Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/22/2024 - 23:02
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील. पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
  • Log in or register to post comments
  • 34520 views

प्रतिक्रिया

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/22/2024 - 23:25

Permalink

पुण्यात गिरीश बापट ह्यांच

पुण्यात गिरीश बापट ह्यांच निधन झाल्यावर वर्ष झाल्यावरही इलेक्शन डिक्लेर केलं गेलं नाही. पण साताऱ्यात उदयराजेंनी भाजप जॉइन करून खासदारकीचा राजीनामा दिला तर तीनच महिन्यात निवडणूक जाहीर केली होती. पुण्यात भाजप हरेल ह्या भीतीमुळे निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली नाही का अशी शंका येते कारण काही दिवस आधीच धंगेकरांनी कसबा जिंकले होते. ह्यामुळे निवडणूक आयोग भाजपसाठी काम करते का अशीही शंका येते. दरम्यान पंजाबात १० मे २०२३ रोजी इलेक्शन घेण्यात आले होते. पुण्यातील कोणीतरी देशप्रेमी नागरिक निवडणूक आयोग विरुद्ध कोर्टात गेल्यावर निवडणूक आयोगाला पुण्यात लोकसभेची निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते पण निवडणूक घेण्याऐवजी निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात गेले. त्याची बातमी. https://sarkarnama.esakal.com/amp/story/pune/pune-loksabha-by-election-big-update-on-pune-lok-sabha-elections-the-election-commission-will-take-this-step-against-the-court-decision-dk88 निवडणूक आयोगाची नीतीमत्ता खालावली असल्याचे हे संकेत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 04/24/2024 - 00:17

In reply to पुण्यात गिरीश बापट ह्यांच by अमरेंद्र बाहुबली

Permalink

एवढं सगळं कशाला?

एवढं सगळं कशाला? आत्ता पासुनच ई.व्ही.एम च्या नावाने रडायला सुरुवात करा , म्हणजे प्रक्टिस होइल =)))) बाकी ह्या निवडणुकींचा निकाल कसाही येवो, निकाल आल्यावर मला बिरुटे सरांना आवर्जुन भेटायला जायची इच्छा आहे ! म्हणजे मोदी पडले तर सरांच्या आर्म चेअर अ‍ॅक्टिव्हिझम चे कौतुक अन अभिनंदन करायला , अन मोदी परत निवडुन आले तर पुढी पाच वर्षे काय काय खुस्पटे काढायची ह्यावर सविस्तर चर्चा करायला =))))) तुमचा प्लॅन काय ? =))))
  • Log in or register to post comments

Submitted by कांदा लिंबू on Wed, 04/24/2024 - 05:48

In reply to एवढं सगळं कशाला? by प्रसाद गोडबोले

Permalink

सांभाळून हो नाहीतर ते

सांभाळून हो नाहीतर ते तुम्हाला पंधरा लाख रुपये मागतील.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 12/09/2024 - 12:20

In reply to पुण्यात गिरीश बापट ह्यांच by अमरेंद्र बाहुबली

Permalink

निवडणूक आयोगाची नीतीमत्ता

निवडणूक आयोगाची नीतीमत्ता खालावली असल्याचे हे संकेत आहेत. हे मी लोकसभेवेळीच सांगितले होते. पुण्यात भाजप हरेल म्हणून लोकसभेची निवडणूकच इलेक्शन कमिशनने होऊ दिली नाही. इतका उघड भाजपसाठी काम करणारा कमिशन प्रामाणिकपणे निवडणुका घेत असेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 04/22/2024 - 23:38

