Skip to main content

स्वराज्य

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 24/03/2024 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ हिंदुत्वाचा / कर्मठतेचा / संकुचित पणाचा प्रचार करणार चित्रपट अशी आवई उठवलेला गेलेला "वीर सावरकर" हा हिंदी / मराठी चित्रपट नुकताच पहिला एका शब्दात यावर परिक्षण लिहायचे तर केवळ एक शब्द विचारत येतो, तो म्हणजे "स्वराज्य .... बस .... बाकी काही नाही तरी काही ठळक मुद्दे - चित्रपटात २ विचार प्रवृत्तीतील संबंध दोन्ही बाजूने चांगले दाखवले आहेत ( -हिंसा ( जर जरुरी असेल तर )- अहिंसा / सावरकर - गांधी / जहाल - मवाळ या भारतीय इतिहासातील आणि विशेषतः ब्रिटीशांचच्या पासूनच्या स्वातात्र्य लढ्यातील काळातील याचे पैलू - गांधींच्या व्यक्तिरेखेतून त्यांची बाजू समर्थ पने दाखवली आहे आणि त्याचाच बरोबर सावरकरांची बाजू पण आणि सावरकरांवर ज्या अनेक बाबीत टिळक होते त्यालाही सडेतोड तर्क पूर्ण उत्तर दिले आहे - सावरकर यांचे : हिंदुत्व" म्हणजे राष्ट्रोययत्व आणि कोना एका धर्माचे संकुचित / कर्मठ विचार अजिबात नाहीत हे खूपच स्पष्ट पणे दाखवले आहे ( त्यांना सरळ प्रश्न विचारला जातो कि तुमच्या "हिंदू " च्या व्याख्येत कोण कोण बसत हिंदू / शीख, जैन बुद्ध ....आणि मुसलमान ? यावर त्यांचे उत्तर ऐकण्यासारखेच आहे - गांधींच्या खिलाफत चलवली ला पाठिंबा देण्याचं धोरणावर आंबेडकरांचे विचारकाय होते ते हि ऐकण्यासारखेच आहेत - १९४७ + काळातील सर्वच जाती कर्मठ असताना एका सावरकर नामक "बामनाने" हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेवर काय करावे यावरचे विचार आणि कृती आणि गांधींचे विचार हे बघितलेत तर आश्चर्य वाटेल - काही क्रॉस रेफ: गांधींचे पहिले राजकीय गुरु नामदार गोखले होते हे अँटेनबरो यांचं गांधी चित्रपटात दाखवलेले तुम्हला आठवत असेल .. ते सूत्र येथे हि एक २ दृश्यात दिसते म्हणजे दिग्दर्शकाचा अभ्यास चांगला आहे दिग्दर्शन , उत्तम,,, थोडा लांबला आहे काही ठिकाणी, आणि लेखन बहुतेक उत्तम १-२ प्रसंग क्लिष्ट ( सावरकर जेवहा चालाखीने स्वतः राजकीय कैदी असल्याचे पटवून देतात आणि कागद मागून प्रथम सरकारला पत्र लिहायला बस्तात तो प्रसंग ) आता तांत्रिक बाबी चित्रोकरण प्रकाश / सेट अप्रतिम सढळ हाताने खर्च करून वातवरण निर्मिती केली आहे वेशभूषा - रंगभूषा उत्तम पण कधी कधी विग वैगरे दिस्तात पात्र : भारतीय आणि ब्रिटिश उत्तम कलाकारांची निवड ( उगाच कोणीतरी भारत एम्बसी किंवा मौल्टीनॅशनल मधील मिळेल तो गोरा आणला आहे असे नाही ( ब्रिटिश / आयरिश जसे व्यक्ती तसे उच्चारण ) अभिनय : रणदीप हुद्दा अप्रतिम , बाकी सर्व ठीक किंवा उत्तम सर्वात शेवटी असे म्हणावेसे वाटते कि स्वराज मग ते मुघलांपासून असो कि ब्रिटिशांपासून मिळवनयसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं त्यातील काही लोकांचे खच्चीकरण गेली काही दशके झाले ते आता बाहेर येत आहे .. त्याला तुम्ही संघाला प्रोपोगांडा म्हणा हवे तर पण सत्य लपून राहत नाही हे खरे छत्रपती शिवाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय ) छत्रपती संभाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय ) बाजीराव पेशवे ( बाजीराव आणि पानिपत ) राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका ) मराठा सरदार ( पानिपत आणि तान्हाजी ) टिळक सावरकर असो अर्थात हे सगळे कपोकल्पित आहे असे कोणाचे म्हणणे अ सेल तर त्यांनी त्या अफूचं नशेत जरूर राहावे एक अजून प्रतिक्रिया https://www.youtube.com/watch?v=wzEsq6R68R8

वाचने 35823
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

बाडीस कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? एकदा म्हणतात मी वाचलं होतं माझी जन्मठेप, माफीनामा लिहील्याचा ऊल्लेख सावरकरांनी कुठेही केला नाहीये. ही माहीती त्यांनी लपवली असेच म्हणावे लागेल. मग पुरावा दिल्यावर म्हणतात अच्छा. मला वाचून बरीच वर्षे म्हणजे जवळपास दहा वर्षे झाली आहेत. माफीनाम्याला आवेदनपत्र असं नाव दिलं असेल त्यामूळे ते ठळक लक्षात राहीलं नसावं. हातात कळफलक असल्यावर तो बडवलाच पाहिजे अशी काही लोकांची स्थिती असते. त्याला उत्तर देणे हा निव्वळ कालापव्यय आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझ्या आजीप्रमाणे आणीबाणी लावून दाखवावी असं आवाहन राहुल गांधींनी केलं तर कुणाची पळता भूई थोडी होईल? ऑ !!

In reply to by मुक्त विहारि

ह्यावर ठाकरेंनी मनिपूर ला फडणवीसांनी जाऊन यावे असे आवाहन केलेय, ठाकरे खर्च ऊचलायलाही तयार आहेत. पाहू फडणवीस आवाहन स्विकारताय का.

In reply to by मुक्त विहारि

राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…” ----
हा हा...काय योगायोग आहे! आमच्या समोरच्या काकू पण परवा हेच म्हणत होत्या.राहूल गांधींना कोणी तरी हा सिनेमा दाखवा ;)

In reply to by मुक्त विहारि

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…” ---- ह्या पेक्षा फडणवीसांनी हा सिनेमा स्वपक्षातील नितेश राणेंना दाखवावा .त्यांनी सावरकरांचा अपमान केला होता. आधी स्वतच घर पहा म्हणावं.

आजच चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघीतला. सर्वांनी बघावा असा चित्रपट आहे. सावरकरांचे विचार पटतात. लहानपणापासून वाचले आहेत. हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचा सख्खा शेजारी.