मिपा वाचकापैकी काही टीकाकारानो, माझ्यावर तुम्ही---
का अशी टीका करता,जी वयक्तिक असते,त्या टीकेत
मत्सर,हेवा,नफरत, पोटशूळ
भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द),
मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं.
मी असं काय गैर लिहितो त्याने मिपाचा दर्जा
खालावतो. असं तुम्हाला वाटतं.?
असं तुम्हाला वाटत असेल तर माझे लेख तुम्ही वाचू नका.
Simple.
मला मिपावर लिहिण्याचा मज्जाव आहे का?
माझ्या लिहिण्याने मिपाचा
दर्जा (standard) कमी
ह़ोतो असं प्रतिसादाच्या प्रतिसादावर प्रतिसाद दिला
जातो.
माझ्या काव्यावर अश्लाघनीय
विडंबन केलं जातं.
ही तुमची असली अश्लाघ्य टीका इतरांनी वाचून मिपाचा दर्जा तुमच्याकडून उंचावला जातोय अशी तुमची भाबडी समज आहे का?
मिपावर माझ्या लेखांचं/काव्यांचं वाचन करणाऱ्या इतर वाचकापैकी काहीनी, ह्या टीकाकारांना,
(चित्रगुप्त ह्यांना)
“यांना आवरा”
असा इशारा पण दिलेला आहे.
(हे चित्रगुप्त म्हणजे त्यांच्याच
लेखात लंडन मधला एके ठिकणी दोघे पायऱ्यांवर उभे आहेत तो फोटो,त्यातले पांढऱे
केस असलेले तेच असतील तर हे चित्रगुप्त बरेच वयस्कर
आणि पोक्त (mature) वाटतात.)
काहींनी तर,मला
“काका, तुम्ही असल्या टीकांकडे दुर्लक्ष करा आणि लिहित रहा, आम्हाला तुमचं
लेखन वाचायचं आहे “
असं ही प्रतिसाद देऊन कळवलं आहे.
मग मी माझं तुमच्या दृष्टीने बिन-दर्जाचं असलेलं
मिपावरचं लेखन थांबवून तुम्हाला न्याय देताना, त्यांच्यावर अन्याय करणार
नाही का?
संयुक्तीक टीका,आदर राखून
झालेली टीका, ही टीकाकाराचे संस्कार, बुद्धीमत्ता आणि असलेला पोक्तपणा यांचं दर्शन करून देतं.
मिपावरचे बरेच टिकाकार
टिकेच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग
करतात असं मला वाटतं तो त्यांनी करु नये एव्हढीच विनंती.निदान माझ्यावर तरी करू नये.
असो.
ही उदाहरणं—-
१–म्हाताऱ्याला त्या लागलाय चळं....
धागे थेंब थेंब गळं...
डोकऱ्याला लागली कळं....
धागे थेंब थेंब गळं....
म्हातारबुवा, थोडं दमानं घ्या आता. इतका अतिसार तब्बेतीला चांगला न्हवं
— इती गड्डा झब्बू
२–स्वत:च्या आकलेचे धिंडवडे काढता अहात.
संपादक मंडळाने याची दखल घ्यावी व फालतू लेख कवीता उडवून टाकाव्यात.
—-इती कर्नल तपस्वी
३–मिपाची हागणदारी केली आहे.
ह्यांना मी लिहितो ते “परवडत
नाही” इतके दिवस मी मिपावर
नव्हतो ते बरं होतं असं ह्यांना
वाटतं.
—-इती अहिरावण
४–मला Dehydrationहोईल म्हणून चिंता “लागून राहिली” आहे
—-इती प्रसाद गोडबोले
५–मला उलटं टांगून मिरचीची धुरी द्यावी असं सुचवत आहेत.
— गड्डा झब्बू
हे सर्व मी शेमळटा सारखं
का ऐकून घ्यावं असं तुम्हाला
वाटतं?
ह्यातल्या काही टीकाकारांना,
आई/वडील ,आजी/आजोबा
मुलं/मुली,नात/नातू खचीत
असतील.ती ह्यांची मंडळी ह्यांना ह्यांच्या अशा अश्लाघ्य टीका वाचून काय म्हणतील याचा त्यांनी विचार करावा
“म्हातारा मेल्याचं दुःख नसावं
काळ सोकावतो हे पहावं.”
हे वाटलं तर pun समजावं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
तुमचा हाच एकमेव लेख पुढे पुढे
हायला मी पण टीका केली होती.
सहमत
खिक्क
मिपावर अबांशी कधी सहमत
कारण
हाहाहा. विनोदबुद्धी छान आहे.
आजोबा एवढा वेळ तुमचा वयाचा
शिंपल
वड्याचे
अच्चं जालं का?
तुमचं लिखाण काही नीट लक्ष
सर आस्ट्रेलियात करतात काहो
तुमच्या पातळीवर येऊन
प्रतिसाद आवडला
चौको भौ...
मानसिक कि शारीरिक कि बौद्धिक
+१
सवांतर: मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हत
मला मिपावर सुरियांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल
काही धागे पूर्वी पण मिपावरच
+१ माझ्या धाग्याना तर
दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे.
म्हणून काय झालं?
कोरा कागद निळी शाई, सामंत
मागे लागलो
जाऊ द्या !! आपण टिकाकारांचे