Permalink

धागा काढल्याबद्दल धन्यवाद

धागा काढल्याबद्दल धन्यवाद बाहुबली. हिरिरीने स्पष्ट मतं मांडणारे आमचे धीट तरुण मिपाकर म्हणून बाहुबलींना पाहतो. राजकीय धुमाळी आहे आणि मंचावर थोडी चर्चा हवीच. आरोप वगैरे सोडून समीक्षा आणि आकडेवारी दिल्यास कायमच नोंद राहील. विविध नेत्यांचे बलाबल किंवा गुणांचीही नोंद घ्यावी. त्यांचे राजकीय भवितव्य काय ? तुलनात्मक चढाओढ. विविध वर्तमानपत्रातील छापील माध्यमांतील राजकीय टिप्पणी लेखांचा ही परामर्श घ्यावा. ट्विटर म्हणजे एक्स या किंवा सोशल मिडिया वरची नेत्यांची टिप्पणी ते बदलतात त्यामुळे त्यांना मिळणारी सवंग लोकप्रियता आणि चर्चेत राहण्यापलिकडे त्यांचे महत्त्व वाटत नाही. सर्वच पक्षांनी विविध दावे केले आहेत. इतक्या जागा जिंकू वगैरे. तसे झाले नाही तर ४ जूनला काय वक्तव्य करतील? काय आदळ आपट करतील ? पक्षांचा जाहिरनामा ओनलाईन कुठे मिळेल? तसेच मागच्या निवडणुकीचेही अजून मिळतील का? मिसळपाव संस्थळाचे धोरण आणि नियम लक्षात ठेऊन धागा वाढवल्यास आनंदच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/23/2024 - 10:58

In reply to धागा काढल्याबद्दल धन्यवाद by कंजूस

Permalink

धागा काढल्याबद्दल धन्यवाद

धागा काढल्याबद्दल धन्यवाद बाहुबली. हिरिरीने स्पष्ट मतं मांडणारे आमचे धीट तरुण मिपाकर म्हणून बाहुबलींना पाहतो. धन्यवाद कंजूस काका.
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Mon, 04/22/2024 - 23:41

Permalink

आम्ही कोणी साधुसंत नाही, असं

आम्ही कोणी साधुसंत नाही, असं भाजपच्या अनेक नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे. एक शेषन सोडले तर इतर जवळपास सर्वच निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाळात आयोग सरकारधार्जिणाच राहिला आहे. अर्थात सध्याच्या काळात त्याने अगदी खालची पातळी गाठली आहे हे उघड आहेच. जर विरोधी पक्षाचे सरकार आले तर या बाबींची चौकशी होईल, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा आहे. सर्वच चोरांवर मोर कोण ठरतं आणि सत्तेत येऊन काय रंग उधळतं, एवढंच बघायचं बाकी आहे. या दरम्यान आपल्याच उक्ती-कृतीने आपला घात कोण करून घेतं हे पाहण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/23/2024 - 00:10

In reply to आम्ही कोणी साधुसंत नाही, असं by रामचंद्र

Permalink

अर्थात सध्याच्या काळात त्याने

अर्थात सध्याच्या काळात त्याने अगदी खालची पातळी गाठली आहे हे उघड आहेच. निवडणूक आयोग आणी मोदी देशात निवडणुका होऊ देताहेत ह्याचेच देशवासियानी उपकार मानावे अशी वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 04/23/2024 - 04:45

Permalink

लोकशाही जिवंत आहे

देशात निवडणुका होऊ देताहेत ह्याचेच देशवासियानी उपकार मानावे अशी वेळ आली आहे. तुम्हाला पटत नसेल पण भारतात अजून लोकशाही जिवंत आहे आणि तुम्ही मोदींना किंवा भाजप ला हुकूमशाह म्हणालेत तरी हे लपून राहत नाहीत कि सर्व पातळीवर निवडणूक होत आहेत आणि बानी जाहीर झालेली नाही , बरखा, राजदीप वागले, थापर सारखे पत्रकार ! तुरुंगात नाहीत . विरोधी नेते तुरुंगात नाही , काँग्रेस वॉर बंदी नाही आता १९७५ नंतर विद्यचारां शुक्ल वैगरे मंडळी आठवा , जयप्रकाश तुरुंगात , जनसंघावर बंदी इत्यादी तेव्हा मोदी हुमशाही हि चापलुसी बास झाली ३ ऱ्या वेळेला व्यस्थित निवडणूक चालू आहेत मत द्या आणि हाकल भाजप ला.. कोणी अडवलाय ( हा आता नेहमीचं "ऑस्ट्रेल्यात काय इलेक्शन कमिशन कसे काम करते हे विचारात बसू नका ...)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 04/24/2024 - 09:23

In reply to लोकशाही जिवंत आहे by चौकस२१२

Permalink

रेग्युलर पाणी येतं का ?

