✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(४) : रक्तगटांचा शोध

ह
हेमंतकुमार यांनी
Tue, 10/23/2018 - 12:31  ·  लेख
लेख

Book traversal links for वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(४) : रक्तगटांचा शोध

  • ‹ वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(३) : थायरॉइड व इ.सी.जी
  • Up
  • वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(५) : पेनिसिलिन ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36981 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

फारच छान माहितीपूर्ण लेख.

टर्मीनेटर
Tue, 10/23/2018 - 12:53 नवीन
फारच छान माहितीपूर्ण लेख. माझा रक्तगट 'B' Rh-negative आहे. मध्यंतरी बायकोने कुतेतरी वाचले होते कि रक्तगट Rh-negative असणे हे माणसांचे नाही तर एलियन्स चे लक्षण आहे. त्यावरून माझी बरीच मस्करी ती करत असे, आता तिला हा लेख वाचायला देतो :) मी आणि माझा एक मित्र (ज्याचा रक्तगट AB Rh-negative आहे) २-३ वेळा स्वेच्छेने रक्तदान करायला गेलो असताना दोघांचे रक्तगट Rh-negative असल्याने त्यांनी त्यावेळी आमचे रक्त न घेता फोन. नंबर्स घेतले होते आणि आवश्यक असेल तेव्हा आम्ही कॉल करू असे सांगितले होते.
  • Log in or register to post comments

१. मुळातच, AB व Rh-negative

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/23/2018 - 18:35 नवीन
१. मुळातच, AB व Rh-negative हे रक्तगट विरळ आहेत. अर्थातच, त्याचे संयोजन (काँबिनेशन) खूप विरळ आहे. सर्वसाधारणपणे, AB+ रक्तगटसमुह ३.४% लोकांत आणि AB- रक्तगटसमुह ०.६% लोकांत (पक्षी : अत्यंत विरळ) असतो. यात देश आणि/अथवा वर्णाप्रमाणे थोडासा फरक असू शकतो. २. शरीराबाहेर काढलेल्या रक्ताला समाप्ती-तारीख (एक्सपायरी डेट) असते. म्हणजेच, ठराविक कालावधीत ते वापरले गेले नाही तर त्याची उपयुक्तता कमी होते किंवा संपते. त्यामुळे, अश्या विरळ रक्तगटांच्या लोकांचे रक्त आधिपासून काढून साठविण्याऐवजी, गरज पडेल तेव्हा त्यांना बोलवून घेऊन रक्त मिळवणे जास्त संयुक्तिक ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

@ डॉ सुहास म्हात्रे

टर्मीनेटर
Wed, 10/24/2018 - 18:46 नवीन
विस्तृत माहितीसाठी धन्यवाद डॉक्टर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मस्त लेख आहे. आवडला.

यशोधरा
Tue, 10/23/2018 - 13:20 नवीन
मस्त लेख आहे. आवडला.
  • Log in or register to post comments

मूलभूत संशोधन शेकडो प्रयोग,

अनिंद्य
Tue, 10/23/2018 - 13:32 नवीन
मूलभूत संशोधन शेकडो प्रयोग, दुरुस्त्या आणि प्रत्यय अश्या अनेक पायऱ्यातून कसे जाते ह्याची थोडक्यात झलक ह्या मालिकेमुळे मिळत आहे. ह्या संशोधकांचे मानव जातीवर अनेक उपकार आहेत हेच खरे. अनिंद्य
  • Log in or register to post comments

पण रक्तदानाबद्दल वाचतांना

अनिंद्य
Tue, 10/23/2018 - 13:32 नवीन
पण रक्तदानाबद्दल वाचतांना सारखे 'अमर अकबर अँथोनी' मधला निरुपा रॉयला रक्त चढवायचा सीन आठवून हसायला येत होते :-)
  • Log in or register to post comments

वरील सर्वांचे आभार

हेमंतकुमार
Tue, 10/23/2018 - 14:56 नवीन
टर्मिनेटर, अहो एलियन्स कुठले, तुम्ही तर हाडामासाचे मिपाकर ! अनिंद्य, तो किस्सा काही आठवत नाही, तुम्हीच सांगा.
  • Log in or register to post comments

सांगायचे काय, बघाच तुम्ही थेट

अनिंद्य
Tue, 10/23/2018 - 15:30 नवीन
सांगायचे काय, बघाच तुम्ही थेट : हा सीन हिंदी सिनेमाच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. :-) https://www.youtube.com/watch?v=Z8TzAQXeYFk
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

पाहिले हो ते गाणे..

