नमस्कार मंडळी,
वरील विषयाच्या अनुषंगाने मिपावर आणि इतरही संस्थळावर अनेक चर्चा झालेल्या आहेत, वाचल्या आहेत पण पाऊस पडायला लागल्यावर घर बांधायची तयारी करायची ह्या जन्मजात सवयीमुळे ऐनवेळीचा काथ्याकुट करत आहे तेव्हा अगोदरच माफी मागतो. बर्याच चर्चा SSC/ CBSE बोर्डाच्या अनुषंगाने आहेत. ICSE च्या अनुषंगाने देखील चर्चा व्हावी म्हणून देखील हा प्रपंच !
सर्वप्रथम मुलाविषयी :
मुलगा आता ९ वी मधे जाईल. शाळेत ICSE बोर्ड आहे आणि त्यांनी विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. पण जेवढे निवड स्वातंत्र्य तेवढा अधिक गोंधळ अशी परिस्थिती आहे.
मुलगा बर्यापैकी हुशार / एकपाठी आहे. शाळेचा आग्रह आणि मुळातच वडिलांकडून मिळालेले कंटाळ्याचे संस्कार यामुळे अजुन बाहेरची शिकवणी लावलेली नाही तरीही 85% ते 90% पर्यंत गुण मिळवत आहे. (सायन्स, गणित सगळ्याच विषयात).
मुलाला पुढे जाऊन झुलॉजीस्ट बनायचे आहे असे तो म्हणतो. म्हणजे नक्की काय करायचे ते त्याला आणि मला देखील कळत नाही आणि ते करेलच याची शाश्वती वाटत नाही. अर्थात या वयात त्याच्याकडून लगेच तशी अपेक्षा नाही. ते असो.
मुळ विषय असा की त्याला गणितात बर्यापैकी गती आहे पण त्याला तो विषय आवडत नाहीये आणि घ्यायचा नाहिये.बर्याच जणांशी चर्चा केल्यानंतर गणित सोडू नये असे जवळजवळ 99% मंडळींचे मत पडले. यात गणितात ओ की ठो कळत नसलेले / त्याचे सध्याचे शिक्षक / इतर शिकलेली मंडळी या सगळ्यांचा समावेश असलेली मंडळी आहेत.
विषयांची विभागणी ४ भागांत आहे.
भाग 1 : अनिवार्य विषय : ( यातील सगळे विषय घ्यायचे आहेत.)
English Language
English Literature
Hindi
History Civics
Geography
-----
भाग २ : ऐच्छिक विषय : ( यातील कोणतेही दोन किंवा तीन विषय घ्यायचे आहेत.)
Science (Physics, Chemistry, Biology)
Environmental Science
Mathematics
Commercial Studeies
Economics
भाग ३ : ऐच्छिक विषय : ( यातील कोणतेही दोन विषय घ्यायचे आहेत )
Computer application (Java coding)
Commercial application
Economics Application
Environmental Application
Home Science
Physical Education
नोंद : यातील पहिल्या आणि शेवटच्या विषय घेऊ नये इतपत निर्णयावर घरातील सर्व सदस्यांचे एकमत झालेले आहे).
भाग 4 : श्रेणीबद्ध (ग्रेडेड) विषय : ( दोन्ही विषय घ्यायचे आहे पण पुढील वाटचालीच्या दृष्टिने यात मिळविलेल्या गुणांमुळे काही परीणाम होणार नाही. केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे)
Marathi
SUPW - Socially Usefull Productive Work
गुणविभागणी खालील प्रमाणे
Group 1
Theory Paper - 80 Marks
Internals - 20 Marks
Group 2
Theory Paper - 80 Marks
Internals - 20 Marks
Group 3
Theory Paper - 100 Marks
Internals - 100 Marks
वर जवळपास सगळीच माहिती दिली आहे तरीही काही निसटले असण्याची शक्यता आहे. मुळ मुद्दा असा की गणित विषय न घेतल्यास पुढील आयुष्यात किती नुकसान होईल ? पुढील आर्थिक स्थितीवर कितपत परींणाम होऊ शकतो.
गणित निवडले आणि त्यात अपयश आले तर किती नुकसान होऊ शकेल याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे तेवढा भाग चर्चेला घेतलेला नाही पण तेव्हाचा आणि आताचा अभ्यासक्रम, करीअर ची क्षेत्र विस्तारीत / बदल झाल्यामुळे अचूकतेच्या जवळपास जाणारा अंदाज नाही.
प्रतिसादांच्या प्रतिक्षेत :
धन्यवाद !
वर्गीकरण
वाचने
6036
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणित घ्यायचे नसल्यास सायन्स
अर्थशास्त्रात गणित नसतं का? :
In reply to गणित घ्यायचे नसल्यास सायन्स by कंजूस
फिजिक्सला लागतं इतकं नसतं.
In reply to अर्थशास्त्रात गणित नसतं का? : by सतिश गावडे
श्रेणीबद्ध (ग्रेडेड) विषय आणी गणित
कंजूस आणि स्वच्छंदी_मनोज
गणित...
काहीही करा पण आपल्या विषयचे शिखर गाठा.
In reply to गणित... by कर्नलतपस्वी
माझा स्वताचा प्रवास व्य नि करेन.
In reply to गणित... by कर्नलतपस्वी
you should have employable
एक माहीती
आपले डोके चालवण्यापेक्षा पैसे टाकुन तज्ञाचे मत घेतलेले बरे.
In reply to एक माहीती by राजेंद्र मेहेंदळे
गणिताशिवाय फिजिक्स कामाचे
दहावीपर्यंत तरी गणित अभ्यासावे
स्पर्धा परीक्षांचे गणित
एक करीअर म्हणून फॉरेन्सिक
सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे आभार !
विषय बरोबर निवडले आहेत.
योग्य संदेश....
In reply to विषय बरोबर निवडले आहेत. by कर्नलतपस्वी
रोचक धागा आणि माहितीपूर्ण
https://www.misalpav.com/node
प्रतिसाद आवडला
In reply to https://www.misalpav.com/node by सुबोध खरे
माझे दोन शब्द