ऑस्ट्रेल्यात काय इलेक्शन कमिशन कसे काम करते हे विचारात बसू नका
आपल्या देशात नळाला रेग्युलर पाणी येतं का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 04/24/2024 - 09:40

In reply to रेग्युलर पाणी येतं का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

नमस्कार सर ,

नमस्कार सर , कसें आहांत ! ते बाकीचांचे सोडुन सोडा , तुम्हाला काय वाटतंय, मोदी षेठजी किती जागा काढतील ई.व्ही.एम च्या पकडुन ? मला वाटतंय की ३०० च्या वर जाणार नाहीत. बाकी शाहु फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र फसवणीस भडजीच्या उर्फ अणाजी पंताच्या नेतृत्वातील भाजपला २० च्यावर जागा देईल असे काही वाटतं नाही. तुम्हाला काय वाटतं ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 04/24/2024 - 09:56

In reply to नमस्कार सर , by प्रसाद गोडबोले

Permalink

छान.

नमस्कार सर , कसें आहांत !
छान.
तुम्हाला काय वाटतं ?
सध्या निवडणूकीच्या कामात आहे. नो कमेंट्स. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 04/23/2024 - 05:59

Permalink

कंजूस भौ बरोबर सहमत.

निवडणुकीच्या नावाखाली सवंग चर्चा,धुळवड खेळली जाऊ नये. नीरक्षीरविवेक बुद्धीने चर्वितचर्वण व्हावे. अर्थात सध्याच्या काळात त्याने अगदी खालची पातळी गाठली आहे हे उघड आहेच. पन्नास साठ वर्षे अनिर्बंधित एकाच पक्षाने, एकाच परिवाराने राज्य केले तेव्हां लोकशाही होती आणी आता लोक शाहीला धोखा कसा... 1975 बद्दल वर उल्लेख आलाच आहे. सिम्पथी वर जेव्हां राजीव जी चारशे पार गेले त्याचे काय.... किस्सा कुर्सी का या सिनेमावर फक्त एकच शो नंतर बंदी आणली. मी बघीतला आहे. तेव्हां संवैधानिक हक्कांची पायमल्ली झाली नव्हती का..... असे बरेच काही आठवते. हमाम मे सब नंगे.... एक लक्षात घ्या सत्तेशिवाय शहाणपण नाही. तुम करे तो रासलिला हम करे तो कॅरॅक्टर ढिला ,या तत्त्वावर विश्लेषण नसावे. बाकी कुंपणावर बसलोच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 04/23/2024 - 07:29

In reply to कंजूस भौ बरोबर सहमत. by कर्नलतपस्वी

Permalink

"चित भी मेरी पट भी मेरी" म्हणतात ना तसे

पन्नास साठ वर्षे अनिर्बंधित एकाच पक्षाने, एकाच परिवाराने राज्य केले तेव्हां लोकशाही होती आणी आता लोक शाहीला धोखा कसा... अगदी बरोबर , सुरवातीला काँग्रेस सत्तेत होती ते साहजिक होते तोच स्वान्त्र्यतील मुख्य पक्ष होता ,, पण नन्तर तो पक्ष ना राहता कुटुंबाचे चराऊ कुराण झाले हे आज काळ जी लोक "लोकशाही बुडाली" असा टाहो फोडत आहेत त्यांना दिसत नाही वर मखलाशी अशी कि " डॉक्टर चा मुलगा डॉक्टर होत तर राजकारणात काय बिघडले ?" काँग्रेस मध्ये खरंच अंतर्गत लोकशाही असती तरी फारशी चिंता नसती आणि लोकशाही टिकेल कि नाही ह्याची ज्यानना येवधी चिंता आहे त्यांना हे सुद्धा दिसत नाही कि निदान आज दीवपक्षीय लोकशाही तरी होईल ( काँग्रेस वर आली तर ) सिम्पथी वर जेव्हां राजीव जी चारशे पार गेले त्याचे काय.... हि सहानुभूती सुद्धा कशी मिळवली तर "सॉफ्ट हिंदुत्व " वापरून केशरी फुलात गुंडाळलेले अस्थी कलश देशभर फिरवून
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Tue, 04/23/2024 - 12:20