हेमंतकुमार
Tue, 10/23/2018 - 19:31 नवीन
लय भारी असेच म्हणतो ! डॉ सुहास, पूरक माहितीबद्दल आभार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

धन्यवाद!

लई भारी
Tue, 10/23/2018 - 16:43 नवीन
अगदी त्रोटक माहिती होती आधी, विस्ताराने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नेहमीप्रमाणे सोप्या भाषेत! Rh -ve हा गट अभावानेच आढळतो, असे का असावे?
  • Log in or register to post comments

शंकानिरसन

हेमंतकुमार
Tue, 10/23/2018 - 19:25 नवीन
Rh -ve हा गट अभावानेच आढळतो, असे का असावे? >> चांगला प्रश्न. मुळात हे विधान जगातील सर्व वंशांना लागू नाही. हे पहा Rh –ve चे प्रमाण (%) : १. Basques (युरोपातील भाग) : ३५ २. मोरोक्कोतील वंश : २९ ३. अमेरिकी वंश : १५ ४. भारत : ०.६ ते ८.५ म्हणजेच या आढळाची कारणे वांशिक आहेत. Rh +ve असण्याचे काही फायदे आहेत. त्यातला एक म्हणजे Toxoplasma या जंतूसंसर्ग पासून संरक्षण. अर्थात हे काही प्रमाणात लागू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लई भारी

नेहमीप्रमाणेच, सुंदर

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/23/2018 - 18:11 नवीन
नेहमीप्रमाणेच, सुंदर माहितीपूर्ण लेख !
  • Log in or register to post comments

फायनल डायग्नोसिस व रक्तगट

चौकटराजा
Wed, 10/24/2018 - 10:30 नवीन
आर्थर हेली यांची वर नाव दिलेली एक कादंबरी आहे . आर एच निगेटिव्ह व दुसरे बाळ यांचे मतिमंदत्व असा काहीसा या कादंबरीचा विषय होता . ते काय प्रकरण आहे . हल्ली दिवस असलेल्या मातेचे रक्त व तिच्या पतीचे रक्त यांचा आर एच समजून घ्यावा लागतो ना ? अँटिजेन व अँटीबॉडी ही जर दोन्ही प्रथिनेच आहेत तर त्यांचे कार्य काय स्वरूपात भिन्न आहे ? बाकी या लेखात मला क्रान्तिकारी वाटणारा विषय आहेच ! आता आर एन ए , डी एन ए कधी घेता ?
  • Log in or register to post comments

चौ रा, धन्यवाद

हेमंतकुमार
Wed, 10/24/2018 - 11:14 नवीन
मालेतील विषय कालानुक्रमे घेत आहे. काळजी नसावी ! तसेच निवडलेला विषय वाचकांना रंजक वाटेल ही कसोटी लावत आहे. आर एच बद्दल सविस्तर उत्तर नंतर देतो
  • Log in or register to post comments

चौ रा, आर एच बद्दल...

हेमंतकुमार
Wed, 10/24/2018 - 11:48 नवीन
हल्ली दिवस असलेल्या मातेचे रक्त व तिच्या पतीचे रक्त यांचा आर एच समजून घ्यावा लागतो ना ? >>>> होय, ते माहित असलेले चांगले. आता प्रश्न कधी उद्भवतो ते बघा. १. समजा आई Rh –ve व वडील +ve आहेत. २. मग गर्भातले मूल +ve वा –ve असू शकते. ३. समजा ते +ve आहे. ४. पहिल्या गरोदरपणात सहसा काहीच बिघडत नाही. कारण मुलाचा जन्म होईपर्यंत त्याचे रक्त आईच्या रक्तात मिसळत नाही. ५. प्रत्यक्ष बाळंत होताना placenta तुटतो आणि मग बाळाचे रक्त आईच्यात जाते. त्यातून +ve प्रकारच्या लालपेशी आईत जातात. ६. आई –ve असल्याने आता तिचे शरीर Rh-विरोधी antibodies तयार करते. पण पहिल्या बाळाचा जन्म आधीच झालेला असल्याने त्याला काहीच त्रास नाही. ७. पुढे ती दुसऱ्या वेळेस गरोदर झाली आणि तेव्हाचे बाळ +ve असेल तर मग तिच्या रक्तातील antibodies बाळात जाऊन त्याच्या लालपेशीचा नाश करतील. ८. पण, असे होऊ नये म्हणून या गरोदरपणात Rh immunoglobulin हे इंजेक्शन तिला दिले जाईल ज्यामुळे वरील पेशी-मारामारीची प्रक्रिया होणार नाही.
  • Log in or register to post comments

बापरे, बराच गुंतागुंतीचा आहे कि हा प्रकार.

