मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्णन

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वर्णन (चालः तमाशातले सवाल जबाब) अटकर बांधा गोरा गोरा खांदा ss पदर उडतोय वार्‍यावर चवळीची तू शेंग शेलाटी लवलव लवलव करती गss ग ग ग गss (माझ्या रामा तू रं ss) गोरा रंग तुझा दुधेरी ss केस काळे मखमाली हासणं तूझं मंजूळ मोठं जणू गुलाब फुलले गाली ग ग ग गss दात तुझे मोती असती ss नाक असे अणुकूचीदार भुवयी ठळक तिरकामठी नजरेचे मारती शर ग ग ग गss पाहणं तुझ चोरून चोरून ss राग तुझा लटका ग लाजलीस हे सांगाया फुका मारसी मुरका ग ग ग गss लगबग लगबग तुझं चालणं ss काम करतीया घाईत जिंकुन घेई मनास माझ्या होशी गळ्यातली ताईत ग ग ग गss

वाचने 3317 वाचनखूण प्रतिक्रिया 8

क्रान्ति 10/05/2009 - 10:42
लावण्यगीत आवडले! [जयश्री गडकर आठवल्या.]
Untitled Album
क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com

सँडी 10/05/2009 - 20:43
मस्तच! :) -संदीप. काय'द्याच बोला.

दिपक 12/05/2009 - 13:43
वा! जबऱ्या.. तोडलंस पठ्या.. :)