Permalink

या धाग्यात कोणत्या ही

या धाग्यात कोणत्या ही पक्षाच्या नेत्या आणि पक्ष विरुद्ध अनुचित टिप्पणी केली नाही तर धागा जिवंत राहील. फक्त मतदान आणि कोण जिंकणार इत्यादी बाबत चर्चा करा. उदा. उत्तर भारतात ६० टक्के पेक्षा कमी मतदान भाजप साठी नुकसानदेह.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/23/2024 - 12:29

Permalink

बारामती, माढ्यात निवडणूक

बारामती, माढ्यात निवडणूक आयोगाकडून तुतारी नावाचे आणखी एक चिन्ह दुसऱ्या उमेदवारास देण्यात आले आहे. तुतारीस मत देणाऱ्या चिन्हात गोंधळ उडावा ह्यासाठीच निवडणूक आयोगाने हे केलंय अस दिसतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on गुरुवार, 06/06/2024 - 09:16

In reply to बारामती, माढ्यात निवडणूक by अमरेंद्र बाहुबली

Permalink

जयंत पाटील ह्यावर बोलले.

जयंत पाटील ह्यावर बोलले. साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा पराभव ह्या चिन्हामुळे झाला असे त्यांचे म्हणणे आहे. एकूण महाराष्ट्रात ह्या चिन्हाला चार लाख मते पडली ! जर साताऱ्याचा दावा खरा असेल तर ९/१० स्ट्राईक रेट असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 06/08/2024 - 12:43

In reply to जयंत पाटील ह्यावर बोलले. by कॉमी

Permalink

कॉमी. शरद पवारांचा स्ट्राईक

कॉमी. शरद पवारांचा स्ट्राईक रेट शंभर टक्के आहे. साताऱ्यातील उमेदवार त्या एका चिन्हामुळे पडला तर रावेर मधील उमेदवार हा मुद्दाम दुबळा दिला होता पवारानी, खडसेंसाठी. १०/१० जागा जिंकलेत पवार.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/23/2024 - 13:04

Permalink

(No subject)

  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/23/2024 - 13:05

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बाबुराव on Tue, 04/23/2024 - 14:01

Permalink

सूरतेची लूट

पहिला निकाल भ्रष्टाचाराचा सूरत स्टोरी अर्थात सूरतची लूट. सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने नीलेश कुंभानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र अर्ज तपासणीत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. नीलेश कुंभानी यांच्या नामांकनावर तीन प्रस्तावकांनी स्वाक्षरी केली होती, *परंतु नंतर त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे शपथपत्र सादर केले की नामनिर्देशनपत्रावरील स्वाक्षऱ्या त्यांच्या नाहीत.* दुस-या उमेदवारास काँग्रेसने पाठिंबा दिला तर, तर त्याचाही अर्ज छाननीत उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. आणि इतर नऊ उमेदवारांनी आत्ता मुख्य लढत देणाराच उमेदवार राहिला नाही मग आम्ही लढुन काय करायचं असं 'कारण' देत उमेदवारी परत घेतली. वाह रे लोकशाही. वाह रे निवडणुका.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/23/2024 - 14:20

In reply to सूरतेची लूट by बाबुराव

Permalink

उत्तर कोरियात जश्या निवडणुका

उत्तर कोरियात जश्या निवडणुका होतात तश्या होताहेत भारतात. सर्व सरकारी यंत्रणा भारत सरकारचा पगार घेऊन मोदींसाठी काम करताना दिसताहेत. ईडी, नी निवडणूक आयोग ह्यात आघाडीवर आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कांदा लिंबू on Tue, 04/23/2024 - 15:16

In reply to उत्तर कोरियात जश्या निवडणुका by अमरेंद्र बाहुबली

Permalink

@अमरेंद्र बाहुबली

चला, या प्रतिसादासाठी घ्या तुमचा मेहनताना तुमच्या IT सेल कडून Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 04/23/2024 - 20:03

In reply to @अमरेंद्र बाहुबली by कांदा लिंबू

Permalink

कुठे त्या भुजबळांच्या नादाला

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/23/2024 - 20:17

In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे

Permalink

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) काँग्रेस सोबत शिवसेना गेली तर हिंदुत्व सोडलं, पण मेहबूबा नी अजितदादा सोबत भाजप गेली तर हिंदुत्व सोडल नाही. त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी, खोटयांचे समर्थक डॉ. श्री. खरे.
  • Log in or register to post comments