टर्मीनेटर
Wed, 10/24/2018 - 18:48 नवीन
बापरे, बराच गुंतागुंतीचा आहे कि हा प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

अगदी खरंय,

हेमंतकुमार
Wed, 10/24/2018 - 19:56 नवीन
सामान्य माणसाचे हे वाचताना डोके अगदी भंजाळून जाते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

छान लेख

तुषार काळभोर
Wed, 10/24/2018 - 20:35 नवीन
अखिल मानवजातीवर अनंत उपकारक असा शोध!! इट डिजर्वस मच मोर दॅन या नोबल.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण लेख.

राघवेंद्र
गुरुवार, 10/25/2018 - 07:25 नवीन
नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण लेख. मुलांचा रक्त गट कसा ठरतो ? आई किंवा वडीलांचा असतो की वेगळा ही असू शकतो. माझ्या ऐकीव माहिती प्रमाणे रक्त गट AO , BO, AB आणि OO असे आहेत पण कुठेही ही माहिती मिळत नाही. रक्तगटाचे ही नावे खरीच आहेत का ?
  • Log in or register to post comments

शंकानिरसन

हेमंतकुमार
गुरुवार, 10/25/2018 - 09:54 नवीन
मुलांचा रक्त गट कसा ठरतो ? आई किंवा वडीलांचा असतो की वेगळा ही असू शकतो? >>> चांगला प्रश्न. हे समजून घ्यायला जीवशास्त्राची पार्श्वभूमी लागेल. १. समजा एखाद्याचा गट A आहे तर त्याला phenotype A म्हणतात. २. या A च्या अंतर्गत २ genotypes असू शकतात : AA किंवा AO. त्यातला कुठला हे त्याच्या आईवडिलांच्या genotypes वर ठरेल. ३. A व B हे antigens अनुवंशिकतेत ‘प्रबळ’ असतात तर O (शून्य) हा दुर्बल असतो. ४. त्यामुळे O गट असणाऱ्याचा genotype OO च असतो. ५. समजा, वडील A व आई B गटाचे आहेत . तर त्यांना होणारी मुले ही A, B, AB अथवा O ची सुद्धा असू शकतात. हे समजण्यासाठी खलील चित्र पहा : Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

सुंदर विश्लेषण !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/25/2018 - 14:24 नवीन
सुंदर विश्लेषण ! फक्त, एक छोटीशी पुरवणी. A = लाल रक्तपेशीच्या आवरणात A अँटिजेन (प्रोटीन) आहे. B = लाल रक्तपेशीच्या आवरणात B अँटिजेन (प्रोटीन) आहे. AB = लाल रक्तपेशीच्या आवरणात A आणि B हे दोन्ही अँटिजेन्स (प्रोटीन्स) आहेत. O = लाल रक्तपेशीच्या आवरणात A आणि B हे दोन्हीही अँटिजेन्स (प्रोटीन्स) नाहीत... त्यांचा अभाव आहे. Rh Positive = लाल रक्तपेशीच्या आवरणात Rh अँटिजेन (प्रोटीन) आहे. Rh Negative = लाल रक्तपेशीच्या आवरणात Rh अँटिजेन (प्रोटीन) नाही... त्याचा अभाव आहे. थोडक्यात, A, B, AB व Rh Positive हे रक्तगट व्यक्तीत ते ठराविक अँटिजेन्स (प्रोटीन्स) असल्याचे दर्शवतात, तर... O किंवा Rh Negative हे रक्तगट त्या व्यक्तीत अनुक्रमे A/B किंवा Rh अँटिजेन्सचा (प्रोटीन्सचा) अभाव दर्शवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

डॉ सुहास,

हेमंतकुमार
गुरुवार, 10/25/2018 - 14:38 नवीन
अगदी सहमत. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सुंदर आणि सोप्या पद्धतीत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

राघवेंद्र
गुरुवार, 10/25/2018 - 21:11 नवीन
सुंदर आणि सोप्या पद्धतीत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

मस्त

गुल्लू दादा
गुरुवार, 10/25/2018 - 09:29 नवीन
माहितीपूर्ण लेख
  • Log in or register to post comments

