंपक शरद स्तोत्र आणि पोवाडे चालू द्या
डॉ.साहेब, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा दावा शरद पवारांनी केला

कांदा लिंबू
गुरुवार, 05/23/2024 - 13:11 नवीन
हा दावा शरद पवारांनी केला असेल तर ते धडधडीत खोटं बोलत आहेत.
न झालेला तेरावा बॉम्ब स्फोट केलेला नराधम आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रडारला ढगावरील विमान दिसत

आग्या१९९०
गुरुवार, 05/23/2024 - 16:37 नवीन
रडारला ढगावरील विमान दिसत नसल्याने हल्ला करणे सोपे गेले असे सांगणारा सर्जिकल स्ट्राईक केले असे सांगत असेल तर त्यावर कोण विश्वास ठेवेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरा पप्पू

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/23/2024 - 19:02 नवीन
खरा पप्पू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

चहा बिस्कीट पत्रकारांच्या

कांदा लिंबू
Wed, 05/22/2024 - 15:31 नवीन
चहा बिस्कीट पत्रकारांच्या रांगेत तुम्ही सुद्धा उभे असावे यासारखी नामुष्कीची गोष्ट दुसरी नसावी.
असं होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मागे अनेकदा ते पंधरा लाखांचं तुणतुणं वाजवत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पवार जर इतके वाईट आहेत तर

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/22/2024 - 15:52 नवीन
पवार जर इतके वाईट आहेत तर मोदी त्यांना गुरू का मानतात??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Wed, 05/22/2024 - 17:15 नवीन
ते उपहासात्मक वाक्य आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पवार जर इतके वाईट आहेत तर

सुबोध खरे
Wed, 05/22/2024 - 19:59 नवीन
पवार जर इतके वाईट आहेत तर मोदी त्यांना गुरू का मानतात?? ते तुम्हाला नाही समजणार भुजबळ बुवा तुमचं बळ कुठे आहे हे सर्वाना माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुमचं तर योग्य जागी आहे ना?

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/22/2024 - 20:22 नवीन
तुमचं तर योग्य जागी आहे ना? मग द्याना उत्तर? की उत्तरच नाहीये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Wed, 05/22/2024 - 21:01 नवीन
मोदी यांनी ते वाक्य उपरोधिक पणे वापरले आहे... तुम्ही बिरबलाची, "पंडीत" ही कथा वाचलेली दिसत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ज्याना विचारलंय त्यांना उत्तर

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/22/2024 - 21:18 नवीन
ज्याना विचारलंय त्यांना उत्तर देऊ द्या. तुम्ही मधे मधे येऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Wed, 05/22/2024 - 22:52 नवीन
तुम्ही मध्ये येता तेंव्हा.... असो, बाय द वे, मला तरी इतकेच समजले की, ना तुम्ही पंचतंत्र वाचले आहे ना इसापनीती ना किशोर मासिक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुमचं तर योग्य जागी आहे ना?

सुबोध खरे
गुरुवार, 05/23/2024 - 09:36 नवीन
तुमचं तर योग्य जागी आहे ना? मग द्याना उत्तर? की उत्तरच नाहीये? ते तुम्हाला नाही समजणार भुजबळ बुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मग मोदींच्या गुरुंचा द्वेष

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/23/2024 - 10:06 नवीन
मग मोदींच्या गुरुंचा द्वेष करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यांचा द्वेष करावा इतके ते

सुबोध खरे
Fri, 05/24/2024 - 09:21 नवीन
त्यांचा द्वेष करावा इतके ते मोठे नाहीतच. बेडकी फुगवली तरी तिचा बैल होत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बेडकी फुगवली तरी तिचा बैल होत