Submitted by कांदा लिंबू on Tue, 04/23/2024 - 21:02

In reply to भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन by अमरेंद्र बाहुबली

Permalink

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित.
भाजपमध्ये राहून कोणी, कुठे, केव्हा भ्रष्टाचार केलाय? काही पुरावे की नेहमीसारखी आपल्या डूआइडीपणाला जागून खोटी विधाने?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/23/2024 - 21:39

In reply to भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन by कांदा लिंबू

Permalink

पी एम केअर घोटाळ्या बद्दल

पी एम केअर घोटाळ्या बद्दल एकलय का?
  • Log in or register to post comments

Submitted by कांदा लिंबू on Wed, 04/24/2024 - 05:50

In reply to पी एम केअर घोटाळ्या बद्दल by अमरेंद्र बाहुबली

Permalink

काही पुरावे?

काही पुरावे? --- चला बटाट्यापासून सोनं बनवण्याची मशीन शोधूया.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/24/2024 - 11:22

In reply to काही पुरावे? by कांदा लिंबू

Permalink

ह्याचक अर्थ टॉक व्हिडीओ

ह्याचक अर्थ टॉक व्हिडीओ तुम्ही पूर्ण पाहिला नाही. तुम्ही आता अंधभक्त डिक्लेर झालात. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 04/24/2024 - 12:15

In reply to ह्याचक अर्थ टॉक व्हिडीओ by अमरेंद्र बाहुबली

Permalink

भक्त

भक्त
तुमच्या अजुनही लक्षातच येत नाहीये . =)))) सर्वसामान्य हिंदु हा सेक्युलर , शांतताप्रिय , मध्यममार्गीच आहे. आणि त्या सर्वांच्यासाठी भक्त हा एक अत्यंत पवित्र शब्द आहे , संकल्पना आहे . भक्तीयोग हा तीन प्रधान वैदिक योगांमध्ये ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग ह्यांमध्ये नसुनही त्याला ह्या तिन्ही पेक्षा उच्च स्थान आहे हिंदु धर्मात. तुमच्या अन सर्वच विरोधी पार्टीतील सो कॉल्ड लिबरल लोकांच्या ह्या अशा भक्त शब्दाच्या विद्रुपीकरणाने सर्वसामान्य हिंदु देखील दुखावला जाऊन भाजपाकडे झुकत आहे. अर्थात आम्हाला आनंदच आहे :) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बाबुराव on Wed, 04/24/2024 - 16:57

In reply to काही पुरावे? by कांदा लिंबू

Permalink

बटाटे ते गटर गॅस

अमृतकाळात तो दिवस दूर नाही जेव्हा कंगनाचे आत्मचरित्र, तडीपारचे किस्से आणि गटर गॅसचे विज्ञान शालेय अभ्यासक्रमात शिकवले जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/24/2024 - 17:02

In reply to बटाटे ते गटर गॅस by बाबुराव

Permalink

हा हा हा.

हा हा हा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/23/2024 - 20:24

Permalink

बचू कडू ह्या परवानगी घेऊन

बचू कडू ह्या परवानगी घेऊन ठरलेल्या सभेच्या जागी त्याचवेळी नवनीत राणा नी अमित शहांची सभा होणार आहे. ह्या विरुद्ध बच्चू कडुनी आंदोलन उभारलंय पाण पोलीसबळाचा वापर करून भाजप हे आंदोलन उधळून लावायचा प्रयत्न करतंय. पोलीसही कायद्याविरूध वागताना दिसताहेत. महाराष्ट्राची कायदव्यवस्था रसातळाला जात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 04/24/2024 - 13:01

Permalink

वाचत आहे ...

वाचत आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/24/2024 - 14:06

Permalink

२५००० कोटींच्या बँक घोटाळा

२५००० कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट. https://marathi.hindustantimes.com/amp/maharashtra/shikhar-bank-ghotala-case-closure-report-no-criminal-offence-says-eow-clearing-ajit-pawar-wife-sunetra-pawar-and-others-141713929454340.html सुबोध खरे विचारत होते ना? भाजप सोडून कुणी जातक का नाही?? :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 04/24/2024 - 17:18

In reply to २५००० कोटींच्या बँक घोटाळा by अमरेंद्र बाहुबली

Permalink

लिंक बद्दल धन्यवाद .....