@ चौ रा, आता तुमचा दुसरा प्रश्न घेतो:

हेमंतकुमार
गुरुवार, 10/25/2018 - 10:09 नवीन
अँटिजेन व अँटीबॉडी ही जर दोन्ही प्रथिनेच आहेत तर त्यांचे कार्य काय स्वरूपात भिन्न आहे ? >>>> अँटिजेन = हे प्रथिन शरीराच्या दृष्टीने ‘परकीय’ असते. ते जेव्हा शरीरात शिरते, तेव्हा ते आपल्या प्रतिकारयंत्रणेला (immune system) उत्तेजित करते. त्यातून अँटीबॉडी निर्माण होते आणि पुढे अँटिजेन व अँटीबॉडीचे संयुग तयार होते. अँटीबॉडी = हे शरीराने तयार केलेले प्रथिन असून ते (परकीय) अँटिजेनच्या विरोधात लढते. थोडक्यात, अँटिजेन ही तलवार असेल तर अँटीबॉडी ही ढाल आहे !
  • Log in or register to post comments

सुरेख .....

सुधीर कांदळकर
गुरुवार, 10/25/2018 - 13:18 नवीन
आकृत्यांमुळे समजणे सोपे झालेच, वर लेखाचे सादरीकरणही सौंदर्यपूर्ण झाले. आवडले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

हेमंतकुमार
Fri, 10/26/2018 - 10:32 नवीन
सुयोग्य प्रश्न, चांगली चर्चा, प्रतिसाद आणि प्रोत्साहनाबद्दल सर्व सहभागींचे आभार !
  • Log in or register to post comments

जरा वेगळी चौकशी

चौकटराजा
Fri, 10/26/2018 - 19:13 नवीन
प्रत्येक अँटीजेन ला एक विशिष्ट प्रोटीन कॅप असते का ? अशा कॅप ला किल्ली समजले तर अँटीबॉडीच्या तशांच प्रोटीन कॅप ला कुलूप म्हणावे काय ? आपलया शरीराला विविध अमायनो ऍसिड चा पुरवठा ना मिळाल्यास अँटीबॉडीचे विशिष्ट कुलूप निर्माण करण्यात " कच्चा माल " कमी पडला असे असते का ? काहींची सर्दी लवकर बरी झाली काहिची उशीरा यात या कच्च्या मालाच्या पुरवठ्याची भूमिका महत्वाची ठरते काय ?
  • Log in or register to post comments

शंकानिरसन

हेमंतकुमार
Fri, 10/26/2018 - 19:30 नवीन
आपलया शरीराला विविध अमायनो ऍसिड चा पुरवठा ना मिळाल्यास अँटीबॉडीचे विशिष्ट कुलूप निर्माण करण्यात " कच्चा माल " कमी पडला असे असते का ? >>> होय, बरोबर. आपली प्रतिकारशक्ती 'इम्म्युनोग्लोब्युलिनस' वर अवलंबून असते. ती प्रथिने असल्यामुळे शरीरात ती तयार करण्यास उच्च प्रथिनयुक्त आहार (कच्चा माल) आवश्यक असतो. त्यातूनच योग्य ती अमिनो आम्ले मिळतात. म्हणून, कुपोषण >> प्रथिन कमतरता >> 'इम्म्युनोग्लोब्युलिनसचे कमी उत्पादन >>> ढासळती प्रतिकारशक्ती
  • Log in or register to post comments

लेखमालेतील भाग ५

हेमंतकुमार
Mon, 10/29/2018 - 09:51 नवीन
इथे आहे: https://www.misalpav.com/node/43526
  • Log in or register to post comments

एक शंका

वन
Sat, 11/03/2018 - 10:04 नवीन
एक शंका आपण लेखात वर्णन केलेल्या एबीओ आणि आरएच व्यतिरिक्त रक्तगटाच्या अन्य काही प्रणाली असतात का? असे कुठेतरी ऐकले होते.
  • Log in or register to post comments

वन, चांगला प्रश्न.

