Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 05/14/2024 - 07:10
पेरणा वाचक सुज्ञ आहेत. बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने हे माझे भाग्य आहे,मित्रांसवे बसाया मिळाते हरीवंशा विन मधुशालेचे महत्व कुणाला कळते दुःख ना फटके आसपास आपले अथवा परक्याचे का जाया करता,साधन हेच आहे,आनंदी जगण्याचे... चार दिवस मिळाले असता चारजणांसवे घालवावे इहलोकीचे तन,मन,धन इहलोकीच व्यतीत करावे चार दिवस मिळाले असतां,खाऊन पिऊन जगावे फुका शब्दच्छल करूनी का लोकांस उगा पिडावे?

Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 05/14/2024 - 07:21

Permalink

इती गोविंद अग्रज

विडंबन हा मुळ कलाकृतीचा सन्मान असतो. कृ. ह. घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 05/14/2024 - 07:33

Permalink

आवडले

आवडले
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Tue, 05/14/2024 - 14:43

Permalink

चार दिवस म्हणजे नेमके कोणते?

चार दिवस म्हणजे नेमके कोणते? आयुष्य चार दिवस असे समजून की पालथ्या तांब्याचे चार दिवस?
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 05/14/2024 - 19:47

In reply to चार दिवस म्हणजे नेमके कोणते? by अहिरावण

Permalink

अहिरावण जी

एकविसावी शताब्दी आहे. तांब्या केव्हाच संग्रहालयात पोहचला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Wed, 05/15/2024 - 10:28

In reply to अहिरावण जी by कर्नलतपस्वी

Permalink

अरे बापरे ! चार दिवसांची

अरे बापरे ! चार दिवसांची "गरजच" संपली? जैव तंत्रज्ञान भलतेच पुढे गेलेले दिसतेय !! हर हर !! चला ! चांगलंय !! जे जे होईल ते ते पहावे... :)
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Wed, 05/15/2024 - 13:04

In reply to अरे बापरे ! चार दिवसांची by अहिरावण

Permalink

अहिरावणजी, मी फक्त तांब्या बद्दल बोललोय.

निसर्गात उत्क्रांती होते म्हणतात मग काहीही होऊ शकेल. शेपूट नाही का गळाली. आता बिना शेपटीचाच "शेपुट घालणे", हा वाक्प्रचार वापरावा लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on गुरुवार, 05/16/2024 - 09:51

In reply to अहिरावणजी, मी फक्त तांब्या बद्दल बोललोय. by कर्नलतपस्वी

Permalink

>>> मी फक्त तांब्या बद्दल

>>> मी फक्त तांब्या बद्दल बोललोय. अच्छा ! हे असं होतं बघा... "बसलं" की तारे तोडले जातात... असो. तुम्ही आहात म्हणून सांभाळून घेत आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 05/14/2024 - 17:34

Permalink

आम्ही सुज्ञ वाचकांपैकी नाही.

आम्ही सुज्ञ वाचकांपैकी नाही. मुळ प्रेरणा कळेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 05/14/2024 - 20:03

Permalink

चोको भो...

आम्ही सुज्ञ वाचकांपैकी नाही तुम्हांला शंका असेल मला नाही. तरी पण मागितली आहे तर ही घ्या. https://www.misalpav.com/node/52184
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 05/15/2024 - 17:17

In reply to चोको भो... by कर्नलतपस्वी

Permalink

धन्यू कर्नलभाऊ !

धन्यू कर्नलभाऊ ! अमंळ निराशा झाली .... ओरिजनल पेक्षा लैच उजवी आहे ! :-) बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने व्वा, क्या बात ... माशाल्ला .. हृदयस्पर्शी ओळी ! कधी योग येतात ते काय माहीत ? एक लघूशंका:
दोन वेळा
दिवसातुन ?
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Wed, 05/15/2024 - 17:49

Permalink

एक लघूशंका

दुपारी साॅफ्ट ड्रिंक लाईक बियर,जीन,व्होडका,वाईन (आमच्या सारखा एखादा कोकाकोल एम्बेडेड म्हातारा साधू) संध्याकाळी हार्ड ड्रिंक्स लाईक सोलन न १,पिटर स्काॅट, पाईपर 3XXX (NOT THAT WHAT FIRST IMPRESSION VOMES IN MIND )इ. म्हणून दोन वेळी.... गेले ते दिन गेले
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 05/16/2024 - 12:12

In reply to एक लघूशंका by कर्नलतपस्वी

Permalink

छान ! यादी छानच आहे !

छान ! यादी छानच आहे ! "गेले ते दिन गेले" म्हणत त्या रम्य दिवसांची आठवण काढत सुख उपभोगणे आवडले आपल्याला !
  • Log in or register to post comments

Submitted by भागो on Wed, 05/15/2024 - 21:59

Permalink

umr-e-darāz maañg ke laa.ī

umr-e-darāz maañg ke laa.ī thī chaar din do aarzū meñ kaT ga.e do intizār meñ a long life, four days in all, I did negotiate two were spent in hope and two were spent in wait
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4323 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com