"मला माझ्या मुलाला साईंटीस्ट करायचे आहे, कृपया मार्गदर्शन कराल काय?"
नेहमीच्या डॉक्टर,इंजीनीयर पेक्षा वेगळी अपेक्षा असलेले पालक पण भेटतात कधी कधी.
" माझे नाव अजिंक्य आपटे. मी आपल्या पालक सभेला दोन वर्षापुर्वी आलो होतो. माझा मुलगा आता दहावीत जाणार आहे"
अहो, पण मी ७ वीच्या मुलांसाठी पालक सभा घेत नाही.- मी
" हो, मला माहीत आहे ते. मी मुख्याध्यापकांना विनंती केली होती. गेली दोन वर्षे तुम्ही शाळेत येत नाही"
" शाळेने दुसरी काही तरी व्यवस्था केली आहे, त्यामुळे निमंत्रण नाही" -मी
"हो आजकाल ट्र्स्टीच्या नातेवाईकांपैकी कोण तरी हा कार्यक्रम करतात. दर विद्यार्थ्यामागे २०० रुपये फी पण आकारली जाते. तुम्हाला काय दीले होते?
"मला गुलाबाचे फुल देउन 'फूल' बनवले होते की. मला त्याचा काही ही त्रास नाही हो. कुणीतरी मार्गदर्शन करते आहे ना. बस्स्."-मी
"अहो एकदम तुम्ही म्हणता तेच. बहुधा टेप केले असणार"
" चालायचेच"-मी
"तुम्ही तुमची पार्श्वभुमी सांगा म्हणजे बरे पडेल"- मी
" फक्त कोरेडे आहेत नियतीने दिलेले पार्श्वभुमीवर, सर"
एकंदर कोरड्यांची कथा अशी.
आपटे साधारण चाळीशीचे. उच्च मध्यम वर्गीय एकेकाळचे. जगभर तेजी असताना ह्यांची कंपनी बंद पडली. पडली पेक्षा मालकाने पाडली. बिल्डरला जागा विकली. प्रकरण कोर्टात. त्यातच बायकोचे आजारपण. फ्लॅट विकुन जगवली बायकोला. आता उच्च वर्गीय
झोपडपट्टीत राहतात्.(वीटांनी बांधलेली) ८० फुट कार्पेट. मुलगा हुशार. ७ वी पर्यंत साधारण ८५%. आता ९३%. घरी टी.वी. आहे. पण फक्त नॅशनल जीओग्रॅफिक चॅनेल मधे रस मुलाला. मी सांगितलेल्या टिप्स मुलाने अक्षरशः शब्दशः पालन केलेले. बापाचे सध्याचे उत्पन्न फक्त ५ हजार महीना. कुठलीही नोकरी नाही. जे मीळेल ते काम करुन संसार चालु आहे.
आता ह्यांच्या मुलाला सायंटीस्ट व्हायचे आहे त्याचा खर्च कसे करणार ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते.
"हे बघा, आपटे साहेब, सद्य परिस्थीतीत उच्च शिक्षणाचा हक्क ३ जणांना. १. तुमची कॅटेगरी असायला पाहीजे. २. तुमच्याकडे भरपुर पैसा असायला पाहीजे. ३. तुमचा पाल्य अगदी उच्च श्रेणी मधे उत्तीर्ण व्ह्यायला हवा.
तो तसा उतीर्ण झाल्यावर तुम्ही आपल्या समाजाच्या विविध स्कॉलरशिप साठी अर्ज करा. म्हणजे तुमचा भार हलका होईल.
तुमच्या पुढे दोन मार्ग आहेत. मुलाने सरळ बी.एस्.सी. एम्.एस.सी चा मार्ग चोखाळावा. खर्च कमी. किंवा आज काल मुंबई विद्यापीठ
व बी.ए.आर्.सी चा संयुक्त प्रोजेक्ट आला आहे. बारावी नंतर प्रवेश दीला जातो. तुमचे सायंटिस्ट व्हायचे स्वप्न पुर्ण होईल. पण स्पर्धा
मात्र पराकोटीची. ११ वी १२ वीला मला हाक मारा. तो तुमचा खर्च ८०% कमी करुन देईन माझी ओळख वापरुन. दहावी मधे सुद्धा ९२% + मार्क मिळवायला जी मदत पाहीजे ती देईन. "
"तुमची फी काय राहील हे सर्व करायला" आपटे
"एक गुलाबाचे फुल" मी
आपटेंच्या म्हणण्यानुसार समाजाच्या विविध संस्था कडुन हुशार विद्यार्थ्याना जी स्कॉलरशिप दीली जाते ती मिळवणे फार जीकीरीचे काम असते.
जाता जाता: दहावीनंतर बहुजन समाजाचे शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते खुपच सजग असतात. विविच प्रकारच्या मदतीचे बोर्ड कोपर्या कोपर्यावर लागलेले असतात. खुपच आदर वाटतो मला त्यांचा.
आपले???????????????????
वाचने
6020
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
घ्या !
मास्तर, छान समुपदेशन!!
मास्तर !
मै
लेख
In reply to मै by विनायक प्रभू
सहमत
In reply to लेख by प्रदीप
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
काटे
१.तुमचे
In reply to काटे by विनायक प्रभू
"हक्क"
+१
In reply to "हक्क" by विजुभाऊ
आमरस
In reply to "हक्क" by विजुभाऊ
खरे
सर,
शिक्षण,
धन्यवाद
आता यावर
जमेल
सहमत
ह्म्म्म्म
निर्णय
In reply to ह्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
जमेल
आम्ही
खरच
टायटल कळले
लेख आवडला
हक्क
नक्की काय
(विषय दिलेला नाही)
शुभेछ्छा!
मुलाने सरळ
पिडांशी १००% सहमत!
In reply to मुलाने सरळ by पिवळा डांबिस
अगदी
In reply to पिडांशी १००% सहमत! by चतुरंग
मास्तर एक
प्रकल्प
आपल्याकडे