या पूर्वी महावीकास आघाडी सरकारच्या काळात पहिला क्लोजर रीपोर्ट सादर झाला होता. आर्थिक गुन्हे शाखेनं आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांनादेखील क्लीन चिट दिली आहे. 'रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोनं कन्नड साखर कारखाना खरेदी केला, तेव्हा बारामती ऍग्रोची आर्थिक स्थिती चांगली असल्याने पैशांची हेराफेरी करण्यात आली नाही,' असं आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ------
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Wed, 04/24/2024 - 19:11

In reply to २५००० कोटींच्या बँक घोटाळा by अमरेंद्र बाहुबली

Permalink

नवाब मालिकांकडे चांगली संधी

नवाब मालिकांकडे चांगली संधी आहे. त्यांचीही मुक्तता होऊ शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/24/2024 - 19:49

In reply to नवाब मालिकांकडे चांगली संधी by रात्रीचे चांदणे

Permalink

नवाब मालिकांवर भाजपचा वेगळाच

नवाब मालिकांवर भाजपचा वेगळाच राग होता. शाहरुखच्या मुलाला त्यानी बाहेर काढले.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 04/24/2024 - 17:15

Permalink

कॉन्ग्रेस नवीन साम्यवाद आणू

कॉन्ग्रेस नवीन साम्यवाद आणू पाहतंय. ( त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यातून जाहीर) पण १)कोण श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे किती अतिरिक्त संपत्ती आहे हे कसं ठरवणार? २)कोण गरीब योग्य लाभार्थी आहे हे कसं ठरवणार? देशात ८० - ९० टक्के गरीब असतील तर? ३) प्रथम संपत्ती मोजायचे काम करावं लागेल. -------------- गरीब युवक आणि महिलांना वार्षिक एक लाख रुपये वाटणार......... १) हे लाभार्थी कसे वेचणार / निवडणार अगणित गरीबांतून? २) हे पैसे कुठून आणणार? ३) हा ओघ किती वर्षे ठराविक लाभार्थींना मिळणार? ४) पैसे मिळू लागल्यावर ते लाभार्थी गरीबच राहण्यासाठी काय करतील? युवकांसाठी हा नवा आशावाद आहे काय? ------------------- त्या पक्षाचे वैचारिक कुंभ कोण? असे विविध प्रश्न डोक्यात घुमत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Wed, 04/24/2024 - 17:17

Permalink

निवडणुकीचा धागा असल्यामुळे

निवडणुकीचा धागा असल्यामुळे धमाल प्रतिसाद येणार याबद्दल खात्री होती ... पण म्हणावे तसा निवडणूक ज्वर वाढलेला दिसत नाही ... जरा जास्त हिरीरीने भाग घ्यावा ही नम्र विनंती ... बाकी तीर्थरूपांकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीपैकी अर्धीच वारसांना मिळणार आणि अर्धी सरकारजमा होणार हे भारी आहे ... पण आत्ता तरी आम्हाला भीती नाही ... कारण ....... आएगा तो मोदीही
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 04/24/2024 - 17:23

In reply to निवडणुकीचा धागा असल्यामुळे by अमर विश्वास

Permalink

तीर्थरूपांकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीपैकी अर्धीच वारसां

तीर्थरूपांकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीपैकी अर्धीच वारसांना मिळणार आणि अर्धी सरकारजमा होणार हे भारी आहे ... बाय द वे... पण जमीन किलो मध्ये मोजणार की फॅरेनहीट मध्ये?
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Wed, 04/24/2024 - 17:28

In reply to तीर्थरूपांकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीपैकी अर्धीच वारसां by मुक्त विहारि

Permalink

मुवि ...

मुवि ... <<पण जमीन किलो मध्ये मोजणार की फॅरेनहीट मध्ये?>>> ते तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजता का उत्तरेकडून दक्षिणेकडे यावर अवलंबून आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Wed, 04/24/2024 - 18:55

In reply to मुवि ... by अमर विश्वास

Permalink

नाही हो.. जमीन वरुन खाली

नाही हो.. जमीन वरुन खाली मोजतात ना? की माझं काही चुकतंय?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 04/24/2024 - 20:00

In reply to नाही हो.. जमीन वरुन खाली by अहिरावण

Permalink

सूर्य पृथ्वी भोवती फिरतो.... असे काही लोकांचे म्हणणे असल्यानं...