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/24/2024 - 10:27 नवीन
बेडकी फुगवली तरी तिचा बैल होत नाही महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री. मोदींचे गुरु. केंद्रात संरक्षण मंत्री, कृषिमंत्री. एका स्वतंत्र राजकीय पक्षाचे अध्यक्ष. बीसीसीआयचे अध्यक्ष आयसीसीचे अध्यक्ष २०१९ ला महाराष्ट्र vachavnaara असा माणूस छोटा? हसावं की रडावं तेच कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Fri, 05/24/2024 - 12:10 नवीन
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री.... पण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसून किंवा कुबड्या घेऊन आणि कधीही संपुर्ण पाच वर्षे पुर्ण केलेली नाहीत... केंद्रात संरक्षण मंत्री, कृषिमंत्री. शेतकरी वर्गाचा काय फायदा झाला? एका स्वतंत्र राजकीय पक्षाचे अध्यक्ष. . ते तर तुम्ही पण होऊ शकता.. त्यात काय नवल? बीसीसीआयचे अध्यक्ष.आयसीसीचे अध्यक्ष... हे तर, तुम्ही पण होऊ शकता.... २०१९ ला महाराष्ट्र vachavnaara . सर्वकालीन विनोद आहे. त्रिशंकू सरकार स्थापन होणार असे दिसताच, माननीय अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक टाकली... तुम्ही असेच विनोदी लिहीत रहा, मिपाला विनोदी प्रतिसादांचे वावडे नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भुजबळ बुवा

सुबोध खरे
Fri, 05/24/2024 - 19:42 नवीन
भुजबळ बुवा कायमचे भावी पंतप्रधान लिहायचं राहिले की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Tue, 05/21/2024 - 20:55 नवीन
प्रकल्प गुजरातला का गेले? अगदी नॅनो प्रकल्प पण गुजरातला का गेले? आर.सी. पटेलच्या काळांत, प्रकल्प वापीला का जात न्हवते? आपले, प्रतिसाद खरोखरच मनोरंजक असतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

Ahmednagar Lok Sabha: EVM

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/23/2024 - 12:51 नवीन
Ahmednagar Lok Sabha: EVM मशीन्स ठेवलेल्या अहमदनगरच्या स्ट्राँग रुममध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरीचा प्रयत्न, https://marathi.abplive.com/news/politics/ahmednagar-lok-sabha-unknown-man-trying-to-damage-cctv-system-of-strong-room-where-evm-machines-kept-says-nilesh-lanke-1283944/amp अस चोरुन लपुन मदत करण्यापेक्षा भाजपलाच विजयी का घोषित करुन टाकत नाहीत?
  • Log in or register to post comments

चंदीगड महापौर निवडणुकीत

आग्या१९९०
गुरुवार, 05/23/2024 - 16:28 नवीन
चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपने निर्लज्जपणाचा कळस केला होता. सुप्रीम कोर्टाने भाजपला फटकारले म्हणून आपचा महापौर निवडून आला. अशा किती निवडणूका किती घोटाळे करून जिंकल्या असतील हे देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खरे आहे. भ्रष्टाचारी जनता

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/23/2024 - 19:03 नवीन
खरे आहे. भ्रष्टाचारी जनता पार्टी ला देशातून हद्दपार करावे लागेल. जनसंघा नंतर आता भाजपला चेचावे लागणार देशप्रेमी लोकाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/23/2024 - 20:43 नवीन
ह्यात, जनसंघाचा काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

"माझा जन्म झालेला नाही, मला

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/23/2024 - 20:42 नवीन
"माझा जन्म झालेला नाही, मला देवानेच पाठवले", पंतप्रधान मोदींचं 'ते' विधान चर्चेत http://dhunt.in/UFlQG By लोकसत्ता via Dailyhunt
  • Log in or register to post comments

देवाने पाठवले असेल तर देव

आग्या१९९०
गुरुवार, 05/23/2024 - 20:50 नवीन
देवाने पाठवले असेल तर देव ह्या व्यक्तीपेक्षा मोठा असेल ना? मग पोस्टरवर देव ह्याच्यापेक्षा लहान का दाखवला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ज्याच्या नावाने मोठे होतात

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/23/2024 - 20:54 नवीन
ज्याच्या नावाने मोठे होतात त्याच्यावर उलटतात. कुणे एकेकाळी पवारांना गुरु मानायाचे आता पवारांवर उलटले. “राम को लाये है” म्हणतात. ह्याची लायकी प्रभू श्रीरामांच्या पादुका तरी आणायची आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ह्याला ' अवतार ' म्हणतात.