हेमंतकुमार
Sat, 11/03/2018 - 10:33 नवीन
रक्तगटाच्या तशा एकूण ३४ प्रणाली आहेत. त्यापैकी ABO व Rh या antigenic गुणधर्माच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या आहेत. अन्य प्रणालीतले antigens सौम्य असतात. तरीदेखील रुग्णास रक्त देण्यापूर्वी त्याचे व दात्याचे रक्त प्रयोगशाळेत एकत्रित तपासले जाते. त्यात Cross matching, antibody screening अशा चाचण्या करतात. त्यामुळे ‘इतर’ प्रणालीतील antigensची दखल घेतली जाते. त्यामुळेच रक्त संक्रमण जास्तीत जास्त सुरक्षित होते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद डॉ.

वन
Sat, 11/03/2018 - 12:03 नवीन
धन्यवाद डॉ. म्हणजे दोन माणसांचा रक्तगट जरी एकच असेल तरी वर तुम्ही सांगितलेल्या चाचण्या केल्याशिवाय ते एकमेकास रक्त देऊ शकत नाहीत. बरोबर ना ?
  • Log in or register to post comments

होय

हेमंतकुमार
Sat, 11/03/2018 - 12:15 नवीन
अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments

इतर काही antigens...

हेमंतकुमार
Fri, 06/14/2019 - 11:46 नवीन
ABO व Rh सोडून लालपेशीतील इतर काही antigens मुळे कशी समस्या येते यासंबंधीची आजची बातमी: नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा व त्याच्या आईचा गट A Rh +ve. या बाळाला जन्मतःच कावीळ झाली आणि हिमोग्लोबिन धडाधड कमी होऊ लागले. त्याला तातडीने रक्त द्यावे लागणार होते पण त्याच्या आईचे (त्याच गटाचे) क्रॉस-match होत नव्हते. बातमी इथे: https://www.esakal.com/pune/thirty-six-hours-baby-fighting
  • Log in or register to post comments

१ ऑक्टोबर

हेमंतकुमार
Fri, 10/01/2021 - 08:18 नवीन
आज राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन आहे. या निमित्त सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा ! सिंधुदुर्ग मधील सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान हे या संदर्भात खूप चांगले काम करीत आहे. विविध उपक्रमांत बरोबरच ते बॉम्बे ब्लड ग्रुप या अतिदुर्मिळ रक्तगटाचे दाते शोधण्याची मोहीम राबवत आहेत. हा रक्तगट आपल्या लोकसंख्येत साधारण 10 लाखात चार इतक्या अत्यल्प प्रमाणात आढळतो. संबंधित प्रतिष्ठानचे अभिनंदन व शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

दुर्मिळ रक्तगट

हेमंतकुमार
Mon, 04/11/2022 - 11:45 नवीन
दुर्मिळ रक्तगट जबलपूर येथील एका ३० वर्षीय पुरुषात एक दुर्मिळ रक्तगट सापडला आहे. त्याचे नाव Ael असे असून तो A गटाचा एक उपप्रकार असतो. परंतु तो लक्षात येण्यासाठी काही उच्च पातळीवरील जनुकीय चाचण्या कराव्या लागतात. हे गृहस्थ नियमित रक्तदाते असून आतापर्यंत त्यांचा रक्तगट सामान्य चाचण्यांच्या आधारे O निगेटिव्ह असा धरला होता. परंतु यावेळेच्या रक्तदानानंतर संबंधित डॉक्टरांना चाचणी करताना काही शंका आल्याने त्यांनी वेगळ्या चाचण्या करवून घेतल्या. https://www.thehindubusinessline.com/news/science/meet-the-jabalpur-man-with-the-rarest-of-blood-groups-ael/article65297038.ece/amp/ अशाच प्रकारचा रक्तगट एका चिनी माणसामध्ये पूर्वी आढळलेला आहे. जगभरात या उपप्रकाराची खूप कमी माणसे आहेत. https://www.nature.com/articles/jhg2005102
  • Log in or register to post comments

१४ मे

हेमंतकुमार
Sat, 05/14/2022 - 11:28 नवीन
जागतिक रक्तदान दिनानिमित्त सर्व नियमित दात्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

१४ जून

हेमंतकुमार
Tue, 06/14/2022 - 07:49 नवीन
१४ जून : Karl Landsteiner यांचा जन्मदिन जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. सर्व नियमित दात्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

वामन देशमुख
Tue, 06/14/2022 - 15:41 नवीन
मी अनेकदा वेळोवेळी रक्तदान करतो. माझे एक स्नेही महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेत अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत पन्नासहून अधिक वेळा रक्तदान केले आहे. --- अवांतर मत: रक्तदान शिबिरांत शक्यतो रक्तदान करू नये, जेंव्हा कुणाला गरज असेल तेंव्हा रक्तदान करावे. चूभूदेघे. --- सवांतर प्रश्न: रक्तदान केल्याने रक्तदात्याला काही शारीरिक उपयोग / फायदा होतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वा दे,