सध्या तरी , हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.. पण, आमच्या, ३-१३-१७६०, ह्या ग्रहावर, दर तीन दिवसांनी सरकार बदलते, तशी एकके बदलतात.... जमल्यास , https://www.misalpav.com/node/39968, ह्या प्रवास प्रवास वर्णनावर , चक्कर टाकलीत तरी चालेल..
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Wed, 04/24/2024 - 20:57

In reply to नाही हो.. जमीन वरुन खाली by अहिरावण

Permalink

तुमचं बरोबर आहे ... वरून

तुमचं बरोबर आहे ... वरून खालीच मोजतात .. प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे .. ऊर्ध्वमूलम अधःशाखम.. जमीन मोजतानाच मुळं वर आले असणार
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 04/24/2024 - 21:35

In reply to तुमचं बरोबर आहे ... वरून by अमर विश्वास

Permalink

ह्या माहीती बद्दल धन्यवाद...

पण, ती किलो मध्ये मोजतात का?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 04/24/2024 - 19:54

In reply to मुवि ... by अमर विश्वास

Permalink

तसेही असेल म्हणा....

बाय द वे... जमीन किलो मध्ये मोजायला, आग्नेय ते नैऋत्य आणि ईशान्य ते वायव्य, अशी सुरुवात केली तर , आणि नैऋत्य ते आग्नेय किंवा वायव्य ते ईशान्य अशी उलट सुरुवात केली तर, किती किलो फरक पडतो? ह्यावर पण काही परमपूज्य लोकांची टिप्पणी असेलच....
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/24/2024 - 21:03

In reply to तसेही असेल म्हणा.... by मुक्त विहारि

Permalink

एक बायरोड हेलिकॉप्टर ने

एक बायरोड हेलिकॉप्टर ने जाणारा फकीर सांगू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 04/24/2024 - 21:33

In reply to एक बायरोड हेलिकॉप्टर ने by अमरेंद्र बाहुबली

Permalink

काही गोष्टी ह्या पदांसाठी राखीव असतात... उदा..

फर्स्ट क्लासचा विमान प्रवास, फाईव्ह स्टार हॉटलमध्ये होणारे वास्तव्य, सुरक्षा रक्षक इत्यादी... काही गोष्टी ह्या पुरस्कार आधारीत असतात... उदा. पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न इत्यादी.... त्यामुळे उद्या एखाद्या योग्य व्यक्तीला जर एखाद्या कंपनीने, अथवा एखाद्या देशाच्या घटनेने, सर्वोच्च पद बहाल केले तर त्या पदाच्या अनुषंगाने त्या त्या सवलती किंवा फॅसिलिटी मिळतात... मी एका कंपनीत, मॅनेजर म्हणुन काम करत असताना मला व्यक्तिगत suit मध्ये फुकट राहायची व्यवस्था करण्यात आली होती. पण मी जेंव्हा चतुर्थ श्रेणी कामगार म्हणुन काम करायची सुरुवात केली तेंव्हा Servent Quartet मध्ये चार कामगार लोकांबरोबर रहात होतो. बाय द वे, तूम्ही पण लवकरात लवकर सर्वोच्च पदावर पोहोचा.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on गुरुवार, 04/25/2024 - 09:57

In reply to काही गोष्टी ह्या पदांसाठी राखीव असतात... उदा.. by मुक्त विहारि

Permalink

सर्वोच्च म्हणजे सर्वात उंच ना

सर्वोच्च म्हणजे सर्वात उंच ना? आमच्या मते कैलास शिखर सर्वात उंच ! म्हणजे ते कैलासवासी व्हावे अशी इच्छा आहे का तुमची? असल्यास निषेध. ते रौरव नरकात जाणार असल्याचे चित्रगुप्त (मिपा सदस्य नाहि) यांनी नुकतेच शिव पार्वतीशी संवाद साधतांना सांगितल्याचे नंदीने सांगितले असे आमच्या सुत्रांकडून कळते
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com