Skip to main content

शिक्षण / करिअर / प्रगती

शालेय विषय निवडीबद्दल मार्गदर्शन

लेखक धर्मराजमुटके यांनी गुरुवार, 07/03/2024 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, वरील विषयाच्या अनुषंगाने मिपावर आणि इतरही संस्थळावर अनेक चर्चा झालेल्या आहेत, वाचल्या आहेत पण पाऊस पडायला लागल्यावर घर बांधायची तयारी करायची ह्या जन्मजात सवयीमुळे ऐनवेळीचा काथ्याकुट करत आहे तेव्हा अगोदरच माफी मागतो. बर्‍याच चर्चा SSC/ CBSE बोर्डाच्या अनुषंगाने आहेत. ICSE च्या अनुषंगाने देखील चर्चा व्हावी म्हणून देखील हा प्रपंच ! सर्वप्रथम मुलाविषयी : मुलगा आता ९ वी मधे जाईल. शाळेत ICSE बोर्ड आहे आणि त्यांनी विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. पण जेवढे निवड स्वातंत्र्य तेवढा अधिक गोंधळ अशी परिस्थिती आहे. मुलगा बर्‍यापैकी हुशार / एकपाठी आहे.

सहज सोपा डिग्री चा छापा कसा मिळवावा ?

लेखक रानरेडा यांनी रविवार, 13/05/2018 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वेळा काही करणा साठी कोठलीही डिग्री असणे जरुरी असते काही मुले फार झटपट सेल्स मध्ये लागतात . अभ्यास राहून जातो आणि डिग्री पूर्ण होत नाही . मग काही काळाने प्रमोशन थांबते कारण तुम्ही ग्रेजुएट नसता . ( अशा केस माहित आहेत ) तुम्ही चांगले सेल्स मन असता , टीम लीडर असता पण म्यानेजर बनवायला ती डिग्री लागतेच . अशा वेळी एक छापा डिग्री ची गरज असते . किंवा Diploma असेल तर Graduate चा छापा पाहिजे असेल तर काय करावे लागेल ? हा खूप जणांना प्रोब्लेम येतो . Engineering Diploma / Hotem management diploma ननंतर UPSC /MPSC / Government Exam द्याच्या असतात किंवा MBA करायचे असते .