का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि माझ्या मनाला लागलेली एक घटना मला आठवली .
धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द एखाद्याला
कृतींपेक्षा जास्त दुखवू शकतात, असं मला वाटतं.
तुम्ही लोकांना जे शब्द बोलू शकता ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत पण त्या शब्दांचा खोलवर परिणाम ज्यांना बोललं जातं त्यांच्यावर नक्कीच होतो.
एकदा लोकांनी एका व्यक्तीला चिडवायला,धमकावायला, सुरुवात केली की प्रत्येकजण त्याचं अनुकरण करून त्याचा पाठपुरावा करतो.
जेव्हा तुमचा एखादा मित्र तुम्हाला चिडवतो, धमकावतो तेव्हा तुमचे प्रत्येक मित्र त्यात सामील होऊन तुमच्या भावना दुखावायला कमी करत नाहीत.
मात्र तुमच्यासाठी तुमच्या बाजूने उभा राहणारा तुमचा जिवलग मित्र, तुम्ही कधीही गमावणार नाही,आणि तो ही तुम्हाला गमावणार नाही.
मला आठवतं, एक दिवशी,मी मिडल स्कूलमध्ये असताना,खूप पाऊस पडत होता आणि आम्हा सर्वांना आत जाऊन लॉकर्ससमोर उभं राहावं लागलं होतं.
मी पण एका लॉकरच्या जवळ उभा होतो.आणि एका लॉकरमधून एक झुरळ बाहेर आलं आणि ज्याला त्याला वाटलं की ते झुरळ माझ्या पुस्तकाच्या पिशवीतून बाहेर आलं आहे. तेव्हा एकसंधपणे बाकीचे मित्र
माझ्याच लॉकरमधून झुरळ बाहेर आलं अशी समजूत करुन घेत होते. आणि मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हे माझं लॉकर देखील नाही. ते सर्व पुन्हा पुन्हा मला
" झुरळ” म्हणाले.
नंतर मी दिसल्यावर ह्याच नावाने मला संबोधत होते आणि मला तसं म्हणण्यात त्यांना यत्किंचितही पर्वा वाटतं नव्हती.
दुसर्या दिवशी मी शाळेत गेलो. माझा जिवलग मित्र मला म्हणत होता “मला माहित आहे की ते झुरळ तुझ्याकडून आलेलं नव्हतं,
ते इतर मित्र फक्त उद्धट आहेत, आणि त्यांना फक्त मजा आणि
चिडवाचिडवितून तुझी चेष्टा करायची होती.”
प्रत्येक वेळी मी हॉलवेमध्ये फिरत असताना ते माझी चेष्टा करत राहिले. शाळेत जाणं खरोखर कठीण होत गेलं.
पण माझ्या प्रिय मित्रांने, माझी समजूत घातली,
“ सर्व गोष्टी महत्त्वाच्या मानू नकोस”
असं तो मला म्हणायचा.
कालांतराने ते चिडवून, चिडवून कंटाळले.
आता मला ते फक्त माझ्या नेहमीच्या नावाने हाक मारू लागले.
जेव्हा मला धमकावलं,चिडवलं जात होतं, तेव्हा मला वाटायचं की ते कधीच असं म्हणायचं थांबणार नाहीत.परंतु नंतर असं दिसून आलं की जेव्हा तुम्हाला तसं वाटायला लागतं तेव्हाच ते “म्हणणं” खरोखरच वेगाने नष्ट होण्यास सुरवात होते. आणि मला ते पटलं.
घटना क्षुल्लक असते,पण वय, मानसिक प्रगल्भता,अनुभव अशा सारख्या गोष्टी हळूहळू पोक्त विचार करायला कारणीभूत होतात.हे आज
लक्षात येऊन गंमत वाटते.
वाचने
5330
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
१९४७ च्या सुमारास तुमच्या शाळेत लॉकर ?? हॉलवे ?
1947
In reply to १९४७ च्या सुमारास तुमच्या शाळेत लॉकर ?? हॉलवे ? by चित्रगुप्त
मग बरोबर आहे.
In reply to 1947 by श्रीकृष्ण सामंत
आवडतं नाहीत
In reply to मग बरोबर आहे. by अहिरावण
लेखापेक्षा प्रतिसाद
In reply to आवडतं नाहीत by श्रीकृष्ण सामंत
सहमत, मीच प्रतिक्रिया वाचायला
In reply to लेखापेक्षा प्रतिसाद by अहिरावण
+1
In reply to सहमत, मीच प्रतिक्रिया वाचायला by अमरेंद्र बाहुबली
प्रतिसाद
In reply to लेखापेक्षा प्रतिसाद by अहिरावण
>>प्रतिसाद फक्त मोजक्याच
In reply to प्रतिसाद by श्रीकृष्ण सामंत
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी
छान.
डाॅ.बिरूटे
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकरांनो तयार रहा.....
हाहाहा
In reply to मिपाकरांनो तयार रहा..... by कर्नलतपस्वी
दुसर्या दिवशी मी शाळेत गेलो.
झुरळ सोडा हो ....
हा हा हा
In reply to झुरळ सोडा हो .... by नठ्यारा
घटना क्षुल्लक असते,पण वय,
जे सुपात
तुम्ही त्या गोडबोल्याकडे लक्ष
In reply to जे सुपात by श्रीकृष्ण सामंत
ख्या ख्या ख्या
In reply to तुम्ही त्या गोडबोल्याकडे लक्ष by अहिरावण
तुम्हाला अजूनही कळतच नाहीये.
In reply to जे सुपात by श्रीकृष्ण सामंत
प्रसाद गोडबोले....
क्या बात है कर्नल साब ...
In reply to प्रसाद गोडबोले.... by कर्नलतपस्वी