आग्या१९९०
गुरुवार, 05/23/2024 - 21:05 नवीन
ह्याला ' अवतार ' म्हणतात. चित्रविचित्र वेषातले फोटो बघितले तर खात्रीच पटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

राजाबाबू.

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/23/2024 - 21:08 नवीन
राजाबाबू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/23/2024 - 21:57 नवीन
ह्याची लायकी प्रभू श्रीरामांच्या पादुका तरी आणायची आहे का? ----- अयोध्या येथील , रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला भाग्य लागते... -----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/23/2024 - 21:50 नवीन
तुम्ही,मुलाखत नीट वाचली आहे का? त्या मुलाखतीमधला काही भाग... पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणतात की, 'माझी आई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचं मी तिच्या पोटीच जन्म घेतलाय. पण, तिच्या निधनानंतर, मला विश्वास वाटायला लागला की माझ्यातील शक्ती ही साधारण नाही. देवानेच खास शक्ती देऊन मला पाठवलं आहे. माझ्याकडून काही तरी करून घेण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.' ही शक्ती केवळ एका साधारण शरीरात असू शकत नाही. पण, देवानेच माझ्यावर कृपा केली आहे. मला वाटतं देवाने काहीतरी चांगलं करण्यासाठी मला क्षमता, प्रेरणा दिली आहे. मी केवळ एक साधन आहे. त्यामुळे मी जे काही करत आहे, ते देवानेच मला करायला सांगितलंय असं मी मानतो, असं मोदी म्हणालेत. ------ अयोध्या येथील, राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला भाग्य लागते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ही जुगलबंदी पाहून "अहो रुपं

कांदा लिंबू
गुरुवार, 05/23/2024 - 21:16 नवीन
ही जुगलबंदी पाहून "अहो रुपं अहो ध्वनी" असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

अमरेंद्र बहुबपी चा आयडी

Vichar Manus
Fri, 05/24/2024 - 22:11 नवीन
अमरेंद्र बहुबपी चा आयडी उडालेला दिसतो
  • Log in or register to post comments

अरेरे... अरेरे....

मुक्त विहारि
Fri, 05/24/2024 - 22:36 नवीन
मनोरंजक प्रतिसाद, आता कोण देणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

येतील ते लवकरच... विधानसभा

अहिरावण
Fri, 05/31/2024 - 19:36 नवीन
येतील ते लवकरच... विधानसभा विलेक्शनच्या अगुदर डु आयडी काढून... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

फारच उत्तम....

मुक्त विहारि
Fri, 05/31/2024 - 23:22 नवीन
आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, विनोदवीरा शिवाय जीवनात रंग येत नाही..... विनोदी लेखन सर्वांचाच आवडीचा विषय आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

*बाहुबली

Vichar Manus
Fri, 05/24/2024 - 22:11 नवीन
*बाहुबली
  • Log in or register to post comments

अबा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/04/2024 - 11:14 नवीन
धाग्यावर मिस करतोय.... बाय द वे काय परिस्थिती आहे म्हणे सध्या ? ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हर्षवायुने ते चचले...

अहिरावण
Tue, 06/04/2024 - 19:26 नवीन
हर्षवायुने ते चचले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे

पॅट्रीक जेड
Tue, 06/25/2024 - 20:28 नवीन
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे ह्यांची साथ होती तेव्हा भाजपचे २३ खासदार होते. ठाकरेंनी साथ सोडली नी ९ खासदार राहिले. उद्धव ठाकरेंचे फोटो वा २०१४ नी २०१९ साली मोदीनी महाराष्ट्रातून खासदार जिंकवले. ठाकरेंचा फोटो हटला नी मोदी आणी भाजप उघडे पडले.
  • Log in or register to post comments

@ अमरेंद्र बाहुबली......

मुक्त विहारि
Wed, 12/11/2024 - 08:04 नवीन
ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी, EVM आणि निवडणुक आयोग, दोन्ही योग्य... बरोबर ना?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा