Skip to main content

काय करावे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे तजवीज आहे काय करावे मन उद्विग्न आहे काय करावे काफिला मार्गस्थ असताना स्तब्ध झाला आहे काय करावे प्रसन्नता शोधीत असताना अनुपस्थित झाली आहे काय करावे मित्राची जरूरत असताना नाराज झाला आहे काय करावे संवाद मनस्थितीचा असताना नियम लागू झाला आहे काय करावे हर एक व्यक्ती अपुला फायदा शोधीत आहे काय करावे चोहिकडून फक्त आश्वासन प्राप्त होत आहे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1862
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

किती करावे, किती भरावे, कितीदा संचित रिते करावे? किती नडावे, किती रडावे, कोणा द्यावे किती पुरावे? किती फसावे, किती हसावे, डोळ्यांचे दव किती पुसावे? किती वळावे, किती पळावे, आयुष्याला किती छळावे? किती हरावे, किती स्मरावे, तेल संपता किती जळावे? किती जुळावे, किती गळावे, शब्दांशी या किती जुगावे?