हेमंतकुमार
Tue, 06/14/2022 - 16:50 नवीन
छान, अभिनंदन ! *जेंव्हा कुणाला गरज असेल तेंव्हा रक्तदान करावे. >>> हे केव्हाही उत्तम. **रक्तदान केल्याने रक्तदात्याला काही शारीरिक उपयोग / फायदा > मानसिक समाधान हा फायदा. (काही लोह- निगडित आजारांत ठराविक रक्त काढून टाकणे हा उपचार असतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

दुर्मिळ रक्तगट

हेमंतकुमार
गुरुवार, 07/14/2022 - 20:01 नवीन
भारतातील एका व्यक्तीमध्ये एक दुर्मिळ रक्तगट सापडला असून या रक्तगटाच्या फक्त दहा व्यक्ती सध्या जगभरात आहेत. यानिमित्ताने Emm ही एक नवी रक्तगट प्रणाली दखलपात्र झाली आहे. बातमी
  • Log in or register to post comments

प्लेटलेटस गरज...

हेमंतकुमार
Fri, 11/04/2022 - 08:38 नवीन
डेंग्यूचे रुग्ण वाढलेले असल्याने त्यांना प्लेटलेटचे उपचारही मोठ्या प्रमाणावर द्यावे लागत आहेत. त्यातून रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटचा तुटवडा झालेला आहे. उत्स्फूर्त रक्तदानाचे आवाहन
  • Log in or register to post comments

कौतुकास्पद

हेमंतकुमार
गुरुवार, 11/10/2022 - 08:47 नवीन
सध्या रक्तपेढ्यांना प्लेटलेटचा तुटवडा जाणवत असल्याचा वर उल्लेख केलेला आहे. त्या संदर्भातील एक कौतुकास्पद कार्य : श्री सचिन मराठे हे त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच नियमित रक्तदाते आहेत. 2010 पासून ते पुण्यातील एका रक्तपेढीत महिन्यातून एकदा असे नियमित प्लेटलेट्स दान करतात. आतापर्यंत त्यांनी 130 वेळा असे दान केलेले आहे. अभिनंदन !
  • Log in or register to post comments

मायलॅब : राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार

हेमंतकुमार
Tue, 05/16/2023 - 09:04 नवीन
रक्तसंक्रमणातून एचआयव्ही आणि हेपेटाइटिस यांचे विषाणू ( HIV, HBV, and HCV) संक्रमित होण्याचा धोका असतो. म्हणून प्रत्येक रक्तदात्याची यासंदर्भात संक्रमणपूर्व चाचणी केली जाते. हे तीनही विषाणू एकाच चाचणीने ओळखणारे NATSpert ID TripleH Detection Kit हे तंत्रज्ञान मायलॅब डिस्कवरी सोल्युशन्स यांनी विकसित केलेले आहे. हे संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान आहे. या उपक्रमाबद्दल संबंधित उद्योगाला केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार दिला गेलेला आहे. अभिनंदन !
  • Log in or register to post comments

दुर्दैवी मृत्यू

हेमंतकुमार
Fri, 02/23/2024 - 17:53 नवीन
AB Rh+ रक्तगट असलेल्या सचिन शर्मा या २३ वर्षीय तरुणाला रुग्णालयाच्या चुकीने O Rh+ या गटाचे रक्त दिले गेले. परिणामी त्याच्या शरीरात घातक प्रतिक्रिया होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे. आदरांजली ! या घटनेच्या बातम्यांनुसार सचिनचा रक्तगट हा AB Rh+ होता आणि त्याला चुकून O Rh+ हे रक्त दिले गेलेले आहे. म्हणून कुठलेही रक्त संक्रमण करण्यापूर्वी दाता व स्वीकारणारा यांच्या रक्ताचे प्रयोगशाळेत क्रॉस मॅचिंग करणे अत्यावश्यक असते. O रक्तगटाचे काही उपप्रकार असे आहेत, की ज्यामध्ये आर एच व्यतिरिक्त अन्य अँटीजेन्सचा समावेश असतो. त्यांच्यामुळे वरील प्रकारची दुर्घटना घडली असावी. अधिक चौकशीअंती गोष्टी स्पष्ट होतील.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा